Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
निजदोष दर्शनाने...
निर्दोष!
Marathi
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
SIGN
दादा भगवान कथित
निजदोष दर्शनाने...
निर्दोष
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन
अनुवाद : महात्मागण
MORE
OYOU
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079) 39830100
O
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : २०००
नोव्हेंबर २०१८
भाव मूल्य : 'परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव !
द्रव्य मूल्य : ४० रुपये
मुद्रक
: अंबा ऑफसेट
B-99, इलेक्ट्रॉनिक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
समर्पण
निजदोष दर्शन विना, बंधन भवोभवाचे अंती; खुलते दृष्टी स्वदोष दर्शनाची, तरतो भवसागर किती. मी 'चंदु' मानले तेव्हापासून, मूळ चुकांचा झाला उदय; 'मी शुद्धात्म्या' चे भान होता, होऊ लागतो चुकांचा अस्त,
भगवंत वरिष्ठ, कर्ता जगाचा, मग चिकटले अनंत गैरसमज, वाजते रेकॉर्ड पण मानतो मी बोललो, म्हणून वाणी लागते जिव्हाळी.
चुका चिकटून राहिल्या कशाने ? केले सदा त्यांचे रक्षण, चुकांना मिळून जाते जेवण, कषायांचे झाले पोट भरण. जोपर्यंत राहतील निज चुका, तोपर्यंतच आहे भोगणे, दिसतात स्वदोष तेव्हा स्वतः होतो पूर्णपणे निष्पक्ष. देह आत्म्याच्या भेदांकनाविना, पक्ष घेतो स्वत:चाच, 'ज्ञानी' भेदज्ञानाद्वारे, रेखांकित करतात स्व- पर याचा.
मग दोषाला पाहताच ठार, करतो मशीनगनची आत मांडणी, दोष धुण्याची गुरुकिल्ली, दिसल्याबरोबर कर 'प्रतिक्रमण'
चुका मिटवतो तो भगवंत, मग नाही कुणाचा वरिष्ठपणा, 'ज्ञानी' चे अद्भुत ज्ञान, प्रकट होत निज परमात्मपणा.
शुद्धात्मा होऊन पाहतो, अंतःकरणातील प्रत्येक अणू; 'बावा'चे दोष धुतल्याने, सूक्ष्मत्वपर्यंतचे शुद्धिकरण.
4
निजदोष दर्शन दृष्टीचे, 'दादावाणी' आहे आज प्रमाण; निजदोष छेदण्यासाठी अर्पण केला ग्रंथ जग चरणी.
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
|त्रिमंत्र
नमो अरिहंताणं नमो सिद्धार्ण नमो आयरियाणं नमो वझायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुबारो, सव्य पावण्पणासणी मंगलाणंच सवसि,
पडर्म इवाह मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐनमः शिवाय ३ जब सच्चिदानंद
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण ?
जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य ! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण ? भगवंत कोण ? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय ? मुक्ती कशाला म्हणतात ? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम ( क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !
ते स्वतः प्रत्येकाला ‘दादा भगवान कोण ?' याबद्द्लची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर 'ए. एम. पटेल' आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर 'चौदालोक'चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत ! माझ्या आत प्रकट झालेले दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो. '
11
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतः च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक
मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धी प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
- दादाश्री
परम पूज्य दादाश्री गावोगावी, देशविदेश परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवित होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा सुद्धा त्यांच्याप्रमाणेच मुमुहूंना सत्संग व आत्मज्ञान प्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुहूंना आत्मज्ञान प्राप्ती करवित असत, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत. __पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्राप्तीसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वतःचा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
परम पूज्य 'दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरूप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदंडावर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींच्या गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करून वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचे खरे मर्म जाणायचे असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे.
अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थितो.
वाचकांना.....
ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळतः 'निज दोष दर्शनथी निर्दोष या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे.
जिथे-जिथे ‘चंदुभाऊ' या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे.
पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती.
दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही गुजराती शब्द जसेच्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसे कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द ( ) कंसात लिहिलेले आहेत.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
या जगात स्वत: कशाने बांधला गेला आहे ? दु:ख का भोगावे लागते? शांती कशी मिळवता येईल? मुक्ती कशी प्राप्त करता येईल? या जगात स्वत:ला जे बंधन आहे ते स्वतःच्या चुकांमुळेच आहे. स्वत:ला इतर कोणत्याही वस्तूने बांधलेले नाही. नाही घर-दार बांधू शकत की नाही बायको-मुले बांधू शकत. नाही धंदा-लक्ष्मी बांधू शकत की नाही देह सुद्धा बांधू शकत. स्वतःच्या ब्लंडर्स आणि मिस्टेकनेच बांधला गेला आहे! अर्थात निज (स्वत:च्या) स्वरुपाची अज्ञानता हीच सर्व चुकांचे मूळ आहे आणि मग परिणाम स्वरुप अनंत चुका, सूक्ष्मतमपासून स्थूलतमरुपात चुकांचे सर्जन होतच राहते.
___ अज्ञानतेमुळे दृष्टी दोषित झाली आहे आणि त्यामुळे राग-द्वेष होतात आणि नवे कर्म बांधले जातात. 'स्वरुपज्ञान' प्राप्तीने दृष्टी निर्दोष होते. परिणामस्वरुप राग-द्वेष क्षय होऊन, कर्मबंधनातून मुक्त होऊन मनुष्य वीतराग होऊ शकतो. चुकांचे स्वरुप काय? तर 'स्वत:ला' समजण्यातच मूळ चूक झाली आहे, मग स्वतः निर्दोष आहे, करेक्ट आहे असे मानून समोरच्याला दोषी मानत जातो. निमित्ताचा चावा घेण्यापर्यंतचे गुन्हे सुद्धा होत राहतात.
इथे प्रस्तुत संकलनात 'ज्ञानी पुरुष' अशी समज प्राप्त करवून देतात की ज्यामुळे स्वत:ची चुकीची दृष्टी सुटते आणि निर्दोष दृष्टी प्रकट होते. परम पूज्य दादाश्री वारंवार सांगत असत की, 'हे जग कशा प्रकारे निर्दोष आहे याचे आम्हाला हजारो पुरावे हजर होतात व जागृती राहते. पण जे पुरावे 'दादाश्रींच्या' ज्ञानात अवलोकीत झाले ते कोणते असतील? ते इथे सुज्ञ वाचकास एका मागून एक प्राप्त होत राहतात. प्रस्तुत संकलनाचा जर सखोल अभ्यास केला तर वाचकास निर्दोष दृष्टीचे अनेक दृष्टीकोन प्राप्त होतील असे आहे, जे परिणाम स्वरुप त्यालाही निर्दोष दृष्टीच्या मार्गावर घेऊन जातील. कारण ज्यांची दृष्टी संपूर्ण निर्दोष
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
झाली आहे, अशा ज्ञानींची ही वाणी वाचकास अवश्य निर्दोष दृष्टीची 'समज' प्राप्त करविणारच !
दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने, दोषित दृष्टीने संसार टिकून राहीला आहे आणि निर्दोष दृष्टीने संसाराचा अंत येतो! स्वतः संपूर्ण निर्दोष होतो. निर्दोष स्थिती कशी प्राप्त करावी ? तर दुसऱ्यांचे नाही पण स्वत:चेच दोष पाहिल्याने. स्वतःचे दोष कशा प्रकारचे असतात, त्यासंबंधी असलेली सूक्ष्म समज इथे दर्शनास येते. खूपच बारीक-बारीक दोष दृष्टीस उघड करुन निर्दोष दृष्टी बनविण्याची परम पूज्य दादाश्रींची कला येथे सूज्ञ वाचकास जीवनात खूप उपयोगी पडेल अशी आहे.
निमित्ताच्या आधीन, संयोग, क्षेत्र, काळाच्या आधीन निघालेल्या वाणीच्या या प्रस्तुत संकलनात भासित क्षति रुपी दोषांना, क्षम्य मानून, त्यासाठी सुद्धा निर्दोष दृष्टी ठेऊन, मुक्तिमार्गाच्या पुरुषार्थाचा प्रारंभ करुन संपूर्ण निर्दोष दृष्टी प्राप्त व्हावी, हीच अभ्यर्थना ! !
- डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद.
९
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
उपोद्घात निजदोष दर्शनाने... निर्दोष 'दुसऱ्यांचे दोष पाहिल्याने कर्म बांधली जातात, स्वतःचे दोष पाहिल्याने कर्मातून सुटले जाते, हा आहे कर्माचा सिद्धांत.
'हुं तो दोष अनंत हैं भाजन छु करुणाळ, ('मी तर दोष अनंतचा भाजन आहे करुणामय')
-श्रीमद् राजचंद्र या जीवाने अनंत जन्मांपासून अनंत दोषांचे सेवन केले आहे. या अनंत दोषांचे मूळ एकच दोष, एकच चूक आहे, ज्याच्या आधारावर अनंत दोषांची श्रृंखला अनुभवास येते. ती कोणती चूक असेल?
सर्वात मोठा मूळ दोष 'स्वतःच्या स्वरुपाचे अज्ञान' हाच आहे ! 'मी कोण आहे?' एवढेच न समजल्यामुळे त हेत-हेच्या रॉग बिलीफ (चुकीच्या मान्यता) उत्पन्न झाल्या आणि अनंत जन्मांपासून त्यातच रुतत गेलो, क्वचित एखाद्या जन्मी ज्ञानी पुरुषांची भेट होते तेव्हा मग 'ती' चूक संपते, त्यानंतर मात्र सर्व चुका संपू लागतात. कारण 'पाहणारा' जागृत होतो म्हणून सर्व चुका दिसू लागतात आणि जी चूक दिसते ती अवश्य निघून जाते. म्हणूनच तर कृपाळुदेवाने पुढे म्हटले आहे की,
'दिठा नही निज दोष तो तरीए कोण उपाय?' ('पाहिले नाही निज दोष तर तरणार कोणत्या उपायाने')
स्वतःचे दोष दिसले नाहीत तर कसे तरणार? ते तर 'पाहणारा' जागृत झाला तरच शक्य होते.
जगाच्या वास्तविकतेचे भान नसल्यामुळे भ्रांत मान्यतांमध्ये, की
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
ज्या पावलोपावली विरोधाभासी आहेत, त्यातच मनुष्य गुरफटत जातो. ज्याला या संसाराचे निरंतर ओझे वाटत राहते, बंधन आवडत नाही, ज्यांना मुक्ती प्रिय आहे त्यांना तर जगाची वास्तविकता, जसे की हे जग कोण चालवते ? कशा प्रकारे चालवते ? बंधन म्हणजे काय ? मोक्ष म्हणजे काय ? कर्म म्हणजे काय ? इत्यादी सर्व जाणून घेणे आवश्यक आहे !
आपला उपरी (वरिष्ठ, बॉस, मालक) या जगात कोणीच नाही ! स्वत:च परमात्मा आहे मग याहीपेक्षा वरिष्ठ आणखी कोण असू शकेल ? आणि हा जो भोगण्याचा ( दुःखदायी) व्यवहार आपल्या वाट्याला आला आहे, त्याच्या मुळाशी स्वत:च्याच 'ब्लंडर्स आणि मिस्टेक्स' आहेत ! 'स्वतः कोण आहे' हे जाणले नाही आणि लोकांनी जे म्हटले, की, 'तू चंदुभाऊ आहेस' तसेच स्वतःला मानले की 'मी चंदुभाऊ आहे, ' ही चुकीची मान्यताच मूळ चूक आहे आणि त्यातूनच पुढे चुकांच्या परंपरेचे सर्जन होते.
या जगात कोणीही स्वतंत्र कर्ता नाही, नैमित्तिक कर्ता आहे. अनेक निमित्त एकत्र येतात तेव्हा एक कार्य होते. तेव्हा आपले लोक समोर दिसणाऱ्या एखाद्या निमित्ताला स्वत:च्याच राग-द्वेषाच्या नंबरवाल्या चष्म्याने पाहतात, पकडतात आणि त्यालाच दोषी मानून त्याचा चावा घेतात. परिणाम स्वरुप स्वतःच्या चष्म्याची काच अधिक जाड होत जाते. (चष्म्याचा नंबर वाढत जातो.)
या जगात कोणी कोणाचे काहीही बिघडवू शकत नाही. तसेच कोणी कोणास त्रासही देऊ शकत नाही. आपल्याला जो काही त्रास होत असतो तो मुळात आपणच दिलेल्या त्रासाचा परिणाम आहे. जिथे मुळात 'स्वतःचीच' चूक आहे, तिथे मग संपूर्ण जग निर्दोष नाही का ठरत ? स्वतः :ची चूक मिटली तर मग या जगात कोण आपले नाव घेईल ?
११
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
हे तर आपणच आमंत्रित केले होते तेच समोर आले आहे! जितक्या आग्रहाने आमंत्रण दिले तितक्याच मजबूतीने ते आपल्याला चिकटले आहे!
जे चूक रहित आहेत त्यांचे तर लुटारूंच्या गावात सुद्धा कोणी नाव घेऊ शकत नाही! एवढा प्रचंड तर प्रताप आहे शीलचा!
आपल्याकडून कुणाला दुःखं होते याचे कारण आपण स्वत:च आहोत! ज्ञानींकडून कोणालाही किंचितमात्र दुःख होत नाही. उलट ते तर अनेकांना परम सुखी करतात! कारण ज्ञानी सर्व चुकांना संपवून बसले आहेत म्हणून! स्वतःची एक जरी चूक संपवली तर तो परमात्मा होऊ शकतो!
या चुका कशाच्या आधारवर टिकून राहिल्या आहेत? चुकांची बाजू घेतली म्हणून! चुकांचे रक्षण केले म्हणून ! क्रोध झाल्यानंतर स्वतः त्याची अशा प्रकारे बाजू घेतो की 'हे बघ, त्याला जर रागवले नसते ना, तर तो सरळ झालाच नसता!' म्हणजेच क्रोधाचे आयुष्य वीस वर्ष वाढवून घेतले! चुकांचे रक्षण करणे बंद झाले तर त्या चुका निघून जातात. चुकांना पोषण देतात म्हणून त्या तिथून हलतच नाहीत! घर करुन बसतात.
या चुका कशा प्रकारे संपवू शकतो? तर प्रतिक्रमणाने-पश्चातापाने ! कषायांचा आंधळेपणा स्वत:चे दोष पाहू देत नाही.
संपूर्ण जग भावनिद्रेत झोपलेले आहे म्हणून तर स्वत:च स्वत:चे अहित करीत आहेत! 'मी शुद्धात्मा आहे' असे भान झाल्यावर भावनिद्रा उडते आणि जागृत होतो.
चुकांचे रक्षण कोण करते? तर बुद्धी! वकीलाप्रमाणे चुकांची बाजू घेऊन वकिली करुन बुद्धी 'आपल्यावर' चढून बसते! म्हणून मग बुद्धीचे चलन चालते. जेव्हा स्वतःच्या चुका मान्य करतो तेव्हा चुकांचे रक्षण करणे बंद होते, म्हणून मग चुकांना जावेच लागते!
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
जो कोणी आपल्याला आपली चूक दाखवतो तो महान उपकारी! ज्या चुकांना पाहण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करावा लागतो, त्या चुका जर कोणी समोरुन आपल्याला दाखवत असेल तर याहून सोपे आणखी काय?
ज्ञानी पुरुष ओपन टु स्काय (पारदर्शक) असतात. लहान मुलांसारखे असतात. लहान मूल सुद्धा त्यांना विना संकोच चूक दाखवू शकतो! आणि ते स्वत:च्या चुकांचा स्वीकारही करतात!
कोणतीही वाईट सवय लागली असेल तर त्यापासून कसे सुटू शकतो? 'ही सवय चुकीचीच आहे' असे नेहमीच आत आणि बाहेर सर्वांसमोर सुद्धा वाटले पाहिजे. प्रत्येकवेळी त्याचा खूप पश्चाताप केला पाहिजे आणि जर एकदा सुद्धा त्याची बाजू घेतली नाही तर ती चूक निघून जाते. वाईट सवयींना काढण्याचा हा आगळा-वेगळा शोध परम पूज्य दादाश्रींचा आहे!
वीतरागांजवळ स्वतःच्या सर्व दोषांची आलोचना केल्याने ते दोष तत्क्षणी निघून जातात!
'जसजशा चुका संपत जातात, तसतसे दर्शन खुलत जाते.' परम पूज्य दादाश्रींचा हा सिद्धांत शिकण्यासारखा आहे.
'जो फिर्याद करतो तोच गुन्हेगार आहे !' तुला समोरचा गुन्हेगार का दिसला? फिर्याद कशासाठी करावी लागली?
टीका करणे म्हणजे दहाचे एक करणे! शक्ती वाया जाते शिवाय नुकसानही होते! समोरच्याची चूक दिसते तितकी नालायकी आत आहे. वाईट आशयच चुका दाखवतात. आपल्याला कोणी न्यायाधीश म्हणून नेमले आहे का? प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीनुसार काम करत असतात. परम पूज्य दादाश्री सांगतात की, 'मी सुद्धा माझ्या प्रकृतीनुसार काम करतो. प्रकृती तर असतेच ना! पण आम्ही त्याच्या तोंडावरच सांगून
१३
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
देतो की मला तुझी ही चूक दिसत आहे. तुला गरज वाटत असेल तर स्वीकार, नाहीतर बाजूला ठेव. प्रथम घरातील सर्व आणि शेवटी बाहेरील सर्वच निर्दोष दिसू लागतील तेव्हा समजावे की आता आपण मुक्तीच्या पायऱ्या चढलो.
दुसऱ्यांचे नाही पण स्वत:चेच दोष दिसू लागले तेव्हा समकित झाले म्हणून समजावे! आणि जेवढे दोष दिसतात ते निरोप घेतात, कायमसाठी!
समोरच्याचे गुण किंवा अवगुण दोन्हीही पाहू नयेत! शेवटी दोन्हीही प्राकृत गुणच आहेत ना! विनाशीच आहेत ना! त्यांच्यात शुद्धात्माच पाहावा.
परम पूज्य दादाश्री सांगतात की, 'खिसेकापू असो की चारित्र्यहीन असो, त्यालाही आम्ही निर्दोषच पाहतो! आम्ही सत् वस्तूलाच पाहतो. ही तात्विक दृष्टी आहे. आम्ही पॅकिंगला पाहत नाही!' जगाला निर्दोष पाहण्याची ही एक मात्र ‘मास्टर की' (गुरुकिल्ली) आहे !
स्वतःच्या चुका केव्हा समजतात? ज्ञानी पुरुष दाखवतात तेव्हा. ज्ञानी पुरुष शिरोमान्य नसतील तर सर्व स्वच्छंदच म्हटले जाते.
उजेडातील चुकांचा तर केव्हा ना केव्हा अंत येईल पण अंधारातील चुका जातच नाहीत ना! अंधारातील चुका म्हणजे 'मी जाणतो!!!'
अक्रम ज्ञानाच्या प्राप्तीनंतर फक्त आतलेच बघितले गेले तर तुम्ही 'केवळज्ञान' सत्तेत असाल. अंश केवळज्ञान होते, सर्वांश नाही. आत मन-बुद्धी-चित्त-अहंकाराला पाहत राहावे. पर सत्तेतील पर्यायांना पाहत राहावे.
'वस्तू, वस्तूचा स्वभाव चुकते त्यास प्रमत्त म्हणतात. वस्तू त्याच्या मूळ धर्मात राहते ते अप्रमत्त भाव.'
मोक्ष केव्हा होतो? 'तुझे ज्ञान आणि तुझी समज चूक रहित होते
१४
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
तेव्हा.' चुकांमुळेच थांबले आहे हे सर्व. जप-तपाची आवश्यकता नाही, चुकरहित होण्याची गरज आहे. मूळ चूक कोणती? 'मी कोण आहे ?' याचे अज्ञान. ती चूक कोण मिटवतात? ज्ञानी पुरुषच.
दोष कशा प्रकारे निघतो? दोष शिरला कसा हे जर समजले तर त्यास काढण्याचा मार्ग सापडतो. दोष श्रद्धेने, प्रतीतीने शिरतो आणि निघतो सुद्धा श्रद्धेने व प्रतीतीने. शंभर टक्के माझीच चूक आहे अशी जेव्हा प्रतीती होते, त्यानंतर त्या चुकांचे एक परसेन्ट सुद्धा रक्षण केले जात नाही तेव्हा मग त्या चुका जातात!
जे कोणी भगवंत झाले ते सर्व स्वतःच्या चुकांना संपवून भगवंत झाले! परम पूज्य दादाश्री सांगतात की, 'चूक कोणाला दिसते? तर चुक रहित चारित्र्य संपूर्ण दर्शनात असते आणि चूक असलेले वर्तन ज्याच्या वर्तनात असते, त्याला 'आम्ही' मुक्त झालेला म्हणतो. आम्हाला आमच्या अगदी सूक्ष्म तसेच सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम सगळ्याच चुका दिसतात.'
__ दोष होतो, त्याची शिक्षा नाही पण दोष दिसला याचे बक्षिस आहे. बक्षिसाने दोष जातो. म्हणून आत्मज्ञानानंतर स्वतः स्वतः बद्दल निष्पक्षपाती होतो, म्हणून स्वतःच्या सर्वच चुका पाहू शकतो!
शुद्ध उपयोगीला कोणतेही कर्म स्पर्शत नाही.
बुद्धी नेहमी समाधान शोधत असते, स्थिरता शोधत असते. बुद्धी स्थिर केव्हा होते? दुसऱ्यांचे दोष पाहिले तर बुद्धी स्थिर होते किंवा मग स्वतःचे दोष पाहिले तरीही बुद्धी स्थिर होते.
अज्ञानतेत दुसऱ्यांचेच दोष पाहते, स्वतःचे दोष दिसतच नाहीत. बुद्धी स्थिर होत नाही म्हणून डळमळत राहते. नंतर संपूर्ण अंत:करण हालवून टाकते, काहूर माजवते.
मग जेव्हा बुद्धी दुसऱ्यांचे दोष दाखवते तेव्हा स्वतःला खरे मानून
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
स्थिर होते! मगच आतील हुल्लड शांत होतो! अन्यथा विचारांचे काहूर चालूच राहते. अशा प्रकारे जगात ढवळाढवळ होत राहिली आहे.
अशी सूक्ष्म गोष्ट कोणत्या शास्त्रात सापडेल? जगाचे सार कुठल्याही शास्त्रात शोधून सापडणार नाही, ते तर ज्ञानींकडूनच समजते.
समोरील व्यक्तीचे दोष दिसतात, हीच संसाराची अधिकरण क्रिया आहे! मोक्षाला जाणारा स्वत:च्याच चुका पाहत राहतो आणि संसारात भटकणारा दुसऱ्यांच्याच चुका पाहत राहतो!
अभिप्राय ठेवल्याने दृष्टी दोषित होऊन जाते. प्रतिक्रमणाने अभिप्राय तुटतात आणि नवीन मन तयार होत नाही.
आत्मदृष्टी झाल्यानंतर... देहाध्यास सुटतो आणि आत्म्याचा अध्यास बसतो त्यानंतर मग निजदोषच (स्वतःचेच दोष) दिसतात.
कित्येक दोष बर्फासारखे गोठलेले असतात, ते पटकन कसे जातील? अनेक थरवाले (आवरणवाले) दोष असतात म्हणून ते हळूहळू जातात. जसजसे दोष दिसू लागतात तसतसे थर कमी होत जातात. कांद्याच्या पाकळया असतात ना त्याचप्रमाणे. जास्त चिकट दोषांचे जास्त प्रतिक्रमण करावे लागतात.
'चंदुभाऊ' कडून दोष होतो आणि ते जर त्याला आवडत नसेल तर त्यास 'दोष पाहिला' असे म्हटले जाते आणि जे दोष दिसतात ते जातात.
जीवन हे स्वत:च्याच पाप-पुण्याच्या गुन्हेगारीचा परिणाम आहे. आपल्यावर फुलांचा वर्षाव होतो तो पुण्याचा परिणाम आणि दगड पडतात तो पापाचा परिणाम आहे! किंमत आहे समताभावे भोगून घेण्याची.
जास्त करुन समस्या वाणीमुळे निर्माण होतात. तिथे जागृती ठेवून
१६
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
किंवा मौन राहून समाधान आणावे. सम्यक् दृष्टीमुळे नवे दोष वाढत नाहीत आणि जुने दोष कमी होतात. ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा कषाय होतात पण ते लगेचच लक्षात येतात आणि 'स्वतः' त्यापासून वेगळाच राहतो.
अक्रम विज्ञानी (परम पूज्य दादा भगवान) यांनी तर ज्ञान देऊन पंचवीस प्रकारच्या मोहांचा नाश करुन टाकला. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी दोन्हीही भ्रांती आहेत, असे सांगून त्या सर्वांपासून सुटका करुन दिली.
समोरच्या व्यक्तीला त्याची कोणती चूक दाखवावी? तर जी चूक त्याला दिसत नसेल तीच. आणि ती चूक कशा प्रकारे दाखवावी? जर समोरच्याला चूक दाखवणारा उपकारी वाटत असेल तरच दाखवावी. 'कढी खारट झाली', असे बोलून भांडण करु नये.
घरातील सर्वजण निर्दोष दिसतात व स्वतःचेच दोष दिसतात तेव्हा होतात खरे प्रतिक्रमण.
प्रतिक्रमण कुठपर्यंत करावे? ज्याच्यासाठी मन बिघडत असेल, सतत आठवत असेल तोपर्यंत. जोपर्यंत आपला अँटॅकिंग नेचर असेल तोपर्यंत मार पडेल. (त्रास होईल)
आपल्याशी जर कोणी संघर्ष करायला आला तरी आपण संघर्ष करणे टाळले पाहिजे, आपण तिथून निसटून जावे!
स्वतः कर्ता नाही परंतु समोरच्याला कर्ता पाहतो तेव्हा स्वत:च कर्ता झाल्यासारखे आहे ! समोरच्याला किंचितमात्र कर्तारुपात पाहिले की स्वतः कर्ता होऊनच गेला! प्रकृती भांडत असेल तरीपण त्यास कर्ता पाहू नये. कारण तो करत नाही, 'व्यवस्थित शक्ती' करते!
दोष करणाराही अहंकार आणि दोष पाहणारा सुद्धा अहंकार! दोष पाहणारा निर्विवादपणे अहंकारी असतोच.
दिवसभर माफीच मागत राहावी. दिवसभर माफी मागण्याची
७
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
सवयच करुन घ्यावी. ज्ञानींच्या कृपनेच काम होते, यात धावपळ करायची नसते. कृपा केव्हा प्राप्त होते? ज्ञानींच्या आज्ञेत राहिल्याने. आज्ञेत राहिल्याने आत समाधी राहते.
आत्मा सुद्धा वीतराग आहे आणि प्रकृती सुद्धा वीतराग आहे. पण प्रकृतीचे दोष काढले की त्याची रिअॅक्शन येते. कुणाचाही दोष दिसतो तो आपलाच दोष आहे.
दादाजींचा हा सत्संग, इथे मार पडत असेल तरीही हा सत्संग सोडू नये. सत्संगात मरण पत्कारवे पण बाहेर कुठेही जाण्यासारखे नाही, सत्संगात कुणाचे दोष पाहू नयेत. नाहीतर 'वज्रलेपो भविष्यती!' म्हणून इथे लगेचच प्रतिक्रमण करुन धुऊन टाकावे नाहीतर निकाचित कर्म बांधले जाते! ज्ञानी पुरुषांचे दोष कधीही पाहू नयेत. ज्ञानी पुरुषांसमोर बुद्धी वापरली तर तो खाली घसरतो, नरकात जातो. एखादा विरळाच ज्ञानीजवळ राहून त्यांचा एकही दोष पाहत नाही! तोच ज्ञानींच्या सेवेत जवळ राहू शकतो!
__ दुसऱ्यांचे दोष पाहिल्यामुळे स्वतःचे दोष पाहण्याची शक्ती कोंडली गेली आहे. कोणाचीही चूक नसते, चूक मानायचीच असेल तर 'व्यवस्थित शक्ती' ची माना आणि 'व्यवस्थित शक्ती' म्हणजे स्वतःचाच हिशोब स्वत:च्या वाट्याला येतो. स्वतः ज्या चुका केल्या आहेत त्यांचा दंड नैसर्गिक निमित्तांद्वारे स्वतःस मिळतो.
ज्ञानींची प्रत्येक कर्म दिव्य कर्म असतात. बाह्य कर्म तर सामान्य लोकांसारखेच असतात परंतु त्यावेळी त्यांची वीतरागता न्याहाळण्यासारखी असते! प्रत्यक्षची (ज्ञानींची) वीतरागता पाहिल्याने आपण वीतराग बनतो!
मोक्षार्थीची लक्षणे कोणती? सरळ ! ओपन टु स्काय! ते स्वत:चे सारे दोष उघड करुन टाकतात!
दोषात एकाग्रता झाल्याने दोष दिसत नाही. तन्मयाकार झालो
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
म्हणून दोष चिकटला. तो दोष पाहिल्याने जातो. आपण स्वतः शुद्धात्मा झालो, आता पुद्गलला शुद्ध करायचे बाकी राहीले. त्यास पाहिल्यानेच शुद्ध होऊन जाते.
जो अतिक्रमण करतो त्यालाच प्रतिक्रमण करायचे असते. शुद्धात्मा अतिक्रमण करत नाही म्हणून त्याला प्रतिक्रमण करावे लागत नाही. हा सिद्धांत लक्षात ठेवावा.
दादाजी सांगतात की, दोष होण्यापूर्वीच आमचे प्रतिक्रमण सुरु होऊन जातात, आपोआपच! ते जागृतीचे फळ आहे !
पुढील जागृतीत तर दोषांना दोषांप्रमाणे सुद्धा पाहात नाही. ते 'ज्ञेय' आणि 'स्वतः' 'ज्ञाता' ज्ञेय आहे तर ज्ञातापण आहे.
कोणाला दोषितही मानू नये आणि निर्दोषही मानू नये, फक्त निर्दोष जाणावे!
स्वत:च्या प्रकृतीला पाहणे, चंदुभाऊ काय करीत आहेत ते पाहणे हा शुद्ध उपयोग आहे. प्रकृतीला का पाहू शकत नाही? तर आवरणामुळे. आवरण कशाने तुटते? ज्ञानी पुरुष 'विधी' (चरणविधी) करवतात. त्याच्याने आवरण तुटते.
ज्ञानींचे सुद्धा सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष होत असतात, ते दोष ते प्रतिक्रमणाने स्वच्छ करतात.
प्रकृतीच्या गुण-दोषांना पाहणारा कोण? प्रकृती प्रकृतीला पाहते, तो पाहणारा आहे प्रकृतीचा बुद्धी आणि अहंकाराचा भाग! यात आत्मा निर्लेप असतो. आत्म्याला चांगले-वाईट असे काही नसतेच. प्रकृतीचे दोष दाखविणारी प्रकृती उच्च कोटीची म्हटली जाते की जी आत्मा प्राप्त करविणारी आहे.
प्रकृतीला जो निर्दोष पाहतो तो परमात्मा! पाहण्यात मुक्तानंद!
१२
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
पण आत्म्याला तर आनंदाची सुध्दा पडलेली नसते. त्याला तर जसे आहे तसे पाहण्यातच सर्वस्व आहे! ___दोषांमुळे अंतराय आणि अंतरायामुळे संपूर्ण आनंदाचा अनुभव थांबतो!
परमपूज्य दादाश्री स्वत:च्या ज्ञान दशेचे वर्णन करताना सांगतात की, 'आम्हाला तर एका केसाइतकी चूक झाली तरी लगेच लक्षात येते!' तर ते आत कसे कोर्ट असेल?! कसे जजमेन्ट असेल? कोणाशीही मतभेद नाही. गुन्हेगार दिसतो तरी त्याच्याशीही सुद्धा मतभेद नाही! बाहेरुन गुन्हेगार, आत तर कोणताच गुन्हा नाही.
म्हणून दादाश्री संपूर्णपणे निर्दोष झालेत आणि संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले!
ज्ञानी पुरुषांची एकही स्थूल किंवा सूक्ष्म चूक नसते! सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुकाच असतात. ज्ञानी अशा चुकांचे संपूर्ण ज्ञाता-दृष्टा असतात आणि त्या चुका कोणाचेही नुकसान करणाऱ्या नसतात, मात्र स्वतःच्या 'केवळ ज्ञानाला' च बाधक असतात!
अंतिम प्रकारची जागृती कोणती? तर या जगात कोणी दोषीच दिसत नाही!
ज्याने सर्व चुका संपवल्या, त्याचा या जगात कुणीही वरिष्ठ राहिला नाही! म्हणून ज्ञानी पुरुषांना देहधारी परमात्मा म्हणतात.
दादाश्री सांगतात की, 'आम्ही' दोघे वेगळे आहोत. आत जे प्रकट झाले आहेत ते 'दादा भगवान' आहेत. ते संपूर्ण प्रकट झाले आहेत, परम ज्योति स्वरुप! जे आम्हाला आमच्या आतील चुका दाखवतात. आणि तेच 'चौदालोकचे नाथ' आहेत! तेच 'दादा भगवान' आहेत! ३६० डिग्रीचे पूर्ण भगवान !
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष जगाला निर्दोष कशा प्रकारे पाहू शकतो?! आत्मदृष्टीनेच, पुद्गल दृष्टीने नाही! तत्त्वदृष्टीनेच, अवस्था दृष्टीने नाही!
समोरच्याला दोषी पाहतो, तो अहंकार आहे पाहणाऱ्याचा! शत्रूसाठी सुद्धा भाव बिघडवत नाही आणि जर भाव बिघडलेच तर लगेच प्रतिक्रमणाने सुधारुन घेतो, तेव्हाच पुढची प्रगती होते आणि शेवटी शीलवान होऊ शकतो.
__ सुरुवातीला तर बुद्धी समोरच्याला निर्दोष पाहू देत नाही पण तरीही निर्दोष पाहण्याची सुरुवात केली पाहिजे. नंतर जसजसे अनुभवास येईल, तसतशी बुद्धी शांत होते.
जसे गणिताचा प्रश्न सोडवताना, उत्तर मिळवण्यासाठी एक संख्या धरावी लागते, 'समजा १००' ही संख्या मनात धरली तर खरे उत्तर मिळते ना?! त्याचप्रमाणे दादाश्री सुद्धा एक संख्या (मनात) धरण्यास सांगतात की, 'या जगात कोणीही दोषी नाहीच. संपूर्ण जग निर्दोष आहे! तर शेवटी खरे उत्तर मिळेलच.
जशी दृष्टी तशी सृष्टी. दोषित दृष्टीने समोरचा दोषी दिसतो. आणि निर्दोष दृष्टीने समोरचा निर्दोष दिसतो.
ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा 'हे जग निर्दोष आहे' हे अनुभवास येत नाही. तिथे तर दादाश्रींनी सांगितले आहे म्हणून आपण असे निश्चित करायचे की, 'जग निर्दोष आहे.' ज्यामुळे मग कोणीही दोषी दिसणार नाही. जिथे हे निश्चित झाले नसेल त्याठिकाणी मग असेच मानावे की हे जग निर्दोषच आहे! उत्तर माहीत असले म्हणजे मग उदाहरण सोडवणे सोपे होऊन जाते ना! प्रतीतीत तर शंभर टक्के ठेवावे की हे जग निर्दोषच आहे. दोषित दिसते ती भ्रांती आहे आणि त्यामुळे संसार टिकून राहिला आहे!
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
ज्ञान जाणले हे तेव्हाच म्हणता येईल की त्यानंतर ठोकर लागत नाही. कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) या सर्व ठोकराच आहेत! आणि तोपर्यंत भटकणेच आहे! कषायांचा पडदा दुसऱ्यांचे दोष दाखवतो! कषाय प्रतिक्रमणाने जातात!
मोक्ष प्राप्तीसाठी कर्मकांड किंवा क्रिया करण्याची गरज नाही, फक्त आत्मा जाणण्याची गरज आहे, जग निर्दोष पाहण्याची गरज आहे!
तरी देखील ज्यांना जसे अनुकूल वाटेल तसे ते करतील, कुणाची टीका करण्याची गरज नाही. नाहीतर त्याच्याबरोबर नव्या कराराने बांधले जाऊ.
स्वकर्माच्या आधारावरच स्वत:ला भोगावे लागते त्यात मग दुसऱ्या कुणाचा काय दोष?
महावीरांचा खरा शिष्य कोण? ज्याला लोकांचे दोष दिसणे कमी झाले आहे ! जरी संपूर्ण दशेत नाही पण सुरुवात तर झाली!
धर्मात एकमेकांचे दोष दिसतात ते तुझे-माझे या भेद बुद्धीने. आणि म्हणूनच श्रीमद् राजचंद्रानी असे म्हटले आहे की,
'गच्छ मतनी जे कल्पना, ते नहीं सद्व्यवहार.' ('गच्छ-मताची जी कल्पना, तो नाही सद्व्यवहार.')
दादाश्री सांगतात की, 'आता आमच्याकडून जे काही बोलले जात आहे ते मागील जन्मात रेकॉर्ड झालेलेच बोलले जात आहे. मागील जन्मात चुकीचे रेकॉर्ड झाले होते त्यामुळे काही धर्मात 'ही चूक आहे' असे बोलले जाते. पण आजचे ज्ञान-दर्शन त्यास संपूर्ण निर्दोष पाहते आणि जे बोलले जाते त्याचे लगेचच प्रतिक्रमण होऊन स्वच्छ होऊन जाते!'
अक्रम मार्गात दादाश्रींचे आश्चर्यजनक ज्ञानीपद प्रकट झाले आहे, या काळात! कुणाच्याही कल्पनेत सुद्धा येऊ शकणार नाही
२२
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
अशी आश्चर्यकारक भेट जगाला निसर्गाकडून मिळाली आहे! निर्दोष दृष्टी झाली, तेव्हापासून स्वतः (दादाश्री) प्रेमस्वरुप झाले आणि त्यांना त्यांच्या शुद्ध प्रेमाने कित्येकांना संसारमार्गातून मोक्षमार्गावर वळविले! अशा या 'अघट-अवध' (जे कमीही होत नाही आणि वाढतही नाही) अशा परमात्म प्रेमाला कोटी कोटी नमस्कार!!! जेव्हा जग निर्दोष दिसते, तेव्हा मुक्त हास्य प्रकटते. मुक्त हास्य पाहिल्यानेच कितीतरी रोग निघून जातात. ज्ञानी पुरुषांचे चारित्र्यबळ संपूर्ण ब्रह्मांडाला एका बोटावर धरु शकेल असे असते! आणि हे चारित्र्यबळ कशाने प्रकटते? निर्दोष दृष्टीने!
डॉ. नीरुबहन अमीन
२३
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
अनुक्रमणिका
१. निजदोष दर्शनाने... निर्दोष विश्वाच्या वास्तविकता
१ ही भानगड उभी करणारा तूच आपला वरिष्ठ कोण?
१ अरे, घे बोधपाठ यापासून मूळ चूक कोणती?
२ चूक संपविण्याची पद्धत... चुका केव्हा समजतात?
३ आलोचना ज्ञानींजवळ जगाचा मालक कोण?
४ तसतशी विकसित होते सूझ ! न समजल्याने उभे केले दुःख ५ नव्हतीच कधी, तर जाईल कुठून? समोरचा तर आहे मात्र निमित्त ५ दहाचे केले एक टोचत नाहीत बोल, दोषाशिवाय ६ सर्व दु:खांचे मूळ 'स्वत:च' चावा घेतात निमित्ताचा
७ नाही कोणी दोषी या जगात अनुमोदनेचे फळ
८ तेव्हापासून झाले समकित आव्हान नसेल तर पूर्णतेची प्राप्ती ९ शेवटी तर ते प्राकृत गुण एकामधून अनंत, अज्ञानतेने ९ सर्वात मोठा दोष दोनच वस्तू विश्वात
१० पाहिले नाहीत निजदोष तर.... आमंत्रण दिले थप्पडला, भरपाईसोबतं ११ कुणाचेही दोष बघू नये लुटारु सुद्धा दूर राहतात, शीलवंतांपासून १२ तेव्हा आला महावीरांच्या मार्गात ज्ञानींना भोगावे लागत नाही १३ नाही दिसले स्वत:चेच दोष ३८ चूक संपवतो तो परमात्मा १४ त्याला म्हणतात जैन दिला आधार चुकांना, रक्षण करुन १४ जेवढे दोष, तेवढेच पाहिजेत प्रतिक्रमण ४१ चावी चुकांना संपविण्याची १४ आत्मा स्वत:च थर्मामीटर समान बंद करा कषायांचे पोषण १६ हे आहे चुकांचे स्वरुप आंधळेपणा नाही पाहू देत दोषाला १७ ज्ञानींची तत्वदृष्टी बुद्धीच्या वकिलीने जिंकतात दोष १८ तरलेलाच तारतो ज्ञानी स्वीकार करतात, निजदोषांचा... १८ तेव्हा चूक संपवली असे... ४६ दोष स्वीकारा, उपकार मानून १९ चूक काढणारा, आत कोण?
नये
४१
२४
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
६४
६४
अंधारातल्या चुका
४७ आरोप लावल्याने थांबते पुढील... ५९ नाही त्याला वरिष्ठ कोणी ४८ बुद्धी एक्सपर्ट, दोष पाहण्यात ६० दृष्टी निजदोषां प्रति
४९ दोष पाहावेत स्वतःचेच, नेहमी प्रमत्त भावाने दिसतात परदोष ४९ दोष पाहते, तिथे बुद्धी स्थिर वीतरागांनी सांगितले मुक्तीच्या हेतूने ५० मुक्ती प्राप्त करण्यासाठी पाहावे.... गरज आहे अचूक ज्ञान आणि अचूक... ५० या, एका गोष्टीवर चूकरहित ज्ञान आणि समज ५४ आत असतोच तो दोष पुरेशी आहे चुकांची प्रतीती बसणे ५४ स्वत:चे गटार दुर्गंध देते आणि दुसऱ्याचे चूक मिटवतील ते भगवंत ५६ गटार धुवायला जातात चूकरहित दर्शन आणि चूक... ५६ दृष्टी अभिप्राय रहित अलौकिक सामायिक हा पुरुषार्थ ५८ असा अंत येतो गुंतागुंतीचा नाही स्पर्शत काही शुद्ध उपयोगीला ५९ जिथे सुटला मालकीपणा सर्वस्व.. ६९
२. आत्मदृष्टी झाल्यानंतर... गरुड येताच, साप पळतात ७० तिथे पुरुषार्थ की कृपा? ८६ निष्पक्षपाती दृष्टी
७० वीतरागभावाने विनम्रता आणि सक्ती ८७ तसतसा प्रकट होतो आत्मप्रकाश ७१ 'ज्ञान' प्राप्तीनंतरची परिस्थिती ८८ गुह्यतम विज्ञान
७२ तेव्हा दोष होतात ते डिस्चार्ज रुपाने...९१ दोष असतात थरवाले ७३ श्रद्धेने सुरु, वर्तनाने पूर्ण... ९३ गुन्हेगारी, पाप-पुण्याची
७४ सोडू नका कधी 'हा' सत्संग ९३ स्वरुप प्राप्तीनंतर...
७६ वळवावे, दोष पाहणाऱ्या शक्तीला ९४ म्हणजे झाले ज्ञानी
७८ 'व्यवस्थित शक्ती' कर्ता, तिथे चूक दिसतो धबधबा दोषाचा...
७८ कोणाची? घरात टोकावे कोणत्या चुकांसाठी? ८० व्रजलेपो भविष्यति... अशी होतात कर्म चोख ८१ पाहतो दोष ज्ञानींचे, त्याला... पाहा समोरच्याला पण अकर्ता। ८२ सरळ व्यक्तीवर ज्ञानी कृपा अपार ९९ ते आहे एकांतिक रुपाने अहंकारी ८३ गुण पाहिल्याने गुण प्रकटतो १०० महत्त्वाचे आहे चुकांचे भान होणे ८४ जिकर्म म्हणजे निजदोष
१००
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
११६
शुद्ध उपयोग, आत्म्याचा १०१ आणि हे ज्ञानगम्य म्हटले जाते. ११४ चुका, उजेडातील
१०२ स्वतःच्या चुकांना स्वत:च रागवतो ११५ प्रकट होते केवळज्ञान, अंतिम दोष.. १०२ तेव्हा झाला संपूर्ण निकाल अंधारातील चुका
१०३ कुठपर्यंत मन स्वच्छ झाले ११७ दादा 'डॉक्टर' दोषांचे १०४ तोपर्यंत वरिष्ठ आतील भगवंत ११८ दोष मिटवण्याचे कॉलेज १०४ भिन्नता त्या दोघांच्या जाणण्यात ११९ आवरण तुटल्याने दोष दिसतात १०६ त्यामुळे अंतराय...
१२१ वीतरागांची निर्दोष दृष्टी १०८ संपूर्ण दोषरहित दशा दादांची १२१ दोषित दृष्टीला पण तू 'जाण' १०९ जागृती चुकांसमोर ज्ञानींची १२२ करायचे नाही, मात्र पाहायचे ११० म्हणून 'आमचा' कोणीही वरिष्ठ नाही १२२ गहू स्वत:चेच निवडा ना ११२ म्हणून 'ज्ञानी' देहधारी परमात्मा १२३ हे तर इंद्रियगम्य ज्ञान ११३ आतील भगवंत दाखवितात दोष... १२३
३. जग निर्दोष भगवंताने पाहिले जग निर्दोष १२५ तिथे कोणावर रागवाल? १३८ कोणत्या दृष्टीने जग दिसते निर्दोष १२५ नाही कोणी शत्रू आता १३९ तत्त्व दृष्टीने जग निर्दोष १२७ साप, विंचू सुद्धा आहेत निर्दोष १४० जग निर्दोष, पुराव्यासकट १२८ महावीरांनी सुद्धा पाहिले स्वदोष १४१ शीलवानाचे दोन गुण १२८ अभेद दृष्टी झाल्याने होतो वीतराग १४२ हे आहे ज्ञानाचे थर्मामीटर १२९ गच्छ-मताची जी कल्पना १४२ एक रक्कम तुम्ही धराल? १३० आजचे दर्शन आणि मागील जन्माची दृष्टीनुसार सृष्टी १३१ रेकॉर्ड
१४४ जग निर्दोष अनुभवात...
१३२ आश्चर्यकारक अद्भुत पद, अक्रम अंतिम दृष्टीने जग निर्दोष
१४६ जाणले तर त्यास म्हटले जाते १३६ नाही बघत दादा दोष कुणाचे १४७ कषाय भाव दोष दाखवतात. १३७ तेव्हा प्रकटते मुक्त हास्य १४८
१३५ ज्ञानींचे
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनाने... निर्दोष
विश्वाच्या वास्तविकता
प्रश्नकर्ता: दादा, जगाच्या वास्तविकतेबद्दल काहीतरी सांगा..
दादाश्री : जगातील लोक व्यवहारात दोन प्रकारे राहतात, एक लौकिक भावाने आणि दुसरे अलौकिक भावाने. जगाचा बहुतांश भाग लौकिक भावानेच राहतो, की देव वर आहे व देवच सर्व काही करतो. आणि पुन्हा स्वत:ही करत जातो, देवही करत जातात. यात त्यांना काही विरोधाभास सुद्धा वाटत नाही. त्यांना देव डोक्यावर असेल तर भीती वाटत राहते की 'खुदा ये करेगा और वो करेगा.' अशा प्रकारे त्यांची गाडी चालत राहते.
परंतु जो अत्यंत विचारवंत असेल, ज्याला स्वतःच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचे ओझे नको असेल, तर त्याच्यासाठी खरी वास्तविकता ही अलौकिकच असायला हवी ना ? अलौकिकतेमध्ये कोणीही उपरी (वरिष्ठ) नाहीच. जगात तुमच्या चुकाच तुमच्या वरिष्ठ आहेत. तुमचे ब्लंडर्स (मूळ चूक) आणि मिस्टेक्स (सामान्य चुका) हे दोनच वरिष्ठ आहेत. दुसरे कोणीच वरिष्ठ नाही.
आपला वरिष्ठ कोण ?
असे कोण म्हणू शकेल? तेव्हा ओहोहो ! हे किती निडर असतील ? आणि भीती कशाची ठेवायची ? माझा असा शोध आहे की तुमचा वरिष्ठ कोणीच नाही, या जगात ! आणि ज्यांना तुम्ही वरिष्ठ मानता, भगवंताला,
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ....निर्दोष
ते तर तुमचे स्वरुप आहे! भगवंताचे स्वरुप कधीही वरिष्ठ असू शकत नाही. ते तुमच्यासाठी अनोळखी आहेत म्हणून ते वरिष्ठ असू शकत नाहीत. मग वरिष्ठ कोण? तर तुमचे ब्लंडर्स आणि मिस्टेक्स. हे दोन जर नसतील तर मग कोणीही तुमचा वरिष्ठ नाहीच. माझ्यातील ब्लंडर्स आणि मिस्टेक्स संपून गेल्या म्हणून माझा कोणीही वरिष्ठ नाही. जेव्हा तुम्हीही तुमच्यातील ब्लंडर्स आणि मिस्टेक्स काढून टाकाल तेव्हा तुमचाही कोणी वरिष्ठ राहणार नाही.
