________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
शरीराची काळजी घ्या. नाहीतर हार्टफेल होऊन जाईल. शरीराकडे लक्ष, पैशांकडे लक्ष, मुलींच्या संस्कारकडे लक्ष, सगळे कोपरे सांभाळायचे आहेत. तुम्ही फक्त एकच कोपरा सांभाळ-सांभाळ करीत आहात, आता बंगल्यातला एकच कोपरा साफ केला आणि बाकी सगळ्या जागेत कचरा पड़न राहिला तर कसे वाटेल? काने-कोपरे सर्वच साफ करायचे आहेत. ह्या रीतीने जीवन कसे जगता येईल?' अर्थात् त्यांच्या बरोबर चांगले वर्तन ठेवा, मुलांना उच्च संस्कार द्या. त्यांना उच्च संस्कारी बनवा, आपण स्वतः तप करा, परंतु त्यांना संस्कारी बनवा.
प्रश्नकर्ता : आम्ही त्यांना सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न करीत असतो, तरी सुद्धा ते नाही सुधारले तर मग आदर्श वडीलांनी ते प्रारब्ध समजून सोडून द्यायचे का?
दादाश्री : नाही, पण तुम्ही तुमच्या रीतीने प्रयत्न करतात ना? तुमच्या जवळ सर्टीफिकेट आहे ? मला दाखवा?
प्रश्नकर्ता : आमच्या बुद्धीला जसे सुचते त्यानुसार प्रयत्न करतो.
दादाश्री : तुमची बुद्धी म्हणजे मी तुम्हाला सांगतो की, एक मनुष्य स्वतः न्यायाधीश, स्वतः गुन्हेगार आणि वकील सुद्धा स्वतः असेल, तर तो कसा न्याय करणार?
अर्थात त्यांना कधीपण सोडून द्यायला नको. त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. सोडून दिले तर मग सर्व नष्ट होऊन जाईल.
लहान मूल आपले संस्कार घेऊनच येतात. परंतु त्याच्यात तुम्हाला मदत करुन त्या संस्कारांना रंग चढवण्याची आवश्कता आहे.
प्रश्नकर्ता : हो, असे करीत असतो, परंतु शेवटी त्यांना प्रारब्धावर सोडून द्यायचे का?
दादाश्री : नाही, सोडू शकत नाही. असे सोडावे लागत असेल तेव्हा माझ्याकडे घेऊन या. मी ऑपरेशन करुन सुधारुन देईल. असे सोडू शकत नाही, धोका आहे.