________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर....
आवडत नाही. ‘चंदुभाऊ असे करतो, ' हा चंदुभाऊचा दोष पकडला गेला. पकडले जातात की नाही सर्व दोष ?
१०५
प्रश्नकर्ता : पकडले जातात. पण दादा, तुमचे वाक्य मला आवडले होते. दोष दिसला आणि गेला. दिसला म्हणजे गेला.
दादाश्री : दोष दिसला म्हणजे गेला. म्हणूनच शास्त्रकारांनी सांगितले, महावीर भगवंतांनी सांगितले की, दोषाला पाहा. दोषातच एकाग्रता झाल्यामुळे दोषास पाहिले नाही, आंधळा बनून राहिलास म्हणून दोष तुला चिकटला. तर आता त्या दोषाला तू पाहिलेस तर तो निघून जाईल. तो काय दावा मांडतो ? हे पुद्गल आपल्याला सांगते की, 'तुम्ही तर शुद्धात्मा झालात पण मग माझे काय ?' तेव्हा आपण म्हणतो की,
4
'आता मला तुझ्याशी काय देणेघेणे ?' तेव्हा म्हणे, 'नाही, असे चालणार नाही. हे तुम्हीच बिघडवले होते, म्हणून जसे होते तसे पूर्ववत करुन द्या. नाही तर तुमची सुटका होणार नाही.' मग सुटका कशी होईल ? तेव्हा म्हणे तुम्ही अज्ञानतेने पाहिले त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत बांधले गेलो आणि आत्ता ज्ञानाने पाहाल तर आम्ही सुटून जाऊ. म्हणून ज्ञानापूर्वक त्या दोषाला पाहिल्याशिवाय तो दोष जात नाही. अज्ञानाने बांधलेले ज्ञानद्वारे सुटते. म्हणून आपण पाहिले. ज्ञान म्हणजे पाहणे, पाहिले की सुटले. मग वाटेल तसा दोष असो पण तरीही हे अक्रम विज्ञान आहे... क्रमिकमार्ग समजदारीपूर्वकचा मार्ग असतो. त्यात सर्व सोडत - सोडत आलेला असतो आणि इथे अक्रममार्गात सोडत सोडत आलेला नसतो. म्हणून कुणाला दुःख होईल असे बोलले गेले तर चंदुभाऊला सांगावे की, 'प्रतिक्रमण करा, असे का करता ?'
प्रश्नकर्ता: शूट ॲट साईट, लगेच.
दादाश्री : हो, पूर्ण दिवस नाही, पण जेव्हा आपल्याला असे वाटत असेल की हा दोष झाला, समोरच्या व्यक्तीला दुःख होईल असे आपण बोललो त्याचे प्रतिक्रमण करायचे. आणि आपले महात्मा तसे करतात