________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
खूप नियमवाले होते आणि तेव्हा त्यांच्यात संयम होता. आणि आजकालचे आई-वडील तर असंयमी आहेत.
प्रश्नकर्ता : ही सर्व मुले मोठी झाल्यानंतर त्यांना आम्ही धर्माचे ज्ञान कश्या प्रकारे द्यायला पाहिजे?
दादाश्री : आपण धर्मस्वरुप व्हायचे म्हणजे तेही होतील. आपल्यात जसे गुण असतील तसे मुले शिकतील. म्हणून आपणच धर्मिष्ठ होऊन जायचे. आपले पाहून पाहून शिकतील. जर आपण सिगारेट पीत असाल तर ते सुद्धा सिगारेट प्यायला शिकतील, आपण दारू पीत असाल तर ते सुद्धा दारू प्यायचे शिकतील. मांस-मटन खात असाल तर ते सुद्धा मांसमटन खायचे शिकतील. जे आपण करीत असाल तसेच ते सुद्धा शिकतील. ते विचार करतील की, आम्ही यांच्यापेक्षा सवाई होऊ असे म्हणतील.
प्रश्नकर्ता : शिक्षणासाठी चांगल्या स्कूलमध्ये घातल्याने चांगले संस्कार नाही येत?
दादाश्री : परंतु ते सगळे संस्कार नाहीत. मुलावर तर आईवडीलांशिवाय दुसरे कोणाचे संस्कार नाही येत. संस्कार आई-वडील आणि गुरु यांचेच. आणि थोडे-फार संस्कार त्याचे जवळपासचे लोक, मित्र मंडळी, संयोग ह्या सर्वांपासून मिळत असतात. तरी सगळ्यात जास्त संस्कार आई-वडील यांचेच! आई-वडील संस्कारी असतील तर ती मुले संस्कारी होतात, नाहीतर संस्कारी होणार च नाही.
प्रश्नकर्ता : आम्ही मुलांना शिक्षणासाठी भारतात पाठवून दिले, तर आम्ही आमचे कर्तव्य चुकलो असे तर नाही होत ना?
दादाश्री : नाही, आपण चुकत नाही. आपण त्याचा सर्व खर्च द्यावा. तेथे अशा स्कूल आहेत की जिथे हिन्दुस्थानचे लोकं सुद्धा आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात. खाणे-पिणे तेथे आणि राहण्याचे सुद्धा तेथेच, अशा बऱ्याचशा चांगल्या स्कूल आहेत!!
प्रश्नकर्ता : दादाजी, घर-संसार सर्व शांतीपूर्ण रहावे आणि अंतरात्माचे सुद्धा जतन व्हावे असे करुन द्या.