इथे लवकर येण्यासाठी तुम्ही त्या पोलीसवाल्यासोबत भांडून आलात, पोलिसाचे समाधान केल्याशिवायच आलात, पोलिसाने तुम्हाला गाडी थांबवण्यास सांगितले पण तुम्ही गाडी न थांबवताच इथे निघून आलात, म्हणून तो पोलिसवाला इथे येतो. तेव्हा त्याला पाहून तुम्हाला लगेच कळते की हा नक्कीच माझ्यासाठी आलेला आहे. कारण चूक केली होती ती लगेच तुमच्या लक्षात येते की, माझ्याकडून ही चूक झाली आहे. ती चूक संपवा. माझे म्हणणे काय आहे? की तुम्ही नुसत्या चुकाच केलेल्या आहेत, त्या संपवा. आत्तापर्यंत दुसऱ्यांच्याच चुका दिसल्या, स्वतःच्या चुका दिसल्याच नाहीत. जो स्वत:च्या चुका पाहतो, आणि त्या चुका संपवतो, तो भगवंत होतो.
मूळ चूक कोणती? आणि या बाजूला साधू-संन्यासी इच्छांना दूर सारण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्या इच्छा जातील अशा नाहीत. उलट दुप्पट होऊन येतात. मूळ चूक कुठे घडली आहे हे त्या लोकांना माहीतच नाही. इच्छा होणे ही मूळ चूक नाही, त्याची मूळ चूक शोधून त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे आपण बटण दाबले तर पंखा बंद होतो. परंतु जर चालू पंख्याला पकडून तो बंद करण्याचा प्रयत्न केला तर काहीही निष्पन्न होणार नाही. अर्थात मूळ चूक थांबवली पाहिजे.
'मी चंदुभाऊ (चंदुभाऊच्या जागी वाचकाने स्वत:चे नाव समजावे)
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आहे' हीच मूळ चूक आहे, मुख्य चूक हीच आहे. हा आरोपित भाव आहे, हा खरा भाव नाही. जसे इथे कोणी इंदिरा गांधी सारखे कपडे घालून आली आणि सर्वांना म्हणाली की 'मी इंदिरा गांधी आहे.' आणि असे सांगून त्याचा फायदा घेतला तर त्याचा गुन्हा लागू होणार की नाही? त्याचप्रमाणे 'मी चंदुभाऊ आहे,' याचा निरंतर फायदा घेत राहतो. हा आरोपित भाव म्हटला जातो, तोच गुन्हा आहे. ___ म्हणजे तुमच्या चुका आणि तुमचे ब्लंडर्स हे दोनच तुमचे वरिष्ठ आहेत. तुमचे ब्लंडर्स कोणकोणते असतील? 'मी चंदुभाऊ आहे' हे पहिले ब्लंडर.' 'मी यांचा मुलगा आहे' हे दुसरे ब्लंडर. 'मी हिचा नवरा आहे' हे तिसरे ब्लंडर. 'मी ह्या मुलाचा बाप आहे' हे चौथे ब्लंडर. असे किती ब्लंडर्स केले असतील?
प्रश्नकर्ता : अनेक केले असतील.
दादाश्री : हो. ह्या ज्या ब्लंडर्स आहेत त्या तुमच्याकडून तुटणार नाहीत. आम्ही ब्लंडर्स तोडून देतो आणि नंतर ज्या मिस्टेक्स आहेत त्या मग तुम्ही काढायच्या. कुणी वरिष्ठ नाही. मग उगाच कसली भीती! तुम्हाला हे समजले ना की कुणीही वरिष्ठ नाही? पक्की खात्री झाली ना?
चुका केव्हा समजतात? लोक मानतात की देव वरिष्ठ (उपरी) आहेत, म्हणून देवाची भक्ती केली तर आपण सुटून जाऊ. पण नाही, कोणी बापही वरिष्ठ नाही. तूच तुझा मालक, तुझा रक्षकही तूच आणि तुझा भक्षकही तूच. यु आर होल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबल फॉर युवरसेल्फ (तुम्हीच स्वतःसाठी संपूर्ण जबाबदार आहात.) स्वतःच स्वतःचे वरिष्ठ आहात. यात दुसरा कोणी बापही हस्तक्षेप करत नाही. आपला वर कोणी बॉस आहे ते सुद्धा आपल्या चुकांमुळेच आहे आणि अंडरहॅन्ड आहे, तेही आपल्या चुकांमुळेच आहे. म्हणून चुका तर संपवाव्याच लागतील ना?
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
स्वत:ची संपूर्ण स्वतंत्रता, आझादी हवी असेल तर स्वत:च्या सर्व चुका संपल्यावरच मिळेल. चूक केव्हा सापडते? जेव्हा 'स्वतः कोण आहे?' याचे भान होते, परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा!
जगाचा मालक कोण? या ब्रह्मांडातील प्रत्येक जीव ब्रह्मांडाचा मालक आहे. मात्र स्वत:चे भान नसल्यामुळे जीवदशेत राहतो. ज्याला स्वत:च्या देहावर सुद्धा मालकीपणाचा भाव नाही तो संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक झाला! हे जग आपल्या मालकीचे आहे असे लक्षात आले, हाच मोक्ष! अद्याप हे का समजले नाही? कारण आपल्याच चुकांनी आपण बांधले गेलो आहोत म्हणून. संपूर्ण जग आपल्याच मालकीचे आहे.
__ आमचा वरिष्ठ कोणीच नाही. वरती कोणी बॉस आहे किंवा कोणी बाप बसलेला आहे, असे नाही. जे आहात ते तुम्हीच आहात आणि तुम्हाला शिक्षा देणाराही कोणी नाही तसेच तुम्हाला जन्म देणारा सुद्धा कोणी नाही. तुम्ही स्वत:च जन्म घेता आणि देह धारण करता आणि मग परत जाता आणि परत येता. जाता आणि येता. तुमच्या मर्जीप्रमाणे व्यवहार चालत आहे. हिंदुस्तानात येईपर्यंत तर समजा सर्व नैसर्गिक, साहजिकरित्या होत आहे पण एकदा हिंदुस्तानात आल्यानंतर थोडेफार समजते की आपल्याकडून काहीतरी चूक घडत आहे.
समंजस माणूस इतकेच जरी समजला की, खरोखर माझ्यात इतर कुणीही हस्तक्षेप करु शकेल, दुःख देऊ शकेल असे नाही? तर आम्ही सांगू की, 'नाही, नाही, नाहीच!!!' आणि जर विचारेल की मग 'माझा वरिष्ठ सुद्धा कुणी नाही?' तेव्हा सांगू 'नाही, नाही, नाही!!!' तुझा वरिष्ठ तुझ्या ब्लंडर्स आणि मिस्टेक्स आहेत. ब्लंडर्स कसे तोडावे? तर आम्ही त्याला सांगू की 'भाऊ, त्यासाठी तर तू इथे ये.' आणि मिस्टेक्स कशा संपवाव्यात? तर ते आम्हाला तुला समाजावून सांगावे लागेल. त्यानंतर तू त्यांना संपव. आम्ही रस्ता दाखवू. म्हणजे मिस्टेक्स तुला संपवायच्या आणि ब्लंडर्स आम्ही तोडून देऊ.
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
न समजल्याने उभे केले दुःख
या जगातील सर्व दुःखं नासमजुतीमुळेच आहेत. दुसरे जे काही दुःखं आहे ते सर्व नासमजुतीमुळेच आहे. हे सर्व स्वतःच उभे केले आहेत, न दिसल्यामुळे! भाजलेल्याला जर कोणी विचारले की 'भाऊ, तुम्हाला कसे भाजले?' तेव्हा तो म्हणेल 'चुकून भाजलो, मी काय मुद्दाम भाजून घेणार? अशी ही सर्व दुःखं चुकांमुळेच आहेत. सर्व दुःखं आपल्याच चुकांचाच परिणाम आहे. चूक संपली की झाले !
प्रश्नकर्ता : कर्म चिकट असतात, त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागते का?
दादाश्री : आपणच कर्म केलेली आहेत म्हणून आपलीच चूक आहे. दुसऱ्या कुणाचाही दोष नाहीच या जगात. दुसरे तर फक्त निमित्त आहेत. दुःख तुमचे आहे आणि ते समोरील निमित्ताच्या हातून दिले जात आहे. सासरा वारल्याचे पत्र पोस्टमन देऊन गेला तर त्यात त्या पोस्टमनचा काय दोष ?
समोरचा तर आहे मात्र निमित्त
आपल्याला घराची अडचण असेल तेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आणि राहण्यासाठी घर दिले तर अशावेळी जगातील लोकांना त्याच्यावर राग (मोह, आसक्ती) उत्पन्न होतो आणि जेव्हा तीच व्यक्ती घर परत मागेल तेव्हा त्याच्यावर द्वेष उत्पन्न होतो. हा राग-द्वेष आहे. आता खरे पाहता यात राग-द्वेष करण्याची गरजच नाही, तो तर निमित्त आहे. देणारा आणि घेणारा, दोन्हीही निमित्तच आहेत. तुमच्या पुण्याचा उदय असेल तेव्हा तो देण्यासाठी भेटतो आणि पापाचा उदय असेल तेव्हा परत घेण्यासाठी भेटतो. त्यात त्याचा काहीच दोष नाही. तुमच्या उदयाच्या आधारावर आहे. त्यात समोरच्या व्यक्तीचा किंचितमात्रही दोष नाही. तो तर मात्र निमित्त आहे, असे आपले ज्ञान सांगते. किती सुंदर गोष्ट सांगते!!
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
अज्ञानीला तर कोणी गोड-गोड बोलले, तर त्याच्यावर राग (अनुराग) होतो आणि कोणी कडू बोलले तर द्वेष होतो. समोरचा गोड बोलतो ते स्वतःचे पुण्य प्रकाशित होत आहे आणि कडू बोलतो ते स्वत:चे पाप प्रकाशित होत आहे. म्हणून मुळात त्या समोरील दोन्हीही व्यक्तींना काही देणेघेणे नाही. कडू-गोड बोलणाऱ्याला काही देणेघेणे नाही. तो फक्त निमित्तच असतो. जो यशाचा निमित्त असेल, त्याच्याकडून यश मिळत राहते. आणि अपशयाचा निमित्त असेल त्याच्याकडून अपयश मिळत राहते. तो तर मात्र निमित्तच आहे, त्यात कुणाचाही दोष नाही.
प्रश्नकर्ता : सर्व निमित्तच म्हटले जातात ना?
दादाश्री : हो, तेही निमित्तच आहे. निमित्ताशिवाय या जगात दुसरी कोणतीही वस्तू नाही.
प्रश्नकर्ता : बाजारातून इथे सत्संगात आलो यात कोणते निमित्त?
दादाश्री : तो तर कर्माचा उदय आहे. यात निमित्ताचा काही प्रश्नच उद्भवत नाही. बाजारातील कर्माचा उदय पूर्ण झाला म्हणून या कर्माचा उदय इथे सुरु झाला, त्यामुळे आपोआपच विचार येतो की चला तिथे सत्संगला जाऊ. निमित्त केव्हा म्हटले जाईल? तुम्ही येथे येण्यासाठी निघालात, दादर स्टेशनला उतरलात आणि थोडे चालल्यानंतर कोणी रस्त्यात भेटले आणि ते तुम्हाला म्हणाले 'भाऊ, इथून परत फिरा, चला माझे महत्त्वाचे काम आहे. तेव्हा आपण समजावे की हे निमित्त आले. नाही तर चालती गाडी, कर्माच्या उदयाप्रमाणे चालतच राहते.
टोचत नाहीत बोल, दोषाशिवाय प्रश्नकर्ता : कोणी आपल्याला काही ऐकवून जातो ते सुद्धा नैमित्तिकच आहे ना? आपला दोष नसेल तरीही बोलत असेल तर?
दादाश्री : आपला दोष नसेल आणि कोणी काही बोलेल, असे बोलण्याचा अधिकार कोणालाच नाही. जगात कुठल्याही मनुष्याला तुमचा
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दोष नसतानाही बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून हा जो बोलत आहे, ती तुमची जी चूक आहे, त्याचाच तो मोबदला देत आहे. हो, ती तुमच्या मागील जन्माची चूक आहे, त्या चुकीचा बदला हा मनुष्य तुम्हाला देत आहे. तो निमित्त आहे आणि चूक तुमची आहे म्हणूनच तो बोलत आहे.
आपली चूक आहे म्हणूनच तो बोलत आहे, म्हणजे तो मनुष्य आपल्याल्या त्या दोषातून मुक्त करत आहे. तेव्हा त्याच्यासाठी भाव बिघडवू नये. उलट आपण असे म्हटले पाहिजे की, 'हे प्रभु! त्याला सद्बुद्धी द्या.' इतकेच म्हटले पाहिजे, कारण तो निमित्त आहे.
चावा घेतात निमित्ताचा आम्हाला तर कोणत्याही मनुष्यासाठी खराब विचार सुद्धा येत नाहीत. बरे-वाईट करुन गेला तरीही खराब विचार नाही! कारण ती त्याची दृष्टी, त्या बिचाऱ्याला जसे दिसते तसे तो करतो. त्यात त्याचा काय दोष? आणि वास्तवात, एक्जेंटली हे जग काय आहे ? तर या जगात कोणी दोषी नाहीच. तुम्हाला दोष दिसतो, ते तुमच्या बघण्याच्या दृष्टीत फेर आहे. मला आत्तापर्यंत कोणी दोषी दिसलेच नाही. अर्थात कोणीही दोषी नाहीच, असे मानूनच तुम्ही चला ना! आपले शेवटचे स्टेशन आहे, ते सेंट्रल आहे असे मानून चालले तर त्यात फायदा होईल की नाही? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : हो, फायदा होतो.
दादाश्री : कोणी दोषी नाही असे जाणून घ्याल तरच इतर सर्व निर्दोष वाटतील आपल्याला! कारण आपण निमित्त आहोत. आणि ते बिचारेही निमित्त आहेत. आपले लोक निमित्ताचाच चावा घेतात. निमित्ताचा चावा घेणे, असे करतात का कधी? नाही ना? निमित्ताचा चावा घेतात का?
प्रश्नकर्ता : हो, आम्ही निमित्ताचाच चावा घेत असतो, पण असे करायला नको ना?
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : दुसऱ्यांचे दोष पाहणे यास आम्ही निमित्ताचा चावा घेण्याची स्थिती म्हणतो. अरेरे, तू निमित्तालाच चावलास? तो तुला शिव्या देतो, हा तर तुझ्या कर्माचा उदय आहे आणि हा उदय तुला भोगायचा आहे. त्यात तो निमित्त आहे. निमित्त तर उपकारी आहे, तो तर तुला कर्मातून सोडविण्यासाठी आला आहे. तो उपकारी आहे आणि तू त्याला शिव्या देतोस ? तू त्याला चावायला धावतोस ? म्हणजे तू निमित्ताचा चावा घेतलास असे म्हटले जाईल. म्हणून हे महात्मा घाबरतात की नाही, आता आम्ही निमित्ताला कधीही चावणार नाही !
'याने मला फसवले' असे बोलणारा भयंकर कर्म बांधतो ! त्यापेक्षा दोन थोबाडीत मारल्या तर कमी कर्म बांधले जाईल. हे तर जेव्हा फसवणूक होण्याची वेळ येते, आपल्या कर्माचा तसा उदय येतो तेव्हाच आपली फसवणूक केली जाते. त्यात समोरच्या व्यक्तीचा काय दोष? त्याने तर उलट आपले कर्म संपवले, तो तर निमित्त आहे.
अनुमोदनेचे फळ
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांच्या दोषाचा दंड आपल्याला मिळतो का ?
दादाश्री : नाही, यात दुसऱ्या कुणाचाही दोष नाही. स्वत:च्या दोषानेच समोरची व्यक्ती निमित्त बनते. हे तर जो भोगतो त्याची चूक. करणे, करविणे आणि अनुमोदन करणे. त्या अनुमोदनेचे सुद्धा फळ येते. केल्याशिवाय फळ येत नाही.
प्रश्नकर्ता : अनुमोदन कशास म्हणतात ?
दादाश्री : कोणी काही कार्य करताना डगमगत असेल तेव्हा तुम्ही म्हणाल की, 'तू आपला कर, मी आहे ना !' यास अनुमोदन केले असे म्हणतात. आणि अनुमोदन करणाऱ्याची जास्त जबाबदारी म्हटली जाते ! काही केल्याचे फळ कोणाला जास्त मिळते ? तर ज्याने जास्त बुद्धी वापरली, त्याला. म्हणजे त्यानुसार वाटणी होते.
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आव्हान नसेल तर पूर्णतेची प्राप्ती
या जगात कोणतीही व्यक्ती तुमचे काही नुकसान करते, त्यात ती निमित्त आहे. नुकसान तुमचे आहे म्हणून रिस्पॉन्सिबल (जबाबदार) तुम्ही आहात. कोणतीही व्यक्ती कुणाचे काहीच करु शकत नाही, असे हे स्वतंत्र जग आहे. आणि जर कोणी काही करु शकत असते तर भीतीला मर्यादाच उरली नसती! मग तर कोणी कोणालाही मोक्षाला जाऊच दिले नसते. महावीर भगवंतांना सुद्धा मोक्षाला जाऊ दिले नसते! महावीर तर सांगतात की, तुम्हाला जे अनुकूल वाटत असेल तसे भाव माझ्यासाठी करा. तुम्हाला माझ्यावर विषय विकारी भाव येत असतील तर विषय विकारी भाव करा, निर्विषयी भाव येत असतील तर निर्विषयी भाव करा, धर्माचे भाव येत असतील तर धर्माचे भाव करा, पूज्यपदाचे भाव येत असतील तर पूज्यपद द्या. शिव्या द्यायच्या असतील तर, शिव्या द्या. मी कशालाही आव्हान करत नाही. जो कशाचेही आव्हान करत नाही, तो मोक्षाला जातो आणि आव्हान करणाऱ्याला येथेच पडून राहावे लागते.
नाहीतर हे जग असे आहे की, ते तुमच्यावर चांगले किंवा वाईट भाव निरंतर करतच राहील. तुम्ही खिशात पैसे ठेवत असाल आणि जर एखाद्या खिसेकापूने ते पाहिले तर तो खिसा कापण्याचा भाव करणार की नाही? की याच्याकडे पैसे आहेत म्हणून याचा खिसा कापला पाहिजे. पण तेवढ्यातच गाडी आली आणि तुम्ही गाडीत बसून निघून गेलात आणि तो तिथेच राहिला. पण लोक असे भाव करतातच. तुम्ही त्यांचे आव्हान स्वीकारत नसाल तर कोणीही तुमचे नाव घेऊ शकत नाही. कुणाच्याही भावात जर तुमचा भाव सामावला नसेल तर कोणी तुम्हाला बांधू शकत नाही. असे जर कोणी बांधले तर कधी अंतच येणार नाही ना ? तुम्ही स्वतंत्र आहात, कोणीही तुम्हाला बांधू शकत नाही.
एकामधून अनंत, अज्ञानतेने
हा डोळा जर हाताने दाबला गेला तर वस्तू एक असूनही दोन
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दिसतात. डोळा, हे आत्म्याचे रियल स्वरुप नाही, ते तर रिलेटिव्ह स्वरुप आहे. तरी सुद्धा, एक चूक झाल्यामुळे एका ऐवजी दोन दिसतात ना? हे काचेचे तुकडे जमिनीवर पडलेले असतील तर त्यात कितीतरी डोळे दिसतात? थोड्याशाच चुकीमुळे कितीतरी डोळे दिसतात? त्याचप्रमाणे हा आत्मा स्वतःहून दाबला जात नाही पण संयोगाच्या प्रेशरमुळे (दबावामुळे) एकाची अनंत रुपे दिसतात. हे संपूर्ण जग भगवत् स्वरुप आहे. या झाडाला कापण्याचा फक्त भाव जरी केला तरीही कर्म बांधले जाते असे आहे. समोरच्या व्यक्तीसाठी थोडासाच खराब विचार केला तरीही पाप लागते आणि चांगला विचार केला तर पुण्य बांधले जाते.
__ आपण इथे सत्संगात आलो आणि इथे माणसे उभी असतील तर मनात असे येते की हे सर्व इथे का उभे आहेत? असे भाव बिघडतात. तेव्हा त्या चुकीसाठी लगेचच प्रतिक्रमण करावे लागते.
दोनच वस्तू विश्वात संयोग आणि शुद्धात्मा हे दोनच आहेत. संयोग का निर्माण झालेत? संयोग सर्वांना वेगवेगळे येतात. हो, एखाद्याला संपूर्ण आयुष्यात कोणी मारणारा भेटतच नाही आणि एखाद्याला आयुष्यभर अनेकदा मार खावा लागतो. तर याला असा संयोग जुळून येतो आणि त्याला तसा, असे का घडते? कारण त्याने कधी कुणाला मारण्याचा भावच केला नव्हता म्हणून त्याला असे संयोग आणि ह्याने मारण्याचे भाव केले होते म्हणून याला तसे (मार खाण्याचे) संयोग जुळून येतात. अर्थात, हे संयोग कशाने जुळून आलेत, याचीही कारणे सापडतील असे आहे. हे संयोग कोणत्या कारणांनी जुळून आले हेही समजू शकते.
रस्त्यात एखादा गरीब माणूस भेटला आणि तो खूप रडत असेल म्हणून तुम्ही त्याला अकरा रुपये देत असाल, तेव्हा हा भाऊ म्हणेल की, 'राहू द्या ना, त्याला फक्त एकच रुपया द्या, अकरा रुपये कशासाठी देता?' आता तो पैसे घेणारा, तुम्ही पैसे देणारे, आणि या भाऊने मनाई केली
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
म्हणजे अंतराय पडला. त्याला पैसे मिळत होते त्यात अंतराय पडला. त्या अंतराय कर्मामुळे त्या भाऊला पैसे मिळणार नाहीत.
आता हे जे सर्व केले त्याचेच सर्व संयोग जुळून आले आहेत. हे काही नवीन संयोग नाहीत. तुमचा कोणीही वरिष्ठ नाही, त्याचप्रमाणे तुमचा कोणीही अंडरहँन्ड (कनिष्ठ) देखील नाही. संपूर्ण जग स्वतंत्र आहे. तुमच्या चुकाच तुमच्या वरिष्ठ आहेत. बस, तुमच्या ज्या चुका आहेत त्याच! चुका आणि ब्लंडर्स!!!
___ तात्पर्य, तुमची चूक नसेल तर जगात कोणीही तुमचे नाव घेऊ शकत नाही. पाहा, रस्त्यात कोणी नाव घेते का? पोलिसवाला, चेकिंगवाला कोणी काही त्रास देतात का? हैराण करतात का? कारण तुमची चूक नसेल तर कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही.
आमंत्रण दिले थप्पडला, भरपाईसोबत कोणी आपल्याला शिव्या दिल्या, आपल्याला वाईट ऐकावे लागले, तर आपण खूपच पुण्यवान म्हटले जाऊ, त्याशिवाय तो आपल्याला भेटलाच नसता ना! आजपासून दहा-पंधरा वर्षांपूर्वी मी असे सांगत होतो की, कोणत्याही व्यक्तीला जर पैशांची अडचण असेल तर त्याने मला एक थप्पड मारावी, मी त्याला पाचशे रुपये देईन. असा एक माणूस मला भेटला होता, मी त्याला म्हणालो की, 'तुला पैशांची अडचण आहे ना? शंभर-दोनशेची? तर तुझी अडचण आजपासूनच दूर होईल. मी तुला पाचशे रुपये देईन, तू मला एक थप्पड मार. तेव्हा तो म्हणाला, 'नाही दादा, असे नाही होऊ शकत.' म्हणजे थप्पड मारणारा आणायचा तरी कुठुन? विकत आणला तरीही कोणी भेटेल असे नाही, आणि शिव्या देणाराही भेटेल असे नाही. तेव्हा ज्याला घर बसल्या असे फ्री ऑफ कॉस्ट (फुकट) मिळत असेल तो तर भाग्यवानच म्हटला जाईल ना! कारण मला पाचशे रुपये देऊनही असा कोणी सापडत नव्हता.
हे ज्ञान होण्यापूर्वी मी स्वत:लाच शिव्या देत होतो. कारण मला
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
कोणी शिव्या देणारा भेटला नव्हता ना! मग विकत कुठून आणणार आपण? आणि विकत देणारही कोण? आपण समोरुन त्याला म्हणालो की, 'तू मला शिवी दे.' तरीही तो म्हणेल की 'नाही, तुम्हाला शिवी नाही देऊ शकत.' म्हणजे पैसे देऊनही कोणी शिवी देत नव्हता. म्हणून मग मला स्वतःलाच शिव्या द्याव्या लागत होत्या, 'तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही मूर्ख आहात, गाढव आहात, असे आहात, तसे आहात, मोक्षधर्म काही कठीण आहे की, तुम्ही एवढा धुमाकूळ घालून ठेवलाय?' अशा शिव्या स्वतःच देत होतो. दुसरा कोणी शिव्या देणारा नसेल मग काय करणार? तुम्हाला तर घर बसल्या शिव्या देणारा भेटतो, फ्री ऑफ कॉस्ट भेटतो, तेव्हा त्याचा फायदा करुन घ्यायला नको का?
लुटारु सुद्धा दूर राहतात, शीलवंतांपासून शीलचा प्रभाव असा आहे की जगात कोणी त्याचे नाव घेऊ शकत नाही. लुटारुंच्या जवळपास राहत असेल, पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या घातल्या असतील, शरीरभर सोन्याचे दागिने घातले असतील आणि जर समोर लुटारु भेटले. तर लुटारु त्याला पाहतात खरे पण हात लावू शकत नाहीत, स्पर्श करु शकत नाही. अजिबात घाबरण्यासारखे हे जग नाही. जी काही भीती आहे ती तुमच्याच चुकांचे फळ आहे, हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोक असेच समजतात की, हे जग बेकायदेशीर आहे.
प्रश्नकर्ता : समजूतीचीच कमतरता !
दादाश्री : समजूतीच्या कमरतरतेमुळेच हे जग टिकून राहीले आहे. आम्ही हेच सांगू इच्छितो की, जगात भीती बाळगण्याची गरजच नाही. ही जी भीती वाटते, तो तुमचा हिशोब आहे. हिशोब चुकता होऊ द्या. इथे पुन्हा नव्याने उधारी करु नका.
तुमच्याशी कोणी वाईट बोलला, तर तुम्हाला वाटते की, हा मला वाईट का बोलतो? मग तुम्ही सुद्धा त्याला पाच शिव्या घालता. म्हणजे
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
१३
तुमचा जो हिशोब होता तो फेडताना नवीन हिशोबाची खातेवही चालू केली. एक शिवी उधार होती, तीच तो परत करण्यासाठी आला होता, तर तुम्ही ते जमा करुन घ्यायची होती, त्या ऐवजी तुम्ही नवीन पाच शिव्या दिल्या. ही एक शिवी तर तुम्हाला सहन होत नाही आणि वरुन पाच शिव्या उधार दिल्या. आता इथे मनुष्याची बुद्धी कशी काय पोहोचू शकेल? उधारी करुन उलट गुंतागुंत वाढवतो. नवीन गुंता निर्माण करतो.
आम्ही पंधरा वर्षांपासून उधार देत नाही म्हणून तर एवढे सारे हिशोब पूर्ण झाले ना! उधार देणेच बंद केले! फक्त जमाच करा. 'यांना' (स्वत:ला) सांगितलेलेच होते, की जमा करुन टाका. सोपे आहे ना, मार्ग सोपा आहे ना? आता हे शास्त्रांमध्ये लिहिलेले नसते.
कोणी काहीच करु शकत नाही. तुम्ही स्वतंत्र आहात. तुमचे वरिष्ठ कोणीच नाही. भगवंत सुद्धा वरिष्ठ नाहीत तेव्हा मग काय! भगवंतांच्या नावाने तुम्ही आश्वासन घेता की भगवंत आपल्यावर दया करतील! 'पुढचे पुढे बघू' असे बोलून चुकीचे काम करता, जबाबदारी ओढवून घेता!
ज्ञानींना भोगावे लागत नाही कुणालाही आपल्याकडून किंचितमात्रही दुःख झाले तर समजावे की आपली चूक आहे. आपल्या आतील परिणाम वर-खाली झाले म्हणजे चूक आपली आहे, असे समजते. जेव्हा समोरील व्यक्ती भोगते, तेव्हा त्याची चूक तर प्रत्यक्ष आहेच परंतु निमित्त आपण बनलो, आपण त्याला रागावलो म्हणून आपली सुद्धा चूक आहे. दादांना का भोगावे लागत नाही? कारण त्यांची एकही चूक उरली नाही. आपल्या चुकीमुळे समोरच्या व्यक्तीवर कोणताही परिणाम झाला (थोडे जरी दुःख झाले) आणि जर काही उधारी झाली तर लगेचच मनात माफी मागून जमा करुन घ्यावी. आपल्यात क्रोध-मान-माया-लोभरुपी कषाय आहेत, त्यामुळे उधारी झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून अशा वेळी जमा करुन घ्यावे. आपल्याकडून चूक झाली असेल तर उधारी होते पण आपण लगेचच
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
कॅश-रोकडे प्रतिक्रमण करुन घ्यावे. आपल्यामुळे कोणाला अतिक्रमण झाले तर आपण ते जमा करुन घ्यावे आणि मागे उधारी ठेवू नये. आणि जर कोणामुळे आपले अतिक्रमण झाले तर आपण आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करुन घ्यावे.
चूक संपवतो तो परमात्मा ज्याने एकदा नक्की केले की माझ्यात ज्या चुका शिल्लक राहिल्या आहेत त्या मला संपवायच्या आहेत, तर तो परमात्मा होऊ शकतो. आपण आपल्या चुकांमुळे बंनधनात अडकलो आहोत. चूक संपवली म्हणजे आपण परमात्माच आहोत. ज्याच्यात एकही चूक उरली नाही तो स्वतः परमात्माच आहे. ती चूक काय सांगते? की, 'तू मला ओळख, मला जाणून घे.' हे तर असे आहे की चुकांनाच स्वत:चे चांगले गुण मानत होतो. चुकांचा स्वभाव कसा आहे की, त्या आपल्यावर नियंत्रण करतात पण चुकीला चूक मानले तर ती पळून जाते. मग ती थांबत नाही. निघूच लागते. पण हे तर काय करतात की त्या चुकीला चूक आहे असे जाणत नाहीत, उलट तिचे रक्षण करतात. म्हणजे चुकांना घरातच जेवू घालतात.
दिला आधार चुकांना, रक्षण करुन प्रश्नकर्ता : दादा, चुकांचे रक्षण कशाप्रकारे केले जाते?
दादाश्री : आपण कुणावर रागावल्यानंतर म्हटले की, 'आपण त्याला रागावलो नसतो तर त्याला समजलेच नसते, म्हणून त्याला रागावलेच पाहिजे,' यामुळे ती 'चूक' असे समजते की या भाऊला अजून माझी ओळख पटली नाही. हा तर उलट माझीच बाजू घेतो. म्हणून इथेच खा, प्या आणि राहा. एकदाच जरी आपण चुकांचे रक्षण केले तर त्या चुकांचे वीस वर्ष आयुष्य वाढते. कोणत्याही चुकांचे रक्षण करु नये.
चावी चुकांना संपविण्याची मन-वचन-कायेने प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने सतत क्षमा
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
मागत राहावी. पावलोपावली जागृती राहिली पाहिजे. आपल्यातील क्रोधमान-माया-लोभाचे कषाय आपल्याकडून चुका करवून पुन्हा उधारी करवतात, असाच आपला माल आहे. त्या चुका करवतातच आणि उधारी उभी करतात पण त्यावेळी आपण लगेचच, त्याचक्षणी माफी मागून जमा करुन स्वच्छ करुन टाकावे. हा व्यापार पेन्डिंग ठेवू नये. हा तर दरअसल रोख व्यापार म्हटला जाईल.
प्रश्नकर्ता : आत्ता ज्या चुका होत आहेत त्या मागील जन्माच्या आहेत ना?
दादाश्री : मागील जन्माच्या पापांमुळेच या चुका आहेत. पण पुन्हा या जन्मात चुका संपवतच नाहीत आणि वाढवतच जातात. चूक संपवण्यासाठी चुकीला चूक म्हणावे लागते. तिचे रक्षण करु नये. ही ज्ञानी पुरुषांची चावी आहे. या चावीने कुठलेही कुलूप उघडले जाते.
___ ज्ञानी पुरुष तुमच्या चुकांसाठी काय करु शकतात? तर ते फक्त तुमची चूक तुम्हाला दाखवतात, प्रकाश धरतात आणि मार्ग दाखवतात की चुकांचे रक्षण करु नका. परंतु जर चुकांचे रक्षण केले की, 'आपल्याला तर या जगात राहायचे आहे, तर असे कसे करु शकतो?' अरे, बाबा, ! असे चुकांना पोषण देऊन त्यांचे रक्षण करु नकोस. एक तर चूक करतोस आणि वरुन कल्पांत करतोस म्हणून कल्पच्या अंतापर्यंत (काळचक्र संपेपर्यंत) राहावे लागेल!
__ चूक ओळखू लागला म्हणजे चूक संपते. कित्येक लोक कापड (विकण्यासाठी माप घेताना) ताणून-ताणून मापतात आणि वरुन सांगतात की, आज तर पाव मीटर कापड कमी दिले. एक तर हे एवढे मोठे रौद्रध्यान आणि परत त्याचे रक्षण? चुकांचे रक्षण करायचे नसते. तूप विकणारा कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे तुपात भेसळ करुन पाचशे रुपये कमावतो. तो तर मुळासकट वृक्ष लावतो. स्वत:च स्वत:चे अनंत जन्म बिघडवून टाकतो.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
१६
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बंद करा कषायांचे पोषण एखाद्या व्यक्तीला चूक रहित व्हायचे असेल तर आम्ही त्याला सांगतो की, फक्त तीनच वर्ष क्रोध-मान-माया-लोभ यांना जेवण (पोषण) देऊ नको. तेव्हा ते सर्व मरतुकडे होऊन जातील. चुकांना जर फक्त तीनच वर्ष खाऊ घातले नाही तर त्या घर बदलून टाकतील. दोष म्हणजेच क्रोध-मान-माया-लोभाचे रक्षण करणे (त्यांची बाजू घेणे.) फक्त तीनच वर्ष त्यांचे कधीच रक्षण केले नाही तर त्या पळून जातात.
ज्ञानी पुरुषांनी दाखवल्याशिवाय मनुष्याला स्वत:च्या चुकांची जाणीव होत नाही. अशा तर अनंत चुका आहेत. ही एकच चूक नाही. अनंत चुकांनी आपल्याला घेरले आहे.
प्रश्नकर्ता : पण जास्त चुका दिसत नाहीत. थोड्याशाच दिसतात.
दादाश्री : इथे सत्संगात बसल्याने आवरण तुटत जातात, त्यामुळे मग दोष दिसतात.
प्रश्नकर्ता : जास्त दोष दिसावेत यासाठी जागृती कशी येते?
दादाश्री : आपल्या आत जागृती तर खूप आहे पण दोषांना शोधण्याची भावना झालेली नाही. पोलिसाला जेव्हा चोराला शोधण्याची इच्छा होते तेव्हा चोर सापडतो. पण जर पोलिस म्हणत असेल की, 'चोराला पकडण्याची काही गरज नाही, तो जेव्हा हाती लागेल तेव्हा पकडू.' मग काय, चोराची तर मजाच झाली ना? या चुका तर लपून बसलेल्या आहेत, त्यांना शोधल्यावर लगेच पकडल्या जातात.
संपूर्ण कमाईचे फळ काय? तुम्हाला जर तुमचे दोष एका पाठोपाठ एक दिसू लागले तरच खरी कमाई केली असे म्हटले जाईल. हा सगळा सत्संग स्वत:चे सर्व दोष पाहावे यासाठीच आहे. आणि जेव्हा स्वत:चे दोष दिसतील तेव्हाच जातील. दोष केव्हा दिसतील? जेव्हा स्वतः 'स्वयं' होईल, 'स्वस्वरुप' होईल तेव्हा. ज्याला स्वत:चे दोष जास्त दिसतात तो
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
उच्च. जेव्हा या देहासाठी, वाणीसाठी, वर्तनासाठी संपूर्ण निष्पक्षपातीपणा उत्पन्न होतो, तेव्हाच स्वतः स्वतःचे सर्व दोष पाहू शकतो.
आंधळेपणा नाही पाहू देत दोषाला
तुला तुझे किती दोष दिसतात ? आणि किती दोष तू धुऊन टाकतोस ?
प्रश्नकर्ता: दोष तर पुष्कळ दिसतात, जसे की क्रोध आहे, लोभ आहे.
दादाश्री : ते तर चार-पाच दोष, हे जे दिसले ते न दिसण्याबरोबरच आहे. आणि जर तुला इतरांचे दोष पाहण्यास सांगितले तर किती दोष दिसतील ?
प्रश्नकर्ता : पुष्कळ दिसतात.
दादाश्री : पुष्कळ दोष पाहू शकतोस.
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : रस्त्याने जाताना सुद्धा दुसऱ्यांचे दोष दिसतात, 'तुला चालता येत नाही, तू असा चालतोस, तू असा आहेस,' असे सर्व दोष दिसतात आणि स्वतः चे दोष मात्र दिसतच नाहीत. कारण क्रोध-मानमाया - लोभामुळे आंधळा झालेला आहे. लोभाने आंधळा, क्रोधाने आंधळा, मायेने आंधळा, मानाने आंधळा, हे सर्व अंध स्वरुप आहे. उघड्या डोळ्यांनी आंधळा होऊन फिरतात, भटकत राहतात. ही केवढी मोठी उपाधि म्हटली जाईल !
संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहे आणि सर्व काही झोपेतच करत आहेत, असे महावीर भगवंत सांगतात. कारण ते स्वत:चे अहित करीत आहेत. उघड्या डोळ्यांनी अहित करीत आहे, याला भगवंतांनी भावनिद्रा म्हटले. संपूर्ण जग भावनिद्रेतच आहे. 'मी शुद्धात्मा आहे.' असे भान झाल्यानंतर भावनिद्रा सर्वांश (पूर्णपणे) गेली असे म्हटले जाईल, जागृत झालो असे म्हटले जाईल.
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बुद्धीच्या वकिलीने जिंकतात दोष जागृत झाल्यावर सर्वच लक्षात येते की इथे आपली चूक होत आहे, अशी चूक होत आहे. नाहीतर स्वतःला स्वतःची एकही चूक सापडत नाही. फक्त दोन-चार मोठ्या चुकाच तेवढ्या दिसतात. स्वतःला दिसतील तेवढ्याच. कधी असे बोलतातही की, थोडासा क्रोध आहे आणि जरासा लोभही आहे, असे बोलतातही पण जर आपण त्यांना सांगितले की 'तुम्ही क्रोधी आहात.' तेव्हा स्वतःच्या क्रोधाचे रक्षण करतात, बचाव करतात. आमचा क्रोध हा क्रोध गणला जात नाही अशी वकिली करतात. आणि ज्याची वकिली कराल, तो नेहमी तुमच्यावर वर्चस्व गाजवतो.
जगातील सर्व लोकांना क्रोध-मान-माया-लोभ काढायचे आहेत. काढण्याची इच्छा कोणाला नसेल? हे सर्व शत्रूच आहेत, असे सर्व जाणतात, तरी सुद्धा रोज जेवू घालतात आणि दोषांना वाढवतात. स्वतःची चूक दिसतच नाही. तेव्हा मग मनुष्य चुकांना खतपाणीच देईल ना!
ज्ञानी स्वीकार करतात, निजदोषांचा... चूक झाली असेल, पण त्याचे आयुष्य कशाप्रकारे वाढते ते मी जाणत होतो. म्हणून मी काय करायचो? सर्व बसले असतील आणि तिथे कोणी येऊन म्हणेल की 'मोठे ज्ञानी होऊन बसले आहात पण तुमचा हुक्का तर सुटत नाही.' असे बोलेल ना, तेव्हा मी म्हणायचो की, 'महाराज हा एवढा आमचा कमकुवतपणाच आहे, हे मी जाणतो.' तुम्हाला तर हे आज कळले पण मला तर हे आधीपासूनच माहीत आहे. आणि मी जर असे म्हणालो की, 'आमच्यासारख्या ज्ञानींना काही स्पर्शत नाही.' झाले मग! तो हुक्का समजून जातो की इथे आपले वीस वर्षांचे आयुष्य वाढले! कारण मालक चांगले आहेत, कसेही करुन आपले रक्षण करतात. असा काही मी कच्चा नाही. मी कधीही चुकांचे रक्षण केले नाही. लोक रक्षण करतात की नाही करत?
प्रश्नकर्ता : हो करतात, खूप जोरदार रक्षण करतात.
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : एक साहेब तपकीर ओढत होते, असे करुन! मी म्हणालो, साहेब ही तपकीर ओढणे तुमच्यासाठी आवश्यक आहे का? तेव्हा ते म्हणाले, 'तपकीर ओढण्यात काही हरकत नाही.' मी (मनातल्या मनात) म्हणालो, या साहेबांना हे माहीतच नाही की ते या तपकीरीचे आयुष्य वाढवत आहेत! कारण आयुष्य म्हणजे काय? तर कुठलाही संयोग असेल तो त्याचा वियोग होण्याचे नक्की झाल्यानंतरच जुळून येतो. आणि हे तर जे नक्की झालेले आहे त्याचे परत अशाप्रकारे आयुष्य वाढवतात! कारण जिवंत मनुष्य, हवे तितके कमी-जास्त करत राहतो, मग शेवटी काय होणार?! तर हे सर्व चुकांचे आयुष्य वाढवतच आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांचे रक्षण करत असतात की 'यात काही हरकत नाही, आम्हाला तर स्पर्शतच नाही.' चुकीच्या गोष्टींचे रक्षण करणे हा तर भयंकर गुन्हा आहे.
प्रश्नकर्ता : आणि जे शुष्क अध्यात्म्यात खोलवर उतरलेले असतील ते असे सांगतात की आत्म्याला काही स्पर्शत नाही. हे तर सर्व पुद्गलचे आहे.
दादाश्री : असे तर इथे पुष्कळ आहेत. गोल-गोल, गोल-गोल फिरवतात. त्यातलाच माल, त्यास शुष्क म्हटले जाते.
सर्व ऐकल्यानंतर मग मी सांगतो की भगवंताने सांगितले आहे की इतकी लक्षणे पाहिजेत. मृदुता, ऋजुता, क्षमा! इथे तर मृदुता दिसत नाही. ऋजुता दिसत नाही, असा तर ताठपणा आहे!
ताठा आणि आत्मा यात तर खूप अंतर आहे.
इथे तर नुसती पोलंपोल चालत असते. हे लोक उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणून मग हे सर्व खोटेनाटे चालवतात. पण माझ्यासारखे तर उत्तर देतातच ना? लगेचच उत्तर देतात. बिरबलासारखे, अगदी हजरजबाब.
दोष स्वीकारा, उपकार मानून आमच्यात जराही आडमुठेपणा नसतो, कोणी आम्हाला आमची
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
चूक दाखवली तर आम्ही ते लगेचच एक्सेप्ट (स्वीकार) करतो. कोणी म्हटले की ही तुमची चूक आहे, तर आम्ही सांगू की, 'हो भाऊ, तू आम्हाला आमची चूक दाखवलीस म्हणून तुझे उपकार.' आम्ही असेच समजतो की त्याने चूक दाखवली म्हणून त्याचे उपकार, मग दोष आहे की नाही याचा शोध घ्यायचा नाही. त्यांना दिसत आहे म्हणून दोष आहेच. माझ्या कोटामागे लिहिले असेल की, 'दादा चोर आहेत'. मग लोक मागे बोलतील की नाही? 'दादा चोर आहे.' असे का बोलतात? कारण माझ्या कोटाच्या मागे तसे लिहिले आहे, बोर्ड लावला आहे ना, तो त्यांना दिसतो! तो बोर्ड जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजते की हो, मागे बोर्ड लावला आहे. जरी दुसरा कोणी लिहून गेला असेल, पण या सर्वांना वाचता तर येते ना!
प्रश्नकर्ता : दादांनी आप्तवाणीत असे लिहीले आहे की, 'दादा चोर आहेत.' असे जर कोणी लिहीले तर, त्याचा महान उपकार, मानावा असे लिहीले आहे.
दादाश्री : हो लिहीले आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे ते कसे?
प्रश्नकर्ता : हो, जर उपकार मानले नाही तर त्यात तुमचा संपूर्ण अहंकार वर येऊन द्वेषात परिणमित होईल. त्याचे काय नुकसान होणार आहे? त्याच्या बापाचे काय जाणार आहे? तो तर दिवाळखोर होऊन उभा राहील आणि तुम्ही मात्र स्वतःचे दिवाळे काढले. स्वत:चे दिवाळे निघू नये यासाठी तुम्ही म्हटले पाहिजे, 'भाऊ, तुझा उपकार आहे!' आपले दिवाळे निघू नये म्हणून. तो तर दिवाळा काढूनच बसला आहे. त्याला काय? त्याला जगाची पडलेली नाही. तो तर वाटेल ते बोलेल. बेजबाबदारीचे वाक्य कोण बोलतो? तर ज्याला स्वत:च्या जबाबदारीचे भान नाही तोच. मग आपणही त्यांच्या सोबत भुंकू लागलो तर आपण सुद्धा कुत्राच म्हटले जाऊ. म्हणून आपण म्हणावे, 'तुझे खूप उपकार आहे.'
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
२१
प्रश्नकर्ता : आपल्या दोषाचे भाव उदयात आले, ते आपण पाहायचे आणि समजायचे, म्हणून आपण त्याचे उपकार मानावे?
दादाश्री : हो, जिथे-जिथे दोष होत असेल तिथे आतून उपकार मानावेत, तेव्हा तो दोष होणे बंद होईल. पोलिसवाल्यावर अभाव होत असेल तर, त्याचे उपकार मानावे, त्यामुळे अभाव होणे बंद होईल. आज कुठलाही मनुष्य खटकत असेल तर, 'तो खूप चांगला माणूस आहे, तो तर आपला उपकारी आहे' असे म्हणाल तर, ते खटकणे बंद होईल. अर्थात हे जे शब्द आम्ही देत आहोत ना, ते एक-एक शब्द औषधच आहेत. हे सर्व औषध आहे! दरअसल औषध! नाहीतर 'चोर' म्हणणाऱ्याचे पण उपकार माना, हे वाक्य तुम्हाला कसे समजेल? तुम्ही हे सर्व मला विचारण्यासाठी तर येणार नाहीत आणि तुमचे परिणाम बिघडतील. त्यापेक्षा तुम्ही उपकार माना, दादांनी सांगितलेले इतके तुम्ही मान्य करा की, भाऊ, त्याचे उपकार आहे, दादांनी सांगितले आहे म्हणून.
प्रश्नकर्ता : दादा स्वतःच उपकार मानतात, मग आम्हीही उपकार मानू, त्यात काय हरकत आहे?
दादाश्री : हो, आपण असा हिशोब लावला पाहिजे की, 'हे तर चांगलेच आहे, फक्त चोरच म्हणाला, लुच्चा आहे, बदमाश आहे, नालायक आहे, असे सर्व तर नाही म्हणाला ना.' इतका तर तो चांगला आहे ना? नाहीतर काय, त्याचे तोंड आहे, तो वाटेल ते बोलेल. आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. आपण उपकार मानावे. उपकार मानल्याने आपले मन बिघडत नाही. समजलं!
ही गोष्ट सिद्धांतिक आहे. ती कशाप्रकारे, की जर तुम्ही मला विचारले की 'दादा, तो तुम्हाला चोर म्हणतो, तर तुम्ही काय कराल?' तेव्हा मी सांगेन की, 'भाऊ' त्याचे उपकार मानावे. असे का सांगता की उपकार माना? कशासाठी? तेव्हा म्हणे कोणीही असे बोलणार नाही. हा कशाचा तरी प्रतिध्वनी आहे, तो माझा स्वत:चाच प्रतिध्वनी आहे. म्हणून
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
मी उपकार मानतो. हे जग प्रतिध्वनी स्वरुप आहे, याची मी शंभर टक्के गॅरंटी लिहून देतो. म्हणून आम्ही सुद्धा उपकार मानतो तेव्हा तुम्ही सुद्धा उपकार मानले पाहिजेत ना! आणि त्यामुळे तुमचे मन पण खूप चांगले राहील. कारण 'चोर म्हणत आहे' तरीही त्याचे उपकार मानता. नाहीतर तुम्हाला सहज असे वाटेल की, दादांना असे बोलतो?! महावीरांसाठी इतके वाईट शब्द बोलत होते तरीही लोकांनी ते पचवले. त्यांच्या भक्तांनी, सर्वांनी ते शब्द पचवले. जे काही बोलत होते ते सर्व पचवून घेत होते. भगवंतांनी त्यांना तसे शिकवले होते.
ही भानगड उभी करणारा तूच प्रश्नकर्ता : म्हणजे जग निर्दोष आहे हे समजण्याची दृष्टी आता विकसित करावी लागेल ना?
दादाश्री : जर या विहिरीत आपण काही बोललोच नसतो तर काही झंझट झालीच नसती ना! आणि नंतर आपण समोरच्या व्यक्तीचा दोष काढतो की, 'तू मला असे का बोललास?' भानगडीची सुरुवात आपणच केली आणि मग त्याला विचारतो की तू आम्हाला अशा शिव्या का देतोस? त्यावर कोणी म्हणेल, 'अरे, त्याने तुला शिवी दिली पण तू असे बोल ना की, 'तू राजा आहेस." तेव्हा तोही असे बोलेल की 'तू राजा आहेस,' बस. हे सर्व आपलेच प्रॉजेक्शन आहे.
