________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बुद्धीच्या वकिलीने जिंकतात दोष जागृत झाल्यावर सर्वच लक्षात येते की इथे आपली चूक होत आहे, अशी चूक होत आहे. नाहीतर स्वतःला स्वतःची एकही चूक सापडत नाही. फक्त दोन-चार मोठ्या चुकाच तेवढ्या दिसतात. स्वतःला दिसतील तेवढ्याच. कधी असे बोलतातही की, थोडासा क्रोध आहे आणि जरासा लोभही आहे, असे बोलतातही पण जर आपण त्यांना सांगितले की 'तुम्ही क्रोधी आहात.' तेव्हा स्वतःच्या क्रोधाचे रक्षण करतात, बचाव करतात. आमचा क्रोध हा क्रोध गणला जात नाही अशी वकिली करतात. आणि ज्याची वकिली कराल, तो नेहमी तुमच्यावर वर्चस्व गाजवतो.
जगातील सर्व लोकांना क्रोध-मान-माया-लोभ काढायचे आहेत. काढण्याची इच्छा कोणाला नसेल? हे सर्व शत्रूच आहेत, असे सर्व जाणतात, तरी सुद्धा रोज जेवू घालतात आणि दोषांना वाढवतात. स्वतःची चूक दिसतच नाही. तेव्हा मग मनुष्य चुकांना खतपाणीच देईल ना!
ज्ञानी स्वीकार करतात, निजदोषांचा... चूक झाली असेल, पण त्याचे आयुष्य कशाप्रकारे वाढते ते मी जाणत होतो. म्हणून मी काय करायचो? सर्व बसले असतील आणि तिथे कोणी येऊन म्हणेल की 'मोठे ज्ञानी होऊन बसले आहात पण तुमचा हुक्का तर सुटत नाही.' असे बोलेल ना, तेव्हा मी म्हणायचो की, 'महाराज हा एवढा आमचा कमकुवतपणाच आहे, हे मी जाणतो.' तुम्हाला तर हे आज कळले पण मला तर हे आधीपासूनच माहीत आहे. आणि मी जर असे म्हणालो की, 'आमच्यासारख्या ज्ञानींना काही स्पर्शत नाही.' झाले मग! तो हुक्का समजून जातो की इथे आपले वीस वर्षांचे आयुष्य वाढले! कारण मालक चांगले आहेत, कसेही करुन आपले रक्षण करतात. असा काही मी कच्चा नाही. मी कधीही चुकांचे रक्षण केले नाही. लोक रक्षण करतात की नाही करत?
प्रश्नकर्ता : हो करतात, खूप जोरदार रक्षण करतात.