________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
११७
प्रश्नकर्ता : त्याच्या मनातही नाही राहिले पाहिजे.
दादाश्री : राहिले तरीही आपल्याला काही हरकत नाही. आपले मन पूर्णपणे क्लियर झाले म्हणजे झाले.
प्रश्नकर्ता : म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी विचार सुद्धा येत नाही असे ?
दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : त्याच्याविषयी विचार येणे सुद्धा बंद होते.
दादाश्री : हो.
कुठपर्यंत मन स्वच्छ झाले
एखाद्या महात्म्यासाठी आमच्या विचारात फेरफार झाला, आम्हाला विचार येत नाहीत, तरीही त्या व्यक्तीसाठी विचार येऊ लागले, म्हणून मला वाटले की हे काय पुन्हा नवीन सुरु झाले आत ? कोणत्या कारणाने त्याच्यासाठी असे विचार येतात ? तसा तर चांगला माणूस आहे पण आता बिघडून गेला आहे की काय, नेमके काय आहे ? अणि मग आतूनच उत्तर मिळाले की, त्याच्या कर्माचा उदय सद्या वाईट आहे. त्याचा उदय फेवरेबल नाही म्हणून असे दिसत आहे. म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी कोमल मनोभाव ठेवतो. कारण एखाद्या माणसाचा उदय फेवरेबल असतो आणि एखाद्याचा फवरेबल नसतो सुद्धा. असे घडते ना ?
प्रश्नकर्ता : हो, घडते.
दादाश्री : असे तर जगात घडतच असते. पण हे तर जेव्हा आम्हाला स्पर्शत असेल अशी गोष्ट येते, तेव्हा आम्ही एका बाजूने त्याच्या प्रति कोमल मनोभाव ठेवतो.
प्रश्नकर्ता : असा कोमल मनोभाव तुम्ही कसे काय ठेऊ शकता ?