________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
घरामध्ये स्त्रियांचा खरा धर्म कोणता? आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना असे म्हणावे लागेल की व्वा! मानले पाहिजे ह्या बाईला. ही बाई अशी कर्तव्य निभावते की जवळपासचे सगळे खूष होऊन जातात. अर्थात् स्त्रियांचा खरा धर्म आहे की, मुलांचे पालन-पोषण करणे, त्यांना चांगले संस्कार देणे, पतीमध्ये संस्कारांची उणीव असेल तर संस्कार सिंचन करणे. आपले सर्व काही सुधारायचे, त्याचे नांव धर्म. सुधारावे नाही का लागत?
काही लोक तर काय करतात? भगवंताच्या भक्तिमध्ये तन्मयाकार राहतात. परंतु मुलाला पाहून ते चिडात. ज्यांच्या मध्ये प्रकट भगवंत आहेत अशा मुलांना पाहून ते चिडतात आणि तेथे भगवंताची भक्ति करतात, त्याचे नांव भगत! ह्या मुलांवर चिडायला हवे का? अरे! ह्यांच्यात तर प्रकट भगवान आहेत.
३. नाही भांडायचे, मुलांच्या उपस्थितीमध्ये...
जर आपण मांसाहार नाही करत, दारू नाही पीत आणि, घरामध्ये पत्नीसोबत भांडत नाही, तर मुले पाहतात की पप्पा खूप चांगले आहेत. दुसऱ्यांचे आई-वडील भांडण करीत असतात पण माझे आई-वडील भांडण करत नाही. एवढे पाहून तर मुले सुद्धा शिकतात.
पती दररोज पत्नीसोबत भांडतो तर मुले 'आ' करुन पाहतच राहतात. 'हे वडीलच असे आहेत' असे समजतात. कारण की मुलगा जरी लहान असला, तरी सुद्धा त्याच्यात न्यायाधीश सारखी न्याय करणारी बुद्धि आहे. मुलींमध्ये न्यायाधीश बुद्धि नसते. मुली कधीपण आईचीच बाजू घेत असतात. परंतु मुलगा तर न्यायाधीश बुद्धिवाला, जाणतो की वडीलांचाच दोष आहे! दोन-चार माणसांला वडीलांचे दोष सांगता-सांगता तो स्वतः निश्चय करतो की मोठा झाल्यावर दाखवून देईल! नंतर मग मोठा झाल्यावर तो तसे करतो सुद्धा. चांगल्याप्रकारे दाखवून देतो! घे तुझीच अनामत तुला परत !
म्हणून मुलांच्या उपस्थितीत भांडायचे नाही. आपण संस्कारी व्हायला हवे. तुमची चुक असेल तरी पण पत्नी म्हणेल, 'काही हरकत नाही.' आणि पत्नीची चुक असेल तर तुम्ही सुद्धा म्हणायचे, 'काही हरकत नाही.' मुले असे पाहतात तेव्हा तर ऑलराइट (चांगले) होत जातात. आणि जर