________________
१२२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
ह्या नीरुबेन आहेत, त्या निरंतर सेवेत असतात पण त्यांना आमचा एकही दोष दिसत नाही. त्या निरंतर सोबतच राहतात. जर ज्ञानी पुरुषातच दोष असेल तर जग निर्दोष कसे असू शकेल?
__ जागृती चुकांसमोर ज्ञानींची आमची जागृती 'टॉप'ची (सवोच्च) असते. तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही पण तुमच्याशी बोलताना जिथे आमची चूक होते तिथे लगेचच आमच्या लक्षात येते आणि आम्ही ती चूक लगेच धुऊन टाकतो. त्यासाठी आत यंत्र ठेवलेले असते, ज्याच्याने लगेच धुतले जाते. आम्ही स्वतः निर्दोष झालो आहोत आणि संपूर्ण जगाला सुद्धा निर्दोषच पाहतो. अंतिम प्रकारची जागृती कोणती? तर जगात कोणीही दोषी दिसत नाही. आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दररोजचे हजारो दोष दिसू लागले. जसजसे दिसू लागतात तसतसे दोष कमी होत जातात आणि दोष कमी होतात तसतशी 'जागृती' वाढत जाते. आमचे फक्त सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष बाकी राहिले आहेत, त्यांना आम्ही 'पाहत' असतो आणि 'जाणत' असतो. ते दोष कुणाला हरकत करणारे नसतात पण काळामुळे ते थांबले आहेत आणि त्यामुळेच ३६० डिग्रीचे केवळज्ञान थांबले आहे. ३५६ डिग्रीपर्यंत पोहाचल्या नंतर थांबले आहे ! परंतु आम्ही तुम्हाला पूर्ण ३६० डिग्रीचे केवळज्ञान फक्त एका तासातच देत असतो, पण तुम्हाला सुद्धा ते पचणार नाही. अरे, आम्हालाच पचले नाही ना! काळामुळेच चार डिग्री कमी राहिली! आत पूर्णपणे ३६० डिग्री 'रियल' आहे आणि 'रिलेटिव्हमध्ये' ३५६ डिग्री आहे. या काळात रिलेटिव्ह पूर्णतेला पोहोचू शकेल असे शक्य नाही. पण आम्हाला त्याची काही हरकत नाही, कारण आत अपार सुख वर्तत असते!
म्हणून 'आमचा' कोणीही वरिष्ठ नाही ज्यांना जितक्या चुका दिसत नाहीत, तितक्या चुका त्यांच्या वरिष्ठ आहेत. ज्याच्या सगळ्याच चुका संपल्या, त्याला कोणी वरिष्ठ नाही.