________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बरेच दोष दिसतात, पण हे तर आत वकील (बुद्धी) ठेवला आहे, म्हणून वकील म्हणतो की, 'हे सगळे देखील असेच करतात ना!' म्हणजे पूर्णपणे दोषाला उडवून टाकले. वकील ठेवतात हे तुम्हाला माहीत आहे का ? सर्वच वकील ठेवतात. स्वतः जज, स्वतः आरोपी आणि स्वतःच वकील. बोला, आता कल्याण होईल का ?
प्रश्नकर्ता : नाही होणार.
दादाश्री : उलट-सुलट काहीही करुन वकील निपटवून टाकतो. असे घडते की नाही ?
प्रश्नकर्ता : हो घडते.
दादाश्री : दिवसभर तेच ते वादळ. आणि त्याचीच ही सर्व दुःखं आहेत. बोला, आता स्वतःच्या किती चुका बाहेर येतील ? स्वतःच्या किती चुकांचे स्टेटमेन्ट (विवरण) देऊ शकेल ?
प्रश्नकर्ता : मग तो काय स्टेटमेन्ट देतो ?
३९
दादाश्री : डोक्यावर जेवढे केस आहेत ना, तेवढ्या चुका आहेत. पण स्वत:च जज, स्वतःच वकील आणि स्वतःच आरोपी, तेव्हा मग चुका कशा सापडतील? निष्पक्षपाती वातावरण उत्पन्न होत नाही ना ! निष्पक्षपाती वातावरण उत्पन्न झाले तर मोक्ष सरळ आहे. मोक्ष काही दूर नाही. हा तर खूप पक्षपात आहे.
जर दुसऱ्यांच्या चुका काढायच्या असतील तर लगेच काढतो. त्यासाठी तो न्यायाधीश आहे, थोडाफार, अल्पांशाने पण स्वत:च्या चुका काढण्यासाठी मुळीच न्यायाधीश नाही. म्हणजे स्वतः जज, स्वतः वकील आणि स्वत:च आरोपी, मग कसे जजमेन्ट येईल ? स्वतःच्या फायद्याचेच येईल.
प्रश्नकर्ता : सोयीस्कर, बस ! स्वतःची सोय होईल तसे जजमेन्ट शोधून काढतो!