________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार (पूर्वार्ध)
१. सिंचन, संस्काराचे.......
प्रश्नकर्ता : येथे अमेरिकामध्ये पैसा आहे, परंतु संस्कार नाहीत आणि जवळपासचे वातावरणच असे आहे, तर त्यासाठी काय करावे ?
दादाश्री : प्रथम आई-वडीलांनी संस्कारी व्हायला पाहिजे. मग मुले बाहेर जाणारच नाहीत. आई-वडील असे असावेत की, त्यांचे प्रेम पाहुन मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाहीत. आई - वडीलांनी असे प्रेमळ असायला हवे. मुलांना जर सुधारायचे असेल तर तुम्ही जबाबदार आहात. मुलांसोबत तुम्ही कर्तव्यांनी बांधलेले आहात. तुम्हाला समजले की नाही ?
आपण मुलांना खूप उच्च प्रतिचे संस्कार द्यायला हवेत. अमेरीकामध्ये बरीच लोक सांगतात की आमची मुले मांसाहार करतात आणि असे बरेच काही करतात. तेव्हा मी त्यांना विचारले, 'तुम्ही मांसाहार करता का?' तर म्हणाले, 'होय, आम्ही करतो' तेव्हा मी म्हणालो, तर मग मुले करणारच ना. आपलेच संस्कार ! आणि जरी आपण करत नाही तरी सुद्धा ते करतील, परंतु ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन करतील. पण आपले कर्तव्य इतकेच की जर आपण त्यांना संस्कारी करायचे आहे तर आपण आपले कर्तव्य चुकायला नको.
आता मुलांकडे आपण लक्ष्य द्यायला हवे की, ते येथील असे - तसे जेवण खाणार नाहीत. आणि जर आपण खात असाल तर आता हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण हे सर्व बंद केले पाहिजे. अर्थात् ते आपले संस्कार बघणार तसे करणार. पूर्वी आपले आई-वडील संस्कारी का म्हटले जात होते ? ते