________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
भांडायचेच असेल तर वाट पाहायची. जेव्हा मुले स्कूलमध्ये जातील तेव्हा तासभर भांडत बसा. परंतु मुलांच्या उपस्थितीत असे भांडण - मारामारी झाली तर मुले पाहातात आणि मग त्यांच्या मनात लहानपणापासून आई-वडीलांच्या बाबतीत विरोधी भावना तयार होते. त्याचा सकरात्मक भाव सुटून नकरात्मकता सुरु होते. अर्थात् आता तर मुलांना बिघडविणारे आईवडीलच आहेत!
१०
म्हणून आपल्याला भांडायचे असेल तर एकांतामध्ये भांडा, मुलांच्या उपस्थितीत नाही. एकांतामध्ये दरवाजा बंद करुन दोघे समोरासमोर भांडायचे तर भांडा.
महाग आंबे आणले आणि आमरसासोबत पोळ्या तयार करुन पत्नीने जेवायला वाढले आणि जेवणाची सुरुवात झाली. थोडे खाल्ले आणि पुढे जसे कढीत हात घातला आणि कढी जरा खारट लागली तर डाइनिंग टेबलवर ठोकून ओरडतो की, 'कढी खारट करुन टाकली आहे. ' अरे ! सरळ जेवण खाऊन घे ना ! घराचा मालक ना, तेथे दुसरा कोणी त्याचा वरिष्ठ नाही. तो स्वत:च बॉस, म्हणून खरडपट्टी काढायला सुरु करतो. मुले बिचारी घाबरुन जातात की पप्पा असे वेड्यासारखे का झालेत ? परंतु बोलू नाही शकत. कारण की मुले दबलेली आहेत, परंतु मनामध्ये अभिप्राय बांधून घेतात की, वाटते पप्पा वेडेच आहेत !
म्हणून मुले सगळी कंटाळून जातात. ते म्हणतात की फादर - मदर (आई-वडील) विवाहित आहेत, त्यांचे (व्यंगी) सुख पाहून आम्हाला कंटाळा आला आहे. मी विचारले, 'का? काय पाहिलेत ?' तेव्हा मुले सांगतात की दररोजची कटकट, क्लेश बघून आम्ही समजून गेलो आहोत की लग्न केल्याने दुःख मिळते. म्हणून आता आम्हाला लग्नच करायचे नाही.
४. अनसर्टिफाइड फादर्स एण्ड मदर्स !
एक बाप सांगायचा, ‘ही सगळी मुले माझ्या विरुद्ध झाली आहेत. ' मी सांगितले, ‘तुमच्यात बरकत नाही हे उघड झाले.' तुमच्यात बरकत असेल तर मुले विरोध कशाला करतील ? म्हणून अशा प्रकारे आपली अब्रू उघडी करु नका.