अरे, घे बोधपाठ यापासून लोक मला विचारतात की, तुम्हाला तुमचे दोष सांगण्याची काय गरज आहे ? त्यात काय फायदा? मी म्हणालो, 'तुम्हाला बोध देण्यासाठी की जेणेकरुन तुम्हाला अशी हिंमत यावी. मी बोलू शकतो तर तुम्हाला हिंमत का येऊ नये? नेहमीच, जे दोष होतात ना, ते दुसऱ्यांसमोर उघड केल्याने मन पकडले जाते. मग मन घाबरुन राहते की हे तर उघड करुन टाकतील, उघड करुन टाकतील. मन उलट आपल्यापासून घाबरत राहील
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
की हा तर खूप साधाभोळा आहे, सर्व उघड करुन टाकेल. आम्ही तर (दोषांना) सरळ सांगितले की, आम्ही दुसऱ्यांसमोर सर्व उघड करुन टाकू. ओपन टु स्काय (पूर्ण उघड) करुन टाकू. तेव्हा सर्व दोष निघून गेले. तेव्हा सर्व दोष विलय होतात.
__ चूक संपविण्याची पद्धत... तुमच्या किती चुका होत असतील? प्रश्नकर्ता : दोन-चार-पाच होत असतील!
दादाश्री : कोण न्याय करतो? ही चूक आहे, असा न्याय करणारा कोण?
प्रश्नकर्ता : नुकसान होते तेव्हा वाटते की चूक केली आहे.
दादाश्री : तेव्हा तुमच्या लक्षात येते, नाही का? पण यात न्याय करणारा कोण? चूक करणारा मनुष्य लगेच चूक मान्य करत नाही. न्याय करणारा मनुष्य जेव्हा म्हणेल की ही तुझी चूक आहे, तेव्हाच त्याच्या लक्षात येते. तेव्हा मान्य करतो. नाही तर मान्य करत नाही. या जगात कोणीही आपली चूक मान्य करीत नाही. पण जर त्याला समजले तर मान्य करतो. चुकांना शुट ऑन साइट (पाहताक्षणी ठार) केले पाहिजे. नाही तर चुका कमी होतच नाहीत. तुमच्या गावी कोणी चुका मान्य करतो का?
प्रश्नकर्ता : मान्य नाही करत.
दादाश्री : हो. कोणीच मान्य करत नाही. हे बघा, अकलेच्या गोण्या, विकायला गेलो तर चार आणेही मिळणार नाहीत. अकलेच्या गोण्या, विकायला गेलो तर पैसे मिळतील का? सर्वच अक्कलवाले, हिंदुस्तानात तर सर्वच अक्कलवाले, तेव्हा कोण पैसे देईल? तुमच्या गावी कोणीच चूक मान्य करत नाही ना? आणि तू लगेच चूक मान्य करतोस का?
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
२४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : हो, लगेचच. माझी एक चूक सांगू का? दादाश्री : हो. प्रश्नकर्ता : मला पत्ते खेळण्याचा खूप नाद आहे.
दादाश्री : असे होय! पत्ते खेळणे हा तर हिशोब आहे. स्वतःच आत हिशोब बांधला होता. जसे ठरवले होते तेच सर्व आपण आता भोगत आहोत.
प्रश्नकर्ता : आता हा पत्ते खेळतो आणि खुश होतो, पण त्याच्या बायकोला हे आवडत नाही.
दादाश्री : तिला आवडत नाही, तर ती भोगेल. जो भोगतो त्याची चूक. ती जर भोगत नसेल तर तिची चूक नाही. आणि जर भोगत असेल तर चूक तिचीच आहे.
प्रश्नकर्ता : बायको म्हणते, मी भोगतच नाही. पण नवऱ्याला असे वाटते की बायको भोगत आहे.
दादाश्री : पण ती स्वतःच सांगते की मी नाही भोगत मग झाले, प्रश्नच मीटला! या ज्ञानाअगोदर ती भोगत असेल! पण नंतर तिला समजले ना! कारण काही ना काही सवय असते. त्याच्याशी आपले काही देणेघेणे नाही. हे तर माल (कर्म) भरुन आणलेले आहे. स्वत:ला सोडायचे असेल तरीही सुटत नाही. ती सवय मग त्याला सोडत नाही! आता आपण जर त्याला रागावलो तर ती आपली चूक आहे. त्याच्याविषयी वाईट वाटून घेतले तीही चूक आहे. कारण ती सवय त्याला सोडत नाही.
प्रश्नकर्ता : पण दादाजी, त्यावर काही उपाय तर असेल की नाही? ती सवय सोडण्यासाठी काही उपाय तर असला पाहिजे ना?
दादाश्री : त्यावर एकच उपाय की, हे भाऊ जेव्हा पत्ते खेळत असतील तेव्हा त्यांना आतून सतत वाटले पाहिजे की ही चुकीची गोष्ट
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आहे, हे चुकीचे आहे, हे चुकीचे आहे. निरंतर असे वाटले पाहिजे. आणि रोजच 'हे चुकीचे आहे' असे बोलतो पण एखाद्या दिवशी कोणी म्हटले की, 'पत्ते खेळणे ही खूप वाईट सवय आहे.' तेव्हा जर तुम्ही म्हणालात की, 'नाही, चांगली गोष्ट आहे. ' तर मग पुन्हा बिघडेल. त्यावेळी तर तुम्ही असे म्हटले पाहिजे की, खरोखर ही चुकीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना जेव्हा उद्युक्त करतात, तेव्हा ( ती सवय) जिवंत ठेवतात हे लोक ! लोक म्हणतात ना, की 'आमच्या सवयी का सुटत नाहीत ?' पण जिवंत ठेवतातच कशाला? पुन्हा पाणी पाजायचेच नाही ना. (चुकांचे रक्षण करु नये, त्यांचा पक्ष घेऊ नये) लोक तर उलट- --सुलट बोलतील. तुम्हाला समजले ना? असे घडते की नाही ?
प्रश्नकर्ता : हो, घडते ना.
दादाश्री : म्हणून ते जिवंत राहीले आहे.
माझ्यासोबतही असे घडले होते. म्हणून मी शोध लावला. या सर्व वस्तू असतात पण तरी आतून त्यासाठी वेगळे राहणे. हुक्का पित होतो तरीही आतून वेगळे, चहा पित होतो, तरीही आत वेगळे. लाचार बनवणाऱ्या वस्तू आपल्याजवळ नसाव्यात. जरी लाचार झालो, तरी आता त्यातून कसे सुटावे, याचा उपाय जाणून घेतला पाहिजे. उपाय जाणून घेतला तेव्हापासून आपण वेगळेच आहोत. म्हणजे काही काळानंतर सोडायचेच आहे, सुटूनच जाणार आहे. आपोआप सुटले तरच खऱ्या अर्थाने सुटले असे म्हणता येईल. अहंकार करुन सोडलेले कच्चे राहते, ते पुढील जन्मात पुन्हा येते. त्यापेक्षा समजून सोडलेले चांगले.
२५
मग ज्याला ज्या वस्तूची सवय असेल, फर्स्टक्लास पत्ते खेळायचे पण मनात मात्र असेच वाटले पाहिजे की, हे पत्ते खेळणे चुकीचे आहे, असे नसावे, असे नसावे, असे नसावे. मग हजार माणसांसमोर आपण उपदेश देत असू आणि त्यावेळी कोणी येऊन म्हणाला की, 'आता काय, पत्ते तर सुटत नाहीत आणि उगाचच दुसऱ्यांना उपदेश देत राहतात ? ! '
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
त्यावर तो म्हणेल, 'पत्त्यांची हरकत नाही.' तर तेव्हा असे म्हणू नये. त्या ऐवजी असे सांगावे की, 'भाऊ, पत्ते खेळतो, ही माझी निर्बळता आहे.
प्रश्नकर्ता : हजार लोकांसमोर चूक कबूल करावी का?
दादाश्री: हो, कबूल केली पाहिजे, म्हणजे मग पत्ते आपल्या डोक्यावर चढून बसणार नाहीत. आणि तुम्ही जर असे म्हटले की त्यात काही हरकत नाही, तेव्हा पत्ते समजून जातील की, हा मुर्ख माणूस आहे, आपण इथेच मुक्काम ठोकला पाहिजे. पत्ते समजून जातात की हे पोकळ घर आहे. म्हणूनच आपण चूक कबूल करावी, नेहमीच! अब्रू जाईल तिथेही, फक्त अब्रूच नाही पण नाक जरी कापले जात असेल ना, तरीही ते कबूल करुन घ्यावी. कबूल करण्यात मात्र पक्के असले पाहिजे.
मन वश करायचे असेल तर ते चूक कबूल केल्याने होते, स्वीकार करा ना, प्रत्येक बाबतीत स्वतःचा कमकुवतपणा उघड केल्याने मन वश होते. अन्यथा मन वश होत नाही. मग मन निरंकुश होऊन जाते. मन म्हणेल, 'आपल्याला हवे तसेच घर आहे हे!'
आलोचना ज्ञानींजवळ तुम्ही तुमचा दोष आम्हाला सांगितल्याबरोबर लगेचच सुटून जातो. तशी आम्हाला काही त्याची गरज नाही पण तुमच्यासाठी सुटण्याचा हा एक उपाय (मार्ग) आहे, कारण वीतरागांशिवाय कोणालाही स्वत:चे दोष सांगण्यासारखे नाही. कारण संपूर्ण जग दोषितच आहे. आम्हाला त्यात काही विशेषही वाटत नाही की हा दोष जड आहे आणि हा दोष हलका आहे. असे आमच्याजवळ बोललात नाही तरीही आम्हाला एकसारखेच वाटते. चूक तर माणसाकडून घडते, त्यात काय घाबरायचे? चूक मिटवणारे आहेत तिथे सांगावे की माझ्याकडून अशी चूक होत आहे. तर ते मार्ग दाखवतात.
तसतशी विकसित होते सूझ ! चूक संपवेल तर काम होईल. चूक कशी संपेल? तेव्हा म्हणे आत
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
सूझ नावाची शक्ती आहे. आपण जेव्हा खूप गोंधळून जातो तेव्हा सूझ पडते (सुचते) की नाही? आपण असे निवांत बसून राहतो तेव्हा आतूनच सुचते की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : ती सूझ देण्यासाठी कोण येत असेल? सूझ ही एकच अशी शक्ती आहे की, ती मोक्षाला घेऊन जाऊ शकते. जीव मात्रामध्ये सूझ नावाची शक्ती असते. गाई गोंधळतात तेव्हा थोडा वेळ उभ्या राहतात. चारही बाजूंनी निघण्याचा रस्ता सापडत नाही तेव्हा त्या थोडा वेळ उभ्या राहतात. मग आतून सूझ येते (सूचते) तेव्हा मग तिथून पुढे जातात. ही सूझ नावाची शक्ती आहे, ती कशी विकसित होते? तर जितक्या चुका संपत जातात, तितकी सूझ विकसित होत जाते. आणि चूक कबूल केली की, 'भाऊ, माझ्याकडून ही चूक घडली आहे.' तेव्हापासूनच शक्ती खूप वाढत जाते.
नव्हतीच कधी, तर जाईल कुठून? क्रोध केला, हे चुकीचे आहे असे समजते की नाही? आता ते लक्षातही आले असेल की, अरे ! हे जरा जास्तच झाले, याचा अर्थ स्वत:ची चूक लक्षात आली आहे. नंतर बाहेरुन शेठ आले आणि त्यांनी महाराजांना म्हटले की, 'महाराज, या शिष्यावर एवढा क्रोध? तेव्हा परत काही वेगळेच बोलतील, 'क्रोध करण्यासारखाच आहे, तो खूप आगाव आहे.' अरे, तुला स्वत:ला हे समजले आहे की, तुझ्याकडून ही घडली आहे आणि तरीही त्याचे रक्षण करतोस? (पक्ष घेतोस) कसला चक्रम आहेस तू? त्यावेळी तुम्ही शेठला काय सांगितले पाहिजे की, 'मला माझी चूक समजली आहे. पुन्हा कधी असे करणार नाही.' तेव्हा ती चूक संपेल..
म्हणजे शेठ येतात तेव्हा आपण चुकांचे रक्षण करतो, असे कशासाठी? शेठ समोर अब्रू वाचवण्यासाठी? अरे! हा शेठ स्वत:च बिन अब्रूचा आहे. कपड्यांमुळे लोकांची अब्रू आहे. नाहीतर लोकांची अब्रू आहेच कुठे? दिसते का कुठे?
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दहाचे केले एक हे जग 'रिलेटिव्ह आहे,' व्यवहारिक आहे. आपण समोरच्याला एक अक्षर सुद्धा बोलू नये आणि जर 'परम विनयात' असाल तर खुसपटही काढू नये. या जगात कुणाचीही खुसपट काढण्यासारखे नाही. खुसपट काढल्याने कोणता दोष लागतो हे खुसपट काढणाऱ्याला माहीत नाही.
कोणाचीही टीका करणे म्हणजे आपली दहा रुपयाची नोट वटवून एक रुपयाची नोट मिळवण्यासारखे आहे. टीका करणारा नेहमी स्वत:चेच गमावत असतो. ज्यामुळे काहीच हाती लागत नाही, अशी मेहनत आपण करु नये. टीकेमुळे तुमचीच शक्ती वाया जाते. आपल्याला जर दिसले की हे तीळ नाही पण रेतीच आहे, तर मग रेतीला पिळण्याची मेहनत का करावी? 'टाइम एन्ड एनर्जी' (वेळ आणि शक्ती) दोन्ही वाया जातात. हे तर टीका करुन दुसऱ्यांच्या कपड्यांचा मळ धुतला आणि स्वतःचे कपडे मळवलेस! ते आता केव्हा धुशील!?
कुणाचेही अवगुण पाहू नये. पाहायचेच असतील तर स्वत:चे पाहा ना! दुसऱ्यांच्या चुका पाहिल्याने आपली बुद्धी कशी होत जाईल! त्यापेक्षा दुसऱ्यांचे गुण पाहिले तर मन कसे खुश होत असते!
सर्व दुःखांचे मूळ 'स्वतःच' समोरच्यांचे दोष कुठेही नाहीच, समोरच्यांचा काय दोष? ते सर्व तर हेच मानून बसले आहे की, हा संसार, हेच सुख आहे आणि हीच खरी गोष्ट आहे. आपण त्यांना समजवायला गेलो की ही तुमची मान्यता चुकीची आहे, तर ती आपलीच चूक आहे. लोकांना दुसऱ्यांच्या चुका पाहण्याचीच सवय लागली आहे. कुणाचेही दोष नसतातच. बाहेर तर तुम्हाला वरण-भात, भाजी-पोळी, आमरस-पुरी सर्व काही बनवून जेवायला वाढतात, वरुन तुपही सोडतात, गहू निवडतात, तुम्हाला कळतही नाही. गहू निवडून दळून आणतात. जर कधी बाहेरची दुःख देत असतील तर गहू कशाला निवडतील? अर्थात बाहेरचे कोणी दुःख देत नाही, तुमचे दु:ख आतूनच येत आहे.
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दुसऱ्यांचे दोषच पाहूच नये, दोष पाहिल्याने तर संसार बिघडतो. स्वत:चेच दोष पाहत राहावे. आपल्याच कर्मांच्या उदयाचे हे फळ आहे! मग बोलण्यासारखे काही उरलेच नाही ना? हे तर सर्व अन्योन्य दोष देतात की 'तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात आणि परत एकाच टेबलावर सोबत बसून जेवतात. असे आतल्या आत वैर बांधले जाते. या वैरामुळेच जग टिकून आहे. म्हणूनच आम्ही सांगितले की, 'समभावे निकाल करा.' जेणे करुन वैर मिटेल.
नाही कोणी दोषी या जगात प्रत्येक कर्माची मुक्ती व्हायला हवी. सासू त्रास देते तेव्हा प्रत्येक वेळी कर्मापासून मुक्ती मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण काय करावे? तर सासूला निर्दोष पाहिले पाहिजे की यात सासूचा काय दोष? माझ्या कर्मांच्या उदयामुळेच त्या मला भेटल्या. त्या बिचाऱ्या निमित्त आहेत. तर त्या कर्मापासून मुक्ती झाली आणि जर सासूचा दोष पाहिला तर कर्म वाढतील, त्यात मग कोण काय करेल? भगवंत तरी काय करतील?
आपण आपले कर्म बांधले जाणार नाही अशाप्रकारे राहावे. या जगापासून दूर राहावे. पूर्वी कर्म बांधले होते म्हणून तर आता एकत्र आलो आहोत. आपल्या घरात कोण एकत्र आले आहेत? तर ज्यांच्याशी कर्माचे हिशोब बांधले होते तेच सर्व एकत्र आले आहेत, आणि मग ते आपल्याला बांधून मारतात सुद्धा! आपण ठरवले असेल की मला त्याच्याशी बोलायचे नाही, तरीही तो तोंडात बोट घालून बोलण्यास भाग पाडतो. अरे, तोंडात बोट घालून कशाला बोलायला लावतोस? याचेच नाव वैर. सर्व पुर्वीचे वैर! तुम्ही असे पाहिले आहे का कुठे?
प्रश्नकर्ता : सगळीकडे तेच दिसते!
दादाश्री : म्हणूनच मी सांगतो ना, की या भानगडीपासून दूर व्हा आणि माझ्याकडे या. मी जे मिळवले आहे, ते मी तुम्हाला देतो, तुमचे काम होऊन जाईल आणि यातून सुटका होईल. नाही तर सुटका होणार नाही.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
३०
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आम्ही कुणाचा दोष काढत नाही, पण नोंद घेतो की पाहा, हे जग कसे आहे ? सर्व प्रकारे या जगाला मी पाहिले, खूप प्रकारे पाहिले आहे. कोणी दोषी दिसतो ती अजून आपलीच चूक आहे. कधी ना कधी तर निर्दोष पाहावेच लागेल ना? आपल्या हिशोबानुसारच आहे हे सर्व. इतकेच जरी तुम्हाला समजले ना तरीही ते खूप उपयोगी पडेल.
मला हे जग निर्दोष दिसते. तुमची अशी दृष्टी होईल तेव्हा हे कोडे सुटेल. मी तुम्हाला असा प्रकाश (ज्ञान) देईल आणि इतके पाप धुऊन टाकीन की, ज्यामुळे मग तुमच्याजवळ प्रकाश राहील आणि तुम्हाला (हे जग) निर्दोष दिसत जाईल. आणि त्यासोबत पाच आज्ञा पण देऊ. या पाच आज्ञेत तुम्ही राहाल तर तुम्हाला जे ज्ञान दिले आहे, त्यास जरासुद्धा फॅक्चर होऊ देणार नाही.
तेव्हापासून झाले समकित स्वत:चे दोष दिसतील तेव्हापासून समकित झाले असे म्हटले जाते. स्वतःचे दोष दिसतील तेव्हा समजावे की स्वतः जागृत झालो आहोत. नाही तर सर्व झोपेतच चालले आहे. दोष नष्ट झाले की नाही, याची जास्त काळजी करण्यासारखी नाही पण जागृतीचीच मुख्य गरज आहे. जागृती आल्यानंतर नवीन दोष होत नाहीत आणि जे जुने दोष असतील ते निघत राहतील. आपण त्या दोषांना बघायचे की कशाप्रकारे हे दोष होत आहेत !
जितके दोष दिसतील तितके दोष निरोप घेऊ लागतील.जे जास्त चिकट दोष आहेत ते दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवस, महिना किंवा वर्षभरानंतर पण दिसले म्हणजे ते निघूच लागतात. अरे, पळूच लागतात. घरात चोर घुसला असेल तर तो किती दिवस लपून बसेल? मालकाला माहीत नाही तोपर्यंत. मालकाला समजताच चोर लगेच पळ काढतो.
शेवटी तर ते प्राकृत गुण प्रश्नकर्ता : दादा, आम्हाला कुणाचे दोष बघायचे नाही फक्त गुणच बघायचे?
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : नाही. दोषही बघायचे नाहीत आणि गुणही बघायचे नाहीत. हे जे दिसतात ते सर्व प्राकृत गुण आहेत. त्यातील एकही गुण टिकणारा नाही. एखादा दानशूर असेल, तर त्याच्यात पाच वर्षापासून ते पन्नास वर्षांपर्यंत तेच (दानेश्वरीचेच) गुण असतील, पण जेव्हा सन्निपात होतो तेव्हा तो गुण बदलतो. हे गुण तर वात, पित्त आणि कफामुळे आहेत. आणि या तिन्हींमध्ये जेव्हा बिघाड होतो, तेव्हा सन्निपात होतो! असे गुण तर अनंत जन्मांपासून जमा केले आहेत. पण तरी असे प्राकृत दोष जमा करु नये. प्राकृत सद्गुण प्राप्त केले तर कधीतरी आत्मा प्राप्त करु शकेल. दया, शांती हे सर्व गुण असतील पण तिथेही जर वात, पित्त आणि कफ बिघडले तर तो सर्वांना मारतच राहतो. यास तर प्रकृतीची लक्षणे म्हणतात.
अशा गुणांनी पुण्यानुबंधी पुण्य बांधले जाते. ज्यामुळे मग एखाद्या जन्मात 'ज्ञानीपुरुषांची भेट झाली तर (मोक्षाचे) काम होते. पण अशा गुणांमध्ये गुंतून राहू नये. कारण ते गुण केव्हा बदलतील ते सांगता येत नाही. हे स्वतःच्या शुद्धात्म्याचे गुण नाहीत. हे सर्व तर प्राकृत गुण आहेत. या गुणांना तर आम्ही भोवरा म्हटले आहे.
संपूर्ण जग या प्राकृत गुणांमध्येच वसले आहे. संपूर्ण जग हे भोवऱ्यासारखेच आहे. हे तर सामायिक-प्रतिक्रमण प्रकृती करवून घेत असते आणि तो मात्र स्वत:च्या डोक्यावर घेतो आणि म्हणतो की 'मी केले.' हे जर देवाला विचारले, तर देव म्हणेल, की तू काहीच करत नाहीस. एखाद्या दिवशी पाय दुखत असेल तर, म्हणेल 'मी काय करु?' प्रकृती बळजबरीने करुन घेते आणि हा म्हणतो की, 'मी केले!' आणि म्हणूनच तो पुढील जन्माचे बीज टाकतो. हे सर्व उदय कर्मांमुळे होत असते आणि स्वतः त्याचा गर्व करतो. उदय कर्माचा गर्व करतो, त्याला साधू कसे म्हणायचे? साधू महाराजांची ही एक चूक आहे की ते उदय कर्माचा गर्व करतात. ही चूक होत असेल आणि जर ही एकच चूक संपवली मग तर कामच (कल्याण) झाले! उदय कर्माचा गर्व साधू महाराजांना आहे की नाही इतकेच बघून घ्यावे. दुसरे बाहेरचे काहीच
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बघायचे नसते. त्यांच्यात कषाय असतील तरी चालेल पण उदय कर्माचा गर्व नसावा. बस, इकतेच बघायचे.
३२
प्रत्येक जीव अनंत दोषांचे भाजन आहे. कृपाळु देवांनी म्हटले आहे की, 'मी तर अनंत दोषांचा भाजन आहे करुणाळ' असे बोला.
सर्वात मोठा दोष
भगवंताने संसारी दोषाला दोष म्हटले नाही. 'तुझ्या स्वरुपाचे अज्ञान' हाच सर्वात मोठा दोष आहे. 'मी चंदुभाऊ आहे' तोपर्यंत दुसरे दोष टिकून आहेत. आणि एकदा जर 'स्वतःच्या स्वरुपाचे भान झाले की मग अन्य दोष पळ काढतात !
स्वत:ची एकही चूक दिसत नाही. आपण विचारले की 'शेठ, तुमच्यात एखादा दोष तर असेलच ना ? तेव्हा म्हणेल 'होय, थोडासा क्रोध आणि जरासा लोभ आहे. दुसरा कोणताच दोष नाही.' मग तिथे तर तू अनंत दोष आहेत असे बोलतोस आणि इथे पुन्हा... दोनच आहेत असे सांगतोस! म्हणजे आपण विचारतो तेव्हा त्याला वाटते की आपली अब्रू जाईल. अरे, पण अब्रू होतीच कुठे ? अबूदार कोणास म्हणावे की जो मनुष्यातून पुन्हा चार पायात जात नाही, त्याला म्हणतात अबूदार !
अरे, एवढा पक्का माणूस तू. देवाजवळ तर 'मी अनंत दोषांचे भाजन आहे' असे बोलतोस आणि इथे बाहेर दोनच दोष आहेत असे सांगतोस ! आपण जर विचारले की, 'तू देवाजवळ बोलत होतास ना ?' तेव्हा म्हणेल, 'हे सर्व तर तिथे बोलायचे असते, इथे नाही' त्यापेक्षा तर टरबूज चांगले, त्याच्यात एवढे दोष नसतात! अरे, देवाजवळ वेगळे बोलतोस आणि इथे वेगळे बोलतोस? आणखी किती चक्कर फिरशील तू ?
म्हणे थोडासा क्रोध आणि जरासा लोभ आहे, या दोन चुकांचाच मालक! भगवंत जेव्हा इथे विचरत ( वावरत) होते ना, तेव्हा त्यांच्यात पाच लाख चुका होत्या आणि हा दोनच चुकांचा मालक ! भगवंत जेव्हा
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
देहधारी होते ना तोपर्यंत त्यांच्यात दोन-पाच लाख चुका असायच्या आणि हा आहे बिन चुकांचा!
जर स्वत:चे दोष दिसत नसतील, तर कधीही तरण्याची (मोक्षाची) गोष्टच करु नये, अशी आशाही बाळगू नये. मनुष्य मात्र अनंत चुकांचे भाजन आहे. आणि जर त्याला स्वत:ची चूक दिसत नसेल, तर एवढेच समजावे की, त्याच्यावर भयंकर आवरण आलेले आहे. त्यामुळे त्याला चूक दिसतच नाही.
आता तरी थोड्याफार चुका दिसतात? चुका दिसतात की नाही तुला? प्रश्नकर्ता : आता दिसतात.
दादाश्री : चुकांचा स्वभाव कसा आहे की, जी चूक दिसली ती निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी परत तेवढ्याच नवीन चुका समोर येतात. निव्वळ चुकांचेच भांडार आहे ! हे तर भांडारच चुकांचे आहे. मग रागवतो आणि रागावल्यानंतर समाधानही करता येत नाही. अरे कशाला रागवतोस? तू रागावलास ना तर आता त्याचा निकाल तर लाव! जसे आपण ताट उष्टे केले असेल तर ते धुता नाही का येत? पण हा तर रागवून बसतो आणि नंतर त्याला त्याचा निकालही लावता येत नाही. मग तोंड फुगवून फिरत राहतो! अरे बाबा, तोंड कशाला फुगवतोस? ।
नुसते चुकांचेच भांडार, म्हणून तर जीव होतो ना? नाहीतर स्वतः शिव आहे, जीव-शिवचा भेद का वाटतो? तर चुकांमुळेच. या चुका संपवल्या तर, सुटका होईल.
पाहिले नाहीत निजदोष तर.... पहिले वाक्य असे सांगते की 'मी तर दोष अनंताचे भाजन आहे करुणाळ' आणि शेवटचे वाक्य सांगते की 'पाहिले नाहीत निजदोष तर, तरणार कोणत्या उपायाने!'
'अनंत दोषांचे भाजन आहे,' हे मला सुद्धा समजते. पण दिसत
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
तर एकही नाही, मग तरण्याचा काही उपाय आहे का ? का दिसत नाही ? स्वतःचे दोष केव्हा दिसतात ? जसजसे तो जगाला निर्दोष बघू लागतो, तसतसे स्वतःचे दोष दिसू लागतात. जोपर्यंत जगाचे दोष काढत राहतो तोपर्यंत स्वत:चा एकही दोष सापडत नाही.
३४
जगाचे दोष काढतात का कुणी ? दुसऱ्यांचे दोष काढण्यात खूप हुशार असतात ? एक्सपर्ट असतात, नाही का ?
कुणाचेही दोष बघू नये
प्रश्नकर्ता : मला समोरच्या माणसात गुणांपेक्षा दोषच जास्त दिसतात, त्याचे काय कारण ?
दादाश्री : जगातील सर्व लोकांचे सध्या असेच झाले आहे. दृष्टीच बिघडून गेली आहे. समोरच्याचे गुण बघत नाहीत, पण दोष मात्र लगेच शोधून काढतात! आणि त्यांना दोष सापडतात सुद्धा, आणि स्वत:चे दोष सापडतच नाही ना ?
प्रश्नकर्ता : समोरच्या व्यक्तीचे जे दोष दिसतात ते दोष स्वतःमध्ये असतात का?
दादाश्री : असा काही नियम नाही, पण तरी असे दोष असतात. ही बुद्धी काय करते ? स्वतःचे दोष लपवत राहते आणि दुसऱ्यांचे दोष बघत राहते. हे तर वाईट माणसाचे काम. ज्याच्या चुका संपल्या असतील तो दुसऱ्यांच्या चुका बघत नाही. त्याला अशी वाईट सवयच नसते. तो सहजपणे सर्वांना निर्दोषच पाहतो. ज्ञान असे असते की कुणाची थोडी सुद्धा चूक पाहत नाही.
प्रश्नकर्ता : मनुष्य दुसऱ्यांचीच चूक शोधतो ना ?
दादाश्री : चूक कुणाचीही पाहू नये. दुसऱ्यांची चूक पाहणे हा तर भयंकर गुन्हा आहे. तू न्यायाधीश आहेस का ? तुला असे काय
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
समजते की तू चूक पाहतोस ? मोठा आला चूक पाहणारा? चूक पाहतोस म्हणजे तुला काही भानच नाही, बेभान आहेस. चूक असते का ? दुसऱ्यांची चूक पाहायची असते का कधी ? दुसऱ्यांची चूक पाहणे हा गुन्हा आहे, भयंकर गुन्हा आहे. स्वत:ची चूक तर दिसत नाही. मग दुसऱ्यांची चूक का शोधत राहता ? चूक स्वतःचीच बघायची असते, दुसऱ्या कुणाची चूक बघायची नसते.
३५
आणि जर असेच चूक बघत राहिलो तर हा त्याची चूक बघेल आणि तो ह्याची चूक बघेल, मग काय होईल ? कुणाचीही चूक बघायची नसते. चूक नसतेच मुळी. जो चूक काढतो, तो अगदी नालायक असतो. समोरच्याची चूक होत आहे असे जर मी पाहिले तर ती माझी नालायकी आहे. त्यामागे वाईट आशय असतो. हो, चूक कशाला पाहतोस ? प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीप्रमाणे काम करत असतात. त्यात कसली आली चूक ? हे काय न्यायाधिशाचे डिपार्टमेन्ट आहे ? सगळेच आपापल्या प्रकृतीनुसार काम करत असतात. मी सुद्धा माझ्या प्रकृतीनुसार काम करतो. प्रकृती तर असतेच ना!
प्रश्नकर्ता : हेच विसरतो की समोरची व्यक्ती कर्ता नाही.
दादाश्री : हो, त्याला अशी जागृती राहिली तर काही हरकत नाही. समोरच्याची चूक बघितली तिथूनच नवीन संसार सुरु झाला. मग जोपर्यंत ती चूक संपवत नाही, तोपर्यंत त्याचा निवाडा येत नाही. निराकरण होत नाही. मनुष्य गुरफटत जातो.
आम्हाला तर क्षणभरही कुणाचीही चूक दिसली नाही आणि चूक दिसलीच तर आम्ही सरळ त्याला सांगून टाकतो, झाकून ठेवत नाही की भाऊ, आम्हाला अशी चूक दिसते. तुला गरज भासली तर स्वीकार नाहीतर बाजूला ठेव.
प्रश्नकर्ता : हे तर तुम्ही त्याच्या कल्याणासाठी सांगता.
दादाश्री : त्याने सावध व्हावे म्हणून सांगतो, त्यामुळे तो गोष्टीचे
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने. निर्दोष
समाधान आणू शकेल ना! आणि जर त्याने ऐकले नाही तरीही आमची काही हरकत नाही. आम्ही सांगतो की असे कर आणि जर नाही ऐकले तरी हरकत नाही.
३६
प्रश्नकर्ता : आपल्याला काहीच वाटत नाही ?
दादाश्री : मी जाणतो की हा कशाच्या आधारावर बोलत आहे ! उदयकर्माच्या आधारावर बोलत आहे. माझी आज्ञा न पाळण्याची त्याची इच्छा तर नाहीच. अशी इच्छा नसतेच ना ? म्हणून त्याला गुन्हा लागू पडत नाही, तो उदयकर्माच्या आधारावर असे बोलला, तेव्हा आम्हाला ते वळवून घ्यावे लागते. जर प्रकृती विरोधास उठली तर तिथे आम्हाला पथ्य (संयम) पाळावे लागते. स्वतःचे तर संपूर्ण अहित करतोच पण दुसऱ्यांचेही अहित करतो. बाकी, सरळ प्रकृतीवाले चुका करतात, करीतच राहतात. जगात साऱ्या प्रकृतीच आहेत.
तुला तुझ्या चुका दिसतात का ?
प्रश्नकर्ता : हो, चुका तर दिसतात.
दादाश्री : एकही चूक दिसत नाही तुला आणि जितके केस आहेत त्याहीपेक्षा जास्त चुका आहेत. त्या कशा समजतील तुला ?
प्रश्नकर्ता : चूक करणे किंवा न करणे ते कर्माधीन आहे ना ?
दादाश्री : ओहोहो ! हा छान शोध लावलास ! बघा ना, जणू लहान मुलेच आहेत ही सर्व ! बेभानपणा! बघा तरी, अजूनही विचारतो की चूक करणे किंवा न करणे हे कर्माधीन आहे की काय मग विहिरीत कसा पडत नाहीस. तिथे तर सांभाळून चालतोस. आणि वेळ आली तर पळतो सुद्धा, तिथे का कर्माधीनपणा बोलत नाहीस ? ट्रेन येते तेव्हा रेल्वेचा रुळ ओलांडतोस की नाही ? तिथे कर्माधीन आहे असे का बोलत नाही.
स्वत:चे दोष स्वतःला कसे दिसतील ? दिसणारच नाहीत ना !
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
३७
कारण की जिथे मोहाचेच साम्राज्य असेल, मोहाने भरलेले! मी अमका आहे, मी असा आहे, याचाही मोह! स्वत:च्या पदाचाही मोह असतो ना? नाही का?
प्रश्नकर्ता : हो, पुष्कळ असतो!
दादाश्री : तर हेच आहे. दुसरे काही नाही. निंदा करण्यासारखे नाही पण सगळीकडे असेच आहे.
तेव्हा आला महावीरांच्या मार्गात जेव्हापासून स्वत:चे दोष दिसणे सुरु होते तेव्हापासूनच कृपाळुदेवांचा धर्म समजला, असे म्हटले जाईल. स्वतःचे दोष जे आज दिसत आहेत, ते उद्या दिसणार नाहीत, उद्या परत नवीन प्रकारचे दिसतील, परवा त्याहीपेक्षा वेगळ्या प्रकारचे दिसतील, तेव्हा आपण समजावे की, याला कृपाळुदेवांचा धर्म समजला आहे तो कृपाळुदेवांचा धर्म पाळत आहे. जोपर्यंत स्वत:चे दोष दिसत नाहीत तोपर्यंत काहीही समजलेले नाही.
क्रमिक मार्गात तर कधीही स्वतःला स्वतःचे दोष दिसतच नाहीत. 'दोष तर पुष्कळ आहेत पण आम्हाला दिसत नाहीत.' असे जर कोणी म्हणाले तर मी मानेल की तू मोक्षाचा अधिकारी आहेस.' पण जर असे म्हणत असेल की माझ्यात दोन-चार दोषच आहेत, तर तो अनंत दोषांनी भरलेला आहे आणि सांगतो की दोन चारच आहेत! तुला तुझे दोन-चार दोषच दिसतात म्हणून काय तेवढेच दोष तुझ्यात आहेत असे तू मानतोस?
महावीर भगवंताचा मार्ग प्राप्त केला असे केव्हा म्हणता येईल? जेव्हा दररोज स्वत:चे शंभर-शंभर दोष दिसतील, रोजचे शंभर-शंभर प्रतिक्रमण होतील, त्यानंतर महावीर भगवंताच्या मार्गात आला असे म्हटले जाईल. 'स्वरुपाचे ज्ञान' तर अजून याहून कितीतरी दूर आहे पण हा तर चार पुस्तके वाचून 'स्वरुप' प्राप्त केल्याच्या नशेत फिरत असतो. यास तर स्वरुपाचा एक अंश सुद्धा प्राप्त केलेला नाही असे म्हटले जाईल.
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जिथे ज्ञान अडकून राहिलेले आहे, तिथे नशा वाढते. नशेमुळे ज्ञानावरण आणि दर्शनावरण दूर होण्याचे थांबले आहे. मोक्षाला जाण्यासाठी इतर कुठलीही वस्तू बाधक नाही. सर्वात मोठे भयस्थान स्वच्छंद आणि नशा हेच आहे!
नाही दिसले स्वतःचेच दोष स्वत:चे दोष दिसतात का तुम्हाला? प्रश्नकर्ता : स्वत:चे दोष शोधण्याचीच गरज आहे आम्हाला. दादाश्री : हो, पण ते का दिसत नाहीत?
प्रश्नकर्ता : आम्ही संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेलो आहोत, त्यामुळे दैनंदिन कामकाजातच गुंतलेलो असतो, म्हणून दिसत नाहीत.
दादाश्री : नाही, बघण्यात काही तरी चूक होत आहे. स्वत:च जज आहे, आणि आरोपी म्हणजे गुन्हा करणाराही स्वतः आहे आणि जवळ जो वकील उभा केला आहे तो वकील सुद्धा स्वतःच बनतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे स्वतःचे खोटे रक्षण करतो.
दादाश्री : हो, सर्व ठिकाणी रक्षणच केले आहे. हो, बस, दुसरे काही केलेच नाही. अगदी खोट्या रितीने बचाव केला सर्व गोष्टींचा.
जग उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहे, म्हणून मग दोष कसे दिसतील? तुझे दोष तुला दिसत नाहीत. मनुष्य स्वत:चे दोष कसे पाहू शकेल?
प्रश्नकर्ता : थोडे स्थूल दोष दिसतात, सूक्ष्म दिसत नाहीत.
दादाश्री : दोष का दिसत नाहीत? 'आत आत्मा नाही?' तेव्हा म्हणे, आत्मा आहे, म्हणजे जज आहे, जज! अहंकार आरोपी आहे. अहंकार आणि जज (आत्मा) दोनच असतील, तर सर्व दोष दिसतात,
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बरेच दोष दिसतात, पण हे तर आत वकील (बुद्धी) ठेवला आहे, म्हणून वकील म्हणतो की, 'हे सगळे देखील असेच करतात ना!' म्हणजे पूर्णपणे दोषाला उडवून टाकले. वकील ठेवतात हे तुम्हाला माहीत आहे का ? सर्वच वकील ठेवतात. स्वतः जज, स्वतः आरोपी आणि स्वतःच वकील. बोला, आता कल्याण होईल का ?
प्रश्नकर्ता : नाही होणार.
दादाश्री : उलट-सुलट काहीही करुन वकील निपटवून टाकतो. असे घडते की नाही ?
प्रश्नकर्ता : हो घडते.
दादाश्री : दिवसभर तेच ते वादळ. आणि त्याचीच ही सर्व दुःखं आहेत. बोला, आता स्वतःच्या किती चुका बाहेर येतील ? स्वतःच्या किती चुकांचे स्टेटमेन्ट (विवरण) देऊ शकेल ?
प्रश्नकर्ता : मग तो काय स्टेटमेन्ट देतो ?
३९
दादाश्री : डोक्यावर जेवढे केस आहेत ना, तेवढ्या चुका आहेत. पण स्वत:च जज, स्वतःच वकील आणि स्वतःच आरोपी, तेव्हा मग चुका कशा सापडतील? निष्पक्षपाती वातावरण उत्पन्न होत नाही ना ! निष्पक्षपाती वातावरण उत्पन्न झाले तर मोक्ष सरळ आहे. मोक्ष काही दूर नाही. हा तर खूप पक्षपात आहे.
जर दुसऱ्यांच्या चुका काढायच्या असतील तर लगेच काढतो. त्यासाठी तो न्यायाधीश आहे, थोडाफार, अल्पांशाने पण स्वत:च्या चुका काढण्यासाठी मुळीच न्यायाधीश नाही. म्हणजे स्वतः जज, स्वतः वकील आणि स्वत:च आरोपी, मग कसे जजमेन्ट येईल ? स्वतःच्या फायद्याचेच येईल.
प्रश्नकर्ता : सोयीस्कर, बस ! स्वतःची सोय होईल तसे जजमेन्ट शोधून काढतो!
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : म्हणून तर संसार कधी सुटतच नाही ! एकीकडे तुम्ही सोयीस्कर करत राहता आणि दुसरीकडे तुम्हाला निर्दोष व्हायचे आहे, हे तर शक्यच नाही ना! वकील नसेल तरच स्वतःचे दोष समजतील पण आजचे लोक वकील ठेवल्याशिवाय राहत नाहीत ना ! वकील ठेवतात की नाही लोक ?
४०
हे ज्ञान दिल्यानंतर लगेचच समजते की ही चूक झाली, कारण आता वकील राहिले नाही. वकील घरी गेले, रिटायर झाले. गुन्हेगार तर आहेत अजून पण वकील राहिले नाही.
या चुका जर संपल्या तर स्वतःचे भगवत्पद प्राप्त होऊ शकेल असे आहे. या चुकांमुळे जीवपद आहे आणि चुका संपल्या तर शिवपद प्राप्त होईल.
जगातील लोकांनी स्वतः चे दोष पाहिले नाहीत, म्हणूनच हे दोष टिकून राहतात, निवांतपणे मुक्काम करतात! तसे तर तो म्हणेल की मला माझे दोष मिटवायचे आहेत, पण दोष तर आत पाया रोवून राहण्यासाठी घर बांधत असतात. सिमेंट टाकून पाया रोवत असतात. दोष हे जाणतात की हा मुर्ख काहीही करणार नाही. तोंडाने बोलतो इतकेच, तो दोष काढणार तरी कसा ?
जो एक दोष संपवू शकतो तो भगवंत होतो !!! एकच दोष ! एका दोषाचे निवारण करतो तो भगवंत होतो. आणि इथे तर दोषाचे निवारण होते पण दुसरा दोष उभा करुन ! दुसरा (नवीन) दोष तयार करुन पहिल्या दोषाचे निवारण करतो. बाकी स्वतःची एक जरी चूक संपवली तरी भगवंत बनू शकतो.
प्रश्नकर्ता : दुसरा दोष उभा होणारच नाही, हे कसे शक्य होऊ शकेल ?
दादाश्री : या सर्व चुकाच आहेत पण एक चूक संपते, ती केव्हा ?
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
तर समकित झाल्यानंतर संपते, त्याशिवाय संपत नाही. तोपर्यंत एकही चूक संपत नाही. तोपर्यंत तर आधी खोदतो आणि पुन्हा भरतो. खोदतो आणि भरतो. खोदतो आणि भरतो. कोणतीच क्रिया त्याला कामास येत नाही. सर्व क्रिया निष्फळ ठरतात!
त्याला म्हणतात जैन तुमच्यात दोन-चार दोष तरी असतील की नाही? प्रश्नकर्ता : जास्त असतील. दादाश्री : दहा पंधरा दोष असतील? प्रश्नकर्ता : मोजले तर मोजताच येणार नाहीत.
दादाश्री : हो. त्यालाच जैन म्हटले जाईल. जैन कोणाला म्हणू शकतो की, स्वत:मध्ये अहंकार आहे, दोष आहे, अशी ज्याला खात्री आहे. जरी त्याला दोष दिसत नसतील, पण दोष आहेत अशी ज्याला श्रद्धा आहे, त्याला जैन म्हटले जाते. स्वतः अनंत दोषांचे भांडार आहे पण ते भांडार तुम्ही केव्हा रिकामे करु शकाल?
प्रश्नकर्ता : ती तर आपली कृपा होईल तेव्हा. दादाश्री : खूप मोठी गोष्ट बोलतात!
जेवढे दोष, तेवढेच पाहिजेत प्रतिक्रमण अनंत दोषांचे भांडार आहे, म्हणून तेवढे प्रतिक्रमणही करावे लागतील. जेवढे दोष भरुन आणले आहेत, ते तुम्हाला दिसतील. ज्ञानी पुरुषांनी ज्ञान दिल्यानंतर दोष दिसतील, नाहीतर स्वत:चे दोष स्वतःला दिसत नाहीत, त्याचेच नाव अज्ञानता. स्वत:चा एकही दोष दिसत नाही आणि दुसऱ्यांचे पाहायचे असतील तर खूप सारे पाहू शकतो, त्याचे नाव मिथ्यात्व.
ज्ञानी पुरुषांनी ज्ञान दिल्यानंतर, दिव्यचक्षू दिल्यानंतर स्वतःला
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
स्वतःचे सर्व दोष दिसतात. सहजही मनोभाव बदलले तरीही लक्षात येते की हा दोष झाला. हा तर वीतरागी मार्ग, एक अवतारी मार्ग आहे. हा खूप जबाबदारीचा मार्ग आहे. एका जन्मात सर्वच स्वच्छ झाले पाहिजे. आधी इथेच स्वच्छ झाले पाहिजे.
४२
म्हणजे फक्त दोषांचेच भांडार आहात. इथे ज्ञानविधीत याल तर मी तुमचे सर्व दोष धुऊन देईन. ते धुण्याचे माझ्या वाट्याला आले आहे. त्यानंतर स्वतःचे दोष दिसतील आणि स्वत: चे दोष दिसू लागले तर समजावे की आता मोक्षाला जाण्याची तयारी सुरु झाली. बाकी कुणालाही स्वतःचे दोष दिसले नाहीत.
आत्मा स्वत:च थर्मामीटर समान
स्वतः जे काही करतो त्यात स्वतःची चूक आहे असे कधीच त्याच्या लक्षात येत नाही. स्वतः जे करत असेल, सहजभावे जे कार्य, क्रिया करत असेल त्यात स्वतःची चूक आहे असे त्याला कधीही वाटत नाही. उलट कोणी चूक दाखवली तर त्याला ते उलटेच दिसते. तो जप करत असेल किंवा तप करीत असेल, किंवा त्याग करीत असेल, त्यात त्याला स्वतःची चूक दिसत नाही. चूक तर जेव्हा तो आत्मस्वरुप होतो, ज्ञानी पुरुषांनी दिलेला आत्मा प्राप्त होतो, तेव्हा आत्मा हा एकमेव थर्मामीटर समान आहे की जो चूक दाखवतो, त्याशिवाय कोणीही चूक दाखवू शकत नाही. स्वत:ची चूक कुणाला दिसतच नाही. चूक दिसली म्हणजे (मोक्षाचे) कामच झाले ना !
चूक संपवली तर परमात्मा होतो. स्वतः परमात्मा तर आहेच परंतु परमात्म्याची सत्ता केव्हा प्राप्त होते ? चूक संपते तेव्हा! पण ती चूक संपत नाही आणि सत्ता प्राप्त होत नाही आणि लोकांचे सासु-सासरे बनून खुश होतात. चूक संपली तर सत्ता प्राप्त होते, परमात्म्याची सत्ता प्राप्त होते. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 'स्वतः परमात्मा आहे' असे लक्ष्य प्राप्त झाले, म्हणून आता तो हळूहळू श्रेणी चढत जातो आणि सत्ता प्राप्त होत राहते.
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बाकी, चूक दाखवतो तोच खरा. कितीतरी चुका आहेत ? जो कोणी आपली एक चूक सुधारतो, जो आपली सर्वात मोठी चूक सुधारुन देतो, त्याला भगवंत म्हणतात.
४३
हा तर पूर्वीचा अभ्यास असतो की मी सर्वांमध्ये परमेश्वर पाहतो, पण भांडताना तर परमेश्वर वगैरे सर्व विसरुन जातो आणि भांडत बसतो, की दूध का सांडले ? स्वतःचे मूल काय मुद्दाम दूध सांडेल ?
हे तर आदि-अनादिपासून चालत आलेले, बापाने मुलाला रागावले पाहिजे अशी रीत आहे. यास काय माणुसकी म्हणतात ? मानवतेचा तर कसा सुगंध दरवळतो? पंचवीस पंचवीस मैलापर्यंत सुगंध दरवळतो. स्वत:च्या सर्व चुका दिसू लागल्या तेव्हा समजावे की आत्ता काही भलं होईल. लोकांना स्वत:ची एक सुद्धा चूक दिसत नाही.
हे आहे चुकांचे स्वरुप
अहंकार विलय झाल्यानंतर चूक संपते. अहंकाराचा विलय आपोआप होणार नाही, तो काही चटणी वाटण्यासारखा नाही. अहंकार तर, जेवढ्या चुका दिसतील, तेवढ्या प्रमाणात जातो. अहंकार म्हणजे चुकांचे स्वरुप. इगोईजम हे चुकांचेच स्ट्रक्चर आहे. स्वरुपाचे भान नाही असे म्हटले जाते, अर्थात ते भान विसरलेले आहेत. भान विसरलेल्यांमध्ये संपूर्ण अहंकारानेच भान विसरलेले आहे. मग आत त्याच्याकडे काय सामान आहे तर आत लहान-मोठ्या चुका आहेत ! त्या चुका संपतील तेव्हा काम होईल. निष्पक्षपाती व्हाल तर स्वत:च्या चुका दिसतील.
