________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
बोलू शकत नाही, आपल्याच गुन्हामुळेच समोरचा बोलत असतो. प्रत्येक वेळी तुमचाच गुन्हा असतो पण तो तुमचा गुन्हा तुम्हाला समजत नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्यांचा गुन्हा पाहता. दुसऱ्यांचा दोष पाहणे ही सर्वात मोठी अज्ञानता आहे ! आम्ही नेहमीच सांगत असतो की, संपूर्ण जग निर्दोष आहे आणि तरीही तुम्ही दोष काढत राहिले तर मूर्खपणाच म्हटला जाईल ना? तुला नाही का वाटत की ही थियरी वीतरागांची आहे?
प्रश्नकर्ता : एक्जेक्ट वीतरागांची थियरी!
दादाश्री : स्वत:चे दोष पाहणारी माणसे जिंकली, मोक्षाला निघून गेली. आपल्या दोषाशिवाय आपल्याला कोणी काही बोलूच शकत नाही! तेव्हा जागृत राहा.
प्रश्नकर्ता : दादाजी, आपले शब्द लगेच क्रियाकारी होऊन उभे राहतील.
दादाश्री : हे सर्व शब्द क्रियाकारीच असतात, परंतु आपण जर या शब्दांना आत शिरु दिले तर. शिरुच दिले नाही, मग काय होईल?
'ज्ञान' प्राप्तीनंतरची परिस्थिती साप, विंचू, सिंह, वाघ, दुश्मन कोणीही तुम्हाला दोषी दिसले नाही, त्यांचा दोष नाही असे जर दिसले, अशी दृष्टी झाली, म्हणजे तुमचे कल्याण झाले. आणि ती दृष्टी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्हाला या जगात कोणीही दोषी दिसणार नाही.
प्रश्नकर्ता : ही दृष्टी प्राप्त झालीच आहे.
दादाश्री : मग इथेच मोक्ष सुख उपभोगतो. इथे आनंदच राहतो. जोपर्यंत दुसऱ्यांचे दोष दिसतात तोपर्यंतच दुःख राहते. दुसऱ्यांचे दोष दिसणे बंद झाले म्हणजे सुटका झाली.
प्रश्नकर्ता : कधी तरी बायकोवर रागावतो, तर त्यास दोष पाहिले असे म्हटले जाईल का?