________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
एक लहान बाळ वडीलांच्या मिशा ओढत होता, तर वडील खुष झाले, आणि म्हणाले, वाह कसे बाळ आहे! बघा, माझ्या मिशा ओढतो! घ्या? आता त्याच्या असे बोलण्यावर लहान मुलगा मिशा पकडतो आणि परत परत ओढतो तरी पण ते काही बोलले नाही तर मग परिणाम काय होणार? म्हणून दुसरे काही नाहीतर बाळाला जरा चिमटा काढा, चिमटा काढल्यावर तो समजेल की हे चुकीची गोष्ट आहे. मी जे करतो आहे, 'ते वर्तन चुकीचे आहे.' असे त्याला कळेल. त्याला जास्त मारायचे नाही, फक्त हळूच चिमटा काढायचा.
वडीलांनी मुलाच्या आईला बोलविले, तेव्हा ती पोळ्या करीत होती, आई म्हणाली, 'काय काम आहे? मी पोळ्या करीत आहे.' 'तू इकडे ये, लवकर ये, लवकर ये लवकर ये!' आई पळत पळत येऊन विचारते, 'काय आहे ?' तेव्हा वडील बोलतात, 'पहा, पहा, मुलगा किती हुशार झाला. पहा, पायांच्या टाचा उंचवून खिशातून पंचवीस रुपये काढले.' मुलगा हे पाहून विचार करतो की, 'अरे! मी आज खूप चांगले काम केले, असे काम मी
आज शिकलो.' आणि नंतर तो चोर झाला, तर काय होणार? त्याला 'खिशातून पैसे काढणे चांगले आहे' असे ज्ञान प्रकट झाले होते. तुम्हाला काय वाटते? बोलत का नाही? असे करायला हवे?
असे चक्रम कुठून पैदा झालेत! ते बाप होऊन बसलेत! लाज नाही वाटत? त्या मुलाला कसे प्रोत्साहन मिळाले, हे कळते का? त्याला वाटले की खूप मोठा पराक्रम केला आहे. अश्याप्रकारे लूटले जाणे आपणांस शोभते का? काय बोलल्याने मुलांना 'एन्करेजमेन्ट' (प्रोत्साहन) मिळेल आणि काय बोलण्याने नुकसान होणार, एवढी समज तर असायला हवी ना? हे तर 'अनटेस्टेड फादर (अयोग्य पिता)' आणि 'अनटेस्टेड मदर (अयोग्य माता)' आहेत. बाप मुळा आणि आई गाजर, तर मग मुले सफरचंद थोडीच होणार?!
अर्थात कलियुगातल्या ह्या आई-वडीलांना असे सर्व जमत नाही आणि चुकीचे 'एन्करेजमेन्ट' देत असतात. काही तर त्याला सारखे उचलून फिरत असतात. पत्नी म्हणते, 'याला उचलून घ्या.' तर पती मुलाला उचलून घेतात. काय करणार? आणि जर तो कडक असेल आणि मुलाला उचलले