आत तर सर्व शास्त्रांची वाणी भरलेलीच आहे. चुका संपवेल त्यानंतर वाणी निघेल, आणि ती वाणी पुन्हा निष्पक्षपाती असायला हवी. मुसलमान बसलेला असेल त्यालाही ऐकण्याची इच्छा होते, जैन बसला असेल त्यालाही एकण्याची इच्छा होते. सर्व स्टँडर्डच्या लोकांना ऐकण्याची इच्छा होते, त्यास निष्पक्षपाती वाणी म्हटली जाते.
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
४४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
स्वत:चे दोष पाहण्यात निष्पक्षपाती असे कोण असतील? तर ते कृपाळूदेव असतील आणि त्यांचे दोन-तीन फॉलोअर्स (अनुयायी) असतील. बाकी स्वत:चे दोष पाहण्यात पक्षपाताचा प्रश्नच कुठे येतो? स्वतःचे दोष पाहण्याचे समजतच नाही.
ज्ञानींची तत्वदृष्टी आम्हाला या जगात कोणीच दोषी दिसत नाही. मग तो खिसा कापणारा असो किंवा चारित्र्यहीन असो, त्यालाही आम्ही निर्दोषच पाहतो! आम्ही 'सत् वस्तूला'च पाहतो! ती तात्विक दृष्टी आहे. आम्ही पॅकिंगला पाहत नाही, वरायटीज ऑफ पॅकिंग आहे, त्यात आम्ही तत्त्वदृष्टीने पाहतो. 'आम्ही' संपूर्ण निर्दोष दृष्टी केली आणि संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले! म्हणूनच 'ज्ञानी पुरुष' तुमची 'चूक' मिटवू शकतात! दुसऱ्या कोणाचे यात कामच नाही.
तरलेलाच तारतो या सर्व चुका आहेतच ना? त्यांचा तपासही केला नाही ना?
प्रश्नकर्ता : आपली काही तरी चूक होत आहे इतके समजते, पण त्यातून बाहेर निघता येत नाही आणि निघण्याचा प्रयत्न करतो तसतसे खोलवर रुतत जातो.
दादाश्री : प्रयत्न करुच नका. प्रयत्न करणे, म्हणजे समजा इथे खड्डा करायचा असेल आणि तिथे खड्डा भरुन काढायचा असेल, त्या ऐवजी जर तू तिथे खड्डा करुन इथे भरलास, मग त्या कामाचे पैसे देईल का कोणी?
प्रश्नकर्ता : नाही देणार.
दादाश्री : उलट वरुन दंड भरावा लागतो की ही जमीन कशाला खोदलीस? शिवाय केसही होते की तुम्ही इथे का खोदले? आता तुम्हीच
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
ती जागा परत भरुन काढा. आणि त्यावर पाणी शिंपडून जशी होती तशी जमीन करुन द्या. ___म्हणजे हे सर्व लोक जे करतात ना, ते चुकीच्या जागी खोदतात. त्यापेक्षा खोदले नसते आणि कोणाला तरी विचारले असते की, भाऊ माझ्या समस्या सोडवून द्या. माझी सुटका करा, तर कोणीतरी त्याला सोडवेल. जो सुटलेला असेल तो सोडवू शकतो आणि एखादा बांधलेला मनुष्य, जो स्वतःच डुबक्या खात असेल, 'वाचवा' असे म्हणत असेल तर 'मेल्या, तूच वाचवा वाचवा असे ओरडतोस मग मला कसा वाचवशील?
प्रश्नकर्ता : समस्या सोडवण्यासाठी आत्तापर्यंत ज्याला शरण गेलो तिथेच बुडून गेलो, ज्या डॉक्टरचे औषध घेतले त्याने दुखणे वाढवले, कमी केले नाही.
दादाश्री : ते डॉक्टर नीट शिकलेले नव्हते. ते स्वतःच डुबक्या खात होते. आणि जे डॉक्टर असे म्हणत असतील की, 'हो, आम्ही तरुन पार उतरलो आहोत, तू ये.' तेव्हा आपण समजावे की तो स्वत:च सांगत आहे ना!
बाकी, असे कोणीही सांगत नाही की आम्ही तरुन पार उतरलो आहोत. कारण त्यांना माहीत आहे की कधी काही भानगड झाली तर लोक समजून जातील की, हे तर बुडत असताना ओरडत होते. लोक तर ओळखतीलच ना? तुम्ही तर तरलेले आहात मग आता बुडत असताना का ओरडता? असे म्हणतील की नाही लोक? अर्थात तेव्हा चांगले संयोग जुळन आले नव्हते. यावेळी चांगले संयोग जुळून आले आहेत, म्हणून (मोक्षाचे) काम होऊन जाईल.
मग यात प्राप्ती कशी काय होईल? ओहोहो! डोक्यावरचे केस तर मोजता येतील पण यांच्या चुका मात्र मोजता येणार नाहीत.
दररोज पंचवीस चुका जरी लक्षात आल्या तर आश्चर्यकारक शक्ती
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
उत्पन्न होईल. संसार नडत नाही, खाण्या-पिण्याचे नडत नाही. लोकांना तपानेही बांधले नाही, त्यागानेही बांधले नाही. लोकांना स्वत:च्या चुकांनीच बांधले आहे. आत तर अमर्याद चुका आहेत पण फक्त मोठमोठ्या पंचवीस चुकाच जरी संपवल्या तर सव्वीसावी चूक आपोआप निघून जाईल. कित्येक लोक तर चुकीला ओळखतातही पण तरी स्वतःच्या अहंकारामुळे त्यास चूक म्हणत नाहीत, असे का ? एकच चूक अनंत जन्म बिघडवून टाकते. मग हे कसे परवडणार ? कारण मोक्षाचा नियाणां (आपल्या संपूर्ण पुण्याच्या बदल्यात एकाच गोष्टीची मनोकामना करणे) केला होता. पण तोही पूर्णपणे केला नव्हता, म्हणूनच असे झाले ना! दादांजवळ यावे लागले ना ?
४६
तेव्हा चूक संपवली असे म्हटले जाईल
प्रत्येक जन्मात एक जरी चूक संपवली असती तरीही मोक्ष स्वरुप झाला असता. पण हे तर एक सुद्धा चूक संपवत नाहीत, उलट पाच चुका वाढवून ठेवतात. बाहेर सर्व सुंदर पण आत अपार क्लेश ! यास चूक संपवली असे कसे म्हणता येईल ? तुमचा वरिष्ठ कोणीच नाही. पण चूक दाखविणारा पाहिजे. चुकांना संपवा, पण स्वतःची चूक स्वतःला कशी सापडेल? आणि त्याही काय एक-दोनच आहेत ? अनंत चुका आहेत ! कायेच्या अनंत चुका तर फार मोठ्या दिसतात. कुणाला जेवायला बोलवताना इतके कठोर बोलतात की, त्यांच्या बत्तीस प्रकारच्या पकवान्नांचे आमंत्रण असेल तरीही ते आवडणार नाही. त्यापेक्षा नसते बोलावले तरी बरे झाले असते, असे वाटते. अरे, बोलतो तेव्हा अशी कर्कश वाणी निघते आणि मनाचे तर असंख्य दोष असतात !
चूक काढणारा, आत कोण ?
आपल्या चुका कोण मिटवू शकेल ? तर 'ज्ञानी पुरुष', की जे स्वत:च्या सर्व चुका मिटवून बसले आहेत. जे शरीर असूनही अशरीर भावाने, वीतराग भावाने राहतात. अशरीर भाव म्हणजे ज्ञानबीज. सर्व चुका
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
संपवल्या नंतर, स्वतःचे अज्ञान बीज नष्ट होते आणि ज्ञानबीज पूर्णपणे उगवते, ते म्हणजे अशरीर भाव. ज्यांना किंचितमात्र, थोडीही ममता देहावर आहे, त्यास अशरीर भाव म्हणू शकत नाही पण देहावरील ममता जाणार तरी कशी? जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत ममता जात नाही.
४७
या जगात सर्वकाही सापडते परंतु स्वत:ची चूक मात्र सापडत नाही. म्हणूनच स्वत:च्या चुका दाखविण्यासाठी ज्ञानींची गरज आहे. ज्ञानी पुरुषच असे सर्व सत्ताधारी आहेत की जे आपल्याला आपली चूक दाखवून त्याचे भान करवून देतात, आणि तेव्हा ती चूक संपते. असे केव्हा होईल ? तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतील आणि आपल्याला निष्पक्षपाती बनवतील तेव्हाच. स्वतःसाठी सुद्धा निष्पक्षपातीपणा उत्पन्न होतो तेव्हाच काम होते. जोपर्यंत ज्ञानी पुरुष स्व स्वरुपाचे भान करवून देत नाहीत तोपर्यंत निष्पक्षपातीपणा उत्पन्न होत नाही. 'ज्ञान' कुणाचीही चूक काढत नाही, आणि बुद्धी सर्वांचीच चूक काढते. सख्ख्या भावाची सुद्धा चूक काढते.
अंधारातल्या चुका
हे तर 'ज्ञानी पुरुष' आहेत, म्हणून स्वतः ला स्वतःच्या दोषांची जाणीव होते. नाहीतर स्वतःला समजणारच कसे ? मग तर चालली स्टीमर कोचीनच्या दिशेने ! होकायंत्र बिघडलेले आहे, म्हणून कोचीनला चालली ! दक्षिणेलाच ते होकायंत्र उत्तर दाखवते ! नाहीतर होकायंत्र नेहमी उत्तर दिशेलाच घेऊन जाते, असा स्वभावच आहे ! होकायंत्र बिघडले म्हणून तो काय करेल? आणि स्वतःला तर ध्रुवतारा पाहता येत नाही.
सर्वात मोठी चूक म्हणजे स्वच्छंद, स्वच्छंदतेमुळे तर पूर्ण लष्कर तयार झाले आहे. स्वच्छंद, हीच मोठी चूक. सहजच जरी असे म्हटले की 'त्यात काय झाले ?' म्हणजे झाले, संपले. त्यामुळे मग अनंत जन्म बिघडतात.
'मी जाणतो' ही अंधारातील चूक तर फार मोठी आहे. आणि परत असे म्हणणे की ‘आत्ता काही हरकत नाही' ही चूक तर सर्वच संपवून
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
४८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
टाकते. 'ज्ञानी पुरुषां' व्यतिरिक्त असे कुणीच बोलू शकत नाही की, 'एकही चूक उरली नाही.' प्रत्येक चुकीला बघून ती चूक संपवायची
आहे. सर्व जण स्वतःच्या दोषानेच बांधलेले आहेत. फक्त स्वतःचेच दोष पाहत राहिल्याने सुटता येईल असे आहे. 'आम्ही' स्वतःचेच दोष पाहत राहिलो म्हणून तर आम्ही सुटलो. निजदोष समजले की मग तो सुटत जातो. म्हणजे ज्ञानी पुरुष तुमची चूक मिटवू शकतात, दुसऱ्या कोणालाही हे जमणार नाही.
आम्ही त्वरित चूक एक्सेप्ट करुन निकाल लावून टाकतो. हे कसे आहे की, पूर्वी ज्या चुका केल्या होत्या त्यांचा निकाल लावला नाही म्हणून त्याच चुका पुन्हा पुन्हा होत आहेत. चुकांचा निकाल लावता आला नाही त्यामुळे एक चूक काढण्याऐवजी दुसऱ्या पाच चुका केल्या.
नाही त्याला वरिष्ठ कोणी प्रश्नकर्ता : पण दादा, प्रत्यक्ष पुरुषाशिवाय या चुका लक्षात येत नाहीत का?
दादाश्री : कसे लक्षात येईल?! त्यांना स्वत:चीच चूक समजत नाही तेव्हा ते दुसऱ्यांची चूक कशी मिटवतील? ज्याला वरिष्ठाची गरज नाही, ज्याला कोणी चूक दाखविणाऱ्याची गरज नाही, तोच चूक मिटवू शकतो. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही चूक मिटवू शकत नाही. जो स्वतः स्वतःच्या सर्व प्रकारच्या चुकांना जाणतो त्याला मग वरिष्ठाची गरजच नाही. वरिष्ठाची गरज कुठपर्यंत असते की जोपर्यंत तुम्ही स्वत:च्या चुका पाहू शकत नाही तोपर्यंत. आणि तुमच्यात ठराविक प्रकारच्या चुका असतील तर ते तुमच्या वरिष्ठ म्हणून राहतीलच आणि हा वरिष्ठपणा केव्हा सुटतो? तुमची एकही चूक, जी तुम्हाला दिसत नसेल त्या सर्वच चुका जेव्हा दिसू लागतात तेव्हा वरिष्ठपणा सुटतो. ही तर नियमशीर गोष्ट आहे ना! तुम्हा सर्वांना स्वतःच्या कमी चुका दिसतात म्हणून तर मी वरिष्ठ आहे अजून. तुमच्या चुका तुम्हाला दिसू लागल्या मग मी कशाला वरिष्ठ होऊ?
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
या भानगडीत मी कशाला पडू? अर्थात जगाचा नियमच असा आहे की, ज्याला स्वत:च्या सगळ्याच चुका दिसतील तेव्हा मग त्याचा वरिष्ठ कोणीच नसेल. म्हणून तर आम्ही सांगतो ना, की कोणी बापही आमचा वरिष्ठ नाही. उलट भगवंतच आम्हाला वश झाले आहेत. 'आम्हाला' तर प्रत्येक चूक, स्वत:ची किंचित्मात्र चूक, केवळज्ञानात दिसणाऱ्या चुका सुद्धा आम्हाला दिसतात. बोला आता, केवळज्ञान वर्तत नाही, आणि तरीही केवळज्ञानात दिसणाऱ्या चुका आम्हाला दिसतात!
दृष्टी निजदोषां प्रति हे ज्ञान घेतल्यानंतर बाहेरचे तर तुम्ही पाहाल, ती वेगळी गोष्ट आहे पण तुमच्याच आतील सर्व तुम्ही पाहत राहाल त्यावेळी तुम्ही केवळज्ञान सत्तेत असाल, पण ते अंश केवळज्ञान असते, सर्वांश नाही. आत वाईट विचार येतील त्यांना पाहायचे, चांगले विचार येतील त्यांना पाहायचे. चांगल्यावर राग (अनुराग) नाही आणि वाईटावर द्वेष नाही. चांगले-वाईट पाहण्याची आपल्याला गरज नाही. कारण मूळ सत्ताच आपल्या ताब्यात नाही, म्हणून ज्ञानी काय पाहतात? संपूर्ण जगाला निर्दोष पाहतात. कारण हे सर्व 'डिस्चार्ज' मध्ये आहे. त्यात त्या बिचाऱ्यांचा काय दोष? तुम्हाला कोणी शिवी देतो, ते डिस्चार्ज आहे, बॉस तुम्हाला अडचणीत टाकतो, ते सुद्धा डिस्चार्जच आहे. बॉस तर निमित्त आहे. जगात कुणाचाही दोष नाही. दोष दिसतो ती स्वत:चीच चूक आहे आणि हेच ‘ब्लंडर्स' आहेत आणि त्यामुळेच हे जग टिकून राहिलेले आहे. दोष पाहिल्याने, चुकीचे पाहिल्यानेच वैर बांधले जाते.
प्रमत्त भावाने दिसतात परदोष जगात कोणीही गुन्हेगार नाही. कोणी गुन्हेगार दिसत असेल तर ती आपलीच कमतरता आहे. कोणी गुन्हेगार दिसतो हाच तुमचा प्रमत्त भाव आहे. खरे तर अप्रमत्तता असली पाहिजे. मग कोणी गुन्हेगार दिसणारच नाही.
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : प्रमत्त भाव म्हणजे काय?
दादाश्री : वस्तु, वस्तूचा स्वभाव चुकते त्यास प्रमत्त म्हणतात. वस्तू त्याच्या मूळ धर्मात राहते त्यास अप्रमत्त भाव म्हणतात.
वीतरागांनी सांगितले मुक्तीच्या हेतूने समज नसल्यामुळे तुम्ही गोंधळता. या गोंधळाविषयी तुम्ही मला विचारले पाहिजे की, माझा इथे गोंधळ होत आहे तर मी काय केले पाहिजे? असे विचारावे, त्यासाठीच तर आपण सत्संग ठेवत असतो.
एक जरी कर्म कमी झाले तरी गुंतागुंत दिवसेंदिवस कमी होत जाते. एका दिवसात एक जरी कर्म कमी केले, तर दुसऱ्या दिवशी दोन कर्म कमी करु शकाल. पण हा तर रोज नवीन गुंता करतो आणि त्यास वाढवतच जातो! हे सर्व काय एरंडेल पिऊन फिरत असतील? जणु एरंडेल प्यायलेले असेल असे तोंड करुन फिरतात हे सर्व. एरंडेल विकत आणत असतील का? इतके महाग एरंडेल रोज कुठून विकत आणतील? आतील परिणती बदलली की एरंडेल प्यायलासारखे तोंड होते! दोष स्वत:चा आणि चूक काढतो दुसऱ्याची, याच्याने आतील परिणती बदलून जाते. स्वतःचे दोष शोधा असे वीतरागी सांगून गेले, दुसरे काहीच सांगितले नाही. 'तू तुझ्या दोषाला ओळख आणि मुक्त हो. बस, एवढ्यानेच तुला मुक्तिधाम मिळेल. एवढेच काम करण्यास सांगितले भगवंतांनी.
गरज आहे अचूक ज्ञान आणि अचूक समजूतीची
एक आचार्य महाराज विचारतात की माझा मोक्ष केव्हा होईल? तेव्हा भगवंत सांगतात, की जेव्हा तुमचे ज्ञान आणि समजूत अचूक होईल तेव्हा. हीच चूक आहे आणि याच चुकीमुळेच अडकून राहिले आहात. तुमचे ज्ञान आणि तुमची समजूत अचूक होईल तेव्हा तुमचा मोक्ष होईल. यात भगवंताने काय खोटे म्हटले?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : तेव्हा कुणी म्हणेल, साहेब जप-तप करायचे का? तर ज्या दिवशी तुझ्या पोटात अजीर्ण झाले असेल त्या दिवशी उपास कर. जप-तप करण्याची आमची अट नाही. कसेही करुन तुझी समजूत आणि तुझे ज्ञान अचूक कर. यात काय खोटे सांगतात भगवंत? चूक आहे तोपर्यंत कोणी मान्यच करणार नाही ना! अजून तर बऱ्याच चुका आहेत?! मी चंदुलाल आहे, या बाईचा नवरा आहे, पुन्हा असेही म्हणतो की या मुलाचा बाप आहे. कितीतरी चुका! ही तर चुकांची परंपराच आहे. मुळातच चूक. मूळ जी रक्कम आहे, त्यात एक अविनाशी आहे आणि एक विनाशी आहे. आणि अविनाशीबरोबर विनाशीचा गुणाकार करायला जातो, तोपर्यंत तर ती रक्कम उडून जाते. ती विनाशी, रक्कम, मग नवरा नाही पण बाप तर आहे, ही रक्कम ठेवतो तोपर्यंत ती रक्कम उडून जाते. म्हणजे गुणाकार कधीच होत नाही, उत्तर मिळत नाही आणि दिवस बदलत नाही. शुक्रवारच कायम राहतो. शुक्रवार बदलत नाही आणि शनिवार होत नाही. एव्हरी डे फ्रायडे (दररोज शुक्रवार).
भगवंताने काय असे सांगितले आहे की तप करा, जप करा, उपाशी मरा, उपास करा, त्याग करा, असे सांगितले आहे का? तुझे ज्ञान आणि तुझी समज अचूक कर, त्या दिवशी तू स्वतःच मोक्ष स्वरूप आहेस ! जिवंत देहधारीचा मोक्ष!!!
भगवंताची गोष्ट तर सोपीच आहे पण तुम्ही कधी तपास केला की, अचुक ज्ञान आणि अचुक समजूत कशी होऊ शकते? तुम्ही तर असा तपास केला की आज कसला उपास करु किंवा कसला त्याग करु? अरे! भगवंतांने त्यागाची अट कुठे केली आहे? हे तर सर्व चुकीच्यामार्गाने चालू लागले, आडगल्लीत शिरले. भगवंताने काय म्हटले होते की, 'तू ज्ञान आणि समजूत अचूक कर.'
प्रश्नकर्ता : चूक नसलेली अचूक समज, ही गोष्ट पुन्हा समजवा. दादाश्री : हो, जेव्हा तुमची समज अचूक होईल तेव्हा तुमचा
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
मोक्ष होईल. तुमची समजूतच चुकीची आहे. ती जेव्हा अचूक होईल, माझ्याजवळ सत्संगात बसाल तेव्हा निपटारा होईल. जोपर्यंत चूक आहे तोपर्यंत निपटारा कसा होईल? चुका असतील का कोणाच्या?
पुढे काय सांगतात की, तू स्वतः मोक्ष स्वरुप आहेस. तू स्वतः परमात्मा आहे. मात्र अचूक ज्ञान आणि अचूक समजूतीचे भान झाले पाहिजे. ज्ञान कसे असावे? अचूक. आणि समज कशी असली पाहिजे? अचूक. फक्त ज्ञानच असेल तर पपई लागणार नाही. झाड तर पपईचे आहे पण एक सुद्धा पपई लागणार नाही, असे घडते का? तुम्ही बघितला नाही का पपया?
प्रश्नकर्ता : बघितला आहे.
दादाश्री : बघितला आहे ना? अरे मूर्खा, तुला वाढवून मोठे केले तरी तू असा निघालास? पाणी पाजून वाढवले तरीही तू आतून असा निघालास? त्या झाडाला पपई लागतच नाही. ___ तात्पर्य हेच की ज्ञान चूकरहित असले पाहिजे आणि समज चूकरहित असली पाहिजे. आता फक्त ज्ञानच चूक रहित झाले तरीही काही उपयोगाचे नाही. समज जर चूक रहित झाली तरी चालेल. कारण समज ही हार्टपर्यंत पोहचते आणि ज्ञान हे बुद्धीपर्यंत पोहचते.
आजचे जे ज्ञान आहे, म्हणजे लोकांचे जे व्यवहारिक ज्ञान आहे ते बुद्धीपर्यंत पोहोचते आणि समज ही हार्टपर्यंत पोहचते, हार्टवाले ज्ञान थेटपर्यंत पोहोचवते, मोक्षापर्यंत पोहोचवते. त्यास आपले लोक सूझ म्हणतात. ही जी समज आहे, त्यामुळे सूझ उत्पन्न होते आणि सूझ मुळे समज उत्पन्न होते, जी थेटपर्यंत पोहोचवणारी सर्वोत्तम वस्तू आहे.
चुकीमुळे तर हा संसार सुद्धा व्यवस्थित चालत नाही, तर मग चुकीमुळे कधी मोक्ष होऊ शकतो का? ज्ञान आणि समज चूक रहित होईल, म्हणजे जेव्हा तुम्ही जाणाल की ज्ञान तर असे आहे आणि हे तर सर्व अज्ञान आहे, चुकीचे आहे, तेव्हापासूनच ज्ञान प्राप्त होत राहते.
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
या वयात सुद्धा असे बोलताना त्याला लाज वाटत नाही की, 'मी हिचा नवरा आहे.' बोलताना लाज वाटते का? आणि 'हा माझा नवरा आहे,' असे बायको सुद्धा बोलते. या वयातही त्यांना लाज वाटत नाही. ऐंशी वर्षाचे झाले त्यांनाही लाज वाटत नाही. कारण ते जसे जाणतात तसेच बोलतात आणि लोकांना समजेल असेच बोलतील ना! मग काय करणार? पण ते ज्ञान खोटे नाही, ते व्यवहारिक ज्ञान आहे, खरे ज्ञान नाही.
खऱ्या ज्ञानात तर तुम्ही शुद्धात्मा आहात आणि तेही शुद्धात्मा आहेत. पण त्या शुद्धात्म्याचे भान झाले पाहिजे ना? आता तर 'मी चंदुलाल आहे हे भान आहे, मी जैन आहे हे दुसरे भान आहे. वय चौऱ्यात्तर वर्ष आहे, हे सुद्धा भान आहे. सर्व प्रकारचे भान आहे. बालपणी कुठे-कुठे खेळायला गेलो होतो याचेही भान आहे. नोकरी कुठे-कुठे केली, व्यापार कुठे-कुठे केला याचेही भान आहे. स्वतः कोण आहे? याचे मात्र भान नाही.
प्रश्नकर्ता : आता ते ज्ञान तुम्ही द्या. खरे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आहे म्हणूनच इथे आलो आहोत.
दादाश्री : या ज्ञानासाठी तर जन्मोजन्म इच्छा असते, पण खरा नियाणां कधी केला नाही. जर खरा नियाणां केला असता तर संपूर्ण पुण्य त्यात वापरले जाते. नियाणांचा स्वभाव काय? तर तुमचे जेवढे पुण्य असेल ते सर्व नियाणां साठी वापरले जाते.
इथे तर घरासाठी पुण्य वापरले गेले, देहासाठी पुण्य वापरले गेले, या सर्व गोष्टींसाठी पुण्य वापरले गेले, परंतु मोक्षाचा नियाणां केलेलाच नाही ना! मोक्षाचा नियाणा केला तर संपूर्ण पुण्य त्यातच वापरले जाते. बघा ना, आम्ही मोक्षाचा नियाणां केला होता म्हणून सर्वकाही सुरळीत चालत आहे. ज्या काही अडचणी असतील त्या मिलमालकांना असतील, पंतप्रधानाला असतील पण आम्हाला काहीच अडचण नाही.
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
५४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
चूकरहित ज्ञान आणि समज प्रश्नकर्ता : चूकरहित ज्ञान आणि चूकरहित समज झाली तर तू स्वत:च मोक्ष स्वरुप आहेस. खूपच उच्च कोटीची गोष्ट सांगितली. आरोपित भाव हीच मुळात चूक आहे, बंधन आहे.
दादाश्री : हो आणि जोपर्यंत हे विज्ञान प्रकट होत नाही, तोपर्यंत असे स्पष्टीकरण मिळतच नाही ना! शास्त्रात असे स्पष्टीकरण केलेले नसते! फक्त शुभ करा, काही तरी शुभ करा, असे सांगतात पण आरोपित भाव आहे असे कोणीच समजवत नाही. कारण ज्ञानी पुरुषांशिवाय असे स्पष्टीकरण मिळत नाही.
लोकांना बुद्धीपूर्वक हे समजलेले असते की काही तरी चूक घडत आहे, खूप मोठी चूक घडत आहे, असे समजते पण तरीही ज्ञानी पुरुष भेटत नाहीत तोपर्यंत ते काय करतील? आंबा असाच उकडत राहतो. लोक खूप समजदार आहेत, ते बुद्धीपूर्वक सर्व समजून सार काढतात की हे सर्व काय आहे? पण तरीही उकडत राहतात. आणि ज्ञानी पुरुष भेटले तर सर्व स्पष्टीकरण देतात. प्रत्येक शब्दाचे स्पष्टीकरण केले नाही तर ते ज्ञानी पुरुषच नाहीत. स्पष्टीकरण व्हायलाच पाहिजे. जर अज्ञानाने स्पष्टीकरण होत असेल तर अज्ञान काय कमी होते? अज्ञान नव्हते का आपल्या घरी? स्टॉक भरुन होतेच ना!
पुरेशी आहे चुकांची प्रतीती बसणे लोक म्हणतात की आता आम्ही आमच्या दोषांना ओळखले आहे पण ते दोष आता तुम्ही काढून टाका. तुम्ही आम्हाला मारा-ठोका, जे करायचे असेल ते करा पण आमच्यातले दोष काढून टाका. तर आता यासाठी कोणता उपाय?
दोष शिरला कसा हे तुम्ही शोधा, त्यानंतर समजेल की दोष कशाप्रकारे निघेल? दोष शिरतो तेव्हा त्यास घालावे लागत नाही, म्हणून
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
काढतेवेळीही त्यास काढावे लागत नाही. जी वस्तू घातली असेल ती काढावी लागते. हे तर मला सांगतात, माझ्यातले दोष काढून टाका. अरे, पण दोष शिरला कशा? तेव्हा म्हणे, एक मनुष्य कुसंगात पडला तिथे त्याला खात्री पटली की हे लोक तर मजा करतात म्हणजे हा मार्ग खूप चांगला आहे, खूप छान, सुख देणारा आहे. त्याला त्या ज्ञानावर श्रद्धा बसली, प्रतीती बसली.
अशाप्रकारे मी यांना काय करतो? त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांना ते नाकारतात की आमच्यात अजिबात चूक नाही. लोकांमध्ये चुका आहेत म्हणून त्यांच्या चुका त्यांना दाखवतो. नंतर त्यांना प्रतीती बसते, हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) की या सगळ्या चुकाच आहेत आणि याचा आम्ही स्वीकार करतो, तेव्हा आता तुम्ही आमच्या या चुका काढा! असे म्हणतात. मी म्हटले, आता काढावे लागणार नाही. प्रतीती बसली म्हणून आता चुका निघू लागतील. तुला फक्त मोकळे मन ठेवायचे की, 'बाबा तुम्ही निघा आता.' बस, एवढेच बोलण्याची गरज. प्रतीती बसल्यानेच चूक निघून जाते आणि प्रतीती बसल्यानेच चूक आत शिरते. यात घालायचे-काढायचे नसते. हा काय कारखाना आहे? एक जरी चूक मिटवायची असेल तरीही बराच वेळ लागतो? कितीतरी जन्म निघून जातात. समजेल अशी गोष्ट आहे ना ही? प्रतीतीमध्ये डाग नाही पडला पाहिजे.
प्रश्नकर्ता : दादाजी, तुम्ही लक्षणे बघत नाहीत पण सरळ मूळ कारणावर उपचार करता, असे डॉक्टर कुठे भेटतील?
दादाश्री : डॉक्टर भेटत नाहीत त्यामुळेच तर ही समस्या आहे ना! असे डॉक्टर भेटले नाहीत आणि असे औषधही भेटले नाही, त्याचीच तर ही भानगड! म्हणून मग परिणामालाच मारत राहिले, इफेक्टलाच!
श्रद्धेमुळे शिरला. प्रतीती संपूर्ण बसली, म्हणून दोष शिरला आणि प्रतीतीनेच निघेल. संपूर्ण प्रतीती झाली पाहिजे की हा दोषच आहे. मग तो दोष निघेल. हाच नियम आहे. नंतर त्याची बाजू घेतली नाही, प्रोटेक्शन
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
(रक्षण) केले नाही, तर तो दोष निघून जातो. पण पुन्हा प्रोटेक्शन देतोच. आपण त्यांना विचारले की, 'साहेब, तुम्ही अजूनही तपकीर ओढता?' तेव्हा म्हणेल, 'त्यात हरकत नाही.' यास प्रोटेक्शन दिले असे म्हटले जाते. मनात जाणतो की हे चुकीचे आहे. म्हणजे प्रतीती बसली आहे, पण पुन्हा प्रोटेक्शन देतो. प्रोटेक्शन देऊ नये. प्रोटेक्शन देतात का लोक?
प्रश्नकर्ता : हो प्रोटेक्शन देतातच ना!
दादाश्री : अब्रू निघून गेली आहे, आहेच कुठे अब्रू? अब्रूदार तर काय हे कपडे घालून फिरत असेल? हा तर झाकत राहतो आब्रू! झाकूनझाकून अब्रू वाचवित राहतो. कपडे फाटले तर शिवून घेतो, अरे कोणी बघेल ना, शिवून घे.
चूक मिटवतील ते भगवंत स्वत:ची एक चूक मिटवतो त्याला देव म्हणतात. स्वत:ची चूक दाखवणारे तर खूप असतात पण कोणी मिटवू शकत नाही. चूक दाखवताही आली पाहिजे. जर चूक दाखवता येत नसेल तर ती आपली चूक आहे, असे मान्य करुन घ्यावे. कुणाला चूक दाखवणे हे खूप कठीण काम आहे आणि ती चूक जो मिटवून देतो तो देवच म्हटला जातो. हे तर ज्ञानी पुरुषांचेच काम. आम्हाला या जगात कोणी दोषी दिसतच नाही. ____ 'आम्ही' दृष्टी संपूर्ण निर्दोष केली आणि संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले! म्हणूनच 'ज्ञानी पुरुष' तुमची 'चूक' मिटवू शकतात. दुसऱ्या कोणाचे हे कामच नाही. भगवंतांनी संसारी दोषांना दोष मानले नाही. 'तुझ्या स्वरुपाचे अज्ञान' हाच सर्वात मोठा दोष आहे. 'मी चंदुलाल आहे, तोपर्यंत इतर सर्व दोष सुद्धा उभे आहेत. आणि एकदा जर 'स्वत:च्या स्वरुपाचे' भान झाले, की मग इतर दोषही निघू लागतात.
चूकरहित दर्शन आणि चूक असलेले वर्तन स्वतःची चूक स्वत:ला समजते तो भगवंत होतो.
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
५७
प्रश्नकर्ता : अशा प्रकारे कोणी भगवंत झाले होते?
दादाश्री : जितकेही भगवंत झाले त्या सर्वांना स्वतःची चूक सापडली, आणि ज्यांनी चूक मिटवली ते सर्व भगवंत झालेत. चूक राहणारच नाही अशा प्रकारे चूक मिटवून टाकतात. सगळ्याच चुका दिसतात. अशी एकही चूक नव्हती की जी त्यांना दिसली नसेल. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म अशा सर्वच चुका दिसतात. आम्हालाही आमच्या पाचपन्नास चुका तर दररोज दिसतात आणि त्या सुद्धा सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुका दिसतात की ज्या लोकांना बिलकुल नुकसानकारक नसतात. हे बोलता-बोलता कुणाचे अवर्णवाद बोलले जाते, ती सुद्धा चूकच म्हटली जाते. ती तर परत स्थूल चूकच म्हटली जाते.
चुका कुणाला दिसतात? तेव्हा म्हणे चूक नसलेले चारित्र्य, त्याच्या श्रद्धेत आहे ! हो, आणि चूक असलेले वर्तन वर्तनात आहे, त्याला चूक दिसते. चूक नसलेले चारित्र्य त्याच्या श्रद्धेत असेल, म्हणजेच चूक नसलेले चारित्र्य संपूर्ण दर्शनमध्ये असेल आणि चूक असलेले वर्तन त्याच्या वर्तनात असेल, त्याला आम्ही मुक्त झाला आहे असे म्हणतो. चूकवाले वर्तन जरी असले पण त्याच्या दर्शनात काय आहे ?
__ सूक्ष्मात सूक्ष्म चूक रहित चारित्र्य कसे असावे? ते आत दर्शनात असले पाहिजे. दर्शनात अगदी सूक्ष्मात सूक्ष्म चूकही नसेल असे दर्शन असले पाहिजे, तरच चूक पाहू शकेल ना?! पाहणारा क्लीयर असेल तरच पाहू शकेल. म्हणूनच आम्ही सांगत असतो ना की ३६० डिग्री वाले जे भगवंत आहेत ते संपूर्ण क्लियर (शुद्ध) आहेत आणि ते आमचे अनक्लियरन्स दाखवतात. हे ज्ञान मिळाल्यानंतर सर्वांना दोन गोष्टी तर असतातच. ज्यांना ज्ञान मिळाले नसेल, त्यांनाही दोन असतात आणि यांनाही दोन असतात. ____ या ज्ञानानंतर आत आणि बाहेर पाहू शकतो. म्हणजे आत चूकरहित चारित्र्य हे असे आहे, असे तो दर्शनमध्ये पाहू शकतो! आणि चूकरहित
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
चारित्र्य जितके त्याच्या दर्शनात उंच गेले, तितक्या चुका त्याला दिसतात. आत जेवढे ट्रान्स्परन्ट (पारदर्शक) आणि क्लीयर झाले, आरसा स्वच्छ झाला की लगेचच आत दिसते. त्यात चुका झळकतात! तुम्हाला चुका दिसतात का?
प्रश्नकर्ता : हो, दिसतात. चूक रहित चारित्र्य ज्याच्या दर्शनात असते आणि चूक असलेले चारित्र्य ज्याच्या वर्तनात असते म्हणून दिसते का?
दादाश्री : त्यामुळे लगेच लक्षात येते की दर्शन चूक रहित आहे. चूक रहित चारित्र्य ज्याच्या दर्शनात असते, तो सांगू शकतो की ही चूक झाली.
अलौकिक सामायिक हा पुरुषार्थ म्हणजे चुका दिसण्यास सुरुवात झाली ना, तर त्या जितक्या दिसतात तितक्या निघून जातात. ___तुम्हाला थोड्यातरी चुका दिसतात का? दररोज पाच-दहा दिसतात ना? त्या दिसल्या, म्हणजे आता दिसण्याचे वाढत जाईल. अजून तर पुष्कळ दिसतील. जसजसे दिसू लागतील तसतसे आवरण उलगडत जाईल आणि त्यामुळे मग जास्त चुका दिसू लागतील.
काही दोष बंद होतील असे नाहीत, ते मग मार खाईल तेव्हा अनुभव होईल, तेव्हाच ते दोष बंद होतील. मी जाणतो की हे दोष अनुभवाशिवाय बंद होणार नाहीत. बंद करविणे हे चुकीचे आहे.
जितके करायचे असेल तितके होऊ शकेल, असे आहे. आणि कित्येक महात्मा करतातही. पुरुषार्थ आहे पण ते सर्वांनाच जमत नाही. आपल्या इथे जी सामायिक करवितात ना, तो मोठा पुरुषार्थ आहे. चुकांचा स्वभाव कसा आहे की एकदाची चूक दिसली की ती जाण्याची तयारी करते, मग ती तिथे थांबत नाही. दोष होतो त्यास हरकत नाही पण दोष दिसला पाहिजे. दोष होतो त्याची शिक्षा नाही, पण चुका दिसतात त्याबद्दल
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
५९
बक्षिस मिळते. कुणालाही स्वत:चे दोष दिसत नाहीत. आत्मा प्राप्त केल्यानंतर निष्पक्षपाती होतो, म्हणून चुका दिसू लागतात.
हे ज्ञान दिल्यानंतर तुम्ही निष्पक्षपाती झालात म्हणून आत्ता देहाचा पक्षपात तुम्हाला शेजाऱ्याइतकाच राहिला आहे, म्हणून जी चूक असेल ती दिसत राहते. आणि दिसली म्हणजे जाण्याची तयारी करते.
नाही स्पर्शत काही शुद्ध उपयोगीला आता हे ज्ञानच तुम्हाला तुमच्यातील चुका दाखवते. 'चंदुभाऊ' कुणावर संतापले तर 'तुमच्या' लक्षात येते की आहोहो, किती मोठी चूक झाली! अर्थात चुका दिसतात त्याचे नाव आत्मा. निष्पक्षपाती झाला त्याचे नाव आत्मा. जोपर्यंत तुम्ही आत्मा आहात तोपर्यंत दोष स्पर्शत नाही. जर तुम्ही शुद्ध उपयोगात असाल तर तुमच्या हातून एखादे चुकीचे काम झाले तरीही ते तुम्हाला स्पर्शत नाही. शुद्ध उपयोगीला कोणतेही कर्म स्पर्शत नाही. म्हणून आचार्य महाराज आम्हाला विचारतात की, जीवांची अहिंसा पाळण्यासाठी 'आम्ही अनवाणी पायांनी फिरतो, आणि तुम्ही तर गाड्यांमधून फिरता. तुमचे ज्ञान खरे आहे, हे आम्ही कबूल करतो पण तुम्हाला त्याचा दोष लागत नाही का? त्यावर मी म्हणालो 'आम्ही शुद्ध उपयोगी आहोत.'
आरोप लावल्याने थांबते पुढील विज्ञान समोरचा निर्दोष दिसला, तर दोषी कोण दिसेल? प्रश्नकर्ता : ज्याच्याजवळ अज्ञान जास्त असेल त्याला जास्त
दोषी वाटतो.
दादाश्री : हो, समोरची व्यक्ती दोषी वाटते आणि ज्याच्याजवळ ज्ञानच असेल, त्याला समोरची व्यक्ती अजिबात दोषी वाटत नाही.
आता दोषी वाटत नाही पण मग दोष कुणाचा? कुणाचा तरी दोष
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
६०
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
असला पाहिजे ना? तर हे जेवढेही दोष होत आहेत ते सर्व तुमचे स्वत:चेच दोष आहेत. हे स्व:चेच दोष आहेत, असे ज्याने पाहिले नाही, असा विचार केला नाही आणि त्या दोषांचा निकाल करत नाही आणि दुसऱ्यांवर आरोप लावत राहतो, त्यामुळे पुढील विज्ञान बंद झाले आहे, थांबले आहे. तुमचे दोष जेव्हा तुमच्या लक्षात येतील तेव्हा तुम्हाला पुढील विज्ञान चालू होईल.(समजेल)
बुद्धी एक्सपर्ट, दोष पाहण्यात या जगात कोणीच दोषी नाही. दोष दिसतात तीच आपली भ्रांती आहे. ही गोष्ट थोडीफार तरी तुमच्या लक्षात आली का?
प्रश्नकर्ता : थोडी आली.
दादाश्री : कोणीच दोषी नाही. दोषी तर आपल्याला आपली बुद्धी उलट दाखवत राहते आणि त्यामुळेच हा संसार टिकून राहिला आहे. बुद्धीला दोष पाहणे चांगले जमते. 'त्याने असे केले ना!' आपण सांगितले की तुम्ही तुमच्या दोषांचे वर्णन करा ना. तेव्हा म्हणेल, असे काही विशेष दोष नाहीत. एक-दोन दोष आहेत बाकी विशेष काही नाही.
दोष पाहावेत स्वत:चेच, नेहमी प्रश्नकर्ता : कोणी दोषी नाही म्हणजे स्वतः पण दोषी नाही, असाच याचा अर्थ झाला ना?
दादाश्री : नाही, मला का दुखत आहे ? समजा एखाद्याने वरुन ढेकूळ फेकला आणि तो मला लागला, मग यात कोणाचा दोष म्हटला जाईल?
प्रश्नकर्ता : यात तर कोणाचाही दोष नाही.
दादाश्री : अर्थात यात माझाच दोष असेल, म्हणूनच असे घडले. तेव्हा आपला स्वतःचा दोष तर पाहावाच लागेल ना. आणि जोपर्यंत स्वत:ची चूक दिसत नाही, तोपर्यंत मनुष्य पुढची प्रगती कशी करु शकेल?
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
६१
जर कोणी शिवी दिली आणि त्या गोष्टीचा स्वत:वर काही परिणाम होत नसेल, स्वतःचीच चूक आहे असे स्वतःला वाटत असेल आणि समोरची व्यक्ती निर्दोष आहे असे समजून स्वतः प्रतिक्रमण करत असेल, तर ते भगवंताचे सर्वात मोठे ज्ञान आहे. हेच ज्ञान मोक्षाला घेऊन जाते. एवढाच शब्द, आमच्या एकाच वाक्याचे जरी पालन केले ना, तरीही तो मोक्षाला जाईल.
दोष पाहते, तिथे बुद्धी स्थिर प्रश्नकर्ता : अर्थात दोष दुसऱ्यांचा नाही, आपलाच दोष आहे?
दादाश्री : हो, असे आहे की, बुद्धीला एका ठिकाणी स्थिर केल्याशिवाय काम बनत नाही. म्हणून समोरच्याचा दोष पाहिला तरी बुद्धी स्थिर होईल. आणि जर समोरील व्यक्तीला निर्दोष पाहिले आणि स्वत:चा दोष पाहिला तरीही बुद्धी स्थिर होईल. कारण बुद्धी आपोआप स्थिर होत नसते ना!
प्रश्नकर्ता : याचा अर्थ कुठे तरी दोष नक्कीच आहे. तिथे दोष नाही म्हणून इथे दोष आहे.
दादाश्री : हो, इतकाच फरक आहे. प्रश्नकर्ता : आता लक्षात आले की हे निर्दोष कशा प्रकारे आहे!
दादाश्री : कारण बुद्धी काय म्हणते? बुद्धी समाधान शोधत असते, स्थिरता शोधत असते. म्हणून तुम्ही एखाद्याचा दोष शोधून काढला तर बुद्धी स्थिर होते. मग त्यामुळे येणारी जबाबदारी काहीही असो, पण कोणाचा तरी दोष शोधून काढला की बुद्धी स्थिर होते. आणि दोष इतर कोणाचाही नाही पण माझाच आहे, तरीही बुद्धी स्थिर होते. पण अशाप्रकारे बुद्धी स्थिर होण्याचा मार्ग म्हणजे मोक्षमार्ग.
आता बुद्धी अशीही स्थिर होते आणि तशीही स्थिर होते पण जी
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बुद्धी दुसऱ्या कोणावरही आरोप करणारी नसेल अशी बुद्धीची स्थिरता असली पाहिजे. म्हणून आपण स्वत:वरच घेतले तर याचे समाधान होईल. आणि त्यामुळे मग बुद्धी पण स्थिर होईल ना!
अशाप्रकारे या जगात ढवळाढवळ होत आहे. स्वत:ची चूक सापडत नाही आणि दुसऱ्याची चूक लगेच लक्षात येते. कारण बुद्धी वापरली आहे ना! आणि ज्याने बुद्धी वापरली नाही त्याच्याकडून चूक होण्याचा तर काही प्रश्नच येत नाही, काही तक्रारच नाही ना! या गाई-म्हशी आहेत, असे सर्व अनंत जीव आहेत, त्या लोकांना काहीच तक्रार नसते, बिलकूल तक्रार नसते.
प्रश्नकर्ता : ही तर खूप महत्त्वाची गोष्ट निघाली की बुद्धीला स्थिर करायची. पूर्वी बुद्धीला संसारात स्थिर करत होतो, तेव्हा दोष दिसत होते.
दादाश्री : हो, बुद्धीला स्थिर करण्यासाठी साधन पाहिजे, तेव्हा शेवटी स्वतः गुन्हेगार नाही असे ठरवतात लोक. आपण असेच सांगतो की, 'तो तर गुन्हेगार आहेच ना!' अर्थात कोणावर तरी दोषारोपण करुन बुद्धीला आपण स्थिर करतो. म्हणून बुद्धी जर स्थिर होत नसेल तर दुसरे काय कराल? तर तेव्हा तुम्ही असे म्हटले पाहिजे की, हा माझाच दोष आहे, जेणे करुन मग बुद्धी तिथे स्थिर होते. नाही तर बुद्धी जर हालायला लागली की आत पूर्ण अंत:करण ढवळले जाते. जसे इथे हुल्लड झाला असेल ना त्याचप्रमाणे. म्हणून बुद्धीला स्थिर करावे लागते ना. स्थिर करत नाही तोपर्यंत हुल्लड झाल्यासारखे होते. अज्ञानी स्वत:च्या जबाबदारीवर बुद्धी स्थिर करतो आणि तुम्ही स्वतःचीच चूक पाहून स्थिर करता आणि स्थिर केले म्हणूनच हुल्लड बंद झाले ना! नाही तर आत विचारांची परंपरा चालूच राहते.
जर असे म्हटले की ही त्याची चूक आहे, तर मग आपली बुद्धी स्थिर होते. मग निवांतपणे जेवण गोड लागते. पण मग यातून संसार पुढे वाढत जातो. आपल्याला तर संसारातून मुक्त व्हायचे आहे. म्हणून आपण
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
सांगावे की, 'चूक माझीच आहे,' तेव्हाच बुद्धी स्थिर होईल आणि मग जेवणही गोड लागेल. अर्थात बुद्धी स्थिर झाली पाहिजे. समजेल अशी गोष्ट आहे ना?
प्रश्नकर्ता : बुद्धी स्थिर होते, ही गोष्ट अगदी बरोबर समजेल अशी आहे.
दादाश्री : हो, आणि जोपर्यंत बुद्धी अस्थिर आहे, तोपर्यंत खाऊ देत नाही, पीऊ देत नाही, झोपूही देत नाही, काहीच करु देत नाही. म्हणजे ही मनाची चंचळता नाही पण बुद्धीची चंचळता आहे. बुद्धी स्थिर झाली म्हणजे प्रश्न मीटला.
प्रश्नकर्ता : आपण सांगितले ना की बुद्धी स्थिर होते, संसाराकडे किंवा मग आत्म्याकडे...
दादाश्री : तुम्ही समोरच्या व्यक्तीला दोष दिला तर तुमची बुद्धी स्थिर होते म्हणून तुम्हाला खाऊ देते, पिऊ दिते, झोपू देते, सर्व काही करु देते. पण समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवल्याने संसार कायम राहिल. आणि मी काय सांगतो की जर संसाराचा अंत आणायचा असेल तर मूळ दोष तुमचाच आहे, वास्तवात हे असेच आहे. आता स्वतःला दोष दिला तरीही बुद्धी स्थिर होईल. बुद्धीला असे नाही की स्वतःला दोष का दिला. पण शेवटी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. बुद्धीला स्थिर केल्याशिवाय चालणार नाही. हे असे काही शास्त्रात थोडीच लिहिण्यात येते?
असे आहे की, या जगाचे संपूर्ण सार शास्त्रात राहीलेला नाही. पण आम्ही हे उघड करीत आहोत की, या जगात कोणीही दोषी नाहीच. हे सर्व जे दिसते, मारामारी, रक्तपात, चोरी, लबाडी हे जे सर्व होत आहे त्यात कोणीही दोषी नाही, ही वास्तविक दृष्टी आहे. वास्तविक दृष्टी ठेवून जर तुम्ही कधी ताळमेळ बसवला तर तुमची दोष दृष्टी निघून जाईल आणि दोष दृष्टी गेली म्हणजे तुम्ही खुदा (देव) झाले, बस! दुसरे काहीच नाही.
