________________
६४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
___ मुक्ती प्राप्त करण्यासाठी पाहावे निजदोष
हे जग निर्दोषच आहे कायमसाठी, साप सुद्धा निर्दोष आहे व वाघ सुद्धा निर्दोष आहे. इंदिराजीही निर्दोष आहेत आणि मोरारजीही निर्दोष आहेत, सर्वच निर्दोष आहे. पण तरीही दोष दिसतात ना? दुसऱ्यांचे दोष पाहणे बंद झाले हीच मोक्षाची क्रिया आहे. दोष दिसतात ही संसाराची अधिकरण क्रिया आहे, म्हणून आपलाच दोष, दुसऱ्या कुणाचा दोष नाही. दुसऱ्यांचे दोष पाहणे बंद झाले त्याला मोक्षाचे तिकीट मिळाले. अर्थात स्वत:चे दोष पाहण्यासाठी हे जग आहे. दुसऱ्यांचे दोष पाहिल्यामुळेच जग उभे राहीले आहे. दुसऱ्यांचे दोष कोण पाहतो? तर ज्याला गुरुत्तम बनायचे असेल तोच.
मोक्षात जाणारा नेहमी स्वतःच्या चुका पाहत राहतो आणि दुसऱ्यांच्या चुका पाहणारा संसारात भटकत राहतो. जर कोणी दुसऱ्यांचे दोष पाहत असतील, तर त्याला कंटाळू नका. तो इथे भटकणार आहे म्हणून तो दोष पाहतच राहणार ना, तो भटकणार आहे. आणि त्याने जर असे केले नाही तर तो भटकेल कसा?
___ या, एका गोष्टीवर तुम्हाला जर इथे आवडत असेल तर दुसऱ्यांना दोषी पाहत राहा. संसार आवडत असेल तर जगाला दोषी पाहत राहा आणि जर संसार आवडत नसेल तर एका किनाऱ्यावर या. एका गोष्टीवर स्थिर व्हा. संसार आवडत नसेल तर संसार दोषी नाही, असे तुम्ही पाहत जा. माझ्याच दोषामुळे हे सर्व घडले आहे. एका किनाऱ्यावर तर यावे लागेल ना? विरोधाभास कुठपर्यंत चालेल? महावीर भगवंतांना कुणीही दोषी वाटले नाही. त्यांना तर वरुन देवतांनी येऊन भयंकर त्रास दिला तरी पण त्यांना ते दोषी वाटले नव्हते.
आत असतोच तो दोष जग दोषी दिसू नये, निर्दोष दिसायला पाहिजे.