________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : घर-संसार सर्व शांतीपूर्ण रहावे एवढेच नाही, मुले सुद्धा आपले पाहून अधिक संस्कारी होवोत, असे होऊ शकते. हे तर सर्व आईवडीलांना बिघडलेले पाहून मुले सुद्धा बिघडून गेली आहेत. कारण की, आई-वडीलचे आचार-विचार उपयुक्त नाहीत. पति-पत्नी सुद्धा, मुले बसलेले असतील तेव्हा मर्यादाहीन चाळे करीत असतात, ते पाहून मुले बिघडणार नाही तर काय होणार? मुलांवर कसे संस्कार पडतील? मर्यादा तर ठेवायला हवी ना? ह्या अग्निचा कसा प्रभाव आहे? लहान बाळ पण ह्या अग्निची भीती ठेवतो ना? आई-वडीलांचे मन फ्रेंक्चर झाले (तुटून गेले) आहे. मन विव्हळ होऊन गेले आहे. दुसऱ्यांना दु:खदायी होईल अशी वाणी बोलत असतात. त्यामुळे मुले बिघडून जातात. पत्नी अशी बोलत असते की पतीला दु:ख होईल आणि पती असा बोलतो की पत्नीला दु:ख होईल. हिन्दुस्थानाचे आई-वडील कसे असायला हवेत? पंधरा वर्षाच्या आतच ते मुलांना संस्कार घडवतात.
प्रश्नकर्ता : आता हा जो संस्कारचा स्तर आहे तो घसरत आहे. त्यामुळे ह्या सर्व समस्या आहेत.
दादाश्री : नाही, नाही. संस्कारच लुप्त होऊ लागले आहेत. याच्यात आता दादा मिळाले म्हणून पुन्हा मूळ संस्कार आणणार. सत्युगात होते, असे संस्कार पुन्हा आणणार. हिन्दुस्थानाच्या प्रत्येक मुलात संपूर्ण विश्वाचे ओझे उचलू शकेल एवढी भरपूर शक्ति आहे. फक्त त्याला पुष्टी देण्याची आवश्कता आहे. हे तर भक्षक निघालेत, भक्षक म्हणजे स्व-सुखासाठी दुसऱ्याला सर्व प्रकारे लूटायचे! ज्याने स्वत:च्या सुखाचा त्याग केला आहे. तोच दुसऱ्यांना सर्व सुख देऊ शकतो.
परंतु येथे तर शेठ पूर्ण दिवस फक्त लक्ष्मीच्याच विचारात रमलेले असतात. तेव्हा मला शेठजींना सांगावे लागते की, 'शेठ तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागला आहात आणि इकडे घर उध्वस्त होत आहे!' मुलगी मोटारगाडी घेऊन एकीकडे जाते, मुलगा दुसरीकडे आणि शेठानी काही भलतीचकडे जाते! शेठजी तुम्ही तर सगळीकडून लूटले जात आहात!' तेव्हा शेठ विचारतात, 'मी काय करावे?' मी सांगितले, 'वस्तुस्थिती समजा आणि कशा प्रकारे जीवन जगायचे, हे समजा. केवळ पैशांच्या मागे पडू नका.