________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
नाही तर पत्नी म्हणेल, 'काय माझ्या एकटीचा आहे ? मिळून सांभाळायचे आहे.' असे तसे बोलली तर पतीला मुलाला उचलावेच लागते, सुटकाच नाही ना? जाणार कुठे? मुलांना उचलून-उचलून सिनेमा पहायला जाणे, घावपळ करणे. मग मुलांना संस्कार कशा प्रकारे मिळतील?
एका बँकेच्या मेनेजरने मला सांगितले, 'दादाजी, मी तर कधीही वाइफला की, मुलांना एक अक्षर सुद्धा बोलत नाही. काहीही चूक केली, काहीही केले तरी पण मी बोलत नाही.'
त्याला वाटले असेल की, दादाजी माझी खूप प्रशंसा करतील! तो काय अपेक्षा करत होता ते कळले का? पण मी त्याच्यावर खूप चिडलो, की तुम्हाला कोणी बँक मेनेजर बनविले? तुम्हाला मुल-बाळ सांभाळता येत नाही आणि पत्नीला सांभाळता येत नाही! तेव्हा तो तर घाबरुनच गेला बिचारा. उलट मी त्यांना सांगितले, 'तुम्ही अगदी शेवटच्या पायरीचे फालतु मनुष्य आहात! ह्या जगात तुम्ही काही कामाचे नाहीत!' तो माणूस मनामध्ये समजला असेल की मी असे सांगितले तर 'दादाजी' मोठे बक्षीस देतील. वेडपट, अरे, याचे काय बक्षीस द्यायचे असते? मूल चूकीचे करीत असेल तेव्हा त्याला आपण 'तू असे का केलेस? पुन्हा असे करु नकोस.' अशा त-हेने नाटकीय पद्धतीने बोलायला पाहिजे. नाहीतर मूल असेच समजेल की तो जे काही करतो आहे ते 'करेक्ट' (बरोबर) च आहे, कारण की वडीलांना 'एक्सेप्ट' केले (स्विकारले) आहे. असे न बोलल्यामुळेच, घरात उद्रेक होतात. सर्व काही बोलायचे, पण नाटकीय पद्धतीने! मुलांना रात्री बसवून समजावयाचे, बातचीत करायची. घरातील सर्व कानाकोपऱ्यातला कचरा तर साफ करावाच लागेल ना? लहान मुलांना जरासे हलविण्याचीच गरज आहे. तसे संस्कार तर असतात, परंतु टकोर करावी लागते. त्यांना हलविण्यात काही गुन्हा आहे?
लहान मुलांना-मुलींना समजावायचे की सकाळी अंघोळ करुन भगवंताची पूजा करावी आणि रोज थोडक्यात बोलायला सागांयचे की, 'मला आणि सगळ्यांना, जगातल्या सर्वांना सद्बुद्धी द्या, जगाचे कल्याण करा.' एवढे बोलले तर त्यांना संस्कार मिळालेत, असे म्हटले जाईल आणि आईवडील कर्मबंधनातून सुटतील. दुसरे, तुम्हाला मुलांनां 'दादा भगवानांचा