________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
जिथे ज्ञान अडकून राहिलेले आहे, तिथे नशा वाढते. नशेमुळे ज्ञानावरण आणि दर्शनावरण दूर होण्याचे थांबले आहे. मोक्षाला जाण्यासाठी इतर कुठलीही वस्तू बाधक नाही. सर्वात मोठे भयस्थान स्वच्छंद आणि नशा हेच आहे!
नाही दिसले स्वतःचेच दोष स्वत:चे दोष दिसतात का तुम्हाला? प्रश्नकर्ता : स्वत:चे दोष शोधण्याचीच गरज आहे आम्हाला. दादाश्री : हो, पण ते का दिसत नाहीत?
प्रश्नकर्ता : आम्ही संसाराच्या रहाटगाड्यात अडकलेलो आहोत, त्यामुळे दैनंदिन कामकाजातच गुंतलेलो असतो, म्हणून दिसत नाहीत.
दादाश्री : नाही, बघण्यात काही तरी चूक होत आहे. स्वत:च जज आहे, आणि आरोपी म्हणजे गुन्हा करणाराही स्वतः आहे आणि जवळ जो वकील उभा केला आहे तो वकील सुद्धा स्वतःच बनतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे स्वतःचे खोटे रक्षण करतो.
दादाश्री : हो, सर्व ठिकाणी रक्षणच केले आहे. हो, बस, दुसरे काही केलेच नाही. अगदी खोट्या रितीने बचाव केला सर्व गोष्टींचा.
जग उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहे, म्हणून मग दोष कसे दिसतील? तुझे दोष तुला दिसत नाहीत. मनुष्य स्वत:चे दोष कसे पाहू शकेल?
प्रश्नकर्ता : थोडे स्थूल दोष दिसतात, सूक्ष्म दिसत नाहीत.
दादाश्री : दोष का दिसत नाहीत? 'आत आत्मा नाही?' तेव्हा म्हणे, आत्मा आहे, म्हणजे जज आहे, जज! अहंकार आरोपी आहे. अहंकार आणि जज (आत्मा) दोनच असतील, तर सर्व दोष दिसतात,