Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 12
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि www. ४ अगोप्तारश्च राजानो बलिषड्भागतस्कराः । समर्थाश्चाप्यदातारस्ते बै निरयगामिनः ॥१३।२३।८० प्रजेचे रक्षण न करता तिच्यापासून उत्पन्नाचा सहावा हिस्सा कर मात्र घेणारे राजे व सामर्थ्य असून दान न करणारे खचित नरकास जातात. ५ अग्निस्तेजो महल्लोके गूढस्तिष्ठति दारुषु । न चोपयुङ्क्ते तदारु यावन्नोद्दीप्यते परैः ॥ ५॥३७६० पृथ्वीवरील अग्निरूप प्रचंड तेज लाकडांचे ठिकाणी गुप्तरूपानें वसत असते, पण जोपर्यंत ते दुसऱ्यांनी [ घर्षणादिकांच्या योगानें ] चेतविलेले नसतें तोपर्यंत ते लाकूड त्याचा उपयोग करीत नाही. ( काही पुरुषांचे अंगीं लोकोत्तर शौर्यादिगुण असतात पण जोपर्यंत त्यांस दुसऱ्यांकडून अत्यंत त्रास पोंचला नाही किंवा प्रोत्साहन मिळाले नाही तोपर्यंत ते व्यक्त होत नाहीत.) । ६ अग्नी प्रास्तं तु पुरुष कर्मान्वेति स्वयं कृतम् । तस्मात्तु पुरुषो यत्नाद्धर्म संचिनुयाच्छनैः ॥ ५।४०११८ [ मरणोत्तर ] अग्नीत टाकून दिलेल्या मनुष्याबरोबर त्याने केलेले [ बरे वाईट ] कर्म तेवढे येत असते. यासाठीच मनुष्याने हळूहळू पण यत्नपूर्वक धर्माचा ( पुण्याचा) संचय केला पाहिजे. ७ अग्न्याधानेन यज्ञेन काषायेण जटाजिनः।। लोकान्विश्वासयित्वैव ततो लुम्पेद्यथा वृकः ॥ १।१४०।१९ अग्निहोत्र ठेवून, यज्ञ करून, भगवी वस्त्रे परिधान करून, जटा वाढवून, मृगाजिन पांघरून, आधी लोकांचा विश्वास संपादन करावा; आणि मग लांडग्याप्रमाणे झडप घालून त्यांचा नाश करावा. ८ अङ्कुशं शौचमित्याहुरथानामुपधारणे। आनाम्य फलितां शाखां पकं पकं प्रशातयेत् ॥१११४०२० फळांनी भरलेली झाडाची खांदी [ आकडीनें ] वाकवून तिच्यावरील पिकलेली उत्तम फळे तोडून घ्यावी, त्याप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त करून घेण्याच्या कामी धर्माच्या बाह्य अवडंबराचा अंकुशासारखा उपयोग होतो. For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 ... 463