________________
६६
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : ही केवढी मोठी चूक म्हटली जाईल? यात काय त्या बिचाऱ्या दरवाजाचा दोष आहे ? जगात सर्वच लाथा मारुन-मारुन दुर्गंधीला स्वच्छ करायला जातात. पण त्या संडासच्या दरवाजांना लाथा मारुन स्वतःलाच त्रास होतो शिवाय दरवाजेही तुटतात.
आम्ही तुम्हाला काय सांगत असतो की, या देहाचे जे-जे दोष असतील, मनाचे दोष असतील, ते जितके तुम्हाला दिसतील, तितके तुम्ही त्यातून सुटलात. दुसरे म्हणजे तुम्हाला दोष काढण्यासाठी डोकेफोडी करण्याची गरज नाही किंवा संडासाचे दारही आपटत राहण्याची गरज नाही. संडासाच्या दाराला लाथा मारल्यामुळे दुर्गंध येणे थांबते का? का नाही थांबत? त्याने लाथा मारल्या तरीही थांबणार नाही? बोंबा मारल्या तरी?
प्रश्नकर्ता : नाही थांबत.
दादाश्री : संडासाला काही फरक पडत नाही ना? अशाप्रकारे हे लोक डोकेफोड करतात, बिन कामाची डोकेफोड ! नवीन काहीही दळले नाही आणि जे आधीचे दळलेले होते तेही उडवून टाकले, भरडून, भरडून! असे केल्याने तर दळलेले सर्व उडूनच जाईल ना! नवीन दळलेले तर जाऊ द्या पण जे पूर्वी दळलेले होते तेच परत दळायला घेऊन तेही उडवून टाकले! हातात काहीच उरले नाही. हे जे मनुष्य जीवन दिसते ना, ते दोन पायांऐवजी चार पाय होतील असे झाले आहे. बोला आता किती फायदा झाला?
दृष्टी अभिप्राय रहित दोष पाहणे बंद करा ना!
प्रश्नकर्ता : जर दोष पाहिले नाहीत तर, जगाच्या दृष्टीने आपण एक्सेस फूल (जास्त मूर्ख) नाही का ठरणार?
दादाश्री : म्हणजे दोष पाहिल्याने आपण सफळ होतो असे म्हणायचे आहे का?