________________
१०६
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
सुद्धा. शुद्धात्म्याने प्रतिक्रमण कशाला करायचे? जो अतिक्रमण करीतच नाही त्याने कशाला प्रतिक्रमण का करायचे? हे तर ज्याने केले त्यालाच सांगायचे, तुम्ही करा. संपूर्ण सिद्धांत लक्षात ठेवावा लागेल. आणि तो लक्षात राहतो सुद्धा. लिहिले तर विसरायला होते. संपूर्ण सिद्धांत लक्षात राहतो ना? हो.. ते वयामुळे सत्संगात थोडे कमी येतात पण तरी त्यांना सर्व तोंडपाठ, सर्व लक्षात राहते. आपल्याला तर कामाशी काम आहे ना? आपल्याला तर सुटण्याशीच काम.
प्रश्नकर्ता : मला तर तुमची एक गोष्ट खूप आवडली होती. तुम्ही तिथे औरंगाबादला बोलला होतात.
दादाश्री : हो.
प्रश्नकर्ता : की माझे प्रतिक्रमण दोष होण्यापूर्वीच होऊन जातात. दोष होण्यापूर्वीच तुमचे प्रतिक्रमण पोहोचतात.
दादाश्री : हो, हे प्रतिक्रमण शुट ऑन साईट. दोष होण्यापूर्वी आपोआप चालू होऊन जातात. आपल्याला समजत सुद्धा नाही की हे कसे सुरु झाले?! कारण हे जागृतीचे फळ आहे.
आवरण तुटल्याने दोष दिसतात चुका दिसत नव्हत्या. आत्मा प्रकट झाला नव्हता म्हणून चुका दिसत नव्हत्या. आणि आता तर इतक्या साऱ्या चुका दिसतात, त्याचे कारण काय? तर आत्मा प्रकट झाला आहे.
प्रश्नकर्ता : सुरूवातीला जेव्हा आम्हाला चुका दिसत नव्हत्या, तेव्हा काय आमचा आत्मा प्रकट झाला नव्हता?
दादाश्री : प्रकट तर झाला होता पण हळूहळू चुका दिसतील असे मी करत होतो, आवरण तोडत होतो.
जितके दोष उत्पन्न होतात तितके दोष दिसल्याशिवाय राहत नाही,