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
६४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
___ मुक्ती प्राप्त करण्यासाठी पाहावे निजदोष
हे जग निर्दोषच आहे कायमसाठी, साप सुद्धा निर्दोष आहे व वाघ सुद्धा निर्दोष आहे. इंदिराजीही निर्दोष आहेत आणि मोरारजीही निर्दोष आहेत, सर्वच निर्दोष आहे. पण तरीही दोष दिसतात ना? दुसऱ्यांचे दोष पाहणे बंद झाले हीच मोक्षाची क्रिया आहे. दोष दिसतात ही संसाराची अधिकरण क्रिया आहे, म्हणून आपलाच दोष, दुसऱ्या कुणाचा दोष नाही. दुसऱ्यांचे दोष पाहणे बंद झाले त्याला मोक्षाचे तिकीट मिळाले. अर्थात स्वत:चे दोष पाहण्यासाठी हे जग आहे. दुसऱ्यांचे दोष पाहिल्यामुळेच जग उभे राहीले आहे. दुसऱ्यांचे दोष कोण पाहतो? तर ज्याला गुरुत्तम बनायचे असेल तोच.
मोक्षात जाणारा नेहमी स्वतःच्या चुका पाहत राहतो आणि दुसऱ्यांच्या चुका पाहणारा संसारात भटकत राहतो. जर कोणी दुसऱ्यांचे दोष पाहत असतील, तर त्याला कंटाळू नका. तो इथे भटकणार आहे म्हणून तो दोष पाहतच राहणार ना, तो भटकणार आहे. आणि त्याने जर असे केले नाही तर तो भटकेल कसा?
___ या, एका गोष्टीवर तुम्हाला जर इथे आवडत असेल तर दुसऱ्यांना दोषी पाहत राहा. संसार आवडत असेल तर जगाला दोषी पाहत राहा आणि जर संसार आवडत नसेल तर एका किनाऱ्यावर या. एका गोष्टीवर स्थिर व्हा. संसार आवडत नसेल तर संसार दोषी नाही, असे तुम्ही पाहत जा. माझ्याच दोषामुळे हे सर्व घडले आहे. एका किनाऱ्यावर तर यावे लागेल ना? विरोधाभास कुठपर्यंत चालेल? महावीर भगवंतांना कुणीही दोषी वाटले नाही. त्यांना तर वरुन देवतांनी येऊन भयंकर त्रास दिला तरी पण त्यांना ते दोषी वाटले नव्हते.
आत असतोच तो दोष जग दोषी दिसू नये, निर्दोष दिसायला पाहिजे.
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : हे खरे आहे ना की, आपण ज्याला दोषी पाहत असतो, ज्या दृष्टीने दोषी पाहत असतो, ते दोष आपल्यात भरलेले आहेत.
दादाश्री : म्हणूनच दिसते.
प्रश्नकर्ता : आणि जितक्या अंशाने दोष दिसणे कमी होत जाते तितक्या अंशाने दृष्टी स्वच्छ होते, हे खरे आहे का?
दादाश्री : हो, तितके स्वच्छ होते. स्वतःचे गटार दुर्गंध देते आणि दुसऱ्याचे गटार धुवायला जातात
दोष म्हणजे सर्वांच्या गटारी आहेत, बाहेरच्या गटारी आपण उघडत नाही. लहान मुलालाही हा अनुभव असतो. हे स्वयंपाक घर बनवले आहे म्हणून गटार सुद्धा असलेच पाहिजे ना! पण ते गटार उघडू नये. कुणात अमुक दोष असेल, कुणी चिडत असेल, कुणी घांघ्रटपणा करत असेल, ते पाहणे यास गटार उघडणे असे म्हटले जाते. त्यापेक्षा कुणाचे गुण पाहिलेले चांगले. गटार तर स्वत:चेच पाहण्यासारखे आहे. पाणी तुंबले असेल तर स्वतःचे गटार साफ करावे. इथे तर गटार भरले जाते, पण लक्षातच येत नाही! आणि लक्षात आले तरी काय करणार? शेवटी ती सवयच होऊन जाते. त्यामुळेच तर हे सर्व रोग उत्पन्न झाले आहेत. शास्त्र वाचून बोलत राहतो की, 'कोणाचीही निंदा करु नका' पण निंदा करणे तर चालूच असते. कोणाविषयी थोडे जरी वाईट बोलले तर तेवढे नुकसान झालेच समजा! बाहेरच्या गटारांची झाकणे कोणी उघडत नाही पण लोकांच्या गटारांची झाकणे मात्र उघडत राहतात.
एक मनुष्य दरवाजाला लाथा मारत होता. मी विचारले, 'का बरे लाथा... मारतोस?' तेव्हा तो म्हणाला की, कितीही साफ केले तरी दुर्गंधच येतो. बोला आता, हा किती मूर्खपणा म्हटला जाईल! संडासाच्या दरवाजाला लाथा मारल्या तरीही दुर्गंध येतो, यात चूक कोणाची?
प्रश्नकर्ता : लाथा मारणाऱ्याची.
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
६६
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : ही केवढी मोठी चूक म्हटली जाईल? यात काय त्या बिचाऱ्या दरवाजाचा दोष आहे ? जगात सर्वच लाथा मारुन-मारुन दुर्गंधीला स्वच्छ करायला जातात. पण त्या संडासच्या दरवाजांना लाथा मारुन स्वतःलाच त्रास होतो शिवाय दरवाजेही तुटतात.
आम्ही तुम्हाला काय सांगत असतो की, या देहाचे जे-जे दोष असतील, मनाचे दोष असतील, ते जितके तुम्हाला दिसतील, तितके तुम्ही त्यातून सुटलात. दुसरे म्हणजे तुम्हाला दोष काढण्यासाठी डोकेफोडी करण्याची गरज नाही किंवा संडासाचे दारही आपटत राहण्याची गरज नाही. संडासाच्या दाराला लाथा मारल्यामुळे दुर्गंध येणे थांबते का? का नाही थांबत? त्याने लाथा मारल्या तरीही थांबणार नाही? बोंबा मारल्या तरी?
प्रश्नकर्ता : नाही थांबत.
दादाश्री : संडासाला काही फरक पडत नाही ना? अशाप्रकारे हे लोक डोकेफोड करतात, बिन कामाची डोकेफोड ! नवीन काहीही दळले नाही आणि जे आधीचे दळलेले होते तेही उडवून टाकले, भरडून, भरडून! असे केल्याने तर दळलेले सर्व उडूनच जाईल ना! नवीन दळलेले तर जाऊ द्या पण जे पूर्वी दळलेले होते तेच परत दळायला घेऊन तेही उडवून टाकले! हातात काहीच उरले नाही. हे जे मनुष्य जीवन दिसते ना, ते दोन पायांऐवजी चार पाय होतील असे झाले आहे. बोला आता किती फायदा झाला?
दृष्टी अभिप्राय रहित दोष पाहणे बंद करा ना!
प्रश्नकर्ता : जर दोष पाहिले नाहीत तर, जगाच्या दृष्टीने आपण एक्सेस फूल (जास्त मूर्ख) नाही का ठरणार?
दादाश्री : म्हणजे दोष पाहिल्याने आपण सफळ होतो असे म्हणायचे आहे का?
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : दोष पाहिल्याने नाही, पण डिस्टिंक्शन करायचे की हा माणूस असा आहे, तो माणूस असा आहे.
दादाश्री : नाही, यात तर जोखीम आहे. यास प्रिज्युडीश (पूर्वग्रह) म्हटले जाते. प्रिज्युडीश कोणासाठीही ठेवू नये. काल एखाद्याने कोटमधून पैसे चोरुन नेले असतील तर, तो आजही चोरी करेल असे आपण गृहीत धरू नये. फक्त आपण कोट सुरक्षित जागी ठेवला पाहिजे. दक्षता बाळगली पाहिजे. काल कोट बाहेर ठेवला होता तर आज योग्य जागी ठेवावा पण पूर्वग्रह ठेवू नये. त्यामुळेच तर हे दुःखं आहते ना सारे, नाही तर जगात दुःखं का असतील? आणि देव दुःख देत नाही हे सर्व तुम्हीच तयार केलेले दुःखं आहे आणि तेच तुम्हाला त्रास देत आहेत. त्यात देव काय करेल? कोणासाठी पूर्वग्रह ठेवू नका. कोणाचाही दोष पाहू नका, हे एवढे समजून घेतले तर समाधान होईल.
तुम्ही प्रतिक्रमण नाही केले तर तुमचा अभिप्राय राहिला, म्हणून तुम्ही बंधनात आलात. जो दोष झाला त्यात तुमचा अभिप्राय बाकी राहिला आणि अभिप्रायाने मन तयार झालेले आहे. माझा कोणत्याही व्यक्तीसाठी किंचितही अभिप्राय नाही. कारण एकदाच पाहिल्यानंतर मी त्याच्यासाठी दुसरा अभिप्राय बदलत नाही.
संयोगानुसार एखादी व्यक्ती चोरी करीत असेल आणि मी स्वतः त्याला चोरी करताना पाहिले असेल तरी देखील मी त्याला चोर म्हणणार नाही. कारण की ते संयोगाधीन आहे. जगातील लोक तर जो पकडला जातो त्याला चोर म्हणतात. तो संयोगाधीन चोर होता की कायमचा चोर होता याचा विचार लोक करीत नाही. मी तर कायमच्या चोराला चोर म्हणतो आत्तापर्यंत मी कुठल्याही व्यक्तीसाठी अभिप्राय बदलला नाही. 'व्यवहार आत्मा' संयोगाधीन आहे, आणि 'निश्चय आत्म्याशी' एकता आहे. आम्हाला संपूर्ण जगाविषयी मतभेद नाहीत.
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
६८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : मतभेद तर असूच शकत नाही, कारण निश्चयाने तर तुम्हाला कोणतीही व्यक्ती दोषी वाटतच नाही ना.
दादाश्री : दोषी वाटत नाही, कारण वास्तवात तसे नाहीच. हे जे दोषी वाटते ना ते दोषित दृष्टीमुळे वाटते! तुमची दृष्टी जर निर्दोष झाली तर तुम्हाला कोणीही दोषी वाटणार नाही!
असा अंत येतो गुंतागुंतीचा गुंतागुंतीचा अंत केव्हा येतो? रिलेटिव्ह आणि रियल या दोनच वस्तू जगात आहेत. ऑल धीस रिलेटिव्हस् आर टेम्पररी एडजस्टमेन्ट, आणि रियल इज दी परमनन्ट. आता रिलेटिव्ह भाग किती आणि रियल भाग किती यांच्यामध्ये लाईन ऑफ डिमार्केशन (भेदरेषा) आखून दिली तर गुंतागुंत बंद होते, नाही तर गुंतागुंत बंद होत नाही. चोवीसही तीर्थकारांनी ही लाईन ऑफ डिमार्केशन आखली होती. कुंदकुंदाचार्यांनी सुद्धा ही लाईन टाकली होती आणि आत्ता आम्ही सुद्धा ही डिमार्केशन लाईन आखून देतो की ज्यामुळे लगेच त्याचे सर्व ठीक होऊन जाते. रिलेटिव्ह आणि रियल या दोन्हींच्या गुंतागुंतीमध्ये लाईन ऑफ डिमार्केशन, भेदरेषा आखून देतो की हा भाग तुझा आहे आणि हा भाग परका आहे. तर आता परक्या भागाला तू माझा मानू नकोस, असे त्याला समजावले की, मग प्रश्न मिटला.
__ हा तर परका माल हडपून घेतला आहे. त्याचीच ही सर्व भांडणे चालतात, भांडणे चालूच राहतात. गुंतागुंत म्हटल्यावर भांडण चालूच राहते, पण स्वतःची एकही चूक दिसत नाही, आणि तसे पाहिले तर पूर्णपणे चुकांनी भरलेलेच आहेत! अर्थात रिलेटिव्ह आणि रियलचे ज्ञान झाल्यानंतर स्वत:च्याच चुका दिसतात. जिथे बघाल तिथे स्वत:च्याच चुका दिसतात आणि आहेच स्वत:ची चूक. स्वत:च्या चुकांमुळे हे जग टिकून राहिलेले आहे, दुसऱ्यांच्या चुकांमुळे हे जग टिकून राहिलेले नाही. स्वतःची चूक संपल्यावर तो सिद्धगतीतच निघून जातो!
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जिथे सुटला मालकीपणा सर्वस्व प्रकारे स्वतःचे जितके दोष दिसतात, तितके दोष आतून कमी होतात, असे कमी होत-होत जेव्हा दोषांचे पोते पूर्ण रिकामे होते, तेव्हा तुम्ही निर्दोष बनता. तेव्हा तुम्ही स्वत:च्या स्वरुपात आलात असे म्हटले जाईल.
आता याचा अंत केव्हा येईल? अनंत जन्मांपासून भटकतच आहोत, दोष तर वाढतच जात आहेत. म्हणजे ज्ञानी पुरुषांच्या कृपेनेच सर्व काम होऊन जाते. कारण ज्ञानी स्वतः मोक्षदाता आहेत. मोक्षाचे दान देण्यासाठी आले आहेत. त्यांना काहीच नको असते.
__ संपूर्ण जागृती असते तेव्हा स्वत:ची एकही चूक होत नाही. एक पण चूक होते ती अजागृती आहे. दोष संपवल्याशिवाय निर्दोष होऊशकत नाही आणि निर्दोष झाल्याशिवाय मुक्ती नाही.
जेव्हा संपूर्ण दोषरहित व्हाल तेव्हा निर्दोष व्हाल. किंवा थोडेफार दोष बाकी असतील तरीही जर हा मालकीपणा सोडून दिला तर निर्दोष व्हाल. हा देह माझा नाही, ही वाणी माझी नाही, तर तुम्ही निर्दोष होऊ शकाल. पण आत्ता तर तुम्ही त्याचे मालक आहातच ना? टाईटल (मालकी) सुद्धा आहे ना? मी तर टाईटल कधीचेच फाडून टाकले आहे! सव्वीस वर्षांपासून एक सेकंद पण ह्या देहाचा मी मालक झालो नाही, ह्या वाणीचा मालक झालो नाही, मनाचा मालक झालो नाही.
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
गरुड येताच, साप पळतात शास्त्रकारांनी एक उदाहरण दिले आहे की भाऊ, या चंदनाच्या जंगलात केवळ साप आणि सापच असतात. गारव्यासाठी ते चंदनाच्या झाडांना गुंडाळून बसलेले असतात. जंगलात चंदनाच्या झाडांना गुंडाळून बसतात पण एक गरुड आला की नुसती पळापळ होते. तसेच मी हे गरुड बसवले आहे, तेव्हा आता हे सर्व दोष पळतील. शुद्धात्मारुपी गरुड बसले आहे म्हणून सर्व दोष पळून जातील. आणि 'दादा भगवान' शिरी आहेत मग त्याला कसली भिती! माझ्या शिरी 'दादा भगवान' आहेत म्हणून तर 'मला' एवढी हिंमत आहे, मग काय तुम्हाला हिंमत येणार नाही? प्रश्नकर्ता : हिंमत तर पुरेपूर येते !
निष्पक्षपाती दृष्टी दादाश्री : 'स्वरुपज्ञाना' शिवाय तर चुका दिसत नाहीत. कारण 'मीच चंदुभाऊ आहे आणि माझ्यात काहीच दोष नाही, मी तर खूप शहाणा-समंजस आहे,' असेच वाटत राहते आणि 'स्वरुप ज्ञान' प्राप्तीनंतर तुम्ही निष्पक्षपाती झालात, मन-वचन-कायेवर तुम्हाला पक्षपात राहिला नाही. म्हणून तुमच्या चुका तुम्हाला दिसतात. ज्याला स्वतःची चूक सापडेल, ज्याला क्षणोक्षणी स्वत:ची चूक दिसते, जिथे-जिथे चूक होते, तिथे दिसते, आणि नाही होत तिथे नाही दिसत, तो स्वत:च 'परमात्म स्वरुप' होऊन गेला! वीर भगवंत होऊन गेला!! 'हे' ज्ञान प्राप्त केल्यानंतर स्वतः निष्पक्षपाती झाला. कारण की 'मी चंदुभाऊ नाही, मी शुद्धात्मा
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
आहे,' हे समजल्यानंतरच निष्पक्षपाती होता येते. जेव्हा कुणाचा सहजही दोष दिसत नाही, आणि स्वतःचे सर्वच दोष दिसतात तेव्हा स्वतःचे काम पूर्ण झाले असे म्हटले जाते. यापूर्वी तर 'मीच आहे' असेच भान होते. त्यामुळे निष्पक्षपाती झाले नव्हते. आत्ता निष्पक्षपाती झालात म्हणून स्वत:चे सर्वच दोष दिसणे सुरु होते आणि उपयोग आतच वळलेला असतो, त्यामुळे दुसऱ्यांचे दोष दिसत नाहीत! स्वतःचे दोष दिसण्यास सुरुवात झाली म्हणजे ‘हे’ ज्ञान परिणमित होण्यास सुरुवात होते. स्वतःचे दोष दिसण्याची सुरुवात झाली म्हणजे दुसऱ्यांचे दोष दिसत नाहीत. या निर्दोष जगात कोणीच दोषी नाही. मग कोणाला दोष देणार ? दोष हा अहंकाराचा भाग आहे आणि जोपर्यंत हा भाग धुतला जात नाही तोपर्यंत सर्व दोष निघणार नाहीत, आणि तोपर्यंत अहंकाराचे निमूर्लन होणार नाही. अहंकाराचे निमूर्लन होईपर्यंत दोष धुवायचे आहेत.
तसतसा प्रकट होतो आत्मप्रकाश
७१
प्रश्नकर्ता : आत्म्याचा अध्यास झाल्यानंतर चुका आपोआपच कमी होऊ लागतात का ?
दादाश्री : नक्कीच, चुका कमी होणे याचेच नाव आत्म्याचा अध्यास. देहाध्यास जातो तसतसे हे उत्पन्न होते.
आधी समकित होते, पण तरीही सर्व दोष दिसत नाहीत असे समकित होते. त्यानंतर मग जागृती वाढत जाते, तसतसे स्वतः चे दोष दिसू लागतात! स्वतःचे दोष दिसतात त्यास क्षायक समकित म्हटले जाते. असे क्षायक समकित आम्ही इथे लोकांमध्ये मोफत लुटवत असतो. फक्त मोफतच नाही, तर उलट आम्ही म्हणतो की तुम्ही इथे या, चहा सुद्धा पाजतो, तरीही येत नाहीत पाहा ना, आश्चर्यच आहे ना !
या चुका दिसू लागल्या म्हणून आपण सांगावे, 'अहो चंदुभाऊ ! तुम्ही अतिक्रमण केले, म्हणून प्रतिक्रमण करा' जगात कुणालाही स्वत:ची चूक दिसत नाही. ज्याला स्वतःची चूक दिसते, त्यास म्हणतात समकित.
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आत्मा झाला म्हणजे ( स्वतः चा ) दोषच दिसेल ना! दोष दिसला म्हणून आपण आत्मा आहोत, शुद्धात्मा आहोत, नाही तर दोष दिसूच शकत नाही. जेवढे दोष दिसले तेवढा आत्मा प्रकट झाला.
७२
ज्याला
ही तर जागृतीच नाही. एकही व्यक्ती अशी नाही की, जागृती असेल. ह्या भाऊंना जोपर्यंत 'ज्ञान' दिले जात नाही तोपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची जागृती नसते. ज्ञान दिल्यानंतर त्यांच्यात जागृती उत्पन्न होते. नंतर चूक झाली तर जागृती असल्यामुळे चूक दिसते. वर्ल्डमध्ये कोणालाही जागृती नसते, फक्त स्वतः च्या एक-दोन चुका दिसतात. दुसऱ्या चुका दिसत नाहीत. ज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्वच चुका दिसतात, हा जागृतीचाच परिणाम आहे!
गुह्यतम विज्ञान
प्रश्नकर्ता : दादा, समोरच्या व्यक्तीचे दोष का दिसतात ?
दादाश्री : स्वतःच्या चुकीमुळेच समोरील व्यक्ती दोषी दिसत असते. दादांना सर्व निर्दोषच दिसतात, कारण स्वतःच्या सर्वच चुका त्यांनी संपवल्या आहेत. स्वतःचाच अहंकार समोरच्या व्यक्तीच्या चुका दाखवित असतो. ज्याला स्वत:चीच चूक पाहायची आहे त्याला सर्व निर्दोषच दिसतील.
ज्याच्याकडून चूक होते तोच ती चूक संपवेल. समोरच्याच्या चुकीशी आपल्याला काय देणेघेणे ?
प्रश्नकर्ता: दादा, समोरच्या व्यक्तीचे दोष पाहायचे नसतील तरी सुद्धा पाहिले जातात आणि भुतं घेरतात तर काय करावे ?
दादाश्री : हा जो गोंधळ उडवते ती बुद्धी आहे, ती विपरीत बुद्धी आहे आणि खूप जूनी आहे आणि पुन्हा तिला आधार दिला आहे, त्यामुळे ती जात नाही. आपण जर तिला म्हटले की तू माझ्यासाठी हितकारी नाहीस, तर तिच्यापासून सुटू शकतो. हा नोकर असतो ना, त्याला म्हटले
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
की मला तुझे काम नाही आणि परत त्याच्याचकडून आपण काम करवून घेत राहीलो तर चालेल का? त्याचप्रमाणे बुद्धीचा एकदाही वापर करु नये! बुद्धीला अजिबात सहकार्य देऊ नये. विपरीत बुद्धी संसारातील हिताहितचे भान दाखविणारी आहे. जेव्हा सम्यक् बुद्धी ही संसाराला बाजूला सारुन मोक्षाला घेऊन जाणारी आहे.
प्रश्नकर्ता : दोष सुटत नाहीत तर काय करावे?
दादाश्री : दोष सुटत नाहीत पण त्या दोषांना 'आपली वस्तू नाही' असे म्हटले तर सुटतात.
प्रश्नकर्ता : पण असे म्हटल्यावरही सुटत नसतील तर काय करावे?
दादाश्री : जे दोष बर्फासारखे गोठलेले आहेत ते एकदम कसे सुटतील? पण तरीही ते ज्ञेय आणि आपण ज्ञाता असा संबंध ठेवला तर त्यामुळे ते दोष सुटतील. त्यास आपला आधार असता कामा नये. आधार नसल्यावर दोष निघूनच जातील. आधारामुळेच वस्तू टिकून राहते. निराधार झाली की ती पडते. हे जग आधाराने टिकून राहिले आहे. निराधार झाले म्हणजे टिकू शकणारच नाही, पण निराधार करणे जमत नाही ना! तो तर फक्त ज्ञानींचाच खेळ! हे जग अनंत 'गुह्य' आहे, यात 'गुह्यात गुह्य' भागाला कसे समजू शकणार?
दोष असतात थरवाले त्या चुका मग ज्ञेय स्वरुपात दिसतात. जितके ज्ञेय दिसतील तेवढ्यांपासून मुक्त होत जातो. जसे कांद्याला पाकळ्या असतात तसे दोष पण पाकळीवाले असतात. जसजसे दोष दिसू लागतात तसतसे त्यांच्या पाकळ्या (थर) निघू लागतात. आणि जेव्हा सर्व थर निघून जातात तेव्हा ते दोष मुळासकट कायमसाठी निरोप घेतात. कित्येक दोषांचा एकच थर असते. त्यांना दुसरा थर नसतो. म्हणून त्या दोषांना एकदाच पाहिल्याने निघून जातात. जास्त थर असलेल्या दोषांना पुन्हा-पुन्हा पाहावे लागते,
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________
७४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आणि प्रतिक्रमण केल्यानंतर ते निघून जातात. आणि कित्येक दोष तर इतके चिकट असतात की त्यांचे पुन्हा-पुन्हा प्रतिक्रमण करावे लागतात. लोक म्हणतील की तोच दोष पुन्हा-पुन्हा का होत आहे? तेव्हा म्हणे हो भाऊ, पण त्याचे कारण त्यांना समजत नाही. दोष तर पाकळ्यांसारखे आहेत, अनंत आहेत. म्हणून जे दोष दिसतात त्यांचे प्रतिक्रमण केले तर ते धुतले जातात.
प्रश्नकर्ता : एकीकडे आपण म्हणतो की हे ज्ञान क्रियाकारी आहे आणि दुसरीकडे काही चूक झाली तर त्यास निकाली भाव म्हणतो तर ही एडजस्टमेन्ट म्हटली जाणार ना?
दादाश्री : या सर्व निकाली गोष्टीच आहेत. या सर्व गोष्टी निकाली आहेत, म्हणून ग्रहणही करु नये व त्यागही करु नये. त्यागात तिरस्कार होत असतो, द्वेष होत असतो आणि ग्रहण करण्यात राग (अनुराग) होत असतो आणि या सर्व तर निकाली गोष्टी आहेत! __तुमच्यात दोष आहे असे तुम्हाला का दिसते! याचा पुरावा काय? तर म्हणे चंदुभाऊ कोणावर रागावले ते तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही, याचा अर्थ तुम्हाला चंदुभाऊचा दोष दिसला. असे दिवसभर जे आवडत नसतील असे सर्व दोष तुम्हाला आता दिसू लागले.
गुन्हेगारी, पाप-पुण्याची हे जग 'व्यवस्थित' आहे. 'व्यवस्थित शक्ती' आपली जी गुन्हेगारी होती ती पुन्हा आपल्याजवळ पाठवते. तेव्हा तिला येऊ द्यावे आणि आपण आपल्या समभावात राहून तिचा निकाल करावा. मागील जन्मी ज्या-ज्या चुका केल्या त्या सर्व ह्या जन्मात समोर येतात, म्हणून आपण या जन्मात जरी सरळ वागलो तरी त्या चुका आपल्याला नडतात, याचेच नाव गुन्हेगारी!
ही गुन्हेगारी दोन प्रकारची आहे. आम्हाला फुले वाहिली तीही
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७५
गुन्हेगारी आणि आमच्यावर दगड फेकतात ती सुद्धा गुन्हेगारी! फुले वाहतात ती पुण्याची गुन्हेगारी व दगड मारतात ती पापाची गुन्हेगारी आहे. हे कसे आहे? तर पूर्वी ज्या चुका केल्या त्याची कोर्टात केस चालते आणि नंतर न्याय होतो. ज्या ज्या चुका केल्या ते सर्व गुन्हे भोगावे लागतात, त्या चुका भोगाव्याच लागतात. त्या चुकांचा आपण समताभावे निकाल करावा, त्यात मग काहीच बोलायचे नाही. न बोलल्याने काय होईल? तर वेळ आली की ती चूक समोर येते आणि ती भोगून झाल्यावर निघून जाते. उच्च जातींमध्ये बोलल्यामुळेच तर गुंता झालेला आहे ना! म्हणून त्या गुंत्याला सोडवण्यासाठी मौन राहिलात तर समाधान होईल. ___'ज्ञानी पुरुषांनी' गुंता केलेलाच नाही, म्हणून त्यांना आता पुढच्या पुढे वैभव मिळत राहते. आणि तुम्हा सर्वांना आत्ता ह्या जन्मात 'ज्ञानी पुरुष' भेटले आहेत. तेव्हा मागील गुंत्याचा समताभावे निकाल करा आणि पुन्हा नवीन गुंता करु नका, म्हणजे तो गुंता पुन्हा येणार नाही आणि शेवटी समाधान होईल.
तेव्हा आपल्याला चूक संपवावी तर लागेल ना!
प्रश्नकर्ता : हो पण कोणकोणत्या चुका आहेत त्या दिसल्या तर पाहिजेत ना!
दादाश्री : चुका तर हळूहळू दिसू लागतील. मी तुम्हाला सांगत जाईन तसतसे तुम्हाला दिसू लागतील. तुमच्यात चूक पाहण्याची दृष्टी उत्पन्न होईल. तुमची इच्छा झाली की मला आता माझी चूक शोधून काढायची आहे, तर ती सापडल्याशिवाय राहणारच नाही.
आत्ता जो तुमचा उदय आहे ना, त्या उदयात जो दोष आहे तो रिझर्वोयर (सरोवर) चा माल आहे. त्यात नवीन माल येणार नाही आणि जुना माल निघण्याचे चालू आहे. सुरुवातीला खूप जोरात निघेल नंतर दोन-पाच वर्षांनी रिकामा होतो. नंतर हाक मारली तरीही येणार नाही आणि काही वर्षांनंतर तर त्याची काही विशेष अवस्था येईल.
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आणि ती सेफसाइड आम्ही करुन दिली आहे. मात्र एवढे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे की, सेफसाइड केलेल्याची आठवण काढू नये. चांगल्या सवयी आणि वाईट सवयी दोन्हींपासून सेफसाइड नाही का केली आम्ही ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : मग म्हणतो, 'दादा, मला असे का होते?' मी आज रागावलो होतो. अरे, जो रागावला होता, त्याला पाहा ना! त्याला तुम्ही जाणले ना? पूर्वी जाणत नव्हते, पूर्वी तर 'मीच केले' असे म्हणत होते. ते आता वेगळे झाले ना ?
प्रश्नकर्ता : हो.
७६
स्वरुप प्राप्तीनंतर...
दादाश्री : हे सायन्स (विज्ञान) आहे. सायन्स म्हणजे सायन्स. पंचवीस प्रकारचे मोह, चार्जमोह मी पूर्णपणे बंद करुन टाकले पण डिस्चार्ज मोह तर बाकी राहणारच आणि डिस्चार्ज मोह तर महावीर भगवंतांना सुद्धा होता, त्यांच्या सामर्थ्यनुसार. कारण त्यांनी कर्म खपवलेले असतात आणि आपण कर्म खपवलेले नाहीत. ते दहाचे कर्जदार होते आणि आपण लाखाचे कर्जदार आहोत. त्यांनी कर्जाची परतफेड करुन टाकली होती आणि आता तुम्ही सुद्धा परतफेड कराल. बस, आपण कर्जाचा निकाल करण्याकरीताच बसलेलो आहोत, तेव्हा आपण समभावे निकाल करतो ना ? हो, निकालच करायचा आहे.
चांगल्या सवयी आणि वाईट सवयी दोन्हीही भ्रांती आहेत. आणि आपण आता भ्रांतीच्या बाहेर निघालो. जो माल आपला नाही त्याचा संग्रह का करावा ?
आपण दोषांना पाहायचे. दोष किती दिसतात ते आपण जाणायचे. दोषाला दोष पाहा आणि गुणांना गुण पाहा. म्हणजे शुभाला गुण म्हटले
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७७
आणि अशुभाला दोष म्हटले, पण ते आत्मभाषेत तसे नाही. आत्मभाषेत दोष किंवा गुण असे काही नसतेच. ही लोकभाषेची गोष्ट आहे, भ्रांत भाषेची गोष्ट आहे. आत्मभाषेत तर दोष नावाची वस्तूच नाही.
महावीर भगवंतांना कोणी दोषी दिसतच नव्हते. खिसा कापणारा सुद्धा दोषी दिसत नव्हता. ज्याने त्यांच्या कानात खिळे ठोकले, त्याचाही दोष दिसला नव्हता. उलट त्याच्यावर करुणा आली की या बिचाऱ्याचे काय होईल! त्याच्यावर जोखीमदारी तर आलीच ना, कारण तो स्वत:चे स्वरुप जाणत नाही. स्वतःचे स्वरुप जाणत असेल आणि त्याने खिळे ठोकले असते तर भगवंतांना त्याच्यावर करुणा आली नसती, कारण तो मग ज्ञानी आहे. पण तो स्वरुप जाणत नव्हता म्हणून तो (खिळे मारणारा) कर्ता झाला. आणि स्वरुप जाणत असता तर तो अकर्ता राहिला असता, मग काही हरकत नव्हती. म्हणून गोष्ट थोडक्यात समजून घ्यायची.
लॉगकट (लांबचा रस्ता) नसतोच. हा शॉर्टकट (छोटा रस्ता) आहे. तुम्हाला आत्म्याची जागृती आली, सुरुवात झाली, हे सर्वात मोठे महत्त्वाचे कार्य झाले. एक क्षण सुद्धा 'मी आत्मा आहे' असे कुणाला लक्ष्य बसत नाही, तेव्हा लक्ष्य बसले ही तर खूप मोठी गोष्ट घडली. त्या दिवशी पापंही धुतली जातात. त्यामुळे मग ते निरंतर तुमच्या लक्षातच राहते, विसर पडत नाही.
आता कर्माचा उदय जर जोरदार असेल तर ते तुम्हाला बैचेन करुन टाकते, थोडी घुसमट होते पण ते तुम्हाला बाधक होत नाही, तुमचा आत्मा निघून गेलेला नाही, पण त्यावेळी आत्म्याचे सुख येणे बंद होते. आणि आमचे सुख येणे कधीच बंद होत नाही, निरंतर असते. उलट सुख उसळत असते. आमच्या, सोबत असणाऱ्याला सुद्धा सुख वाटते. आमच्या जवळ बसलेला असेल त्यालाही सुख वाटते. सुख उफाळत असते. इतके सारे आत्म्याचे सुख आहे, हा देह असून सुद्धा, हे कलियुग असून सुद्धा!
तुम्हाला आता चूक होते ती दिसते का? समजते का सर्व?
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________
७८
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जागृतीमुळे स्वत:चे सर्व दोष, सर्वच दिसते. समोरच्या व्यक्तीचे दोष पाहणे म्हणजे जागृती नाही. असे तर अज्ञानीला खूप होत असते. दुसऱ्याचे दोष अजिबात दिसत नाहीत आणि स्वतःचे दोष पाहण्यात वेळही अपूरा पडतो. त्याचेच नाव जागृती.
म्हणजे झाले ज्ञानी प्रश्नकर्ता : जितके विभाव होतात ते सर्व दोषच म्हटले जातात ना?
दादाश्री : आता विभाव होतच नाही. आता जे दोष दिसतात ना, ते मानसिक दोष दिसतात. मनःपर्यवमुळे मानसिक दोष, बुद्धीचे दोष, अहंकाराचे दोष अर्थात अंत:करणातील सर्व दोष तुम्हाला दिसतात. चंदुभाऊचे (स्वतःचे) दोष तुम्हाला दिसतात की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : चंदुभाऊचे दोष तुम्हाला दिसले म्हणजे तुम्ही झाले ज्ञानी. हे तर तुम्ही मला जेमतेम दहा तासच भेटले असाल.
तुमच्या हातात, ज्या हिऱ्याची किंमत सुद्धा मोजता येणार नाही असा हिरा मी तुमच्या हातात ठेवला आहे. पण तो हिरा बाळाच्या हातात आल्यामुळे त्याची व्हॅल्यू समजतच नाही!
दिसतो धबधबा दोषाचा... क्षणोक्षणी दोष दिसतात ना? प्रश्नकर्ता : क्षणोक्षणी तर नाही, पण थोडे-थोडे दिसतात.
दादाश्री : अजून तर क्षणोक्षणी दिसतील. खूप दोष आहेत, अपार दोष आहेत, पण अजून दिसत नाहीत. स्वतःचे दहा दोषीही कोणाला दिसत नाहीत. दोन-तीन दोष असतील असे बोलतात, कारण दोष दिसू लागले तेव्हापासूनच मोक्षाला जाण्याची सुरुवात होते.
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
७९
दोषांचा धबधबा दिसतो ना! जितके दोष दिसले तितके गेले (संपले). पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढेच दोष उत्पन्न होत राहतील. निरंतर वाहतच राहतील. जोपर्यंत तुम्हाला निर्दोष बनवत नाही तोपर्यंत वाहतच राहतील. पण आता मात्र हलके होता येईल!
__ धबधब्यासारखे दोष दिसतील असे काही करा, त्यात काय जास्त महेनत आहे? तुमचे जे स्वरुप आहे ते स्वरुप आणि चंदुलाल वेगळे. चंदुलालचा खांदा थोपटा! चंदुलाल काही चांगले काम करुन आले असतील त्या दिवशी म्हणावे, 'तुम्ही तर एवढ्या वयात चांगला लाभ करुन घेतला. तुम्ही सुटाल तर आम्हाला सोडाल.' जोपर्यंत तुम्ही चिकटून बसले असाल तोपर्यंत आमची सुटका होणार नाही. म्हणून आपण म्हणावे लवकर काम आटोपून सत्संगातला जा.' 'चंदुभाऊ असे करा, तसे करा,' असे त्यांना प्रोत्साहित करीत राहा. तुम्ही तर वरिष्ठ झालात आणि 'मुलांसाठी एवढी हाय-हाय कशासाठी करता?' असे तुम्ही सांगायला हवे. कोणत्या जन्मात मुले नव्हती? कुत्री, मांजरी, एकही जन्म मुलांशिवाय गेलाच नाही ना? नाहीत ही खरी मुले! ही तर लौकिक वस्तू आहे. हे काय खरे आहे ?
हे सर्व रिलेटिव्ह आहे. ही दुधी ओरडते का, की माझी मुलं किती? शंभर दुधी लागल्या तर शंभरही तुझीच मुले! जशी पाना-पानांना दुधी लागते तसे या लोकांना दिड-दिड वर्षात, दोन-दोन वर्षात एक दुधी लागत राहते!!! दुधीभोपळ्यात सुद्धा जीव आहे आणि यांच्यात सुद्धा जीव आहे. दुधीत एकेन्द्रिय जीव आहे आणि यांच्यात पंचेन्द्रिय जीव आहे, पण जीव तर दोघांमध्येही आहेच ना! जीव तर दोघांमध्ये सारखाच आहे!
म्हणजे स्वत:चे दोष दिसत आहेत ना? चंदुभाऊला सांगायचे सुद्धा की 'चंदुभाऊ, असे कशासाठी करता? आम्ही तुमची सुटका करू इच्छितो, तुमची सुटका होईल तर आमचीही सुटका होईल. चंदुभाऊ शुद्ध होतील तेव्हाच तर आपली सुटका होईल.
म्हणून आपण आत स्वत:लाच सांगायचे की 'चंदुभाऊ, तुमचाच
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दोष आहे, तेव्हाच ही भानगड उभी झाली आणि म्हणून असे लोक तुम्हाला भेटले, त्याशिवाय असे लोक भेटतील का कधी? नाही तर फले वाहतील अशी माणसे भेटतात. पाहा ना, मला फुले वाहणारी माणसे नाही का भेटत? तुम्हाला समजले ना?
__ घरात टोकावे कोणत्या चुकांसाठी?
जीवन सर्व बिघडून गेले आहे, जीवन असे नसावे. जीवन तर प्रेममय असायला हवे. जिथे प्रेम असेल तिथे चुका दाखवायच्या नाही. चूक दाखवायची असेल तर त्या व्यक्तीला नीट समजावून सांगावे. त्याला आपण सांगावे की, 'असे करण्यासारखे' आहे. तेव्हा तो सुद्धा म्हणेल, 'बरे झाले मला सांगितले' तुमचे उपकार मानेल.
'चहात साखर नाही,' असेही म्हणेल. अरे, पिऊन टाक ना चुपचाप. नंतर तिलाही कळणारच आहे ना? तेव्हा उलट ती आपल्याला म्हणेल, 'तुम्ही साखर का मागितली नाही?!' तेव्हा आपण सांगावे, तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा पाठवा.
जीवन जगणे जमत नाही. घरच्या माणसांची चूक पाहायची नसते. पाहतात की नाही आपले लोक?
प्रश्नकर्ता : रोजच पाहतात.
दादाश्री : बापाची, आईची, मुलांची, सर्वांचीच चूक पाहतात. फक्त स्वतःचीच चूक पाहत नाही! किती हुशार! अक्कलवान! असे मूर्ख लोक आहेत हे. पण आता शहाणे व्हा. म्हणजे अतिक्रमण करु नका.
जर कधी एखादा शिंतोडा उडाला की लगेच आपण समजून जावे की, हा डाग पडला म्हणून लगेच धुऊन टाकावा. चूक तर होणार, नाही होणार असे नाही, पण चूक धुऊन स्वच्छ करणे हे आपले काम.
प्रश्नकर्ता : पण डाग दिसेल अशी दृष्टी प्राप्त झाली पाहिजे.
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : ती दृष्टी तर आपल्याला प्राप्त झाली आहे. दुसऱ्यांना प्राप्त झालेली नसते पण आपल्याला तर प्राप्त झाली आहे ना, की ही चूक झाली, आपली चूक लक्षात येते. आपली जागृती अशी आहे की, सगळ्या चुका दाखवते. थोड्या-थोड्या दिसतात, जसजसे आवरण सरकत जाते तसतसे दिसू लागतात.
जेव्हा घरातील सर्व माणसे निर्दोष दिसतात आणि मात्र स्वत:चेच दोष दिसतात तेव्हा खरी प्रतिक्रमणे होतात.
अशी होतात कर्म चोख प्रश्नकर्ता : महात्म्यांची अशी स्टेज (स्थिति) केव्हा येईल की, प्रतिक्रमण करावेच लागणार नाहीत?
दादाश्री : अँटेक करणे विसरेल तेव्हा प्रतिक्रमण करायला विसरेल. प्रश्नकर्ता : जुन्या दोषांचे प्रतिक्रमण कुठपर्यंत करावेत?
दादाश्री : दोष असतील तोपर्यंत. आणि आपल्या दोषामुळे समोरच्या व्यक्तीला दुःख होत असेल तरच म्हणावे, 'चंदुलाल याचे प्रतिक्रमण करा' अन्यथा प्रतिक्रमण करण्याची गरज नाही.
__ प्रश्नकर्ता : ह्या जन्मात असे काही दोष केलेले नसतील, परंतु भुतकाळात, पूर्वीच्या जन्मी असे काही दोष केले असतील की ज्यांचे प्रतिक्रमण करुन त्यातून सुटायचे असेल तर ते प्रतिक्रमण कसे करावे? आणि कुठपर्यंत करावे?
दादाश्री : मागच्या जन्मी झालेले दोष आपल्याला कसे समजणार? जो क्लेम करत असेल त्याचे निवारण होऊ शकते पण कोणी क्लेम करत नसेल तर? म्हणजे जो क्लेम करत असेल त्याचे प्रतिक्रमण करावे. दुसऱ्या कुणाशी काही देणघणे नाही. ज्याची आठवण येत असेल, ज्याच्यासाठी आपले मन बिघडत असेल, त्याचे प्रतिक्रमण
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
करावे, संपूर्ण जग निर्दोषच आहे परंतु निर्दोष दिसत का नाही, याचे कारण काय? तर ते आपल्या ॲटेक करण्याऱ्या स्वभावामुळेच. आपल्याला शिवी देतो तो सुद्धा निर्दोष आहे. मारतो तो सुद्धा निर्दोष आहे, आपले नुकसान करतो तोही निर्दोष आहे. कारण हा सर्व आपलाच हिशोब आहे. आपलाच हिशोब आपल्याला तो परत करत आहे. आणि तो जर आपण पुन्हा त्याला परत केला तर पुन्हा नवीन हिशोब बांधला जातो. म्हणून जे घडले त्यास आपण 'व्यवस्थित' मानले की मग झाले. असे सांगावे की 'घ्या, आत्ता हिशोब पूर्णपणे चूकता झाला.' निर्दोष पाहाल तर मोक्ष होईल. दोषी पाहिले याचा अर्थ तुम्ही आत्मा पाहिलाच नाही. समोरच्या व्यक्तीत जर तुम्ही आत्मा पाहिला तर तो दोषी नाही.
८२
पाहा समोरच्याला पण अकर्ता
तुम्ही काही सांगितले, तेव्हा त्याला दोष दिसला, तर त्यात काय फायदा होतो ?
प्रश्नकर्ता : फायदा कसला ? नुकसानच होते ना !
दादाश्री : तो कोणत्या ज्ञानाच्या आधारावर दोष पाहतो ?
प्रश्नकर्ता : यात ज्ञान कसे असणार? तो तर अज्ञानतेमुळे दोष पाहतो ना ?
दादाश्री : हो, पण त्याने ज्ञान घेतलेले असेल तरी सुद्धा दोष पाहतो तेव्हा? तो स्वतःचे ज्ञानच कच्चे करीत आहे. स्वतः कर्ता नाही आणि समोरच्याला कर्ता रुपात पाहतो, म्हणजे तो स्वतःच कर्ता झाल्यासमान आहे. समोरच्याला थोड्या अंशाने जरी कर्ता पाहिले म्हणजे तो ज्ञानात कच्चा (कमी) पडला असे आपले ज्ञान सांगते. मग प्रकृती जरी भांडत असेल तरी सुद्धा कर्ता पाहू नये. प्रकृती भांडेल सुद्धा.
प्रश्नकर्ता : कित्येक वेळा तर खूपच भांडते, मग हे काय आहे ?
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : खूपच? अरे, हे तर चांगले म्हणावे, मारामारी करीत नाही, हे चांगलेच म्हणावे. नाही तर प्रकृती तर याहून पुढे जाते, बंदुक घेऊन मागे लागते!
हो, हे असे सर्व घडते, आत जसा माल भरला असेल तसा निघतो. पण कर्ता पाहिले म्हणून आपले ज्ञान कमी पडले. कारण हे सर्व परसत्ताच करत असते, तुमचेही ज्ञान कधी असे कमी पडते का?
प्रश्नकर्ता : हो, बऱ्याचदा पडते.
दादाश्री : प्रकृती भांडते त्यास हरकत नाही, पण 'त्याला' कर्ता पाहू नये. प्रकृती तर स्वतः जसे ड्रॉईंग केले असेल, मागील जन्मी जशी फिल्म उतरवली, त्यानुसार भांडते सुद्धा, मारामारी सुद्धा करते! पण तेव्हा आपण कर्ता पाहू नये.
दिवसभरात कुणाकडूनही काहीही गुन्हा होत नसतो. जेवढे दुसऱ्यांचे दोष दिसतात तेवढी कमतरता अजून आहे आपल्यात! सर्व तुमचाच हिशोब आहे.
ते आहे एकांतिक रुपाने अहंकारी स्वत:चे दोष दिसतात का आता? प्रश्नकर्ता : हो, दिसतात.
दादाश्री : नाही तर स्वतःला स्वत:चा एकही दोष दिसत नाही. अहंकारी मनुष्य स्वतःचा दोष पाहू शकत नाही. फक्त जाणतो खरा की माझ्यात मोठमोठे दोन चार दोष आहेत, पण सर्व दोष पाहू शकत नाही!
__ कुणाकडून काही दोष झाला असेल तर त्यात तीर्थंकर हस्तक्षेप करत नसत. हा हस्तक्षेप केला जातो म्हणजे त्यात तेवढा अहंकार आहे. दोषी बघणारा अहंकार आहे आणि दोष सुद्धा अहंकारच आहे. दोन्हीही अहंकार आहेत!
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : आणि दोष करणारा सुद्धा?
दादाश्री : तो सुद्धा अहंकार आहे आणि दोषी बघणारा सुद्धा अहंकारच आहे.
प्रश्नकर्ता : दोष सुद्धा अहंकार आहे, असे का सांगता तुम्ही?
दादाश्री : अर्थात दोष करणारा, बस. तरी दोष करणारा अहंकारी नसूही शकतो. आपले ज्ञान घेतलेला असेल आणि पाच आज्ञांचे पालन बरोबर करीत असेल, तर त्याच्या दोषाला दोष म्हटले जात नाही. कारण तो 'स्वत:च' स्वत:चे दोष पाहणारा असतो. पण दोष हा भरलेला माल आहे, 'तुमचा' दोष नाही. अर्थात अशी सापेक्षता आहे यात, हे फक्त एकांतिक नाही. पण दोष बघणारा तर अहंकारीच असतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे दादाजी, दोष करणारा हा अहंकारी नसूही शकतो का?
दादाश्री : नसूही शकतो. प्रश्नकर्ता : आणि दोष बघणारा मात्र अहंकारी असतोच.
दादाश्री : असतोच, एकांतिक रुपाने. एकांतिक रुपाने असतोच. या जगात दोष पाहणारा एकांतिक रुपाने अहंकारी असतोच.
___ महत्त्वाचे आहे चुकांचे भान होणे
चूक झाली हे जर लगेच लक्षात येत असेल तर कोणी चूक करणारच नाही ना! पण मग चोवीस तास झाल्यानंतर सुद्धा लक्षात येत नाही.
प्रश्नकर्ता : हे तर जेव्हा दु:ख भोगवे लागते ना, तेव्हा समजते.
दादाश्री : भोगण्याचा परिणाम तर सहा महिन्यानंतर येतो, स्वतःला काही समजतच नाही.
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
प्रश्नकर्ता : पण दादाजी यात तर लगेच लक्षात आले होते की असे काहीतरी होईल. ह्या भाऊने सांगितल्यावर पटकन लक्षात आले की काही तरी गडबड केली.
दादाश्री : नाही, पण स्वत:हून काही समजत नाही. प्रश्नकर्ता : मला हे स्वत:हून समजले होते.
दादाश्री : त्याने सांगितले, त्याने सावध केले म्हणून मागे (वळून) पाहिले. बाकी ‘स्वतःहून' तर काही होतच नाही.
प्रश्नकर्ता : ह्या भाऊने सांगितले आणि लगेच मला स्ट्राईक झाले की, माझ्याकडून ही चूक झाली.
दादाश्री : चूक झाली हे लक्षात येते ना? चूक झाली असे लक्षात आले तेव्हाच सुधारतो ना? लक्षात आले की मग लगेच सुधारतो ना?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : मग बरोबर आहे. चूक तर बाहेर होतच राहणार. ते तुझ्या लक्षात येईल, समजत जाईल. जेव्हा स्वतःची चूक स्वतःहून लक्षात येते तेव्हा मी म्हणेल की हा आहे ज्ञानी! मनुष्य चुका करतच जीवन जगत असतो. चुकांनाच सत्य मानून जीवन जगत असतो. नंतर जेव्हा स्वत:ला काही भोगावे लागते तेव्हा विचार करतो की, हे असे का बरे होते? त्यानंतर लक्षात येते. परंतु जेव्हा भोगल्याशिवायच चूक लक्षात येते तेव्हा समजावे की आता ज्ञान प्रगट झाले आहे ! हे ज्ञान आहे आणि हे अज्ञान आहे असा भेद पडला पाहिजे.
