________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
असीम जय-जयकार हो' दररोज बोलण्यास सांगायला पाहिजे. त्यामुळे हिन्दुस्थानातील मुले एवढी सुधारली गेली आहेत की सिनेमाला सुद्धा जात नाहीत. सुरुवातीला दो-तीन दिवस जरा कंटाळा करतील, परंतु मग दोनतीन दिवसानंतर सर्व शांत, झाल्यावर आत त्याचा स्वाद उतरल्यावर, ते स्वतःच आठवणीने करतील.
२. कर्तव्याची गाणी काय गायची! स्वैच्छिक कार्याचे बक्षीस असते. परंतु एक भाऊ केलेल्या कर्तव्याचे बक्षीस शोधत होता! सर्व जग बक्षीस शोधत आहे की 'मी इतके काही केले, तुम्हाला काही कळत नाही का? तुम्हाला माझी किंमत नाही' अरे वेड्या कशाची किंमत शोधत आहेस, हे जे तु काही केले ते तर तुझे कर्तव्य होते तेच केलेस! एक माणूस स्वत:च्या मुलाबरोबर वाद घालत होता, तेव्हा मी त्याच्यावर रागवलो. तो म्हणत होता, 'कर्ज काढून मी तुला शिकविले. मी जर कर्ज काढले नसते तर तू शिकला असतास का? भटकत राहिला असता.' अरे, वेड्या, विनाकारण बडबडतोस कशाला? हे तर तुझे कर्तव्य आहे, असे बोलू नये. उलट हा मुलगा समंजस आहे. जर त्याने 'तुम्हाला कोणी शिकवले?' असे विचारले असते तर? तुम्ही त्याला काय उत्तर दिले असते? असे वेड्यासारखे बडबडत असतात ना लोक? अशिक्षित माणसं, भानच नाही. बेभान नुस्ती!
मुलांसाठी सर्व काही करायला हवे. परंतु मुलगा म्हणेल की, नाही बाबा आता पुरे झाले. तरी सुद्धा वडील सोडत नाही, तेव्हा काय करायचे? मुले लाल झेंडा दाखवतात तेव्हा तरी आपण समजायला हवे की नको? तुम्हाला कसे वाटते?
नंतर तो सांगेल, मला धंदा करायचा आहे. तर आपण व्यवसायासाठी काही तरी मार्ग करुन द्यायला हवा, पण मग याच्याहि पुढे जास्त खोलात शिरणारा बाप मुर्ख आहे. तो जर नोकरीला लागला असेल तर आपल्या जवळ जी जमा पुंजी असेल, ती गाठीशी ठेवून द्यायला हवी. एखाद्या वेळी मुलगा अडचणीत सापडला असेल तर हजार-दोन हजार पाठवून द्यायचे. परंतु हे तर सारखे त्याला विचारत असतात. तेव्हा मुलगा म्हणतो, 'तुम्हाला