________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
नाही म्हणत असतो की माझ्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करु नका.' त्यावर हे वडील काय म्हणतात, 'अजून त्याला अक्कल नाही म्हणून असे बोलतो.' अरे, हे तर तुम्ही निवृत्त झालात! चांगलेच झाले. संसाराच्या जाळ्यातून मुक्त झालात!! मुलगा स्वत:हून च नाही म्हणतो आहे ना!
प्रश्नकर्ता : योग्य मार्ग कोणता? आम्ही तेथे मुलांना सांभाळायचे की स्वतःच्या कल्याणासाठी सत्संगमध्ये यायचे?
दादाश्री : मुले तर स्वत:हूनच सांभाळली जात आहेत. मुलांना तुम्ही काय सांभाळणार? आपले स्वत:चे कल्याण करुन घेणे हाच मुख्य धर्म आहे. बाकी, ही मुले तर सांभाळलेलीच आहेत ना! मुलांना काय तुम्ही मोठे करतात? बागेत गुलाबाची रोपे लावलीत तर रात्री वाढतात की नाही वाढत? पण आपण असे मानत असतो की माझे गुलाब, परंतु गुलाब तर हेच समजतो की मी स्वत:च आहे. मी कोणाचाही नाही. सगळे आपल्या स्वत:च्या स्वार्थने प्रेरित आहेत. हे तर आपण वेडा अहंकार करतो. वेडेपणा करतो.
प्रश्नकर्ता : जर गुलाबाला आपण पाणी दिले नाही तर ते कोमेजून जाणार?
दादाश्री : पाणी नाही दिले असे होतच नाही ना! मुलास चांगल्या प्रकारे ठेवले नाही तर ती चावायला धावतील अथवा ढेकूळ तरी मारतील.
म्हणून आता सांसारीक कर्तव्य बजावताना धर्म व कार्य यांचा समन्वय कशा प्रकारे साधता येईल? मुलगा जरी उलट उत्तर देत असेल तरी आपला धर्म न चुकवता कर्तव्ये बजावायची आहे. आपला धर्म काय? मुलाचे पालन-पोषण करुन मोठे करणे, आणि त्याला सत्मार्गावर चढवायचे. आता जर तो बरे-वाईट बोलत असेल आणि तुम्ही पण बरेवाईट बोलाल तर काय होईल? तो बिघडत जाईल. त्यासाठी तुम्ही त्याला प्रेमाने समजावयाला पाहिजे की बैस बाळ, हे पहा, असे आहे, तसे आहे. अर्थात् सगळ्या कर्तव्यांसोबत धर्म व्हायलाच पाहिचे. धर्म नसेल तर त्या वेक्युममध्ये (रिकाम्याजागी) अधर्म येऊन बसेल. खोली रिकामी राहणार नाही. आता येथे आपण ही खोली रिकामी ठेवली असेल तर लोक कुलूप उघडून घूसून जातील की नाही घूसणार?