प्रश्नकर्ता : स्वत:ची चूक लक्षात आल्यानंतर चूक होणे थांबते का?
दादाश्री : थांबत नाही त्यास हरकत नाही. लक्षात आले म्हणजे पुष्कळ झाले. चूक होणे थांबेल किंवा थांबणारही नाही तरीही माफच आहे. चूक लक्षात येत नाही त्याला मात्र माफी नाही. चूक होणे थांबत
Page #113
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने.. निर्दोष
नाही त्यास हरकत नाही. बेभानपणाला माफी नाही. बेभानपणामुळे चूक होत असते.
प्रश्नकर्ता : असा बेभानपणा अनेकदा झाला असेल. बऱ्याच ठिकाणी बेभानपणाच राहत असतो, तर तिथे चुका होतच असतील ना?
दादाश्री : होतच असतात. चुका होत असतील नाही, होतच असतात!
प्रश्नकर्ता : तो बेभानपणा सुटेल आणि चूक दिसेल, असे कशाप्रकारे होऊ शकते?
दादाश्री : त्यासाठी तर जागृती आली पाहिजे.
पूर्ण दिवस माफी मागत राहावे. पूर्ण दिवस माफी मागण्याची सवयच करुन घ्यावी. पापच बांधले जातात. उलटे (नकारात्मक, चुकीचे) पाहण्याचीच दृष्टी झाली आहे.
तिथे पुरुषार्थ की कृपा? प्रश्नकर्ता : चूक दिसेल, यासाठी जबरदस्त पुरुषार्थ करावा लागतो?
दादाश्री : पुरुषार्थ नाही, कृपा पाहिजे. पुरुषार्थाने तर इथे जरी कितीही धावपळ केली तरीही काही होणार नाही. यात पुरुषार्थाची गरजच नाही. इथे तर कृपा मिळवावी! म्हणजे काय? तर दादांना राजी ठेवायचे आणि दादा राजी केव्हा होतात? तुम्ही त्यांच्या आज्ञेत राहिले तर. दादा फक्त इतकेच पाहतात की, हा आज्ञेत किती राहतो? फुलांचा हार आणला किंवा दुसरे काही केले, हे दादा पाहत नाहीत. हाराचा तर थोडा लाभ होतो, त्यात संसारी लाभ मिळतो आणि यात सुद्धा थोडा लाभ मिळतो!
सर्व चुका संपवण्यासाठी एक तर यज्ञ (ज्ञानींची आणि महात्म्यांची सेवा करावी, असा यज्ञ) करावा लागेल किंवा मग स्वपुरुषार्थ करावा लागेल. नाही तर अधूनमधून दर्शन करुन गेले तर भक्तीचे फळ मिळेल
Page #114
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
परंतु ज्ञानाचे फळ मिळणार नाही. आपली दृढ इच्छा आहे की ज्ञानींच्या आज्ञेतच राहायचे आहे, तर त्यांच्या कृपेमुळे आज्ञेत राहू शकतो. आज्ञा पालन करतो तेव्हा आज्ञेची मस्ती राहते. आणि ज्ञानाची मस्ती कोणाला राहते की जो दुसऱ्यांना उपदेश देत असेल.
हे विज्ञान तर रोख आहे, त्वरित फळ देणारे आहे. तुम्ही एक तास माझ्या आज्ञेत राहिले तर काय होईल? समाधि वाटेल!
वीतरागभावाने विनम्रता आणि सक्ती प्रश्नकर्ता : सत्संगात फाईलींचा समभावे निकाल करण्याची गोष्ट निघाली होती, परंतु विनम्रता दाखवल्याने चिकट फाईल जास्त त्रास देत असेल, तर मग तिथे विनम्रता दाखवण्याची गरज नाही. उलट तो जास्त वाकडा वागेल.
दादाश्री : अशी काही गरज नसते. पण त्याचे उत्तर शोधता येत नाही, ती लेव्हल काढणे कठीण आहे.
प्रश्नकर्ता : हे कशाप्रकारे लेव्हलमध्ये ठेवावे?
दादाश्री : हे तर प्रत्येक मनुष्य असेच म्हणतो, समोरच्याचीच चूक बघत असतो ना! चूक तर स्वत:चीच आहे, पण त्यांना मी सांगितले की विनम्रता दाखवयाची नाही. त्यांच्याशी वीतराग भावे राहायचे. सक्तीत सुद्धा वीतराग भाव असले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण असे राहणे कठीण आहे ना? असे कसे राहू शकतो?
दादाश्री : उत्तम प्रकारे राहू शकतो. आपला दोष नसेल तर नक्कीच राहू शकतो. आपला दोष असेल तर मात्र राहू शकत नाही. मुळात दोष आपलाच असतो. जो दुसऱ्यांवर दोष लादण्याचा प्रयत्न करत असतो त्याचाच दोष असतो. हे तर स्वत:ची सेफसाईड (सुरक्षितता) शोधत बसतात!
हे दुसरे सर्व तर आपलेच प्रतिबिंब आहे. कोणी आपल्याला काही
Page #115
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बोलू शकत नाही, आपल्याच गुन्हामुळेच समोरचा बोलत असतो. प्रत्येक वेळी तुमचाच गुन्हा असतो पण तो तुमचा गुन्हा तुम्हाला समजत नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा गुन्हा पाहता. दुसऱ्यांचा दोष पाहणे ही सर्वात मोठी अज्ञानता आहे ! आम्ही नेहमीच सांगत असतो की, संपूर्ण जग निर्दोष आहे आणि तरीही तुम्ही दोष काढत राहिले तर मूर्खपणाच म्हटला जाईल ना? तुला नाही का वाटत की ही थियरी वीतरागांची आहे?
प्रश्नकर्ता : एक्जेक्ट वीतरागांची थियरी!
दादाश्री : स्वत:चे दोष पाहणारी माणसे जिंकली, मोक्षाला निघून गेली. आपल्या दोषाशिवाय आपल्याला कोणी काही बोलूच शकत नाही! तेव्हा जागृत राहा.
प्रश्नकर्ता : दादाजी, आपले शब्द लगेच क्रियाकारी होऊन उभे राहतील.
दादाश्री : हे सर्व शब्द क्रियाकारीच असतात, परंतु आपण जर या शब्दांना आत शिरु दिले तर. शिरुच दिले नाही, मग काय होईल?
'ज्ञान' प्राप्तीनंतरची परिस्थिती साप, विंचू, सिंह, वाघ, दुश्मन कोणीही तुम्हाला दोषी दिसले नाही, त्यांचा दोष नाही असे जर दिसले, अशी दृष्टी झाली, म्हणजे तुमचे कल्याण झाले. आणि ती दृष्टी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्हाला या जगात कोणीही दोषी दिसणार नाही.
प्रश्नकर्ता : ही दृष्टी प्राप्त झालीच आहे.
दादाश्री : मग इथेच मोक्ष सुख उपभोगतो. इथे आनंदच राहतो. जोपर्यंत दुसऱ्यांचे दोष दिसतात तोपर्यंतच दुःख राहते. दुसऱ्यांचे दोष दिसणे बंद झाले म्हणजे सुटका झाली.
प्रश्नकर्ता : कधी तरी बायकोवर रागावतो, तर त्यास दोष पाहिले असे म्हटले जाईल का?
Page #116
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : पण 'तुम्हाला' राग येत नाही ना? प्रश्नकर्ता : मला, शुद्धात्म्याला येत नाही.
दादाश्री : हो, पण तेव्हा तर तुम्हाला तुमचा दोष दिसतो. तुम्हाला दोष दिसतो ना?
प्रश्नकर्ता : हो दिसतो.
दादाश्री : अर्थात तुम्हाला तुमचा दोष दिसतो, पण बायकोचा दोष दिसत नाही ना?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : बस, आपल्याला इतर कुणाचाही दोष दिसायला नको. तुमचा दोष, म्हणजे चंदुभाऊचा दोष दिसतो. पण दुसऱ्या कुणाचा दोष दिसायला नको.
प्रश्नकर्ता : पण जेव्हा राग आला तेव्हा तिचा (बायकोचा) दोष दिसला, म्हणून तर राग आला ना?
दादाश्री : नाही, तिचा दोष दिसला म्हणून तुम्ही म्हणता की, चंदुभाऊ दोषी आहेत, पण तुम्हाला बायको दोषी दिसत नाही. तुम्हाला तिचा दोष दिसत नाही, चंदुभाऊचाच दोष दिसतो. अर्थात तुम्ही स्वत:चा दोष बघता की, 'भाऊ, हा तर चंदुभाऊचाच दोष आहे. स्वत:चाच दोष आहे!' समजले ना?
प्रश्नकर्ता : रागावल्यानंतर असे वाटते. दादाश्री : रागावल्यानंतर पण चंदुभाऊच दोषी वाटतो ना तुम्हाला? प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : तेव्हाच गुन्हा म्हटला जाईल ना! असे झाल्यानंतरच गुन्हा म्हटला जातो. समोरील व्यक्तीचा दोष दिसत नाही, स्वत:चा दोष
Page #117
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दिसतो अर्थात चंदुभाऊचा दोष तुम्हाला दिसतो. चंदुभाऊ गुन्हेगार आहे असे तुम्हाला वाटते.
प्रश्नकर्ता : हो, दादाजी असेच वाटते.
दादाश्री : चंदुभाऊला ती (बायको) गुन्हेगार आहे असे वाटते पण तुम्हाला चंदुभाऊ गुन्हेगार आहे असेच वाटते. चंदुभाऊने बायकोचा दोष पाहिला व तिच्यावर रागावले, म्हणून चंदुभाऊ गुन्हेगार आहेत, असे तुम्हाला वाटते.
९०
प्रश्नकर्ता : माझ्या नोकराला मी दोन-तीनदा हाका मारुन उठवले तरी त्याने उत्तर दिले नाही. त्यावेळी तो जागाच होता. म्हणून त्याच्यावर मला खूप क्रोध आला, तर त्याचे काय करावे ?
दादाश्री : क्रोध आल्यानंतर तुम्हाला दोष दिसला का ? प्रश्नकर्ता : दादा, आधी दोष दिसला त्यानंतरच क्रोध येईल ना ? दादाश्री : हो, म्हणजे क्रोध आला पण नंतर वाटले ना की, त्याचा दोष नाही. म्हणजे तुम्हाला तुमची चूक दिसली.
प्रश्नकर्ता : लगेच नाही वाटले.
दादाश्री : जरी नंतर, पण त्याने चूक केली नाही, म्हणजे ती चूक तुम्ही स्वतः केली असे वाटले. त्यानेच चूक केली असती तर स्वत:चा दोष दिसलाच नसता !
प्रश्नकर्ता : पण असे तर रोजच घडते ! राग येतोच.
दादाश्री : त्यासाठी तुम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल. पण कशासाठी प्रतिक्रमण ? पश्चाताप करण्याचे कारण काय ? त्याने असे का केले? तेव्हा म्हणे, त्याने जे काही केले ते तुमच्या कर्माचा उदय आहे. म्हणून तर त्याने ही चूक केली. कोणताही माणूस चूक करतो ते तुमच्या निमित्तानेच करतो. तुमच्याच कर्माचा उदय आहे म्हणून त्याने चूक केली.
Page #118
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
तर तिथे तुम्हाला रागावण्याची गरज नव्हती. तुम्ही याचा पश्चाताप केला पाहिजे. पण आता समजल्याशिवाय असेच पश्चाताप करु शकत नाही. गुन्हा दिसत असेल पण गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय पश्चाताप कसा करु शकेल? ते सिद्ध झाले पाहिजे की अरे, हा तर माझ्याच कर्माचा उदय आहे. म्हणजे अशी समज असली पाहिजे.
आता जर कोणी मला चापट मारली तर मी लगेचच त्याला आशिर्वाद देईन. याचे काय कारण असेल? तो चापट मारतो का? या जगात कुणीही कुणाला चापट मारु शकत नाही. पूर्वी तर मी बक्षिस ठेवले होते. आजपासून तीस वर्षांपूर्वी भारतात मी बक्षिस ठेवले होते की, जो मनुष्य मला मारेल त्याला मी पाचशे रुपये रोख देईन. पण मला कोणीही मारणारा भेटला नाही. कोणी दुःखी असेल तर 'भाऊ, दुःखामुळे तू कुणाजवळ उसने पैसे मागत असशील त्यापेक्षा तू माझ्याकडून हे पाचशे रुपये घेऊन जा ना!' तेव्हा तो म्हणेल, 'नाही रे बाबा. उसने मागितलेले परवडेल पण तुम्हाला चापट मारुन माझी काय अवस्था होईल?
हे जग पूर्णपणे नियमशीर चालते. देव चालवित नाही तरी पण स्ट्रॉग नियमानुसार आहे. देवाच्या हजेरीमुळे हे जग चालते. म्हणून तुमच्याशी कोणी दोष करत असेल (त्रास देत असेल) तर, तो तुमचाच प्रतिध्वनी आहे. जगात कुणाचाही दोष नसतो. मला संपूर्ण जगातील जीवमात्र निर्दोषच दिसतात. हे जे दोषी दिसतात, तीच भ्रांति आहे. आपले विज्ञान असे सांगते की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा दोष दिसतो तो तुमचाच दोष आहे. तुमच्याच दोषाचे रिअॅक्शन (प्रत्याघात) आलेले आहे. आत्माही वीतराग आहे आणि प्रकृती सुद्धा वीतराग आहे. पण तुम्ही जितके दोष बघाल तितके त्याचे रिअॅक्शन येईल.
तेव्हा दोष होतात ते डिस्चार्ज रुपाने... सर्व निर्दोषच आहेत. दोषी दिसतात तोच आपला दोष आहे,
Page #119
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
कोणत्याही जीवाचा मुळीच दोष नाही. असे दिसले तर ते ज्ञान म्हटले जाईल पण तसे दिसत नाही ना?
प्रश्नकर्ता : दोषी पाहायचे नसते तरीही दोषी दिसते त्यास डिस्चार्ज म्हटले जाते ना?
दादाश्री : डिस्चार्ज. डिस्चार्ज टु बी हॅबिच्युएटेड. ज्यात स्वत:ची सत्ता नाही त्यास हॅबिच्युएटेड म्हटले जाते.
प्रश्नकर्ता : दोषी दिसले तर ते डिस्चार्ज कसे म्हटले जाईल?
दादाश्री : दोषी पाहाण्याचा भाव सुटला म्हणून डिस्चार्जच म्हटले जाईल ना! पण त्याने पूर्णपणे आज्ञा पाळली नाही. तो हळूहळू आज्ञा पाळत जाईल, तसतसे शुद्ध होत जाईल. तोपर्यंत त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल.
प्रश्नकर्ता : पण बेसिकली असे फिट झाले आहे की, निर्दोषच आहे पण कधीतरी असे दोषी बघितले जाते.
दादाश्री : म्हणूनच ते 'हॅबिच्युएटेड' आहे, असे म्हटले ना. नसेल करायचे तरीही होऊन जाते.
प्रश्नकर्ता : आमची दृष्टी अजून निर्दोष का होत नाही? दादाश्री : दृष्टी निर्दोषच आहे.
प्रश्नकर्ता : निर्दोषच दिसले पाहिजे, हाच आमचा भाव आहे, पण तरी सुद्धा दुसऱ्यांचे दोष दिसतात.
दादाश्री : दोष दिसतात, तर ज्याला दिसतात त्याला आपण 'पाहत' असतो, बस. आत जसा माल भरला असेल तसाच निघेल ना?
प्रश्नकर्ता : पण त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल ना? दादाश्री : प्रतिक्रमण तर करावेच लागेल! असा माल का भरला?
Page #120
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
श्रद्धेने सुरु, वर्तनाने पूर्ण... अर्थात हे आपले ज्ञान शुद्ध ज्ञान आहे. समज सुद्धा शुद्ध आहे. संपूण जग निर्दोष दिसले पाहिजे. प्रथम श्रद्धेत निर्दोष आले, आता हळूहळू समजमध्ये येईल, ज्ञानात येईल. स्वतः शुद्धात्माच आहे ना! खिसा कापला तरी निर्दोष दिसले पाहिजे.
जे जाणले ते मग पूर्णपणे आपल्या श्रद्धेत येते, त्यानंतर वर्तनात येते. म्हणजे अजून पूर्णपणे श्रद्धेत आलेले नाही. जसजसे श्रद्धेत येत जाईल तसतसे वर्तनात येत जाईल. तो प्रयोग हळूहळू होतो. असे एकदम नाही होऊ शकत! पण ते जाणल्यानंतरच प्रयोगात येईल ना?!
प्रश्नकर्ता : पण हे तर बऱ्याच काळापासून जाणलेच आहे ना?
दादाश्री : नाही. यास जाणले असे नाही म्हटले जात. जाणले तर त्यास म्हणतात की जे वर्तनात येतेच. अर्थात पूर्णपणे जाणलेले नाही. हे तर स्थूल जाणले. जाणण्याचे फळ काय? तर ते लगेचच वर्तनात येते. म्हणजे हे स्थूल जाणले आहे, अजून तर याचे सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम होईल तेव्हा वर्तनात येईल.
सोडू नका कधी 'हा' सत्संग ह्या सत्संगात मार खावा लागला तर मार खाऊन सुद्धा हा सत्संग सोडू नका. मरावे लागले तरी अशा सत्संगात मरावे पण बाहेर मरु नये. कारण ज्या हेतूसाठी मेला, तो हेतू त्याला जॉईंट होत असतो. इथे कोणी मारत नाही ना?
आणि मारले तर निघून जायचे का? हे जग नियमबद्ध चालत आहे. आता यात कुणाचा दोष पाहिला तर काय होईल? खरोखर कुणाचा दोष असेल का?
प्रश्नकर्ता : कुणाचा दोष तर नसेल पण मला असे दिसते.
दादाश्री : असे जे दिसते, ते दर्शन चुकीचे असते. समजा आपण एक वस्तू इथून पाहिली, तो घोडा असेल पण आपल्याला बैलासारखा
Page #121
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दिसतो म्हणून आपण त्याला बैल आहे असे म्हणतो. पण तिथे जवळ जाऊन बघितले तर समजते की तो तर घोडा आहे. तेव्हा आपल्याला हे नाही का कळत की, आपले डोळे कमजोर झाले आहेत! म्हणून दुसऱ्यांदा आपण जे पाहतो ते नक्की तेच आहे असे मानू नये.
प्रश्नकर्ता : दादाजी आपल्या व्हिजन (दृष्टी) ने कुणाचाही दोष नाही, तरी पण मला असे का दिसते?
दादाश्री : तुला जे दिसते त्यात तू ज्ञानाचा उपयोग करत नाही ना! अज्ञानच चालू ठेवतोस. या दादांचा चश्मा घातला तर दोष दिसणार नाही. पण तू नेहमी त्या (अज्ञानाच्या) चश्मानेच पाहत असतो. नाही तर या जगात खरोखर कोणीच दोषी नाही. हा माझा अति सूक्ष्म शोध आहे.
वळवावे, दोष पाहणाऱ्या शक्तीला कुणाचाही दोष पाहू नये. मग तेव्हापासूनच समंजस होत जातो. वास्तवीक कुणाचाही दोष नाही. हा तर बिनकामाचा मॅजिस्ट्रेट बनतो. स्वत:चे दोष पूर्णपणे दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचे दोष पाहण्यास तयार झाला. दोष पाहण्याची शक्ती माणसात आहे, पण ती स्वतःचा दोष पाहण्यासाठी आहे, दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी नाही. त्याचा दुरुपयोग झाल्यामुळे स्वत:चे दोष पाहण्याची शक्ती बंदच झाली आहे. दुसऱ्यांचे दोष पाहण्यासाठी ही शक्ती नाही. तो स्वत:चा दोष बघतच नाही ना? आपण दुसऱ्यांचे दोष बघतो पण ते त्यांना आवडते का?
प्रश्नकर्ता : नाही आवडत. दादाश्री : मग न आवडणारा व्यापार आपण बंद करायला नको का? 'व्यवस्थित शक्ती' कर्ता, तिथे चूक कोणाची?
जागृती ठेवायचीच आहे असा आपला निश्चय असला पाहिजे. चुकांचा प्रश्न नाही. आपल्या इथे चूक होतच नसते. चूक तर 'ज्याची'
Page #122
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
होते, त्याची स्वत:ला जाणीवही होते. की, ही चूक झाली, पण हे 'व्यवस्थित शक्ती' करते, पण स्वतः निमित्त बनला म्हणून त्याचे आलोचना-प्रतिक्रमण - प्रत्याख्यान केले पाहिजे की, 'असे व्हायला नको' त्याशिवाय चालणारच नाही ना ! वस्तूच पूर्ण वेगळी आहे. करत आहे व्यवस्थित शक्ती. म्हणूनच आपल्या इथे कुणाचाही दोष पाहायचा नसतो ना!
९५
ह्या सत्संगात कुणाची चूक पाहण्याची दृष्टीच सोडून द्या. चूक होतच नसते कुणाचीही. हे सर्व 'व्यवस्थित शक्ती' करीत असते. म्हणून चूक पाहणारी दृष्टीच काढून टाकावी. नाही तर आपला आत्मा बिघडेल. प्रश्नकर्ता: चूक पाहणारी दृष्टी राहिली तर चढलेली पायरी खाली उतरतो ना ?
दादाश्री : माणूस संपूनच जातो! सर्व काही 'व्यवस्थित शक्ती' करीत आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर सर्व 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारावर होत असते.
व्रजलेपो भविष्यति...
अन्य क्षेत्रे कृतम् पापम् धर्म क्षेत्रे विनश्यति, धर्म क्षेत्रे कृतम् पापम् वज्रलेपो भविष्यति.
बाहेर काही दोष झाला असेल तर त्या दोषाचा इथे (धर्म स्थानात ) नाश होऊ शकतो पण इथे जर पाप केले तर 'वज्रलेपो भविष्यति.' म्हणून मी म्हटले, की ‘धुऊन टाका. ' तेव्हा म्हणतो की, 'हो, मी चुकलो. आता या पुढे कधीही असे होणार नाही.' मी म्हटले, कुणाचाही दोष पाहू नका, इथे नका पाहू, बाहेर जाऊन पाहा. बाहेर पाहिलेले दोष इथे धुतले जातील परंतु इथे पाहिले तर वज्रलेप होऊन जाईल. सहजही कुणाचा दोष पाहू नये. वाटेल तसे वाईट करत असेल, तरीही दोष पाहू नये आणि जर पाहिला गेला तर आपण धुऊन टाकले पाहिजे, नाही तर ते वज्रलेप होऊन जाईल.
Page #123
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
म्हणून इथे लगेचच धुऊन टाकावे. वाईट विचार आले की लगेचच धुऊन टाकावे. कोणी चांगले केले की वाईट केले, ते पाहण्याची आपल्याला गरज नाही.
हे धर्मस्थान म्हटले जाते. घरी चूक केली असेल तर ती इथे सत्संगात धुतली जाते पण धर्मस्थानात चूक झाली तर ती चूक निकाचीत होते.
प्रश्नकर्ता : दादांजवळ बसलेले असू तरीही निकाचीत होते?
दादाश्री : नाही होत. पण त्याचा जसा लाभ मिळायला हवा तसा मिळत नाही. तर अशा चुका होत असतात. म्हणून तुम्हाला सावध करतो. चूक झाली म्हणून काही ज्ञान निघून जात नाही. सावध केल्यामुळे शुद्ध होते ना?
पाहतो दोष ज्ञानींचे, त्याला... तुला आमचा दोष दिसतो का कधी? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : कधीच नाही? आणि या बिचाऱ्याला पहिल्यांदाच आमचा दोष दिसत आहे. म्हणून आम्ही अनोळखी माणसांना आमच्या संर्पकात जास्त ठेवत नाही, बुद्धी वापरली की दोषच दिसतात माणसाला, मग खाली घसरतो. समज नसलेला तर नर्कात जातो. अरे, ज्ञानी पुरुषाचा, जे साऱ्या संसाराला तारतात, त्यांच्यातही दोष शोधून काढलास! पण हा अनोळखी माणूस, त्याला समज नाही. म्हणून आम्ही जास्त टचमध्ये ठेवत नाही. एक-दोन तासच ठेवतो. फक्त एक नीरुबेन, यांना कधीही दोष दिसले नाहीत, कित्येक वर्षांपासून सोबतच राहतात पण त्यांना एक सुद्धा दोष दिसला नाही! एक क्षणही आमचा दोष दिसला नाही, ते ह्या नीरुबेनला! हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना! तुला तर कधीतरी दिसत असेल, नाही? कधीच नाही?
प्रश्नकर्ता : दादाजी, आपले तर हे विज्ञान आहे, या गोष्टींची तर
Page #124
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
९७
अद्भुतताच आहे! इथे दोष पाहण्याचे काही कारणच नाही, ज्यांना संपूर्ण, अद्भुत ज्ञान दशा वर्तत असते!
दादाश्री : असे आहे, की, तुमचे जैन असतातना ते चांगले. एवढासा छोटा मुलगा असेल तो ही सांगेल की 'दादाजी सांगतात तेच खरे, दुसरे नाही.' सर्व जण असेच मानतात. आणि हे दुसरा सर्व कच्चा माल.
प्रश्नकर्ता : तुम्ही निरंतर अगदी सूक्ष्मतम उपयोगात वर्तत असतात, तिथे तर काही दोष राहतच नाही ना? मग आम्ही आपले दोष कसे पाहू शकतो?
दादाश्री : अशी समज नाही ना, बिलकूल समज नाही.
प्रश्नकर्ता : केवळज्ञान स्वरुपात वर्तत असता मग बाहेरचे वाटेल तसे असो, श्रीमद् राजचंद्रांनी तर इथपर्यंत सांगितले की ज्ञानींना सन्निपात झाला असेल, तरीही त्यांचे दोष पाहू नये.
दादाश्री : पण अशी समज असली पाहिजे ना! समज ही काही सोपी गोष्ट आहे !
प्रश्नकर्ता : उलट हे विचारण्यात, चर्चा करण्यात आम्ही विनय चुकतो, त्या सर्व चुका आम्हाला धुवायला लागतात.
दादाश्री : जिथे पाहायचे नसते तिथेही पाहतात, हेही आश्चर्यच आहे ना! दुसऱ्या ठिकाणी दोष पाहिले तर ते मी मिटवून देतो, पण इथे जर दोष पाहिले तर कोण मिटवू शकेल? मग मिटवणारा कोणी भेटणारच नाही ना! म्हणून मी सावध करतो की अरे, बघ हं, इथे सावध रहा. समज नाही ना बिचाऱ्याला! कोणत्याही प्रकारची समज नाही ना! तेव्हा असे थोडे-फार ज्ञान दिलेले असेल, तर त्या लोकांना जागृती राहते, जर चोख मनाचे असतील तर. आणि त्यांना दुसरी कुठलीच समज नाही की मी हे काय करीत आहे! बुद्धी फसवते, पण ते स्वतःला समजत नाही ना! बुद्धी सर्वांनाच फसवते. जे पाहायचे नसेल तेही दाखवते.
या बाबतीत मी नीरुबेनला पाहिले. त्यांना एक दिवस सुद्धा उलटा
Page #125
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
विचार आला नाही. आम्ही कुणाला मारत असलो ना, तरीसुद्धा नकारात्मक विचार नाही. उलट नीरुबेनला हेच वाटते की दादाजींनी त्याचे काहीतरी हित पाहिले असेल म्हणून मारत असतील!
प्रश्नकर्ता : आणि खरोखर तसेच असते. दादाश्री : पण आता तिथपर्यंत त्यांची बुद्धी कशी पोहोचू शकेल?
प्रश्नकर्ता : इथे तर फक्त करुणा आणि कल्याणाशिवाय दुसरे काहीच नाही.
दादाश्री : हळूहळू त्याचेही सर्व व्यवस्थित होईल.
प्रश्नकर्ता : या ज्ञानात तर जगात सुद्धा कुणाला दोषी पाहायचे नसते मग ज्ञानी पुरुषांचे दोष पाहूच कसे शकतो? जगाला निर्दोष पाहायचे आहे. स्वत:च्या चुकांमुळेच दोष दिसतात.
दादाश्री : हो, पण मनुष्याला असे भानच नाही ना! भान असेल तर असे करणारच नाही ना? जोखीम पत्करणारच नाही ना? खूपच मोठे जोखीम म्हटले जाईल! म्हणून तर त्या भाऊंना सांगितले की, आठ वाजायच्या आधी तुम्ही इथे यायचे नाही. आम्ही चहा पित असू, मग दीड कप पित असू की दोन कप पित असू! तेव्हा त्याची बुद्धी दाखवेल की, एवढे दोन कप पिण्याची काय गरज? एक कप प्यायले असते तर काय चुकीचे होते?
प्रश्नकर्ता : पाहण्यासारखे तर आतील सर्व आहे की चहा पित असताना आपण कशा प्रकारे वीतरागतेमध्ये राहता!
दादाश्री : असे पाहण्याची शक्ती कुठून आणतील? हे तर आपल्या ज्ञानाने आत गारवा (शांती) वाटतो. तेवढेच चांगले आहे ना!
प्रश्नकर्ता : दादाजी आपण तर सांगता ना की, एक क्षण सुद्धा आम्ही आमच्या मोक्षाचा ध्येय कधी विसरत नाही.
Page #126
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
दादाश्री : एक मिनिटही, अरे, एक क्षण सुद्धा विसरत नाही.
प्रश्नकर्ता : आता पूर्णपणे मोक्षमार्गात राहायचे आणि परत हा व्यवहारही सांभाळायचा. एकाही व्यक्तीला दु:खं होऊ नये, त्याचा रोग निघेल, इतके कडक बोलावे लागते, असे सर्व करावे लागते.
दादाश्री : मग दोन लुटारुंची गोष्ट सुद्धा वाचतो. प्रश्नकर्ता : हो, ते पण करायचे आणि मोक्षही चुकवायचा नाही.
दादाश्री : दोन लुटारुंची गोष्टही वाचायची. ते पुस्तक हातात आले तर तेही पूर्ण करायचे. पेपर वाचण्याच्या फाईलचाही निकाल करायचा आणि हे सांगतात की, 'आम्हाला खुप काम आहे!' घ्या, आले मोठे काम करणारे! इथे पाणी ठेवले असेल ते मला आणून देतात, मला प्यायचे नसेल तरीही देतात ! त्यांना वाटते की हे काम केले! मला प्यायचे नसेल तरीही देत राहतात. मी म्हणतो, 'नाही, आता नको.' पण त्यास ते काम समजतात.
आम्ही जे सांगतो ना की 'कर्म बांधली जात नाहीत,' ते तर ऐंशी टक्के पाच आज्ञा पाळत असेल तरच. नाही तर कर्म बांधलेच जातील. आज्ञा पालन केले नाही, तर कर्म बांधलेच जातील. माझ्याजवळ दिवसभर बसून राहिले तरी काही होणार नाही. आणि मला सहा महिन्यांपासून भेटला नसेल परंतु जर आज्ञेचे पालन करीत असेल त्याचे कल्याण होईल. बाकी इथे सर्वांना शांती वाटते, म्हणून सगळे बसूनच राहतात ना! कुत्रा सुद्धा इथून हटत नाही! मारले तरी पुन्हा इथे येऊन बसतो. एकदा आम्ही औरंगाबादला गेलो होतो तेव्हा तिथे एक कुत्रा माझ्यापासून दूर जातच नव्हता.
सरळ व्यक्तीवर ज्ञानी कृपा अपार मोक्षमार्ग हातात आल्यानंतर जितकी धावपळ (पुरुषार्थ) तुमच्याकडून होते तितकी यांच्याकडून होत नाही. हे तर सर्व प्रमादी खाते.
Page #127
--------------------------------------------------------------------------
________________
१००
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आम्हाला उचलून घ्यावे लागते. म्हणजे हे मांजरीच्या पिल्लांसारखे आहेत. मांजरीला तिच्या पिल्लांना स्वतः उचलून फिरावे लागते आणि तुम्ही माकडाच्या पिल्लांसारखे आहात. तुम्ही तर पकडून ठेवता, सोडतच नाही, फार पक्के! डिजाईन म्हणजे डिजाईन! आणि यांना तर आम्हाला उचलून घ्यावे लागते! कारण यांची सरळता पाहून आम्ही खुश होत असतो. आणि खुश होतो म्हणून उचलून फिरतो.
सरळता आहे म्हणून सर्वच (दोष) उघडे करुन टाकतात. सर्व कपाट उघडून टाकतात. घ्या साहेब, बघा आमच्याजवळ हा माल आहे, असे म्हणतात. आणि असरळता म्हणजे एकच कपाट उघडतो. दुसरे कपाट तर सांगितले तरच उघडेल, नाही तर नाही उघडणार. आणि हा (सरळ) तर सांगायच्या अगोदरच सर्व उघडून टाकतो. सरळता म्हणजे काय ते तुम्हाला समजले?!
गुण पाहिल्याने गुण प्रकटतो समोरच्या व्यक्तीचे गुण पाहिले तर गुण उत्पन्न होतील. बस! आपण कुणाला शिव्या दिल्या आणि तो काही बोलला नाही तर आपल्याला कळते की याच्यात किती चांगले गुण आहेत ! मग आपल्यातही ते गुण उत्पन्न होतात. आणि जगात कुणाचाही दोष नाही. हे सर्व स्वत:च्या दोषांमुळेच आहे.
निजकर्म म्हणजे निजदोष हे कर्म-कर्म असे गात राहतात पण कर्म म्हणजे नक्की काय याचे त्यांना भानच नाही. स्वत:चे कर्म म्हणजे निजदोष. आत्मा निर्दोष आहे पण निजदोषांमुळे बांधला गेला आहे. जितके स्वतःचे दोष दिसू लागतात तितकी मुक्ती अनुभवात येते. काही दोषांचे तर लाख लाख थर (आवरण) असतात म्हणून लाख-लाख वेळा पाहिल्याने ते निघू लागतात. दोष तर मन-वचन-कायेत भरलेलेच आहेत. आम्ही स्वतः ज्ञानात पाहिले आहे की जग कशामुळे बांधलेले आहे. निजदोषांनेच बांधलेले आहे. निव्वळ
Page #128
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०१
चुकांचे भांडार आत भरलेले आहे. क्षणोक्षणी दोष दिसतील तेव्हा काम झाले असे म्हटले जाते. हा सर्व माल तुम्ही भरुन आणला आहे, तो (मला) विचारल्या शिवायच ना! शुद्धात्म्याचे लक्ष्य बसले म्हणून चुका दिसतात. तरीही जर चुका दिसत नसतील तर त्यास निव्वळ प्रमादच म्हटले जाईल.
शुद्ध उपयोग, आत्म्याचा आत्म्याचा शुद्ध उपयोग म्हणजे काय? आत्म्याच्या बाबतीतही दुर्लक्ष करु नये. जराशी डुलकी आली तर पतंगाचा दोरा अंगठ्याला गुंडाळून डुलकी घ्यावी. त्याचप्रमाणे आत्म्याच्या बाबतीतही जरा सुद्धा अजागृती ठेवू नये. या मन-वचन-कायेचे दोष तर क्षणोक्षणी दिसले पाहिजेत. या दुषमकाळात तर दोष नसेल अशी कायाच नसते. जेवढे दोष दिसू लागतील तेवढी (ज्ञानाची) किरणे वाढली असे म्हटले जाईल. या काळात हे अक्रम ज्ञान तर आश्चर्यकारक प्राप्त झाले आहे. तुम्हाला फक्त जागृती ठेवून भरलेला माल रिकामा करायचा आहे, सारखे धुत राहायचे आहे.
अनंत चुका आहेत. चुका असल्यामुळे झोप येते. नाही तर झोप कसली? झोप येते त्यास तर शत्रू मानले जाते. प्रमादचर्या म्हणतात! शुभ उपयोगातही प्रमादाला अशुभ उपयोग म्हणतात. ज्ञानी पुरुष तर तासभरच झोपतात. निरंतर जागृत राहतात. आहार कमी झाला असेल, झोप कमी झाली असेल तेव्हा जागृती वाढते. नाही तर प्रमादचर्या असते. जास्त झोप येणे यास प्रमाद म्हणतात. प्रमाद म्हणजे आत्म्यास गाठोड्यात बांधून ठेवण्यासारखे आहे. जेव्हा झोप कमी होते, आहार कमी होतो तेव्हा समजावे की प्रमाद कमी झाला. चूक संपते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लाईट (तेज) येते. वाणी सुंदर निघते, लोक त्याच्या मागे-मागे फिरतात. आपल्यात चुका नाहीत असे मानून बसून राहिला तर चूक दिसणारच कशी? निवांतपणे झोपून राहतो. आपले ऋषिमुनी झोपत नसत, खूप जागृत होते.
Page #129
--------------------------------------------------------------------------
________________
१०२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
चुका, उजेडातील
स्थूल चुका तर समोरासमोर संघर्ष झाल्याने बंद होऊन जातात. पण सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम चुका तर इतक्या असतात की, त्या जसजशा निघत जातात तसतसा त्या मनुष्याचा सुगंध येत जातो. या चुका तर अंधारातील चुका आहेत. त्या स्वतःला दिसत नाहीत. ज्ञानी पुरुष जेव्हा प्रकाश फेकतात तेव्हाच त्या दिसतात. त्यापेक्षा उजेडातील चुका चांगल्या. त्या इलेक्ट्रिसिटीवाल्या असतात म्हणून स्वतःला लगेच दिसतात.
प्रश्नकर्ता : इलेक्ट्रिसिटीवाल्या चुका म्हणजे काय ?
दादाश्री : त्या सर्व उघड्या चुका, आतल्याआत घुसमट करवून निघून जातात. त्यामुळे सतत जागृतीत राहू शकतो. त्या चांगल्या म्हटल्या जातात. परंतु अंधारातील चुका तर कुणाला दिसतच नाहीत. त्यात स्वतःच प्रमादी असतो, स्वतः अपराधी असतो आणि दाखविणाराही कोणी भेटत नाही. इलेक्ट्रिसिटीवाल्या चुकांना कोणी दाखविणारा तरी भेटतो. स्वतःच्या चुका स्वतःला चावतात, अशा चुकांना आम्ही इलेक्ट्रिसिटीवाल्या चुका म्हणतो आणि अंधारातील चुका म्हणजे स्वतःच्या चुका स्वतःला चावत नाहीत. ज्या चूका चावतात त्या लगेच दिसतात पण ज्या चावत नाहीत त्या नजरेआड निघून जातात. अंधारातील चुका आणि अंधारातील गोष्टी, त्यापेक्षा तर कठोर माणसाच्या उजेडातील चुका चांगल्या, मग त्या जरी ढीगभर असोत. जेव्हा नावडती परिस्थिती आली असेल, कोणी दगडाने मारले तेव्हा चुका दिसतात. स्ट्राँग परमाणूवाली चूक असेल तर ती लगेचच दिसते, अशी व्यक्ती खूप कडक असते. तो ज्या बाजूला शिरतो तिथे खोलवर जातो. संसारात शिरला तर संसारात खोलवर जातो. आणि ज्ञानात शिरला तर ज्ञानात खोलवर जातो.
प्रकट होते केवळ ज्ञान, अंतिम दोष गेल्यावर
'माझ्यात चूक नाहीच' असे कधी बोलूच नये. असे बोलूच शकत नाही. ‘केवळ' झाल्यानंतरच चुका राहत नाहीत. भगवान महावीरांना
Page #130
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०३
'केवळज्ञान' प्राप्त झाले तो काळ आणि स्वतःचे दोष दिसणे बंद होण्याचा काळ एकच होता! दोन्हीही समकालीन होते! एकीकडे शेवटचा दोष दिसण्याचे बंद होणे आणि दुसरीकडे केवळज्ञान प्राप्त होणे, असा नियम आहे. जागृती तर निरंतर असली पाहिजे. इथे तर दिवसाही आत्म्याला गोणीत बंद करुन ठेवतात, हे कसे चालेल?! स्वत:च्या दोषांना पाहून ते धूत गेल्याने आपण पुढे जातो, प्रगती होते, नाही तरी शेवटी आज्ञेत राहिल्याने लाभ तर आहेच. त्यामुळे आत्मा जोपासला जातो. जागृतीसाठी सत्संग आणि पुरुषार्थाची गरज आहे. सत्संगात राहण्यासाठी प्रथम आज्ञेत राहिले पाहिजे.
अंधारातील चुका अरे, मनात दिलेल्या शिव्या किंवा अंधारात केलेली कृत्ये भयंकर आहेत! तो असे समजतो की, 'मला कोण पाहणारा आहे आणि हे कुणाला कळणार आहे ?! अरे, ही काही अंधेरनगरी नाही! हा तर भयंकर गुन्हा आहे! या सर्वांना अंधारातील चुकाच त्रास देतात!
'मी जाणतो' ही अंधारातील चूक तर भयंकर मोठी चूक आणि परत 'आता काही हरकत नाही' ही चूक तर मारुनच टाकते. असे तर ज्ञानी पुरुषांशिवाय कुणी बोलूच शकत नाही की, 'माझ्यात एक सुद्धा चूक शिल्लक राहिलेली नाही.' प्रत्येक चुकांना पाहून त्या संपवायच्या आहेत. आपण 'शुद्धात्मा' आणि बाहेरच्या बाबतीत 'मी काहीच जाणत नाही' असे ठेवावे, त्यामुळे मग काही हरकत येत नाही. पण 'मी जाणतो' हा रोग तर शिरायलाच नको. आपण तर 'शुद्धात्मा'. शुद्धात्म्यात एकही दोष नसतो. पण चंदुलालमध्ये जे-जे दोष दिसतील त्यांचा निकाल करावा. अंधारातील चुका आणि अंधारात दाबल्या गेलेल्या चुका दिसत नाहीत. जसजशी जागृती वाढते तसतसे जास्तीत जास्त चुका दिसतात. स्थूल चुका जरी संपल्या तरीही डोळ्यांचे तेज बदलून जाते! अंधारात केलेल्या चुका अंधारात कशा दिसतील? जसजसा चुका निघत जातात, तसतशी वाणीही अशी निघत जाते की, कुणी दोन तास ऐकतच राहिल!
Page #131
--------------------------------------------------------------------------
________________
१०४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादा 'डॉक्टर' दोषांचे चुका पुष्कळच आहेत, असे जर जाणले तर चुका दिसू लागतात आणि दिसल्यावर चूका कमी होऊ लागतात. आम्ही काही सगळ्यांचे दोष पाहत बसत नाही. आमच्याजवळ असा रिकामा वेळही नसतो. ते तर तुमचे खूप पुण्य जमा होते तेव्हा तुमचे दोष दाखवतो. या दोषांमुळे
आत मोठा रोग उत्पन्न होतो. जेव्हा तुमचे पुण्य उदयास येते तेव्हा आम्ही सिद्धीबळाचा वापर करुन त्या व्यक्तीचे ऑपरेशन करुन त्या रोगाला बाहेर काढतो. डॉक्टर ऑपरेशन करतात, त्याहीपेक्षा लाख पटीने जास्त मेहनत आमच्या ऑपरेशनमध्ये असते!
दोष मिटवण्याचे कॉलेज हसत-खेळत दोष मिटवण्याचे हे कॉलेजच आहे! नाही तर रागद्वेषाशिवाय दोष जातच नाहीत. हे कॉलेज हसत-खेळत चालत आहे. हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना! अक्रम विज्ञानाचे हे आश्चर्यच आहे ना!
प्रश्नकर्ता : आपले शब्द असे निघतात की, ज्यामुळे ते दोष तिथून निघू लागतात. इथून शब्द असे निघतात की ते दोष तिथे गळून पडतात.
दादाश्री : गळून पडतात ना? बरोबर आहे.
आता तुम्हाला तुमचा दोष दिसत आहे हे कसे समजेल? तर म्हणे, चंदुभाऊ रागावतो ते तुम्हाला आवडत नाही. म्हणजे हे तुम्ही जाणले की, चंदुभाऊमध्ये हा दोष आहे. पकडला गेला तो दोष. तो दोष तुम्ही पाहिला. चंदुभाऊत जे दोष होते ते तुम्ही पाहिलेत. 'दिठा नही निजदोष तो तरीए कोण उपाय?' (अर्थात पाहिले नाही स्वतःचे दोष तर कोणत्या उपायाने तरणार?) निजदोष पाहण्याची दृष्टी उत्पन्न झाली म्हणजे परमात्मा होण्याची तयारी झाली असे म्हटले आहे आणि निजदोष कुणालाही दिसत नाहीत. अहंकार आहे तोपर्यंत प्रत्येक अणूत दोष आहे. भ्रांती जाते तेव्हा समजते की, अहोहो! चंदुभाऊ क्रोध करतो ते आपल्याला
Page #132
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
आवडत नाही. ‘चंदुभाऊ असे करतो, ' हा चंदुभाऊचा दोष पकडला गेला. पकडले जातात की नाही सर्व दोष ?
१०५
प्रश्नकर्ता : पकडले जातात. पण दादा, तुमचे वाक्य मला आवडले होते. दोष दिसला आणि गेला. दिसला म्हणजे गेला.
दादाश्री : दोष दिसला म्हणजे गेला. म्हणूनच शास्त्रकारांनी सांगितले, महावीर भगवंतांनी सांगितले की, दोषाला पाहा. दोषातच एकाग्रता झाल्यामुळे दोषास पाहिले नाही, आंधळा बनून राहिलास म्हणून दोष तुला चिकटला. तर आता त्या दोषाला तू पाहिलेस तर तो निघून जाईल. तो काय दावा मांडतो ? हे पुद्गल आपल्याला सांगते की, 'तुम्ही तर शुद्धात्मा झालात पण मग माझे काय ?' तेव्हा आपण म्हणतो की,
4
'आता मला तुझ्याशी काय देणेघेणे ?' तेव्हा म्हणे, 'नाही, असे चालणार नाही. हे तुम्हीच बिघडवले होते, म्हणून जसे होते तसे पूर्ववत करुन द्या. नाही तर तुमची सुटका होणार नाही.' मग सुटका कशी होईल ? तेव्हा म्हणे तुम्ही अज्ञानतेने पाहिले त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत बांधले गेलो आणि आत्ता ज्ञानाने पाहाल तर आम्ही सुटून जाऊ. म्हणून ज्ञानापूर्वक त्या दोषाला पाहिल्याशिवाय तो दोष जात नाही. अज्ञानाने बांधलेले ज्ञानद्वारे सुटते. म्हणून आपण पाहिले. ज्ञान म्हणजे पाहणे, पाहिले की सुटले. मग वाटेल तसा दोष असो पण तरीही हे अक्रम विज्ञान आहे... क्रमिकमार्ग समजदारीपूर्वकचा मार्ग असतो. त्यात सर्व सोडत - सोडत आलेला असतो आणि इथे अक्रममार्गात सोडत सोडत आलेला नसतो. म्हणून कुणाला दुःख होईल असे बोलले गेले तर चंदुभाऊला सांगावे की, 'प्रतिक्रमण करा, असे का करता ?'
प्रश्नकर्ता: शूट ॲट साईट, लगेच.
दादाश्री : हो, पूर्ण दिवस नाही, पण जेव्हा आपल्याला असे वाटत असेल की हा दोष झाला, समोरच्या व्यक्तीला दुःख होईल असे आपण बोललो त्याचे प्रतिक्रमण करायचे. आणि आपले महात्मा तसे करतात
Page #133
--------------------------------------------------------------------------
________________
१०६
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
सुद्धा. शुद्धात्म्याने प्रतिक्रमण कशाला करायचे? जो अतिक्रमण करीतच नाही त्याने कशाला प्रतिक्रमण का करायचे? हे तर ज्याने केले त्यालाच सांगायचे, तुम्ही करा. संपूर्ण सिद्धांत लक्षात ठेवावा लागेल. आणि तो लक्षात राहतो सुद्धा. लिहिले तर विसरायला होते. संपूर्ण सिद्धांत लक्षात राहतो ना? हो.. ते वयामुळे सत्संगात थोडे कमी येतात पण तरी त्यांना सर्व तोंडपाठ, सर्व लक्षात राहते. आपल्याला तर कामाशी काम आहे ना? आपल्याला तर सुटण्याशीच काम.
प्रश्नकर्ता : मला तर तुमची एक गोष्ट खूप आवडली होती. तुम्ही तिथे औरंगाबादला बोलला होतात.
दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : की माझे प्रतिक्रमण दोष होण्यापूर्वीच होऊन जातात. दोष होण्यापूर्वीच तुमचे प्रतिक्रमण पोहोचतात.
दादाश्री : हो, हे प्रतिक्रमण शुट ऑन साईट. दोष होण्यापूर्वी आपोआप चालू होऊन जातात. आपल्याला समजत सुद्धा नाही की हे कसे सुरु झाले?! कारण हे जागृतीचे फळ आहे.
आवरण तुटल्याने दोष दिसतात चुका दिसत नव्हत्या. आत्मा प्रकट झाला नव्हता म्हणून चुका दिसत नव्हत्या. आणि आता तर इतक्या साऱ्या चुका दिसतात, त्याचे कारण काय? तर आत्मा प्रकट झाला आहे.
प्रश्नकर्ता : सुरूवातीला जेव्हा आम्हाला चुका दिसत नव्हत्या, तेव्हा काय आमचा आत्मा प्रकट झाला नव्हता?
दादाश्री : प्रकट तर झाला होता पण हळूहळू चुका दिसतील असे मी करत होतो, आवरण तोडत होतो.
