________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
होते, त्याची स्वत:ला जाणीवही होते. की, ही चूक झाली, पण हे 'व्यवस्थित शक्ती' करते, पण स्वतः निमित्त बनला म्हणून त्याचे आलोचना-प्रतिक्रमण - प्रत्याख्यान केले पाहिजे की, 'असे व्हायला नको' त्याशिवाय चालणारच नाही ना ! वस्तूच पूर्ण वेगळी आहे. करत आहे व्यवस्थित शक्ती. म्हणूनच आपल्या इथे कुणाचाही दोष पाहायचा नसतो ना!
९५
ह्या सत्संगात कुणाची चूक पाहण्याची दृष्टीच सोडून द्या. चूक होतच नसते कुणाचीही. हे सर्व 'व्यवस्थित शक्ती' करीत असते. म्हणून चूक पाहणारी दृष्टीच काढून टाकावी. नाही तर आपला आत्मा बिघडेल. प्रश्नकर्ता: चूक पाहणारी दृष्टी राहिली तर चढलेली पायरी खाली उतरतो ना ?
दादाश्री : माणूस संपूनच जातो! सर्व काही 'व्यवस्थित शक्ती' करीत आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर सर्व 'व्यवस्थित शक्तीच्या' आधारावर होत असते.
व्रजलेपो भविष्यति...
अन्य क्षेत्रे कृतम् पापम् धर्म क्षेत्रे विनश्यति, धर्म क्षेत्रे कृतम् पापम् वज्रलेपो भविष्यति.
बाहेर काही दोष झाला असेल तर त्या दोषाचा इथे (धर्म स्थानात ) नाश होऊ शकतो पण इथे जर पाप केले तर 'वज्रलेपो भविष्यति.' म्हणून मी म्हटले, की ‘धुऊन टाका. ' तेव्हा म्हणतो की, 'हो, मी चुकलो. आता या पुढे कधीही असे होणार नाही.' मी म्हटले, कुणाचाही दोष पाहू नका, इथे नका पाहू, बाहेर जाऊन पाहा. बाहेर पाहिलेले दोष इथे धुतले जातील परंतु इथे पाहिले तर वज्रलेप होऊन जाईल. सहजही कुणाचा दोष पाहू नये. वाटेल तसे वाईट करत असेल, तरीही दोष पाहू नये आणि जर पाहिला गेला तर आपण धुऊन टाकले पाहिजे, नाही तर ते वज्रलेप होऊन जाईल.