________________
जग निर्दोष
१४३
धर्मातच आहे. तेव्हा तुम्ही बुद्धी वापरु नका. 'तुझे चुकीचे आहे,' असे कुणाला कधीही म्हणू नये. यालाच म्हणतात निष्पक्षपाती.
'तुझे चुकीचे आहे' असे आम्ही का सांगत असतो? तर ते तुम्हाला समजावण्यासाठी, आम्ही दुसऱ्या लोकांची गोष्ट करीत आहोत. दुसयांची टीका करण्यासाठी बोलायचे नसते. आणि टीका नसतेच कुठेही, जर टीका असेल तर ते वीतरागांचे विज्ञान नाही. तिथे धर्म नाहीच, अभेदता नाहीच.
हा अमक्या संप्रदायाचा असो की, हा तमक्या संप्रदायाचा असो, पण कुणाचीही टीका नाही. भगवंत काय म्हणतात? निष्पक्षपातीला जर आपण विचारले की, 'साहेब आपले काय मत आहे? हे लोक आम्हाला आंधळे वाटतात.' तेव्हा ते म्हणतील, तुमच्या दृष्टीने काहीही असो पण ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. तेव्हा म्हणे, चोर चोरी करत आहे तर? तर ते त्यांच्या जागेवर खरे आहेत. तुम्ही कशासाठी शहाणपणा करता? तुम्ही फक्त त्याला निर्दोष दृष्टीने पाहा. तुमच्याजवळ जर निर्दोष दृष्टी असेल, तर त्या दृष्टीने तुम्ही पाहा. दुसरे काही पाहू नका. आणि दुसरे पाहिले तर मारले जाल. जसे पाहाल तसे व्हाल. जसे पाहाल तसे तुम्ही व्हाल. यात काय खोटे सांगितले? हे वीतराग समंजस आहेत ना! असे तुम्हाला वाटते ना?
इथे तर हे वैष्णव धर्माचे लोक ' वीतरागांचा धर्म' प्राप्त करण्यासाठी आले आहेत. त्यांना आश्चर्य वाटले की, अहो! वीतरागी असे होते! तेव्हा मी म्हणालो, हो, असे होते वीतरागी. त्यावर ते म्हणाले, असे तर आम्ही कधी ऐकलेच नव्हते. म्हणून तर ते या मंदिरात येतात ना, आणि उल्हासपूर्वक सीमंधर स्वामींचे दर्शन करतात!
प्रश्नकर्ता : ही तर तुम्ही खूप मोठी गोष्ट सांगितली, 'जसे पाहाल तसे व्हाल.'
दादाश्री : हो. तसे पाहाल तर तुम्ही ते रुप होऊन जाल. म्हणून