________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : म्हणून तर संसार कधी सुटतच नाही ! एकीकडे तुम्ही सोयीस्कर करत राहता आणि दुसरीकडे तुम्हाला निर्दोष व्हायचे आहे, हे तर शक्यच नाही ना! वकील नसेल तरच स्वतःचे दोष समजतील पण आजचे लोक वकील ठेवल्याशिवाय राहत नाहीत ना ! वकील ठेवतात की नाही लोक ?
४०
हे ज्ञान दिल्यानंतर लगेचच समजते की ही चूक झाली, कारण आता वकील राहिले नाही. वकील घरी गेले, रिटायर झाले. गुन्हेगार तर आहेत अजून पण वकील राहिले नाही.
या चुका जर संपल्या तर स्वतःचे भगवत्पद प्राप्त होऊ शकेल असे आहे. या चुकांमुळे जीवपद आहे आणि चुका संपल्या तर शिवपद प्राप्त होईल.
जगातील लोकांनी स्वतः चे दोष पाहिले नाहीत, म्हणूनच हे दोष टिकून राहतात, निवांतपणे मुक्काम करतात! तसे तर तो म्हणेल की मला माझे दोष मिटवायचे आहेत, पण दोष तर आत पाया रोवून राहण्यासाठी घर बांधत असतात. सिमेंट टाकून पाया रोवत असतात. दोष हे जाणतात की हा मुर्ख काहीही करणार नाही. तोंडाने बोलतो इतकेच, तो दोष काढणार तरी कसा ?
जो एक दोष संपवू शकतो तो भगवंत होतो !!! एकच दोष ! एका दोषाचे निवारण करतो तो भगवंत होतो. आणि इथे तर दोषाचे निवारण होते पण दुसरा दोष उभा करुन ! दुसरा (नवीन) दोष तयार करुन पहिल्या दोषाचे निवारण करतो. बाकी स्वतःची एक जरी चूक संपवली तरी भगवंत बनू शकतो.
प्रश्नकर्ता : दुसरा दोष उभा होणारच नाही, हे कसे शक्य होऊ शकेल ?
दादाश्री : या सर्व चुकाच आहेत पण एक चूक संपते, ती केव्हा ?