________________
निजदोष दर्शनाने... निर्दोष
विश्वाच्या वास्तविकता
प्रश्नकर्ता: दादा, जगाच्या वास्तविकतेबद्दल काहीतरी सांगा..
दादाश्री : जगातील लोक व्यवहारात दोन प्रकारे राहतात, एक लौकिक भावाने आणि दुसरे अलौकिक भावाने. जगाचा बहुतांश भाग लौकिक भावानेच राहतो, की देव वर आहे व देवच सर्व काही करतो. आणि पुन्हा स्वत:ही करत जातो, देवही करत जातात. यात त्यांना काही विरोधाभास सुद्धा वाटत नाही. त्यांना देव डोक्यावर असेल तर भीती वाटत राहते की 'खुदा ये करेगा और वो करेगा.' अशा प्रकारे त्यांची गाडी चालत राहते.
परंतु जो अत्यंत विचारवंत असेल, ज्याला स्वतःच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचे ओझे नको असेल, तर त्याच्यासाठी खरी वास्तविकता ही अलौकिकच असायला हवी ना ? अलौकिकतेमध्ये कोणीही उपरी (वरिष्ठ) नाहीच. जगात तुमच्या चुकाच तुमच्या वरिष्ठ आहेत. तुमचे ब्लंडर्स (मूळ चूक) आणि मिस्टेक्स (सामान्य चुका) हे दोनच वरिष्ठ आहेत. दुसरे कोणीच वरिष्ठ नाही.
आपला वरिष्ठ कोण ?
असे कोण म्हणू शकेल? तेव्हा ओहोहो ! हे किती निडर असतील ? आणि भीती कशाची ठेवायची ? माझा असा शोध आहे की तुमचा वरिष्ठ कोणीच नाही, या जगात ! आणि ज्यांना तुम्ही वरिष्ठ मानता, भगवंताला,