जितके दोष उत्पन्न होतात तितके दोष दिसल्याशिवाय राहत नाही,
Page #134
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
दिसल्याशिवाय गेले तर ते अक्रम विज्ञानच नाही. असे हे विज्ञान आहे. विज्ञानच आहे हे!
१०७
दोष प्रतिक्रमणाने धुतले जातात. कुणाच्या संघर्षात आले की मग दोष दिसू लागतात, आणि संघर्षात येत नाही तेव्हा दोष झाकलेला राहतो. रोजचे पाचशे-पाचशे दोष दिसू लागले तर समजावे की पुर्णाहूती जवळ येत आहे.
प्रश्नकर्ता : पण दादा, हे ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला अशी जागृती येते की स्वतःचे दोष दिसतात, खूप सारे पापही दिसतात आणि त्यामुळे मग भीती वाटते.
दादाश्री : त्याची भीती बाळगल्याने काय फायदा ? पाहणारा, होळी पाहणारा खरोखर जळतो का कधी ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : होळी जळते पण होळी पाहणारा जळतो का ? आणि हे तर चंदुभाऊला होते, तेव्हा चदुंभाऊची पाठ थोपटावी की भाऊ, असे होणार. केले आहे तर होणारच, असे म्हणावे.
प्रश्नकर्ता : पण लांबून सुद्धा चटका बसतोच ना, दादा !
दादाश्री : हो, चकटा बसतो.
प्रश्नकर्ता : इतकी सारी पापं केली आहेत दादा की असे वाटते केव्हा सुटका होईल!
दादाश्री : हो, ते तर अगणित, अपार दोष केलेले आहेत !
प्रश्नकर्ता : आणि ते जेव्हा दिसतात तेव्हा असे वाटते की, जर दादाजी भेटले नसते तर आमचे काय झाले असते !
दादाश्री : स्वत:ची पापं दिसू लागतात तेव्हापासूनच हे समजून
Page #135
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
जा की आता आपली डिग्री वाढली ! या जगात कोणाही स्वतःचे पाप पाहू शकत नाही. स्वतःचे दोष पाहू शकत नाही. (स्वतःचे) दोष पाहिले तर भगवंत होतो.
१०८
प्रश्नकर्ता : बायकोचे किंवा कुणाचेही दोष दिसणार नाहीत असे काही करा, दादा.
दादाश्री : नाही, दोष तर दिसणारच. ते दिसतात म्हणून तर आत्मा ज्ञाता आहे आणि दोष ज्ञेय आहेत.
प्रश्नकर्ता : पण दोष दिसणारच नाहीत असे होऊ शकत नाही ? दादाश्री : नाही, दोष नाही दिसले तर आत्मा निघून जाईल. आत्मा आहे म्हणूनच दोष दिसतात, पण ते दोष नाहीत, ज्ञेय आहेत.
वीतरागांची निर्दोष दृष्टी
वीतरागांची कशी दृष्टी! कोणत्या दृष्टीने त्यांनी पाहिले की ज्यामुळे त्यांना जग निर्दोष दिसले ? अहो साहेब ! आपण वीतरागांना विचारले की साहेब, तुम्ही तर कसे, कोणत्या डोळ्याने पाहिले की ज्यामुळे हे जग तुम्हाला निर्दोष दिसले ? तेव्हा ते म्हणतात की, 'ते ज्ञानींना विचारा. आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी येणार नाही.' डिटेलमध्ये सविस्तरपणे ज्ञानींना विचारा. म्हणजे मी जे पाहिले ते त्यांनी तर पाहिले पण मी सुद्धा पाहिले !
प्रश्नकर्ता : म्हणजे दादा, निर्दोष जाणावे, निर्दोष मानू नये असे ? आणि दोषी जाणावे असे ?
दादाश्री : आपल्या ज्ञानात दोषी नाही, निर्दोषच जाणावे. दोषी कोणीच नसतो. भ्रांत दृष्टीने दोषी आहे. भ्रांत दृष्टी दोन भाग पाडते. हा दोषी आहे आणि हा निर्दोष आहे. हा पापी आहे आणि हा पुण्यवान आहे. आणि या दृष्टीने एकच आहे की निर्दोषच आहे. आणि तिथे मग टाळाच लावून टाकला. बुद्धीला बोलण्याचा स्कोपच (संधी) राहिला नाही. बुद्धीला
Page #136
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०९
हस्तक्षेप करण्याचा स्कोपच राहिला नाही. म्हणून बुद्धीबाई तिथून मागे फिरते की, 'इथे आता आपले चालत नाही. तेव्हा घरी चला.' ती काय कुमारी थोडीच आहे ? विवाहीत होती म्हणून तर सासरी जाते. बुद्धीबाई आपल्या सासरी निघून जाते.
दोषित दृष्टीला पण तू 'जाण' प्रश्नकर्ता : म्हणजे दादा, दोषी पण मानू नये, निर्दोष पण मानू नये, निर्दोष जाणावे.
दादाश्री : जाणायचे सर्वच, पण दोषी जाणू नये. दोषी जाणतो ती तर आपली दृष्टी बिघडली आहे म्हणून आणि त्या दोषीसोबत 'चंदुभाऊ' जे काही करीत आहेत ते 'आपण' पाहत राहावे. 'चंदुभाऊला' 'आपण' अडवायचे नाही.
प्रश्नकर्ता : तो काय करतो हे आपण पाहत राहायचे.
दादाश्री : बस, पाहत राहा. कारण त्या दोषी बरोबर हा दोषी डोकेफोड करीत आहे. पण हा 'चंदुभाऊ' सुद्धा निर्दोष आहे आणि ती समोरची व्यक्ती सुद्धा निर्दोषच आहे. दोघे भांडतात पण दोघेही निर्दोषच आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे चंदुभाऊ दोषी असेल तरीही त्याला दोषी मानू नये. पण त्याला दोषी जाणावे खरे?
दादाश्री : हो जाणावे. जाणले तर पाहिजेच ना? प्रश्नकर्ता : आणि सूक्ष्म दृष्टीने तो निर्दोषच आहे.
दादाश्री : सूक्ष्म दृष्टीने तो निर्दोषच आहे, पण चंदुभाऊचे जे काही करायचे असेल ते तुम्ही करा. परंतु जगाच्या संबंधामध्ये निर्दोष मानायचे असे मी सांगतोय. तुम्हाला चंदुभाऊला टोकावे लागते की, 'तुम्ही असे वागाल तर चालणार नाही.' त्याला शुद्ध फूड द्यायचे. अशुद्ध फूडने ही दशा झाली आहे तेव्हा आता शुद्ध फूड देऊन समाधान आणण्याची गरज आहे.
Page #137
--------------------------------------------------------------------------
________________
११०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : त्याने काही उलट-सुलट केले तर प्रतिक्रमण करण्यास सांगावे लागेल का?
दादाश्री : हो, ते सर्व सांगावे लागेल. 'तुम्ही नालायक आहात' असे सांगा. हो, असे सुद्धा सांगू शकता. पण फक्त चंदुभाऊसाठीच दुसऱ्यांसाठी नाही. कारण ती तुमची फाईल नंबर वन, तुमची स्वतःची, दुसऱ्यांसाठी हे नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे फाईल नंबर वन (स्वतः) दोषी असेल तर त्याला दोषी मानावे, त्याला रागवावे.
दादाश्री : सर्व प्रकारे रागवावे, त्याच्यावर प्रिज्युडीस (पूर्वग्रह) सुद्धा ठेवावा की 'तू असाच आहे, मी जाणतो तुला'. त्याला रागवावे सुद्धा, कारण आता निकालच करायचा आहे
करायचे नाही, मात्र पाहायचे प्रश्नकर्ता : पण दुसरी कोणी व्यक्ती असेल, फाईल नंबर दहा, तर त्याला दोषी पाहायचे नाही. तो निर्दोष आहे असे?
दादाश्री : निर्दोष! अरे, आपली फाईल नंबर दोन (पत्नी) सुद्धा निर्दोष आहे! कारण आपला गुन्हा काय होता? तर सगळ्यांना दोषी पाहिले पण या चंदुभाऊचा (स्वतःचा) दोष पाहिला नाही. त्या गुन्ह्याचे हे रिअॅक्शन आले आहे. अर्थात गुन्हेगार पकडला गेला. दुसरे कोणी गुन्हेगार नाहीच.
प्रश्नकर्ता : म्हणजे उलट पाहिले गेले.
दादाश्री : आजवर उलटच पाहिले. आत्ता सुलट पाहिले. ही गोष्ट समजूनच घ्यायची आहे. करायचे काहीच नाही. वीतरागांनी सांगितलेले फक्त समजून घ्यायचे त्यात करायचे काहीच नसते. असे समंजस होते वीतराग! जर करायचे असते तर मनुष्य बिचारा थकून गेला असता!
Page #138
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१११
प्रश्नकर्ता : आणि केले तर पुन्हा बंधन होईल ना?
दादाश्री : हो, करणे हेच बंधन! काही पण करणे हेच बंधन. जप केला तर 'मी केले' म्हणून बंधन. पण ते सगळ्यांसाठी नाही. बाहेरच्यांना मी सांगेल की जप करा. कारण त्यांच्याकडे तो त्यांचा व्यापार आहे. दोघांचे व्यापार वेगळे आहेत.
प्रश्नकर्ता : स्वत:ची प्रकृती दिसू लागली आहे, सर्वच दिसते, मन-बुद्धी-चित्त-अहंकार सर्व दिसते पण त्याचा स्टडी (अभ्यास) कसा करावा? त्याच्या समोर ज्ञानाचा उपयोग कसा करावा? कशी जागृती राहिली पाहिजे.
दादाश्री : प्रकृती तर आपल्याला समजतेच. आपल्याला कळते की ही प्रकृती अशीच आहे आणि कमी समजले असेल तरी दिवसेंदिवस समज वाढत जाते! पण शेवटी पूर्णपणे समजमध्ये येते. म्हणून आपल्याला फक्त काय करायचे आहे की, हे चंदुभाऊ काय करीत आहेत ते पाहात राहण्याची गरज आहे, तोच शुद्ध उपयोग आहे.
प्रश्नकर्ता : स्वत:च्या प्रकृतीला पाहायचे असते, ते पाहिले जात नाही आणि पुन्हा चुकत जातो तर यात कोणती वस्तू काम करते?
दादाश्री : आवरण. ते आवरण तर तोडावे लागते. प्रश्नकर्ता : ते कशा प्रकारे तुटते?
दादाश्री : आपल्या येथील विधींमुळे दिवसेंदिवस आवरणं तुटत जातात, तसतसे दिसू लागते. हे सारे आवरणमयच होते, काहीच दिसत नव्हते, ते हळूहळू दिसू लागले आहे. ती आवरणे सर्व दोष पाहू देत नाहीत. आताच सर्व दोष दिसतील असे नाही. किती दिसतात? दहा-पंधरा दिसतात का?
प्रश्नकर्ता : बरेच दोष दिसतात. दादाश्री : शंभर-शंभर?
Page #139
--------------------------------------------------------------------------
________________
११२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : साखळी चालत राहते.
दादाश्री : तरीही पूर्ण दिसत नाही. आवरणं असतात ना, त्यामुळे. पुष्कळ दोष असतात. विधी करतेवेळीही आमचे सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष होत राहतात, जे दुसऱ्यांना नुकसान करणारे नसतात, पण ते दोष आमच्याकडून होतात हे आमच्या लक्षात येते. आम्हाला ते त्वरित स्वच्छ करावे लागतात. त्याशिवाय तर चालणारच नाही ना ! दिसतात तेवढे तर स्वच्छ करावेच लागतात.
गहू स्वत:चेच निवडा ना
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांची प्रकृती पाहण्याची सवयच नसेल तर त्यास काय म्हणतात ?
दादाश्री : दुसऱ्यांची प्रकृती पाहिली तरी त्यांचे दोष मात्र पाहायचे नाही. आपण समजून घ्यावे की 'हा दोष आहे' पण दोष पाहू नये. ते स्वत:चे दोष पाहण्यास शिकले आहेत, मग आपल्याला पाहण्याची काय गरज ?
प्रश्नकर्ता : नाही, पण ते आपले दोष बघत असतील तर आपण काय करावे ?
दादाश्री : ते आपले दोष बघतात आणि पुन्हा आपण त्यांचे दोष बघितले तर हे दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यापेक्षा जर आपण बंद केले तर त्यांना कधीतरी विचार येईल की, ' हे काही थकत नाहीत. मला एकट्यालाच थकवत राहतात.' मग तेही थकून बंद होतील. दुसऱ्यांचा दोष बघणे हे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. स्वतःच्या दोषांचा काही ठिकाणा नाही आणि दुसऱ्यांचे दोष बघत राहतात. अरे भाऊ! तू तुझे गहू निवड ना ! दुसऱ्यांचे गहू निवडतो आणि तुझ्या घरी न निवडताच दळत राहतोस! काय हे?
प्रश्नकर्ता : पण असे असते दादा, की आमचे गहू तर निवडलेले
Page #140
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
११३
असतात, पण आम्ही निवडत असू आणि ज्यांच्याशी व्यवहार असेल, ते आमच्या निवडलेल्या गव्हात बिन निवडलेले गहू टाकत असतील तेव्हा आम्हाला त्यांना सांगावे लागते की, 'बाबा, असे करु नका.'
दादाश्री : कोणी बिन निवडलेले गहू केव्हा टाकेल की जेव्हा आपले गहू सुद्धा बिन निवडलेले असतील ना, तेव्हाच टाकेल. आपले निवडलेले असतील तर नाही टाकणार. असा नियम आहे.
हे तर इंद्रियगम्य ज्ञान प्रश्नकर्ता : नाही, पण दादा आपण एखाद्या वस्तूचा समभावे निकाल करत असतो, की 'भाऊ ही वस्तू चांगली नाही.' ह्या वस्तूमुळे क्लेश होत आहे. ह्या वस्तूमळे व्यवहार बिघडत आहे. पण समोरचा मनुष्य समभावे निकाल करण्याऐवजी असे म्हणेल की, 'मी तर असेच करणार. तुला जे करायचे असेल ते कर' मग तिथे व्यवहार कसा करावा?
दादाश्री : असे आहे ना, हे सर्व बुद्धीचे चाळे आहेत. जो परिणाम बदलत नाही, तिथे पाहत राहावे की याचा कसा परिणाम होत आहे ! म्हणजे समोरच्याची प्रकृती पाहत राहावी. आता हे चाळे कोण करत असते?
प्रश्नकर्ता : पुद्गल?
दादाश्री : बुद्धी करत आहे. नाही तर जे परिणाम आहेत त्यांना आपण पाहत राहायचे. पाहिले म्हणजे आपण आत्मा झालो. आणि जर दोषांना पाहाल तर प्रकृती स्वरुप होऊन जाल.
प्रश्नकर्ता : दादा, लोक तर असे सांगतात की, 'आम्ही तर तुमच्या प्रकृतीची चूक काढत आहोत आणि आम्ही त्याला (चूक काढणाऱ्याला) पाहत असतो की हा तुमची चूक काढत आहे.
दादाश्री : नाही, चूक काढणारा पाहू शकत नाही आणि पाहणारा चूक काढत नाही. काही नियम तर असतातच ना?!
Page #141
--------------------------------------------------------------------------
________________
११४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : म्हणजे तुम्ही चूक काढून असे म्हणता की, 'आम्ही पाहत आहोत, आम्ही चूक काढत आहोत,' याचा अर्थ....
दादाश्री : कोणताही चूक काढणारा असे पाहू शकत नाही, आणि पाहणारा असेल तर तो चूक काढू शकत नाही. म्हणजे त्या पाहण्यात आणि ह्या पाहण्यात फरक आहे. तो इंद्रियगम्य पाहणारा आहे आणि हा अतिंद्रिय म्हणजे ज्ञानगम्य पाहणारा आहे. म्हणून त्या इंद्रियगम्यला 'पाहिले' असे म्हणता येणार नाही.
प्रश्नकर्ता : जर कुणाचीही चूक काढली, याचा अर्थ....
दादाश्री : कुणाचीही चूक काढणे तो तर सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण हे जग निर्दोष आहे.
आणि हे ज्ञानगम्य म्हटले जाते प्रश्नकर्ता : पण दादा, आम्ही हे डिस्चार्ज रुपात पाहत असतो की, हे पाहा, चंदुभाऊ कुणाची चूक काढत आहे, ते पाहत असतो, मग हे काय आहे?
दादाश्री : चूक काढताना चंदुभाऊ जे पाहतात ते बुद्धीगम्य आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे हा चंदुभाऊ चंदुभाऊला पाहतो ते बुद्धीगम्यच आहे?
दादाश्री : हो, ते बुद्धीगम्य आहे. आणि ज्ञानगम्य केव्हा म्हटले जाईल की कुणाची चूक काढत नाही आणि पाहतो तेव्हा ज्ञानगम्य म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : हो, पण दादा, दैनंदिन व्यवहारात एखाद्यावेळी सांगावे तर लागते ना, की ही गोष्ट बरोबर नाही.
दादाश्री : 'सांगावे लागते' असा काही नियम नाही. पण सांगितले जाते अशी निर्बळता साहजिकपणे असतेच माणसात. आम्ही सुद्धा, आमच्यासोबत राहणाऱ्यांना सांगत असतो 'परत अशी चूक का केली?'
Page #142
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
असे सांगतो. पण ते सांगितले जाते. समजलं ? अशी निर्बळता सर्वांमध्ये असतेच. परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की 'ही आपली चूक झाली, असे व्हायला नको.
११५
त्याला स्वतःला असे वाटले पाहिजे की, हे चुकीचे आहे. तेव्हाच चुका काढण्याची सवय हळूहळू, डिस्चार्ज होत-होत संपून जाईल. हे सर्व डिस्चार्जच होत आहे.
स्वतःच्या चुकांना स्वतःच रागवतो
एकेक अडचणी येतात ना, तेव्हा अगोदर सहन करण्याची शक्ती येते, त्यानंतर अडचणी येतात. नाही तर मनुष्य तिथल्या तिथे खलास होऊन जाईल. म्हणजे असे सर्व नियम आहेत.
प्रश्नकर्ता : दादा, हे सर्व 'व्यवस्थित शक्ती' करत असते ?
दादाश्री : यालाच म्हणतात 'व्यवस्थित शक्ती.' म्हणूनच असे सर्व संयोग एकत्र येऊन मग ती शक्तीही उत्पन्न होईल, नाही तर या मनुष्याचे काय हाल होतील! तेव्हा आता अजिबात घाबरण्यासारखे नाही. आपल्याला तर हे 'दादा' आहेत आणि 'मी' आहे बस, दुसरे काहीच नाही या जगात. ‘दादा' आहेत आणि ‘मी' आहे, आम्ही दोघेच. दादांसारखी प्रचंड ' खुमारी' असली पाहिजे. कोणी बापही आपला वरिष्ठ नाही, अशी. वरिष्ठाचेही वरिष्ठ म्हटले आहे दादांना !
प्रश्नकर्ता: दादा, पण आम्हाला तर अजून आमच्या चुका घाबरवतात ना ?
दादाश्री : हो, त्या घाबरवतील.
प्रश्नकर्ता : मग तुमच्या स्थितीपर्यंत पोहोचता-पोहोचता तर...
दादाश्री : चुका घाबरवतात ना ! तेही आपल्याला समजते ना, की
हे कोण घाबरवत आहे ? आपण ते जाणतो. पण मुळात तर आपण दादाच
Page #143
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आहोत ना? यात तर काही फरक नाही ना? आपण एकच आहोत ना ? एकदा आमचे भागीदार मला म्हणाले की, 'सध्या दोन-तीन अडचणी आल्या आहेत, खूप मोठ्या अडचणी आहेत.' मी म्हटले, 'जा, गच्चीवर जाऊन बोला की भाऊ, दोन-तीन अडचणी आल्या आहेत आणि आम्ही तर दादांची बँक उघडली आहे, तेव्हा दुसऱ्या काही अडचणी असतील त्यांनी सुद्धा यावे. म्हणजे मी पेमेंट करुन टाकेल, असे म्हणा. काय सांगितले ? पूर्वी बँक नव्हती म्हणून उपाधी वाटत होती. आता मात्र बँक आहे माझ्याजवळ, दादाई बँक, जेवढ्या अडचणी असतील त्या सर्वांनी एकदम यावे, असे म्हणा. आणि ते भागीदार गच्चीवर जाऊन मी सांगितलेले शब्द बोललेत सुद्धा. मोठ्याने ओरडून बोलले की, 'जेवढ्या अडचणी असतील, त्या सर्वांनी यावे. मला पेमेंन्ट करायचे आहे.' हो उगाच आत हाय हाय.... ....धोतरात ऊवा पडल्या म्हणून काय धोतर सोडून टाकायचे ? असे चालते का ? म्हणजे कधीतरी असे म्हटले पाहिजे. आपली गच्ची आहेच ना ? तेव्हा 'या, सर्व पेमेन्ट करुन टाकतो.' असे म्हणावे.
११६
तेव्हा झाला संपूर्ण निकाल
तुम्ही घाबरलात तर वस्तू जास्त चिकटतील. आणि सर्व फाईलींचा निकाल झाला की मग तुम्ही परमात्माच आहात. तुम्हाला फाईली आहेत का ?
प्रश्नकर्ता : हो, हो.
दादाश्री : असे होय ? मग छान. फाईली आहेत म्हणून तर झंझट आहे ना !
प्रश्नकर्ता : फाईलींचा पूर्णपणे निकाल झाला असे केव्हा म्हणता येईल? फाईल पूर्णपणे मिटली, तिचा निकाल झाला असे केव्हा समजते ? असे केव्हा म्हटले जाते ?
दादाश्री : आपल्या मनात त्याच्याविषयी काही राहत नाही त्याच्याही मनात आपल्याविषयी काही राहत नाही. म्हणजे कम्प्लीट निकाल झाला.
Page #144
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
११७
प्रश्नकर्ता : त्याच्या मनातही नाही राहिले पाहिजे.
दादाश्री : राहिले तरीही आपल्याला काही हरकत नाही. आपले मन पूर्णपणे क्लियर झाले म्हणजे झाले.
प्रश्नकर्ता : म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी विचार सुद्धा येत नाही असे ?
दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : त्याच्याविषयी विचार येणे सुद्धा बंद होते.
दादाश्री : हो.
कुठपर्यंत मन स्वच्छ झाले
एखाद्या महात्म्यासाठी आमच्या विचारात फेरफार झाला, आम्हाला विचार येत नाहीत, तरीही त्या व्यक्तीसाठी विचार येऊ लागले, म्हणून मला वाटले की हे काय पुन्हा नवीन सुरु झाले आत ? कोणत्या कारणाने त्याच्यासाठी असे विचार येतात ? तसा तर चांगला माणूस आहे पण आता बिघडून गेला आहे की काय, नेमके काय आहे ? अणि मग आतूनच उत्तर मिळाले की, त्याच्या कर्माचा उदय सद्या वाईट आहे. त्याचा उदय फेवरेबल नाही म्हणून असे दिसत आहे. म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी कोमल मनोभाव ठेवतो. कारण एखाद्या माणसाचा उदय फेवरेबल असतो आणि एखाद्याचा फवरेबल नसतो सुद्धा. असे घडते ना ?
प्रश्नकर्ता : हो, घडते.
दादाश्री : असे तर जगात घडतच असते. पण हे तर जेव्हा आम्हाला स्पर्शत असेल अशी गोष्ट येते, तेव्हा आम्ही एका बाजूने त्याच्या प्रति कोमल मनोभाव ठेवतो.
प्रश्नकर्ता : असा कोमल मनोभाव तुम्ही कसे काय ठेऊ शकता ?
Page #145
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : म्हणजे ते जसे दिसत आहेत तसे आम्ही त्यांना मानतच नाही, ते चांगलेच आहेत, असेच मानतो.
प्रश्नकर्ता : मग तुम्ही व्यवहार कशा प्रकारे करता ?
दादाश्री : निर्दोषच आहेत ना ! मी तर त्यांचा निर्दोष व्यवहारच पाहिलेला आहे. मग दोषी का दिसतात ? तर 'देअर आर कॉजेस' (त्यामागे काही तरी कारण आहे). निर्दोषच पाहिले आहे सर्व. हे जग बुद्धीने दोषित आहे आणि ज्ञानाने निर्दोष आहे. तुला तुझे पती निर्दोष दिसत नाहीत ?
प्रश्नकर्ता : दिसतात ना !
दादाश्री : मग आता तिथे चूक काढण्यात काय अर्थ ? चूक तर, हा पुतळा त्या पुतळ्याची चूक काढत असेल, तर ते आपण फक्त पाहत राहायचे. म्हणजे त्या प्रकृतीला निहाळायचे.
तोपर्यंत वरिष्ठ आतील भगवंत
यात अन्य कुणाचे काहीच नाही, हे तर आपल्याच चुकांचे फळ आपण भोगायचे. मालकी आपलीच, कुणीही वरिष्ठ नाही, आत बसले आहेत ते भगवंतच आपले वरिष्ठ. ते शुद्धात्मा तेच भगवंत. ज्यांना फाईल नाही त्या शुद्धात्माला भगवंत म्हटले जाते आणि ज्यांना फाईल आहे त्यांना शुद्धात्मा म्हटले जाते. पाहा ना, तुम्हाला फाईली आहेत ना, लगेच सर्व समजले ना की फाईलवाले शुद्धात्मा, ते शुद्धात्मा म्हटले जातात.
११८
प्रश्नकर्ता: दादाजी, तुमच्यासारखी स्थिती प्राप्त करायची आहे. सगळ्या फाईली असून सुद्धा त्या पेशू शकणार नाहीत.
दादाश्री : म्हणजे आता फाईलपर्यंत पोहोचलात. आता फाईलींचे समाधान करुन टाकायचे बस, म्हणजे पूर्ण झाले. सर्व काम संपले. नाही हिमालयात तप करावे लगले की नाही उपास करावे लागले. हिमालयात तर कितीही जन्मांपर्यंत तप केले तरी काहीही निष्पन्न होत नाही. चुकीचा
Page #146
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
११९
मार्ग, सहजच जरी चुकीचा मार्ग असेल पण त्या मार्गाने गेलात तर मूळ स्थान गाठता येणार नाही. करोडो वर्षे फिरत राहिलो तरीही येणार नाही!
भिन्नता त्या दोघांच्या जाणण्यात प्रश्नकर्ता : प्रकृतीचे गुण-दोष जो पाहतो, तो पाहणारा कोण आहे ? दादाश्री : तीच प्रकृती आहे. प्रश्नकर्ता : प्रकृतीचा कोणता भाग पाहतो? दादाश्री : तो बुद्धीचा भाग, अहंकाराचा भाग. प्रश्नकर्ता : मग यात मूळ आत्म्याचे काय काम आहे ? दादाश्री : मूळ आत्म्याला काय? त्याला काही देणेघेणेच नाही ना! प्रश्नकर्ता : मूळ आत्म्याचे पाहणे-जाणणे कशा प्रकारचे असते? दादाश्री : ते निर्लेप असते आणि हे तर लेपीत आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे चांगले-वाईट पाहतो तो लेपीत भाग आहे ? दादाश्री : हो, तो सर्व लेपीत भाग.
प्रश्नकर्ता : बुद्धीने प्रकृतीचे चांगले-वाईट पाहिले, हे जे पाहतो, जाणतो, तो स्वतः आहे ?
दादाश्री : प्रकृतीचे दोष पाहिले तर ती प्रकृतीच झाली. तिथे आत्मा नाही. आत्मा असा नाही. त्याला कुणाचाही दोष दिसत नाही.
प्रश्नकर्ता : एकमेकांच्या दोषांची गोष्ट नाही पण स्वतः स्वत:चे दोष पाहतो ती गोष्ट करत आहोत.
दादाश्री : तेव्हा प्रकृतीच असते. पण ती उच्च प्रकारची प्रकृती आहे, जी आत्मा प्राप्त करविणारी आहे.
Page #147
--------------------------------------------------------------------------
________________
१२०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : आणि प्रकृतीला निर्दोष पाहतो, तो कोण पाहतो?
दादाश्री : प्रकृतीला निर्दोष पाहतो तोच परमात्मा आहे, तोच शुद्धात्मा आहे. दुसऱ्या कशातच हात घालत नाही ना!
प्रश्नकर्ता : निर्दोष पाहण्यात त्याला कसा आनंद मिळतो? दादाश्री : तो आनंद, त्यास मुक्तानंद म्हटले जाते ना! प्रश्नकर्ता : म्हणजे परिणामाबद्दल काहीच बोलत नाही. दादाश्री : परिणामाला, प्रकृतीच्या परिणामाला बघतच नाही.
दोन प्रकारचे पारिणामिक ज्ञान आहेत. एक प्रकृतीचे पारिणामिक ज्ञान, आणि दुसरे आत्म्याचे पारिणामिक ज्ञान. प्रकृतीला तुम्ही निर्दोष पाहता म्हणजे तुम्ही त्या पारिणामिक ज्ञानात पास झालात. दोषी पाहता तेव्हा तुम्ही गुंता निर्माण करता.
प्रश्नकर्ता : पण ते जसे आहे तसे पाहण्यात कोणता स्वाद चाखत आहे?
दादाश्री : त्याने तर तो आनंद चाखलेलाच असतो ना, पण तो काय म्हणतो की, मला आनंदाची काही पडलेली नाही. मला तर हे जसे आहे तसे पाहण्यातच आनंद वाटतो. म्हणून आम्ही काय सांगतो की 'जसे आहे तसे' पाहा ना! ती सर्वात अंतिम गोष्ट आहे !
प्रश्नकर्ता : कोणत्या ज्ञानप्रकाशाच्या आधारे तो कुणालाही दोषी पाहत नाही?
दादाश्री : तो केवळज्ञानाच्या अंशाने दोषी पाहत नाही. प्रश्नकर्ता : ते कसे ज्ञान आहे ? दादाश्री : ते केवळज्ञान आहे.
Page #148
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१२१
त्यामुळे अंतराय... प्रश्नकर्ता : संपूर्ण आनंद केव्हा वर्ततो (अनुभवला जातो)? सारे दोष निघून गेल्यानंतरच ना?
दादाश्री : आनंद तर वर्ततच आहे पण जे दोष आहेत ते अंतराय (विघ्न) निर्माण करतात. म्हणून त्याला लाभ घेता येत नाही. आनंद तर आत्ता सुद्धा आहे. परंतु तो आनंद अनुभवता येईल अशी सेटींग करत नाही ना आपण.
संपूर्ण दोषरहित दशा दादांची स्वत:चे दोष पाहण्यात तर सुप्रीम कोर्टवाला सुद्धा पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत जजमेन्ट पोहोचूच शकत नाही. तिथे तर स्वत:चा थोडासुद्धा दोष पाहू शकत नाही. आणि दोष तर ढीगभर होत असतात. आवरण जास्त आहेत म्हणून दोष दिसत नाहीत. आणि एवढासाच, फक्त एका केसाइतकाच दोष झाला ना, तरीही लगेच लक्षात येते की हा दोष झाला. म्हणजे आत असे कसे कोर्ट असेल? आणि हे जजमेन्टही कसे असेल? आणि तरीही कोणाशीच मतभेद नाही. गुन्हेगाराशीही मतभेद नाही. जरी गुन्हेगार दिसतो तरीही मतभेद नाही. कारण वास्तवात तो गुन्हेगार नाहीच. तो तर फॉरेनमध्ये (बाह्यभागात) गुन्हेगार आहे आणि आपल्याला तर होमशी (आत्म्याशी) देणेघेणे आहे म्हणून आपल्याला मतभेद असूच शकत नाही ना!
दादांचे स्थूल-सूक्ष्म दोन्ही दोष निघून गेले आहेत. आणि जे सुक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष राहिले आहेत, ते जगाला अजिबात नुकसानकारक किंवा फायद्याचे नसतात. जगाला स्पर्शत नाही असे दोष असतात. स्थूल दोष म्हणजे तुम्ही माझ्यासोबत चार महीने जरी राहिलात ना, तरी तुम्हाला माझा एकसुद्धा दोष दिसणार नाही, चोवीस तास सोबत राहिलात तरीही.
Page #149
--------------------------------------------------------------------------
________________
१२२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
ह्या नीरुबेन आहेत, त्या निरंतर सेवेत असतात पण त्यांना आमचा एकही दोष दिसत नाही. त्या निरंतर सोबतच राहतात. जर ज्ञानी पुरुषातच दोष असेल तर जग निर्दोष कसे असू शकेल?
__ जागृती चुकांसमोर ज्ञानींची आमची जागृती 'टॉप'ची (सवोच्च) असते. तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही पण तुमच्याशी बोलताना जिथे आमची चूक होते तिथे लगेचच आमच्या लक्षात येते आणि आम्ही ती चूक लगेच धुऊन टाकतो. त्यासाठी आत यंत्र ठेवलेले असते, ज्याच्याने लगेच धुतले जाते. आम्ही स्वतः निर्दोष झालो आहोत आणि संपूर्ण जगाला सुद्धा निर्दोषच पाहतो. अंतिम प्रकारची जागृती कोणती? तर जगात कोणीही दोषी दिसत नाही. आम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दररोजचे हजारो दोष दिसू लागले. जसजसे दिसू लागतात तसतसे दोष कमी होत जातात आणि दोष कमी होतात तसतशी 'जागृती' वाढत जाते. आमचे फक्त सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष बाकी राहिले आहेत, त्यांना आम्ही 'पाहत' असतो आणि 'जाणत' असतो. ते दोष कुणाला हरकत करणारे नसतात पण काळामुळे ते थांबले आहेत आणि त्यामुळेच ३६० डिग्रीचे केवळज्ञान थांबले आहे. ३५६ डिग्रीपर्यंत पोहाचल्या नंतर थांबले आहे ! परंतु आम्ही तुम्हाला पूर्ण ३६० डिग्रीचे केवळज्ञान फक्त एका तासातच देत असतो, पण तुम्हाला सुद्धा ते पचणार नाही. अरे, आम्हालाच पचले नाही ना! काळामुळेच चार डिग्री कमी राहिली! आत पूर्णपणे ३६० डिग्री 'रियल' आहे आणि 'रिलेटिव्हमध्ये' ३५६ डिग्री आहे. या काळात रिलेटिव्ह पूर्णतेला पोहोचू शकेल असे शक्य नाही. पण आम्हाला त्याची काही हरकत नाही, कारण आत अपार सुख वर्तत असते!
म्हणून 'आमचा' कोणीही वरिष्ठ नाही ज्यांना जितक्या चुका दिसत नाहीत, तितक्या चुका त्यांच्या वरिष्ठ आहेत. ज्याच्या सगळ्याच चुका संपल्या, त्याला कोणी वरिष्ठ नाही.
Page #150
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
माझा कोणीच वरिष्ठ नाही, म्हणून मी सर्वांचा वरिष्ठ, वरिष्ठचाही वरिष्ठ! कारण आमच्यात स्थूल दोष तर नसतातच. सूक्ष्म दोष सुद्धा निघून गेले आहेत. सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष असतात, त्या दोषांचे आम्ही संपूर्ण ज्ञाता-दृष्टा राहत असतो. महावीर भगवंत सुद्धा हेच करत होते.
१२३
म्हणून 'ज्ञानी' देहधारी परमात्मा
ज्ञानी पुरुषात दिसू शकतील अशा स्थूल चूका नसतात. या दोषांची मी तुम्हाला व्याख्या देतो. स्थूल चूक म्हणजे काय ? माझ्याकडून जर एखादी चूक घडली तर जो जागृत मनुष्य असेल त्याला समजते की यांनी काही तरी चूक केली. सूक्ष्म चूक म्हणजे इथे पंचवीस हजार माणसं बसली असतील, तर मी समजून जातो की, माझा हा दोष झाला पण त्या पंचवीस हजारा पैकी जेमतेम पाच मनुष्य सूक्ष्म चूक समजू शकतील. सूक्ष्म दोष तर बुद्धीपूर्वक पण दिसू शकतात. परंतु सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष हे मात्र ज्ञानाच्या आधारेच दिसतात. सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष मनुष्यांना दिसत नाहीत. देवी-देवतांनाही अवधिज्ञानाने पाहिले तरच दिसतील. पण तरी तर ते दोष कुणाचे नुकसान करत नाहीत, असे सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम दोष आमच्यात राहिलेले आहेत आणि ते सुद्धा या कलियुगाच्या विचित्रतेमुळे !
'ज्ञानी पुरुष' स्वतः देहधारी परमात्माच म्हटले जातात. ज्यांची एकही स्थूल चूक नाही की एकही सूक्ष्म चूक नाही.
आतील भगवंत दाखवितात दोष...
जग दोन प्रकारच्या चुका पाहू शकते, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. स्थूल चुका बाहेरील पब्लिक पण पाहू शकते आणि सूक्ष्म चुका बुद्धिजीवी पाहू शकतात. या दोन चुका ज्ञानी पुरुषात नसतात. आणि सूक्ष्मतर दोष तर फक्त ज्ञानींनाच दिसतात. आणि आम्ही सूक्ष्मतममध्ये बसलेलो आहोत.
Page #151
--------------------------------------------------------------------------
________________
१२४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
माझ्या ज्या सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुका आहेत की ज्या 'केवळज्ञानाला' अडवत असतील, केवलज्ञानाला बाधक अशा ज्या चुका घडत असतील त्या चुका भगवंत 'मला' दाखवतात म्हणून 'मी' जाणतो ना की हे माझे वरिष्ठ आहेत. असे नाही का लक्षात येत? आपली चूक दाखवतात ते भगवंत आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत की नाही?
प्रश्नकर्ता : हो बरोबर आहे.
दादाश्री : म्हणून आम्ही सांगत असतो ना की, जे आम्हाला चुका दाखवतात ते 'चौदालोकचे' नाथ आहेत. चौदा लोकच्या नाथांचे दर्शन करा. चूक दाखवणारे कोण आहेत? चौदालोकचे नाथ!
आणि ते दादा भगवान तर मी पाहिले आहेत, आत संपूर्ण दशेत आहेत. याची मी गॅरंटी देतो. मीच त्यांना भजतो ना! आणि तुम्हाला ही सांगतो की 'भाऊ, तुम्ही सुद्धा दर्शन करा.' दादा भगवानांची ३६० डिग्री आहे आणि माझी ३५६ डिग्री आहे, म्हणून आम्ही दोघे वेगळे आहोत, हे सिद्ध झाले की नाही?
प्रश्नकर्ता : हो ना!
दादाश्री : आम्ही दोघे वेगळेच आहोत. जे आत प्रकट झाले आहेत, ते दादा भगवान आहेत. ते संपूर्ण प्रकट झाले आहेत. परम ज्योति स्वरुप!
Page #152
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
भगवंताने पाहिले जग निर्दोष प्रश्नकर्ता : महावीर भगवंतांनी पूर्ण जगाला निर्दोष पाहिले.
दादाश्री : भगवंतांनी निर्दोष पाहिले आणि स्वतःच्या निर्दोष दृष्टीने निर्दोष पाहिले. त्यांना कोणीच दोषी वाटला नाही. तसेच मी सुद्धा निर्दोष पाहिले आहे, मला सुद्धा कोणी दोषी दिसत नाही. फुलांचा हार घातला तरी कोणी दोषी नाही आणि शिव्या दिल्या तरीही कोणी दोषी नाही. हे तर मायावी दृष्टीमुळे सगळे दोषी दिसतात. म्हणजे हा फक्त दृष्टीचाच दोष आहे.
प्रश्नकर्ता : निर्दोषता केव्हा प्राप्त होते?
दादाश्री : जेव्हा संपूर्ण जगाला निर्दोष पाहाल तेव्हा! मी संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले आहे, तेव्हा मी निर्दोष झालो. हित करणाऱ्याला आणि अहित करणाऱ्याला सुद्धा आम्ही निर्दोष पाहतो.
कोणीही दोषी नाही. त्याने जरी दोष केला असेल, तरी खरोखर त्याच्या पूर्व जन्मात केला असेल. परंतु त्यानंतर तर त्याची इच्छा नसेल तरीही आत्ता तो दोष होतो. तेव्हा तो त्याच्या इच्छे विरुद्ध होतो ना? भरलेला माल आहे, त्यात त्याचा काही दोष नाही ना, म्हणून त्याला निर्दोष मानला.
कोणत्या दृष्टीने जग दिसते निर्दोष पुद्गलला पाहू नका. पुद्गलवर दृष्टी करु नका. आत्म्याकडेच दृष्टी करा. कानात खिळा ठोकणारा सुद्धा महावीर भगवंतांना निर्दोष दिसला. दोषी दिसतो, तीच आपली चूक आहे. तो एक प्रकारचा आपला
Page #153
--------------------------------------------------------------------------
________________
१२६
निजदोष दर्शनना ने....निर्दोष
अहंकार आहे. हे तर आपण बिन पगाराचे न्यायाधीश बनतो आणि मार खात राहतो. मोक्षाला जाताना हे लोक आपल्याला गोंधळवतात, असे जे आपण बोलतो ते तर व्यवहाराने बोलतो. इंद्रिय ज्ञानाने जसे दिसते तसेच बोलतो. पण खरोखर, वास्तविकतेत तर लोक अडवू शकतच नाही ना! कारण 'कोणताही जीव, कोणत्याही जीवात हस्तक्षेप करु शकतच नाही' असे हे जग आहे. लोक तर बिचारे, प्रकृती जशी नाचवते तसे नाचतात, म्हणजे यात कुणाचाही दोष नाहीच. संपूर्ण जग निर्दोषच आहे. मला स्वत:ला निर्दोष अनुभवात येत आहे. जेव्हा तुम्हाला निर्दोष अनुभवात येईल, तेव्हा तुम्ही या जगापासून मुक्त व्हाल. नाहीतर जोपर्यंत एक जरी जीव दोषी वाटत असेल तोपर्यंत तुमची सुटका होणार नाही.
प्रश्नकर्ता : त्यात सर्व जीव येतात? म्हणजे फक्त माणसेच नाहीत पण किडे, मुंग्या हे सर्व सुद्धा त्यात येतात का?
दादाश्री : हो, प्रत्येक जीव निर्दोष स्वभावाचे दिसले पाहिजेत.
प्रश्नकर्ता : दादा, तुम्ही प्रत्येक जीव निर्दोष आहे, असे म्हटले. आता जर नोकरीत मी कुठे चूक केली आणि माझा वरिष्ठ अमलदार मला असे म्हणेल की 'तू ही चूक केलीस,' मग तो मला रागवेल, ठपका देईल. आता जर मी निर्दोषच असेल तर मला कोणी रागवायला नको ना?
दादाश्री : कुणाचे रागावणे आपण पाहू नये. आपल्यावर रागावणारा सुद्धा निर्दोष आहे, असे आपल्या समजूतीत असले पाहिजे. म्हणजे कुणावर दोष टाकू शकत नाही. तुम्हाला जितके निर्दोष दिसतील, तितके तुम्ही (यर्थाथ) समजमध्ये आलात, असे म्हटले जाईल.
मला जग निर्दोष दिसते, तुमची दृष्टी सुद्धा अशी झाली म्हणजे हे कोडे सुटेल. मी तुम्हाला असा प्रकाश देईल आणि इतके पाप धुऊन टाकेल की, ज्यामुळे तुमचा प्रकाश टिकून राहिल. आणि त्यामुळे मग तुम्हाला निर्दोष दिसत जाईल. आणि त्याचबरोबर तुम्ही पाच आज्ञेत राहाल तर तुम्हाला जे ज्ञान दिले आहे, त्या ज्ञानाला सहजही फॅक्चर होऊ देणार नाही.
Page #154
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१२७
तत्त्व दृष्टीने जग निर्दोष आम्ही संपूर्ण जगाला निर्दोष पाहतो. प्रश्नकर्ता : असे संपूर्ण जगाला निर्दोष केव्हा पाहता येईल?
दादाश्री : तुम्हाला उदाहरण देऊन समजावतो, मग तुम्हाला समजेल. समजा एका गावात एक सोनार राहतोय. पाच हजार लोकांचे गाव आहे. तुमच्याजवळ जे सोने आहे ते सोने तुम्ही तिथे विकण्यासाठी गेलात. तेव्हा तो सोनार आधी ते सोने असे घासेल, घासून बघेल. आता आपले सोने जरी चांदीसारखे सफेत दिसत असेल, भेसळयुक्त सोने असेल तरी तो रागवत नाही. तो का रागवत नाही की, तुम्ही असे भेसळयुक्त सोने का आणले? कारण त्याची दृष्टी तर फक्त सोन्यावरच आहे. आणि दुसऱ्या कोणाकडे गेलात तर तो रागवेल की, की असे सोने का आणले म्हणून? म्हणजे जो खरा सोनार आहे तो रागवत नाही. अरे, तुम्ही जर सोनेच मागत आहात, तर याच्यात सोनेच पाहा ना! यात दुसरे सर्व का पाहता? एवढे भेसळयुक्त सोने का आणले? असे जर ओरडत राहिले, तर त्याचा अंत केव्हा येईल? आपण आपल्या परीने बघून पाहून घ्यायचे की, यात इतके सोने आहे आणि याचे इतके रुपये मिळतील. तुम्हाला समजले ना? या दृष्टीने मी संपूर्ण जगाला निर्दोष पाहतो. सोनार या दृष्टीनेच जरी कसेही सोने असले तरीही त्यात सोनेच पाहतो ना? दुसरे पाहूच नये ना? आणि रागवतही नाही. आपण सोनाराला सोने दाखवायला गेलो तर आपल्याला असे वाटते की, 'तो रागावला तर?' आपले सोने तर खराब झालेले आहे ! पण नाही, तो अजिबात रागावणार नाही. तो काय म्हणेल, 'मला बाकीच्या गोष्टींशी काय देणेघेणे? मग तो सोनार बिन अक्कलेचा आहे की अक्कलवाला आहे?
प्रश्नकर्ता : अक्कलवालाच म्हटला जाईल ना?
दादाश्री : मग हे उदाहरण बरोबर नाही का? प्रश्नकर्ता : बरोबर आहे, असे उदाहरण दिले की पटकन लक्षात येते.
Page #155
--------------------------------------------------------------------------
________________
१२८
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : आता हे उदाहरण कोणाला माहीत नाही का ?
प्रश्नकर्ता : माहीतच असेल.
दादाश्री : नाही, हे त्यांना कसे लक्षात येईल ? दिवसभर लक्ष लक्ष्मीजीवरच असते. आणि लक्ष्मीचा विषय संपला की बाईसाहेबांची आठवण येते. आणि बाईसाहेबांचा विषय संपला की पुन्हा लक्ष्मीचा विषय आठवतो. त्यामुळे दुसरे काही लक्षातच नाही राहत ना ! मग दुसरे हिशोब काढण्याचे राहूनच जाते ना ?
आम्ही सोनाराला पाहिले आहे, मला असे वाटायचे की हा सोनार रागवत का नाही की, 'तुम्ही सोने का बिघडवून आणले ?' त्याची दृष्टी कशी सुंदर आहे! अजिबात रागवत नाही. याचे सोने चांगले आहे असेही कधी बोलत नाही. पण असे म्हणतो 'बसा, चहा-पाणी घ्याल ना ?' अरे, भेसळयुक्त सोने आहे तरीही चहा पाजतोस ? तर यात सुद्धा असेच आहे. आत तर शुद्ध सोनेच (शुद्ध आत्माच ) आहे ना ? तात्विक दृष्टीने पाहिले तर कुणाचाही दोष नाही.
जग निर्दोष, पुराव्यासकट
आम्ही संपूर्ण जग निर्दोष पाहतो. आम्ही जगाला निर्दोष मानले आहे. ते मानलेले थोडेच बदलणार आहे ? घटक्यात बदलेल का ? आम्ही निर्दोष मानले आहे, जाणले आहे, मग दोषी थोडेच वाटणार आहे ? !
कारण जगात कोणीही दोषी नाहीच. मी एक्जॅक्टली (जसे आहे तसे) सांगत आहे. बुद्धीने प्रुफ (पुरावे) द्यायलाही तयार आहे. या बुद्धीवान जगाला, हा जो बुद्धीचा प्रसार झालेला आहे त्यांना प्रुफ हवा असेल तर मी प्रफ देऊ इच्छितो.
शीलवानाचे दोन गुण
या काळात हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) शीलवान कोणीच नसतो.
Page #156
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१२९
असे शीलवान मागील पंचवीसशे वर्षांत झाले नाहीत. मागील पंचवीसशे वर्षांची जी कर्म आहेत, त्यात असे शीलवान कोणी होऊ शकतच नाही. शील येते खरे पण पूर्णता येत नाही.
प्रश्नकर्ता : पण शीलच्या दिशेने तर जाऊ शकतो ना? दादाश्री : हो जाऊ शकतो.
प्रश्नकर्ता : तर तिथे जाण्यासाठी काय करावे? हा माझा सर्वात मोठा कठीण प्रश्न आहे. त्यासाठी काय करावे? ते समजतच नाही.
प्रश्नकर्ता : थोडक्यात समजून घ्यावे की कुणा शत्रू विषयी सुद्धा आपले भाव बिघडवू नये आणि जर बिघडला असेल तर प्रतिक्रमणाने सुधारुन घ्या. भाव बिघडतो तो आपल्या कमतरतेमुळे बिघडतो. म्हणून त्यास प्रतिक्रमाणाने सुधारुन घ्यावे! असे करत-करत ती वस्तू सिद्ध होईल.
आणि दुसरे म्हणजे या जगात कोणीही दोषी नाहीच मुळी. खरोखर प्रत्येक जीव निर्दोषच आहे, या जगात. दोषी दिसते हीच भ्रांती आहे. कोणीही दोषी नाही. हे 'त्याच्या लक्षात राहिले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण हे बुद्धीने समजणे खूप कठीण आहे.
