________________
११०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : त्याने काही उलट-सुलट केले तर प्रतिक्रमण करण्यास सांगावे लागेल का?
दादाश्री : हो, ते सर्व सांगावे लागेल. 'तुम्ही नालायक आहात' असे सांगा. हो, असे सुद्धा सांगू शकता. पण फक्त चंदुभाऊसाठीच दुसऱ्यांसाठी नाही. कारण ती तुमची फाईल नंबर वन, तुमची स्वतःची, दुसऱ्यांसाठी हे नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे फाईल नंबर वन (स्वतः) दोषी असेल तर त्याला दोषी मानावे, त्याला रागवावे.
दादाश्री : सर्व प्रकारे रागवावे, त्याच्यावर प्रिज्युडीस (पूर्वग्रह) सुद्धा ठेवावा की 'तू असाच आहे, मी जाणतो तुला'. त्याला रागवावे सुद्धा, कारण आता निकालच करायचा आहे
करायचे नाही, मात्र पाहायचे प्रश्नकर्ता : पण दुसरी कोणी व्यक्ती असेल, फाईल नंबर दहा, तर त्याला दोषी पाहायचे नाही. तो निर्दोष आहे असे?
दादाश्री : निर्दोष! अरे, आपली फाईल नंबर दोन (पत्नी) सुद्धा निर्दोष आहे! कारण आपला गुन्हा काय होता? तर सगळ्यांना दोषी पाहिले पण या चंदुभाऊचा (स्वतःचा) दोष पाहिला नाही. त्या गुन्ह्याचे हे रिअॅक्शन आले आहे. अर्थात गुन्हेगार पकडला गेला. दुसरे कोणी गुन्हेगार नाहीच.
प्रश्नकर्ता : म्हणजे उलट पाहिले गेले.
दादाश्री : आजवर उलटच पाहिले. आत्ता सुलट पाहिले. ही गोष्ट समजूनच घ्यायची आहे. करायचे काहीच नाही. वीतरागांनी सांगितलेले फक्त समजून घ्यायचे त्यात करायचे काहीच नसते. असे समंजस होते वीतराग! जर करायचे असते तर मनुष्य बिचारा थकून गेला असता!