________________
जग निर्दोष
१३७
थोबाडीत मारले तरीही काहीच परिणाम होत नाही. तेव्हाच 'जाणले' असे म्हटले जाते. हे तर खिसा कापला जातो तेव्हा 'माझा खिसा कापला पोलीसाला बोलवा!' अशी बोंबाबोंब करतो. अरे, कशाच्या आधारावर कापला गेला हे माहीत आहे का तुला? ज्ञानी पुरुष जाणतात की कशाच्या आधारावर कापला गेला. ज्ञानींना खिसा कापणारा गुन्हेगार दिसत नाही. आणि यांना तर खिसा कापणारा गुन्हेगार दिसतो. खिसा कापणारा निर्दोष आहे तरी पण तुम्हाला दोषी दिसतो. म्हणून तुम्ही अजून कितीतरी जन्म भटकाल. जे पाहायचे ते पाहिले नाही आणि सर्व उलटेच पाहिले! जो गुन्हेगार नाही त्याला गुन्हेगार पाहिले. पाहा तरी हे असे चुकीचे ज्ञान शिकून आले आहेत!
पण तरी लोक जे धर्म करतात, क्रियाकांड करतात तेही चुकीचे नाही. पण खरी गोष्ट, खरी वास्तविकता तर जाणावी लागेल ना? तो खिसे कापणार तुम्हाला गुन्हेगार वाटतो ना? तर पोलीसांना सुद्धा खिसे कापणारा गुन्हेगार वाटतो आणि मजुरांना सुद्धा तो गुन्हेगार वाटतो, मग यात तुम्ही कोणते नवीन ज्ञान घेऊन आलात? लहान मुलांनाही कळते की, याने खिसा कापला आहे, म्हणून 'हा गुन्हेगार आहे', असे लहान मुलेही म्हणतात. बायका सुद्धा म्हणतात आणि तुम्ही सुद्धा म्हणता. मग तुमच्यात आणि त्या त्यांच्यात काय फरक आहे ? 'मी जाणतो, मी जाणतो' असे म्हणता, पण लोकांजवळ आहे तसेच ज्ञान तुमच्याजवळही आहे ना? त्यास ज्ञान म्हणूच कसे शकतो? दुसरे नवीन ज्ञान तुमच्याजवळ आहेच कुठे? 'ज्ञान' तर असे नसते ना?
कषाय भाव दोष दाखवतात, क्षणभर सुद्धा कुठलाही जीव दोषी झालेला नाही. हे जे दोषी दिसतात ते आपल्याच दोषांमुळे दिसतात. आणि दोषी दिसतात म्हणूनच कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) करतात. नाही तर कषाय करणारच नाहीत ना? दोषी दिसते म्हणजे चुकीचेच दिसते. आंधळा, आंधळ्याला