________________
म्हणून दोष चिकटला. तो दोष पाहिल्याने जातो. आपण स्वतः शुद्धात्मा झालो, आता पुद्गलला शुद्ध करायचे बाकी राहीले. त्यास पाहिल्यानेच शुद्ध होऊन जाते.
जो अतिक्रमण करतो त्यालाच प्रतिक्रमण करायचे असते. शुद्धात्मा अतिक्रमण करत नाही म्हणून त्याला प्रतिक्रमण करावे लागत नाही. हा सिद्धांत लक्षात ठेवावा.
दादाजी सांगतात की, दोष होण्यापूर्वीच आमचे प्रतिक्रमण सुरु होऊन जातात, आपोआपच! ते जागृतीचे फळ आहे !
पुढील जागृतीत तर दोषांना दोषांप्रमाणे सुद्धा पाहात नाही. ते 'ज्ञेय' आणि 'स्वतः' 'ज्ञाता' ज्ञेय आहे तर ज्ञातापण आहे.
कोणाला दोषितही मानू नये आणि निर्दोषही मानू नये, फक्त निर्दोष जाणावे!
स्वत:च्या प्रकृतीला पाहणे, चंदुभाऊ काय करीत आहेत ते पाहणे हा शुद्ध उपयोग आहे. प्रकृतीला का पाहू शकत नाही? तर आवरणामुळे. आवरण कशाने तुटते? ज्ञानी पुरुष 'विधी' (चरणविधी) करवतात. त्याच्याने आवरण तुटते.
ज्ञानींचे सुद्धा सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष होत असतात, ते दोष ते प्रतिक्रमणाने स्वच्छ करतात.
प्रकृतीच्या गुण-दोषांना पाहणारा कोण? प्रकृती प्रकृतीला पाहते, तो पाहणारा आहे प्रकृतीचा बुद्धी आणि अहंकाराचा भाग! यात आत्मा निर्लेप असतो. आत्म्याला चांगले-वाईट असे काही नसतेच. प्रकृतीचे दोष दाखविणारी प्रकृती उच्च कोटीची म्हटली जाते की जी आत्मा प्राप्त करविणारी आहे.
प्रकृतीला जो निर्दोष पाहतो तो परमात्मा! पाहण्यात मुक्तानंद!
१२