________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : हे खरे आहे ना की, आपण ज्याला दोषी पाहत असतो, ज्या दृष्टीने दोषी पाहत असतो, ते दोष आपल्यात भरलेले आहेत.
दादाश्री : म्हणूनच दिसते.
प्रश्नकर्ता : आणि जितक्या अंशाने दोष दिसणे कमी होत जाते तितक्या अंशाने दृष्टी स्वच्छ होते, हे खरे आहे का?
दादाश्री : हो, तितके स्वच्छ होते. स्वतःचे गटार दुर्गंध देते आणि दुसऱ्याचे गटार धुवायला जातात
दोष म्हणजे सर्वांच्या गटारी आहेत, बाहेरच्या गटारी आपण उघडत नाही. लहान मुलालाही हा अनुभव असतो. हे स्वयंपाक घर बनवले आहे म्हणून गटार सुद्धा असलेच पाहिजे ना! पण ते गटार उघडू नये. कुणात अमुक दोष असेल, कुणी चिडत असेल, कुणी घांघ्रटपणा करत असेल, ते पाहणे यास गटार उघडणे असे म्हटले जाते. त्यापेक्षा कुणाचे गुण पाहिलेले चांगले. गटार तर स्वत:चेच पाहण्यासारखे आहे. पाणी तुंबले असेल तर स्वतःचे गटार साफ करावे. इथे तर गटार भरले जाते, पण लक्षातच येत नाही! आणि लक्षात आले तरी काय करणार? शेवटी ती सवयच होऊन जाते. त्यामुळेच तर हे सर्व रोग उत्पन्न झाले आहेत. शास्त्र वाचून बोलत राहतो की, 'कोणाचीही निंदा करु नका' पण निंदा करणे तर चालूच असते. कोणाविषयी थोडे जरी वाईट बोलले तर तेवढे नुकसान झालेच समजा! बाहेरच्या गटारांची झाकणे कोणी उघडत नाही पण लोकांच्या गटारांची झाकणे मात्र उघडत राहतात.
एक मनुष्य दरवाजाला लाथा मारत होता. मी विचारले, 'का बरे लाथा... मारतोस?' तेव्हा तो म्हणाला की, कितीही साफ केले तरी दुर्गंधच येतो. बोला आता, हा किती मूर्खपणा म्हटला जाईल! संडासाच्या दरवाजाला लाथा मारल्या तरीही दुर्गंध येतो, यात चूक कोणाची?
प्रश्नकर्ता : लाथा मारणाऱ्याची.