दादाश्री : बुद्धी हे समजू देतच नाही. कोणीच दोषी नाही असे बुद्धी समजूच देत नाही.
प्रश्नकर्ता : तर यासाठी काय करावे?
दादाश्री : हे वाक्य जर तुमच्या अनुभवात आले तर तो अनुभवच तुम्हाला सांगेल. म्हणून प्रथम या वाक्याने सुरुवात करा. मग तो अनुभवच तुम्हाला सांगेल, म्हणजे मग बुद्धी शांत होऊन जाईल.
हे आहे ज्ञानाचे थर्मामीटर या जगाच्या 'सार' रुपात जर तुम्ही विचारले की, या जगाचे 'सार'
Page #157
--------------------------------------------------------------------------
________________
१३०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
काय आहे ? तेव्हा म्हणे, 'जगात कोणताही मनुष्य दोषी नाहीच. मनुष्यही दोषी नाही आणि वाघ सुद्धा दोषी नाही.' म्हणजे या उत्तरावरुन पूर्ण रक्कम शोधून काढायची.
उत्तर काय आहे, तर हे जग संपूर्ण निर्दोष स्वरुपात आहे. जीवमात्र निर्दोष आहे. दोषी दिसते ते स्वत:च्या अज्ञानतेमुळे. बोला आता, किती चुकीच्या धारणेत आहात तुम्ही?
प्रश्नकर्ता : खूपच चुकीच्या.
दादाश्री : जेव्हा जग निर्दोष दिसेल, तुमचा खिसा कापत असेल तरीही ती व्यक्ती तुम्हाला निर्दोष दिसत असेल, तेव्हा समजावे की करेक्टनेस (यथार्थता) वर आपण आलोत.
एक रक्कम तुम्ही धराल? शाळेत शिकत असताना अंकगणितात शिक्षक शिकवतात ना की काही जमत नसेल तर सपोज (समजा की) १०० असे सांगतात ना? असे नाही का सांगत की मनात १०० हा आकडा धरा तेव्हा उत्तर येईल. तेव्हा आपल्याला वाटते की, शिक्षकांनी १०० वर काही जादू केलेली दिसतेय. मग आपण म्हणू की नाही मी तर सव्वाशे धरेल. तेव्हा ते सांगतील, तुला धरायची असेल ती धर ना! असे धरल्यानेही उत्तर मिळेल असे आहे.
अशी एक रक्कम मी तुम्हाला धरण्यास सांगू का? या जगात कोणीही दोषी नाही. संपूर्ण जग निर्दोषच आहे. तुम्हाला दोष दिसतात का?
प्रश्नकर्ता : पाहिले तर दिसतात.
दादाश्री : खरोखर दोष नाहीच. तरीही दोष दिसतात, ती आपली अज्ञानता आहे. लोकांचे किंचितमात्र दोष दिसतात ती आपली अज्ञानता आहे.
Page #158
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१३१
ही रक्कम धरली आणि ही रक्कम धरुन उत्तर आणले तर उत्तर येईल असे आहे. जगात कोणीच दोषी नाही. तुमच्या दोषानेच तुम्हाला बंधन आहे. दुसऱ्या कुणाचा दोष नाहीच. कोणी तुमचे नुकसान केले, कोणी शिव्या दिल्या, अपमान केला त्यात त्याचा दोष नाही, दोष तुमचाच आहे.
दृष्टीनुसार सृष्टी प्रश्नकर्ता : कधी असेही घडते की, जी व्यक्ती आज आम्हाला चांगली वाटते तीच उद्या तिरस्कारयुक्त वाटते. परत तिसऱ्या दिवशी तीच व्यक्ती आम्हाला मदत करणारी वाटते. तर असे का वाटते?
दादाश्री : त्या व्यक्तीत आपल्याला जो बदल दिसतो तो आपला रोग आहे. व्यक्तीत बदल होतच नाही. म्हणून जो बदल दिसतो तो आपलाच रोग आहे. आणि अध्यात्म हेच सांगते ना! अध्यात्म काय सांगते? तुला पाहताच येत नाही. मग उगाचच बायकोचा नवरा होऊन का बसला आहेस? अर्थात आपल्याला पाहता येत नसल्यामुळे असे सर्व घडत असते. बाकी ही फॅक्ट (खरी) वस्तू नाही.
स्वतःसाठी समोरची व्यक्ती काय मानत असेल, ते कसे समजणार? तुमच्यासाठी एखादी व्यक्ती अभाव व्यक्त करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीसाठी काय वाटते?
प्रश्नकर्ता : अभाव व्यक्त केला तर वाईट वाटते.
दादाश्री : मग तुम्ही दुसऱ्यांसाठी अभाव व्यक्त केला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : हे एक कोडेच आहे की, यांच्यात मला चांगला भाव दिसतो आणि या त्यांच्यात मला वाईट भाव दिसतो?
दादाश्री : नाही, हे कोडे नाही. आम्ही जाणतो की हे काय आहे, म्हणून आम्हाला कोडे वाटत नाही. एक व्यक्ती मला रोज विचारत असे
Page #159
--------------------------------------------------------------------------
________________
१३२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
की, या माणसासाठी मला वाईट भाव का येतात? मी सांगितले, 'त्या माणसाचा दोष नाही, तुमचा दोष आहे.'
प्रश्नकर्ता : पण आपण जर वाईट असू तर सगळेच वाईट दिसायला हवेत.
दादाश्री : आपणच वाईट आहोत म्हणूनच हे वाईट दिसते. कोणीही वाईट नाहीच. वाईट दिसते ते तुमच्याच वाईटपणामुळे वाईट दिसते. भगवंताने हाच शोध लावला आणि तुम्ही जे चांगले म्हणतात तोही तुमचा मूर्खपणा आहे, फूलीशनेस आहे. चांगले-चांगले म्हणतो आणि जेव्हा आपण विचारु तेव्हा म्हणेल, 'माझा विश्वासघात केला.' पण मग तू चांगले-चांगले का म्हणत होतास? आज चांगले म्हणेल आणि दहा वर्षांनंतर म्हणेल की, माझा विश्वासघात केला, असे घडते की नाही?
प्रश्नकर्ता : असे घडतेच ना!
दादाश्री : आणि असे जे चुकीचे दिसते ते चांगले आहे असेही मानू नका.
जग निर्दोष अनुभवात... प्रश्नकर्ता : समोरचा निर्दोष दिसेल अशी जागृती सतत राहिली पाहिजे ना?
दादाश्री : निर्दोष पाहायला अजून तुम्हाला बराच वेळ लागेल. पण तरी दादांनी सांगितले आहे म्हणून कदाचित तुम्हाला निर्दोष दिसेलही, पण ते फक्त सांगितल्यामुळेच दिसेल. तुम्हाला एक्जक्ट निर्दोष दिसणार नाही.
प्रश्नकर्ता : मग आम्हाला असा अनुभव येणारच नाही? दादाश्री : आत्ताच तुम्हाला अनुभव येणार नाही.
प्रश्नकर्ता : आणि जर आम्ही मनात असे मानले की हो, ते निर्दोषच आहेत तर?
Page #160
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१३३
दादाश्री : तुम्हाला हे ज्ञान तर झाले पण तसा अनुभव कधी ना कधी होईल. पण आता त्या आधीच तुम्ही असे ठरवून टाकले म्हणजे मग काही अडचणच नाही ना! निर्दोष आहे असे म्हटल्यामुळे आपले मन बिघडत नाही. तुम्ही कुणाला दोषी ठरवले तर प्रथम तुमचे मन बिघडते आणि ते मग तुम्हाला दुःख देतेच. कारण खरोखर कोणी दोषी नाहीच. तुमच्या अक्कलनेच तुम्हाला दोषी दिसते आणि तीच भ्रांतीची जागा आहे. हो, तुम्ही मला नेहमी सगळ्यांबद्दल सांगत असता पण मी कोणाची तक्रार ऐकतो का?!
प्रश्नकर्ता : आता तुम्ही काय सांगितले की तुम्ही मला नेहमी सांगत असता.
दादाश्री : हो, पण तुम्ही अशा सर्व गोष्टी सांगत असता की हा असे करत होता, तो तसे करत होता, तर आता तुम्हाला समजले ना की हे सर्व चुकीचे आहे ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : सगळा वेळ वाया गेला. सगळेच निर्दोष आहेत. असे समजले की, प्रश्न मिटला.
प्रश्नकर्ता : कोणी आमचा खिसा कापला तर लगेच आम्ही म्हणतो की, हा माझ्या कर्माचा उदय आहे, मग लगेच तो माणूस निर्दोष दिसतो.
दादाश्री : इतके जर तुमच्या ज्ञानात आले की, हा माझ्याच कर्माचा उदय आहे, म्हणून तो निर्दोष दिसतो, हे बरोबर आहे. यास अनुभवपूर्वकचे म्हटले जाईल.
प्रश्नकर्ता : ते अनुभवपूर्वकचे म्हटले जाईल? दादाश्री : हो. प्रश्नकर्ता : आपल्या कर्माचा उदय आहे असे दिसले तर?
Page #161
--------------------------------------------------------------------------
________________
१३४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : हो, हेच की हा माझ्याच कर्माचा उदय आहे, त्याचा दोष नाही. यास जागृती म्हणतात.
आणि तुम्ही जर समजल्याशिवाय असेच बोललात की, संपूर्ण जग निर्दोष आहे, तर ते अजून पूर्णपणे तुमच्या अनुभवात आलेले नाही.
म्हणजे काही बाबतीत तुमचे असे डिसाईड (नक्की) होऊन जाते आणि काही बाबी अशा असतील की ज्यात डिसिजन (निर्णय) होत नाही. म्हणून हे तुम्ही मानूनच घ्यायचे. नंतर जेव्हा टाईम येईल तेव्हा ते डिसाईड होऊन जाईल. आपल्याला उत्तर माहीत असेल तर मग हिशोब लिहिता-लिहिता जेव्हा उत्तर मिळते तेव्हा समजते. उत्तर माहीत असलेले चांगलेच आहे ना!
प्रश्नकर्ता : हो. आता आम्हाला कुठलेही फळ मिळाले किंवा कुठलेही कार्य झाले, प्लस किंवा मायनस (कमी किंवा जास्त) पण ते आपल्या कर्माच्या अधीनच आहे, असेच मानले जाते...
दादाश्री : हो, यात दुसरे काहीच नाही. सर्व काही आपलेच आहे. मायनस म्हटले तरी आपले आणि प्लस म्हटले तरीही आपले. परंतु व्यवहारात तुम्ही समोरच्याला असे सांगितले पाहिजे की, भाऊ साहेब, तुम्ही चांगले काम करुन दाखवले, असे बोलले पाहिजे. आणि खराब केले असेल तर त्याला असे म्हणू नये की तुम्ही खराब काम केले.
प्रश्नकर्ता : मग त्याला काय सांगावे?
दादाश्री : त्याला काहीच सांगायचे नाही. त्याच्या प्रति मौन राहायचे. कारण, जर चांगले म्हटले नाही तर त्याला एन्करेजमेन्ट (प्रोत्साहन) मिळणार नाही. त्याला वाटेल की, हे शेठ तर काही बोलतच नाही. तो तर असेच मानतो ना की 'हे मीच केले!' तुमच्या कर्माच्या उदयाने तो करत आहे, असे त्याला माहीत नाही. तो तर असेच म्हणेल की, 'हे मी माझ्या मेहनतीने केले आहे.' तेव्हा आपल्याला 'हो' म्हणावे लागते.
Page #162
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१३५
अंतिम दृष्टीने जग निर्दोष प्रश्नकर्ता : आता कोणताही मनुष्य मला नालायक दिसत नाही, आणि पूर्वी तर मला सर्वच नालायक दिसत होते.
दादाश्री : नाहीच मुळी. हा तपास केल्यानंतरच मी सांगितले की, मला संपूर्ण जग निर्दोष दिसते.
प्रश्नकर्ता : शुद्धात्मा पाहिले नाही तेव्हाच दोषी दिसते ना?
दादाश्री : दोषी केव्हा दिसते की जेव्हा आपण शुद्धात्मा पाहत नाही तेव्हा दोषी दिसते आणि दुसरे म्हणजे त्याने त्याचे 'सार' काढलेले नाही, एक्जॅक्टली जर 'सार' काढले तर तो स्वत:च म्हणेल, दोष पाहणारा स्वत:च म्हणेल की, भाऊ ही तर माझीच चूक आहे. अर्थात फक्त शुद्धात्मा पाहिल्यानेही काही पूर्ण होत नाही. ते मग पुढे-पुढे चालूच राहते. तेव्हा पद्धतशीरपणे निकाल झाला पाहिजे. म्हणजे त्याचे 'सार' काढून निकाल झाला पाहिजे की कशा प्रकारे त्याचा दोष नाही. हो त्याचा दोष नाही तरीही असे का दिसते?
महावीर भगवंतांनी सांगितले की, संपूर्ण जग निर्दोष आहे, जी काही चूक होती ती माझीच होती आणि ती सापडली. आणि मलाही माझी चूक सापडली. आणि आता मी तुम्हाला काय सांगतो? की तुमची चूक शोधा. मी दुसरे काहीच सांगत नाही. जो पतंगाचा दोरा माझ्याजवळ आहे, तसाच पतंगाचा दोरा तुमच्याजवळही आहे. तुम्ही शुद्धात्म्याचे ज्ञान प्राप्त केले म्हणून पतंगाचा दोरा तुमच्या हातात आला. पतंगाचा दोरा हातात नसेल आणि गटांगळ्या खाल्ल्या, आरडाओरडा केला, उड्या मारल्या तर त्याने काहीही निष्पन्न होत नाही. पण हातात दोरा असेल आणि तो ओढला तर त्याचे गटांगळ्या खाणे बंद होते की नाही? तो दोरा मी तुमच्या हातात दिला आहे.
म्हणून तुम्हाला निर्दोष पाहायचे. निर्दोष दृष्टीने शुद्धात्मा पाहून त्याला
५सत.
Page #163
--------------------------------------------------------------------------
________________
१३६
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
निर्दोष ठरवायचे. मग थोड्या वेळाने पुन्हा आतून आरडाओरडा करेल. 'तो तर असे-असे करतो, त्याला कशाला निर्दोष पाहता?' म्हणून एक्जक्टली जसे आहे तसे निर्दोष पाहायचे आणि एक्जेक्टली निर्दोषच आहे.
कारण हे जे जग आहे ना, जे तुम्हाला दिसते, तो सर्व तुमचा परिणाम आहे, कॉजेस (कारणं) दिसत नाहीत. तर आता परिणामात कोणाचा दोष?
प्रश्नकर्ता : कॉजेसचा दोष.
दादाश्री : कॉजेस करणाऱ्याचा दोष. म्हणजे परिणामात कुणाचाही दोष नसतो. असे हे जग परिणाम स्वरुप आहे. हे तर मी तुम्हाला अगदी छोटा ‘तारण' (हिशोब) काढायला शिकवले अजून तर दुसरे पुष्कळ हिशोब आहेत. कितीतरी हिशोब जमा झाले तेव्हा मी स्वीकार केला की, हे जग निर्दोष आहे. नाही तर असाच स्वीकार होईल का? ही काही नुसती थाप आहे ?
तुम्ही तुमच्या प्रतीतीत बसवा की हे जग निर्दोष आहे, शंभर टक्के निर्दोषच आहे. दोषीत दिसते तीच भ्रांती आहे आणि त्यामुळेच हे जग निर्माण झाले आहे बस, निर्माण होण्याच्या मागे दुसरे कोणतेही कारण नाही. ज्ञानदृष्टीने पाहायला गेलो तर जग निर्दोष आहे आणि अज्ञानतेने जग दोषित दिसते. जग जोपर्यंत दोषित दिसते. तोपर्यंत भटकत राहायचे आणि जेव्हा जग निर्दोष दिसेल तेव्हा आपली सुटका होईल.
जाणले तर त्यास म्हटले जाते जाणले तर तेव्हा म्हटले जाते की, कधीही ठोकर लागत नाही. खिसा कापला गेला तरीही ठोकर (दुःख) लागत नाही, आणि थोबाडीत मारले तरीही ठोकर लागत नाही, यास जाणले असे म्हटले जाते. हे तर 'मी जाणतो,' 'मी जाणतो' असे गात राहतो. बाकी 'जाणले' तर त्यास म्हटले जाते की, किंचितमात्र, नावापूरताही अहंकार नसतो. खिसा कापला,
Page #164
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१३७
थोबाडीत मारले तरीही काहीच परिणाम होत नाही. तेव्हाच 'जाणले' असे म्हटले जाते. हे तर खिसा कापला जातो तेव्हा 'माझा खिसा कापला पोलीसाला बोलवा!' अशी बोंबाबोंब करतो. अरे, कशाच्या आधारावर कापला गेला हे माहीत आहे का तुला? ज्ञानी पुरुष जाणतात की कशाच्या आधारावर कापला गेला. ज्ञानींना खिसा कापणारा गुन्हेगार दिसत नाही. आणि यांना तर खिसा कापणारा गुन्हेगार दिसतो. खिसा कापणारा निर्दोष आहे तरी पण तुम्हाला दोषी दिसतो. म्हणून तुम्ही अजून कितीतरी जन्म भटकाल. जे पाहायचे ते पाहिले नाही आणि सर्व उलटेच पाहिले! जो गुन्हेगार नाही त्याला गुन्हेगार पाहिले. पाहा तरी हे असे चुकीचे ज्ञान शिकून आले आहेत!
पण तरी लोक जे धर्म करतात, क्रियाकांड करतात तेही चुकीचे नाही. पण खरी गोष्ट, खरी वास्तविकता तर जाणावी लागेल ना? तो खिसे कापणार तुम्हाला गुन्हेगार वाटतो ना? तर पोलीसांना सुद्धा खिसे कापणारा गुन्हेगार वाटतो आणि मजुरांना सुद्धा तो गुन्हेगार वाटतो, मग यात तुम्ही कोणते नवीन ज्ञान घेऊन आलात? लहान मुलांनाही कळते की, याने खिसा कापला आहे, म्हणून 'हा गुन्हेगार आहे', असे लहान मुलेही म्हणतात. बायका सुद्धा म्हणतात आणि तुम्ही सुद्धा म्हणता. मग तुमच्यात आणि त्या त्यांच्यात काय फरक आहे ? 'मी जाणतो, मी जाणतो' असे म्हणता, पण लोकांजवळ आहे तसेच ज्ञान तुमच्याजवळही आहे ना? त्यास ज्ञान म्हणूच कसे शकतो? दुसरे नवीन ज्ञान तुमच्याजवळ आहेच कुठे? 'ज्ञान' तर असे नसते ना?
कषाय भाव दोष दाखवतात, क्षणभर सुद्धा कुठलाही जीव दोषी झालेला नाही. हे जे दोषी दिसतात ते आपल्याच दोषांमुळे दिसतात. आणि दोषी दिसतात म्हणूनच कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) करतात. नाही तर कषाय करणारच नाहीत ना? दोषी दिसते म्हणजे चुकीचेच दिसते. आंधळा, आंधळ्याला
Page #165
--------------------------------------------------------------------------
________________
१३८
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आपटतो, अशी गोष्ट आहे ही. आंधळी माणसं समोरासमोर आपटतात हे आपण समजून घेतले आणि दूर उभे राहून म्हटले की, 'हे तर
आंधळे आहेत वाटते.' एवढे आपटतात याचे काय कारण? तर त्यांना दिसत नाही म्हणून. बाकी जगात कुठलाही जीव दोषी नाहीच. आणि दोष दिसतो तो तुमचाच दोष आहे. म्हणूनच कषाय टिकून राहिले आहेत.
दुसऱ्यांचे दोष दाखवतो तो कषायभावाच्या पडदा आहे. त्यामुळेच दुसऱ्यांचे दोष दिसतात. शिंगांसारखे कषायभाव असतात, ते वाकवल्याने वाकत नाही.
__ आता क्रोध-मान-माया-लोभ 'कमी करा, कमी करा' असे सांगतात पण ते कमी केव्हा होतील? ते काय कमी होतात? वास्तविकतेचे ज्ञान असेल की कोणीच दोषी नाही, मग तर क्रोध-मान-माया-लोभ कमी करण्याचे काही कारणच उरले नाही ना! दोषी दिसतात म्हणूनच प्रतिक्रमण करावे लागते ना?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : एखाद्यावेळी मागील क्रोध-मान-माया-लोभच्या कारणाने दोषी दिसत असतील तर प्रतिक्रमण करावे लागते. म्हणजे मग क्रोधमान-माया-लोभ निघून जातात.
तिथे कोणावर रागवाल? आता डोंगरावरुन एक ढेकूळ घरंगळत आले व डोक्याला लागले आणि रक्त निघाले, त्यावेळी तुम्ही कोणाला शिवी देता? कोणावर रागावता?
डोंगरावरुन एवढा मोठा दगड पडला तर आधी वर बघतो की कोणी घरंगळवला की काय? तिथे कोणीच दिसत नाही. किंवा मग माकडाने जरी घरंगळवला असेल तरी हरकत नाही. फार तर त्याला पळवून लावाल. त्याला काय शिव्या द्याल? माकडाचे नाव-निशाण काहीच नाही, मग कुठे
Page #166
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
दावा मांडाल? नाव असलेल्यावर दावा मांडू शकतो, पण माकडाचे तर नावही नाही, काहीच नाही. कोणावर दावा मांडाल ? शिव्या कशा देणार ?
१३९
तसे तर मुकामार मार खात असतो पण घरात थोडे जरी वर-खाली झाले तर पूर्ण घर डोक्यावर घेतो! पण तरी भगवंताच्या भाषेत सर्व निर्दोषच आहेत. कारण तो झोपेत करतो, त्यात त्याचा काय दोष? समजा, झोपेत कोणी म्हणाला की, 'तुम्ही माझे घर जाळून टाकले, माझे पुष्कळ नुकसान केले', तर आता झोपेत बोलणाऱ्याला आपण गुन्हेगार कसे ठरवू शकतो ? नाही कोणी शत्रू आता
प्रश्नकर्ता : जग निर्दोष आहे, हे कोणत्या अर्थाने ?
दादाश्री : उघड्या अर्थाने ! जगातील लोक असे नाही का म्हणत की, 'हा माझा शत्रू आहे. माझे याच्याशी जमत नाही, माझी सासू वाईट आहे. पण मला तर सगळे निर्दोषच दिसतात.
प्रश्नकर्ता : पण तुम्ही तर सांगता की, तुम्हाला कोणीच वाईट दिसत नाही.
दादाश्री : कोणी वाईट आहेच कुठे? मग वाईट का बघायचे ? आपण समोरच्याचे सामान (आत्मा) बघायचे ! डबीचे काय काम? डबी पितळ्याची असो किंवा तांब्याची असो किंवा लोखंडाचीही असो ! शत्रू म्हणून पाहिला तर दुःख होईल ना, पण शत्रू म्हणून पाहतच नाही ना आता तर तुमची दृष्टी अशी आहे, चामड्याचे डोळे आहेत, म्हणून हा शत्रू, हा चांगला नाही, हा चांगला आहे. आता हा चांगला आहे नंतर दोन-चार वर्षांनी पुन्हा त्यालाच वाईट म्हणाल. म्हणाल की नाही ?
प्रश्नकर्ता : नक्कीच म्हणतो.
दादाश्री : आणि मला या जगात कोणीही शत्रू दिसत नाही. मला सर्व निर्दोषच दिसतात. कारण माझी दृष्टी निर्मळ झालेली आहे. या चामड्याच्या डोळ्यांनी चालणार नाही, त्यासाठी तर दिव्यचक्षू पाहिजेत.
Page #167
--------------------------------------------------------------------------
________________
१४०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
साप, विंचू सुद्धा आहेत निर्दोष या जगात कोणी दोषी नाहीच. प्रश्नकर्ता : जे काही आहे ते उदयकर्मामुळेच आहे, म्हणूनच ना?
दादाश्री : हो, संपूर्ण जग निर्दोषच आहे. कोणत्या दृष्टीने निर्दोष आहे? तेव्हा म्हणे, जर शुद्धात्मा पाहिला तर निर्दोषच आहे! मग दोषी कोण आहे ? तर बाहेरील पुद्गल ना! ज्याला जग मानते, ते पुद्गल...! आपल्याला काय जाणायचे आहे की, आज हे पुद्गल उदयकर्माच्या अधीन आहे, स्वतःच्या अधीन नाही, स्वत:ची इच्छा नसेल तरीही करावे लागते. तेव्हा तो बिचारा निर्दोषच आहे. म्हणूनच आम्हाला संपूर्ण जग, जीवमात्र निर्दोषच दिसतात. जग निर्दोष स्वभावाचे आहे. संपूर्ण जग निर्दोषच आहे. तुम्हाला दुसऱ्यांचे दोष दिसतात ते तुमच्यात दोष असल्यामुळेच दिसतात. जग दोषी नाही, हे जर तुमच्या दृष्टीत आले तरच तुम्ही मोक्षाला जाल. जग दोषी आहे ही दृष्टी असेल तर तुम्हाला इथेच आरामशीर पडून रहावे.
कोणी जप करत असेल, तप करत असेल तर आपण त्याचा दोष का पाहावा? 'व्यवस्थित शक्ती' च्या ताब्यात जसे असेल, तसे तो बिचारा करतो. त्यात आपले काय देणेघेणे? आपल्याला टीका करण्याचे काही कारण आहे का? आपण त्याच्याबरोबर नवीन करार का करावा? त्याला जसे अनुकूल वाटेल तसे तो करेल. आपले तर मोक्षाशीच काम आहे मोक्षाशिवाय दुसऱ्या कोणाशीही काम नाही. आणि आम्हाला जगात कोणीच दोषी दिसत नाही. खिसा कापणारा सुद्धा दोषी दिसत नाही. म्हणजे जगातील कुठलाही जीव दोषी दिसत नाही. साप असो, विंचू असो किंवा कोणीही असो, जो तुम्हाला दोषी दिसतो त्याची मग तुम्हाला भीती वाटायला लागते. आणि आम्हाला दोषी दिसतच नाही. तो कोणत्या आधारे दोषी नाही, तो आधार आम्ही ज्ञानाने जाणतो. दोषी दिसते ती तर भ्रांतदृष्टी आहे, हो, भ्रांत दृष्टी! हा चोर आहे आणि हा सावकार आहे, हा अमका आहे, ही सर्व भ्रांत दृष्टी आहे. आपले 'लक्ष्य' काय असले पाहिजे की,
Page #168
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१४१
जीवमात्र निर्दोष आहेत. दोषदृष्टीने आपल्याला दोषी दिसते. तेव्हा अजून आपल्या पाहण्यात चूक होत आहे, इतके समजले पाहिजे. वास्तवात कोणी दोषी नाहीच. भ्रांतिमुळे दोष दिसतात.
महावीरांनी सुद्धा पाहिले स्वदोष चोराने तुमचा खिसा कापला तरीही तो तुम्हाला दोषी वाटत नाही, अशी कितीतरी कारणे घडतील तेव्हा मोक्ष होईल. आत्मज्ञान झाल्यानंतर अशी दृष्टी होणार आणि तेव्हाच मोक्ष होईल, नाही तर मोक्ष होत नाही.
पाहायला गेले तर, हे जे दोषी दिसतात, ती तुमची बुद्धी तुम्हाला फसवते. बाकी या जगात कोणी दोषी नाहीच! बुद्धीमुळे आपल्याला असे वाटते की याने आयुष्यभर काहीच पाप केले नाही तरीही त्याच्या नशीबी असे का? तेव्हा म्हणे, नाही, हे तर कितीतरी जन्मांचे पाप, म्हणजे चिकट पाप असतील ते उशीरा पिकतात. (उदयात यातात). आता जर तुम्ही एखादे चिकट कर्म बांधले तर पाच हजार वर्षानंतर ते पाप उदयास येते. कर्म विपाक होण्यास तर बराच टाईम जातो. आणि कित्येक कर्म हलके असतात, ते शंभर वर्षात पिकतात, म्हणून आपले लोक म्हणतात ना की साधा-सरळ माणूस आहे, चांगला माणूस आहे. सरळ माणसाची कर्म चिकट नसतात.
आणि कर्म विपाक झाल्याशिवाय फळ देत नाही. आंब्याच्या झाडावर एवढा मोठा आंबा पण रस निघत नाही. विपाक झाला पाहिजे. हे ज्ञान झाल्यानंतर आम्हाला सुद्धा कोणी मनुष्य, कोणी जीव दोषी दिसला नाही. जेव्हा अशी दृष्टी मिळेल तेव्हा महावीर दृष्टी झाली असे निश्चित होईल. महावीरांच्या दृष्टीत कोणी दोषी दिसत नव्हते. भगवंतांना कानात खिळे ठोकले तेव्हा त्यांना कोण दोषी दिसले होते?
प्रश्नकर्ता : स्वकर्म.
दादाश्री : स्वकर्म दिसले. देवतांनी ढेकूण टाकले, दुसरे केले, तिसरे केले, तरीही दोषी कोण दिसले? तर स्वत:चेच कर्म. स्वकर्म.
Page #169
--------------------------------------------------------------------------
________________
१४२
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
महावीर भगवंतांना त्या लोकांनी (कानात) खिळे ठोकले होते, तेव्हा त्यांनी लगेच ज्ञानात पाहिले की हा कसला परिणाम आला आहे! म्हणजे कानात खिळे ठोकले त्यांनाही निर्दोष पाहिले होते!
जगात कुणाचाही दोष काढण्यासारखा नाहीच. आम्ही कधीच कुणाचा दोष काढीत नाही. कुणाचा दोष नसतोच. भगवंतानी सुध्दा निर्दोष पाहिले मग आपण दोष काढणारे कोण? त्यांच्याहीपेक्षा हुशार? भगवंतापेक्षाही हुशार? भगवंतांनीही निर्दोष पाहिले आहे.
जगात कुणाला दोषी पाहिले नाही, त्याचे नाव महावीर आणि महावीरांचा खरा शिष्य कोण की ज्याला लोकांचे दोष दिसणे कमी झाले आहे. संपूर्ण दशेपर्यंत होत नाही, पण दोष दिसणे कमी होऊ लागले आहेत.
अभेद दृष्टी झाल्याने होतो वीतराग हे जे तुम्हाला दोषी दिसतात त्याचे काय कारण आहे, तर तुमची दृष्टी विकारी झाली आहे. तुझे-माझे करणारी बुद्धी आहे. हे माझे आणि हे तुझे, असा भेद करणारी आहे! जोपर्यंत दोषी दिसतात तोपर्यंत काहीच प्राप्त केले नाही. आम्हाला कोणाशीही दुरावा नाही. ज्याची अभेद दृष्टी झाली, त्याला भगवंत म्हटले जाते. हे आमचे आणि हे तुमचे, हे सर्व सामाजिक धर्म आहेत.या सामाजिक धर्मांनीच गुंतागुंत निर्माण केली आहे, धर्म पाळत जातात आणि चिंता वाढत जाते.
गच्छ-मताची जी कल्पना बाकी, कृपाळुदेवांनी म्हटले आहे की 'गच्छ-मताची जी कल्पना तो नाही सद्व्यवहार.
कल्पना ती मात्र कल्पनाच नाही, पण तेच आवरण स्वरुप झाले आहे. पण तरी भगवंतांनी त्यास धर्म म्हटले. तो त्याच्या जागेवर धर्मातच आहे. तुम्ही शहाणपणा करू नका. तो जे करत आहे, तो त्याच्या जागेवर
Page #170
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१४३
धर्मातच आहे. तेव्हा तुम्ही बुद्धी वापरु नका. 'तुझे चुकीचे आहे,' असे कुणाला कधीही म्हणू नये. यालाच म्हणतात निष्पक्षपाती.
'तुझे चुकीचे आहे' असे आम्ही का सांगत असतो? तर ते तुम्हाला समजावण्यासाठी, आम्ही दुसऱ्या लोकांची गोष्ट करीत आहोत. दुसयांची टीका करण्यासाठी बोलायचे नसते. आणि टीका नसतेच कुठेही, जर टीका असेल तर ते वीतरागांचे विज्ञान नाही. तिथे धर्म नाहीच, अभेदता नाहीच.
हा अमक्या संप्रदायाचा असो की, हा तमक्या संप्रदायाचा असो, पण कुणाचीही टीका नाही. भगवंत काय म्हणतात? निष्पक्षपातीला जर आपण विचारले की, 'साहेब आपले काय मत आहे? हे लोक आम्हाला आंधळे वाटतात.' तेव्हा ते म्हणतील, तुमच्या दृष्टीने काहीही असो पण ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. तेव्हा म्हणे, चोर चोरी करत आहे तर? तर ते त्यांच्या जागेवर खरे आहेत. तुम्ही कशासाठी शहाणपणा करता? तुम्ही फक्त त्याला निर्दोष दृष्टीने पाहा. तुमच्याजवळ जर निर्दोष दृष्टी असेल, तर त्या दृष्टीने तुम्ही पाहा. दुसरे काही पाहू नका. आणि दुसरे पाहिले तर मारले जाल. जसे पाहाल तसे व्हाल. जसे पाहाल तसे तुम्ही व्हाल. यात काय खोटे सांगितले? हे वीतराग समंजस आहेत ना! असे तुम्हाला वाटते ना?
इथे तर हे वैष्णव धर्माचे लोक ' वीतरागांचा धर्म' प्राप्त करण्यासाठी आले आहेत. त्यांना आश्चर्य वाटले की, अहो! वीतरागी असे होते! तेव्हा मी म्हणालो, हो, असे होते वीतरागी. त्यावर ते म्हणाले, असे तर आम्ही कधी ऐकलेच नव्हते. म्हणून तर ते या मंदिरात येतात ना, आणि उल्हासपूर्वक सीमंधर स्वामींचे दर्शन करतात!
प्रश्नकर्ता : ही तर तुम्ही खूप मोठी गोष्ट सांगितली, 'जसे पाहाल तसे व्हाल.'
दादाश्री : हो. तसे पाहाल तर तुम्ही ते रुप होऊन जाल. म्हणून
Page #171
--------------------------------------------------------------------------
________________
१४४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
मी कधीही दुसरे काही पाहिले नाही. कुणालाही दोषी पाहू नये. स्वरुप जे उलट दिसत आहे, त्यास आपण फिरवून सुलट करुन टाकावे की मला असे का दिसले?
आजचे दर्शन आणि मागील जन्माची रेकॉर्ड
आम्हाला संपूर्ण जग निर्दोष दिसते, पण ते श्रध्देत आहे. श्रध्देत म्हणजे दर्शनमध्ये आहे आणि अनुभवात आले आहे की निर्दोषच आहे. पण तरीही जे वर्तनात आहे ते अजून सुटत नाही!
आता एखाद्या संतांची वाईट गोष्ट आली. ते कसेही असोत पण आम्हाला ते निर्दोषच दिसले पाहिजेत. तरी सुध्दा आम्ही बोलतो की, 'ते असे आहेत, असे आहेत, पण असे बोलायला नको. आमच्या श्रध्देत तर ते निर्दोषच आहेत. ज्ञानात आले आहे की निर्दोष आहेत, तरी सुध्दा बोलले जाते. वर्तनात बोलले जाते. म्हणून आम्ही त्यास टेपरेकॉर्ड म्हणत असतो!! टेप रेकॉर्ड झाले, मग आता काय करु शकतो? पण टेपरेकॉर्ड इफेक्टिव आहे ना, म्हणून त्याला (ऐकणाऱ्याला) तर असेच वाटते ना की, हे दादाच बोलले.
प्रश्नकर्ता : आणि हे बोलत असताना, हे चुकीचे घडत आहे असे आत वाटते का?
दादाश्री : हो, बोलताना, ऑन दि मोमेन्ट (त्याचक्षणी) माहीत असते. हे चुकीचे होत आहे, हे चुकीचे बोलले जात आहे.
प्रश्नकर्ता : ते बरोबर आहे पण त्या संतांची ती 'चूक' आहे, असे बोलले जाते त्यावेळी लक्षात असतेच ना की या अपेक्षेने ही त्यांची 'चूक' आहे?
दादाश्री : हो. कोणत्या अपेक्षेने त्यांची 'चूक' म्हटली जाते ते आम्ही जाणतो, पण ती मान्यता तर पूर्वीची होती ना! हे सर्व पूर्वीचे ज्ञान होते. ही आजची टेपरेकॉर्ड नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे पूर्वीचे ज्ञान या टेपला, बोलण्यास मदत करते?
Page #172
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१४५
दादाश्री : हो. आणि आत्ता सुध्दा ती रेकॉर्डच बोलत आहे. पण लोकांना तर असेच वाटते ना की आजच दादा बोलले, आत्ताच दादा बोलले, पण मी जाणतो की हे पूर्वीचे आहे. पण तरी देखील आम्हाला खेद तर होतोच ना ! असे शब्द निघायला नको. एक अक्षर सुद्धा असे निघायला नको.
प्रश्नकर्ता : पण जर तुम्ही जसे आहे तसे बोलला नाहीत तर ऐकणारे सगळे ‘गैरमार्गावर' जातील, असे होऊ शकते ना ?
दादाश्री : ऐकणारे ? पण ही तर बुद्धीचीच दखल ना ! वीतरागतेला तर कसलीच दखल नसते !
प्रश्नकर्ता : पण ऐकणारे तर बुद्धीच्या अधीनच असतात ना ?
दादाश्री : हो, पण माझ्या बुद्धीत आले की यामुळे ऐकणाऱ्याला नुकसान होईल, म्हणजे नुकसान आणि फायदा, प्रॉफिट आणि लॉस बघितले ना? प्रॉफिट आणि लॉस तर बुद्धी दाखवते की समोरच्याचे नुकसान होईल ! तरीसुद्धा आत्ता आम्ही जे संतांविषयी बोललो ते आज उपयोगाचे नाही. पण तेव्हा आम्ही असे मानत नव्हतो की, हे संपूर्ण जग निर्दोष आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे तेव्हा बुद्धीची दखल होती, असेच ना ?
दादाश्री : हो. तेव्हा बुद्धीची दखल होती. म्हणजे ही 'दखल' लवकर जात नाही ना ?
प्रश्नकर्ता : अर्थात सारे वर्तन पूर्वीच्या ज्ञानाच्या आधारावरच आहे ना ?
दादाश्री : पूर्वी जोपर्यंत बुद्धी होती तोपर्यंत हे टोचत होते. पण मग बुद्धी गेल्यानंतर टोचत नाही ना! बुद्धी तर प्रत्येकाला टोचत राहते. नेहमीच, जोपर्यंत बुद्धी आहे तोपर्यंत कम्पेर ॲन्ड कॉन्ट्रास्ट (तुलना आणि तफावत) हे चालतच राहते.
प्रश्नकर्ता : आणि सिध्दांत ठेवला आहे की हे निर्दोष आहे.
Page #173
--------------------------------------------------------------------------
________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : म्हणजे निर्दोष आहे तरी पण हे असे कशामुळे घडते? एकीकडे आम्ही उघडपणे सांगत असतो की संपूर्ण जग निर्दोष आहे आणि दुसरीकडे हे असे शब्द निघतात.
१४६
आश्चर्यकारक अद्भुत पद, अक्रम ज्ञानींचे
हे सर्व ‘सायन्स' आहे. हा 'धर्म' नाही. धर्म तर, जे बाहेर चालत आहेत त्या सर्वांना ‘धर्म' म्हटले जाते. ते रिलेटिव्ह धर्म आहेत. रिलेटिव्ह म्हणजे नाशवंत धर्म आणि हे तर 'रियल', लगेच मोक्षफळ देणारे. लगेचच मोक्षाचा स्वाद चाखवणारे आहे.
असा मोक्षमार्ग चाखला आहे, त्याचा स्वाद घेतला आहे, अनुभवात सुध्दा आला आहे. ‘संपूर्ण जग निर्दोष आहे' असे तुमच्या 'समज' मध्ये आले आहे, आणि महावीर भगवंताच्या तर ते अनुभवात होते. एखाद्या वेळी तुम्हाला काही समजत नसेल आणि काही भानगड झाली, तरी पण लगेच हे ज्ञान हजर होऊन जाते की, यात त्याचा काय दोष? हे तर 'व्यवस्थित' आहे, असे तुम्हाला समजते. निमित्त आहे असेही समजते. सर्व काही समजते.
भगवंताला हे अनुभवात होते. आणि आमच्या समजमध्ये_आहे. समज आमच्यासारखीच असते ना ! एक्जेक्ट हजर, शूट ऑन साईट समज असते, म्हणून हे आमचे 'केवळ दर्शन' म्हटले जाते. तुमचे 'केवळ दर्शन' अजून होत आहे. ‘केवळज्ञान' होऊ शकेल असे तर शक्य नाही, मग आपण त्यास कशासाठी बोलवायचे ? जे होणे शक्य नसेल त्यास जर म्हटले, की 'या, या' तर काय होईल ? 'केवळ दर्शन' हे काय छोटे पद आहे? वर्ल्डचे ‘अद्भुत' पद आहे !!! या दुषमकाळात 'केवळ दर्शन' तर आश्चर्यकारक पद आहे. सुषमकाळात तीर्थकरांच्या वेळी असलेल्या पदापेक्षाही हे पद 'उच्च' म्हटले जाते. कारण आता तर तीन टक्के (गुण) असताना पास केले होते. महावीर भगवंताच्यावेळी तेहतीस टक्के (गुण) असल्यावर पास केले जात होते.
'संपूर्ण जग निर्दोष आहे' असे समजले ना !
Page #174
--------------------------------------------------------------------------
________________
जग निर्दोष
१४७
नाही बघत दादा दोष कुणाचे तुमचे दोष सुद्धा आम्हाला दिसतात पण आमची दृष्टी शुध्दात्म्यावर असते, उदय कर्माकडे दृष्टी नसते. आम्हाला सगळ्यांचेच दोष लक्षात येतात पण त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही, म्हणून कविने लिहिले आहे की,
'मा कदी खोड काढे नही, दादानेय दोष कोईना देखाय नही.'
('आई कधी खोड काढत नाही, दादांनाही कुणाचे दोष दिसत नाहीत.')
मला आता कोणी शिव्या दिल्या आणि नंतर म्हणेल, 'साहेब, मला माफ करा.' अरे भाऊ, आम्हाला माफी द्यायची नसते. माफी तर आमच्या सहज गुणातच असते. आमचा स्वभावच सहज होऊन गेलेला आहे की जो माफीच देत असतो. तू काहीही केलेस तरीही माफीच असते. ज्ञानींचा तो 'स्वाभाविक गुण' बनून जातो. आणि तो आत्म्याचा गुण नाही, आणि देहाचाही गुण, ते सर्व व्यतिरेक गुण आहेत. __या गुणांवरुन आपण अंदाज काढू शकतो की, आत्मा इथपर्यंत पोहोचला. पण तरीही हे आत्म्याचे गुण नाहीत. आत्म्याचे स्वत:चे गुण तर थेट तिथपर्यंत सोबत जातात, ते सर्व गुण आत्म्याचे. आणि व्यवहारात हे जे आम्ही सांगतो ती त्याची लक्षणे आहेत. आपण कुणाच्या थोबाडीत मारले आणि ते आपल्याशी हसत मुख असतील तर आपल्या लक्षात येते की त्यांना सहज क्षमा आहे. तेव्हा आपल्याला समजते की गोष्ट खरी आहे.
तुमची निर्बळता आम्ही जाणत असतो. आणि निर्बळता असतेच. आमची सहज क्षमा असते. क्षमा द्यावी लागत नाही, सहजपणे मिळून जाते. सहज क्षमा गुण म्हणजे अंतिम दशेचा गुण. आमच्याकडे सहज क्षमा असते. एवढेच नाही, पण आम्हाला तुमच्यासाठी निरंतर एकसमान
Page #175
--------------------------------------------------------------------------
________________
१४८
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रेम असते. जे वाढते-घटते ते प्रेम नाही. ती आसक्ति आहे. आमचे प्रेम वाढत-घटत (कमी-जास्त होत) नाही. आणि तेच शुध्द प्रेम, परमात्म प्रेम आहे.
तेव्हा प्रकटते मुक्त हास्य प्रश्नकर्ता : आपले एक जरी अक्षर पोहोचले (समजले) तर निर्दोषता येईल.
दादाश्री : आणि आमचे एक अक्षर पोहोचण्यास वेळही लागत नाही. हे जे ज्ञान दिले आहे ना, म्हणून एक अक्षर पोहोचण्यास वेळच लागत नाही.
__संपूर्ण जग निर्दोष दिसेल तेव्हा मुक्त हास्य उत्पन्न होईल. ओझे नसलेले मुक्त हास्य उत्पन्न होऊच शकत नाही असा नियम आहे. एक जरी माणूस दोषी दिसत असेल, तोपर्यंत मुक्त हास्य उत्पन्न होत नाही. आणि मुक्त हास्य तर मनुष्याचे कल्याण करुन टाकते. मुक्त हास्याचे एकदाच दर्शन केले तरीही कल्याण होऊन जाते! त्यासाठी तर आता स्वतः ते स्वरुप व्हावे लागेल. तुम्ही स्वतः ते रुप झालात तर सर्व ठिक होईल. फक्त पर्सनालिटीच काम करीत नाही, तर स्वत:चे जे चारित्र्य आहे ते सुद्धा खूप मोठे काम करते. म्हणूनच तर शास्त्रकारांनी असे म्हटले आहे की, 'ज्ञानी पुरुष एका बोटावर संपूर्ण ब्रम्हांडाला उचलू शकतात.' कारण चारित्र्यबळ आहे. चारित्र्यबळ म्हणजे काय? निर्दोष दृष्टी. निर्दोष दृष्टी तुम्ही दादांकडून ऐकली आणि अजून तर ती तुमच्या प्रतीतीमध्ये आली आहे. आम्हाला ती अनुभवात असते. तुम्हाला प्रतीती नक्कीच बसली आहे पण अजून वर्तनात येण्यास वेळ लागेल ना? बाकी, मार्ग हाच आहे. मार्ग सोपा आहे आणि काही अडचण येईल असा नाही.
जय सच्चिदानंद
Page #176
--------------------------------------------------------------------------
________________ चिंता (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी भोगतो त्याची चूक 16. मृत्युवेळी, आधी आणि नंतर 2. एडजस्ट एवरीव्हेर 17. सेवा-परोपकार जे घडले तोच न्याय 18. दान संघर्ष टाळा 19. त्रिमंत्र मी कोण आहे? 20. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी क्रोध 21. चमत्कार 22. सत्य-असत्याचे रहस्य प्रतिक्रमण 23. वाणी, व्यवहारात 9. भावना सुधारे जन्मोजन्म कर्माचे विज्ञान 24. पैशांचा व्यवहार 11. पाप-पुण्य 25. क्लेश रहित जीवन 12. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार 26. निजदोष दर्शनाने...निर्दोष ! 13. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार 27. प्रेम 14. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य 28. गुरू-शिष्य 15. मानव धर्म 29. अहिंसा हिन्दी 1. ज्ञानी पुरुष की पहचान 20. प्रेम 2. सर्व दुःखों से मुक्ति 21. माता-पिता और बच्चों का व्यवहार कर्म का सिद्धांत 22. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध 23. दान मैं कौन हूँ? 24. मानव धर्म वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... 25. सेवा-परोपकार 7. भुगते उसी की भूल 26. मृत्यु समय, पहले और पश्चात एडजस्ट एवरीव्हेयर 7. निजदोष दर्शन से... निर्दोष 9. टकराव टालिए 28. पति-पत्नी का दिव्य व्यवहार 10. हुआ सो न्याय 29. क्लेश रहित जीवन 11. चिंता 30. गुरु-शिष्य क्रोध 31. अहिंसा प्रतिक्रमण 32. सत्य-असत्य के रहस्य 14. दादा भगवान कौन? 33. चमत्कार 5. पैसों का व्यवहार 34. पाप-पुण्य 16. अंतःकरण का स्वरूप 35. वाणी, व्यवहार में... 7. जगत कर्ता कौन? 36. कर्म का विज्ञान 18. त्रिमंत्र 37. आप्तवाणी - 1 से 9 और 13 (पूर्वार्ध-उत्तरार्ध) 19. भावना से सुधरे जन्मोजन्म 38. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे। 30; 3
Page #177
--------------------------------------------------------------------------
________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सिनोग्रा पाटीया जवळ, सिनोग्रा गाँव, ता-अंजार. फोन : 9924346622 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट, फोन : (02822) 297097 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा, (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : त्रिमंदिर, बाबरिया कोलेज जवळ, वडोदरा-सुरत हाई-वे NH-8, वरणामा गाँव. फोन : 9574001557 अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामानी पोळ-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, ___ सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 बेंगलूर : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूणे : 9422660497 जालंधर : 9814063043 U.S.A. : (D.B.V.I.) +1877-505-DADA (3232) UAE : +971557316937 U.K. : +44330-111-DADA (3232) Singapore : +6581129229 Kenya : +254722722063 New Zealand: +64210376434 Australia: +61421127947 Website : www.dadabhagwan.org
Page #178
--------------------------------------------------------------------------
________________ या जगातून मुक्त होण्यासाठी... संपूर्ण जग निर्दोषच आहे. मला ते अनुभवास येत आहे. जेव्हा तुम्हाला अनुभवास येईल तेव्हा तुम्ही या जगापासून मुक्त व्हाल. नाही तर जोपर्यंत एक जरी जीव दोषी वाटत असेल तोपर्यंत तुम्ही मुक्त नाहीत. -दादाश्री Printed in India dadabhagwan.org Price Rs40