________________
१३०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
काय आहे ? तेव्हा म्हणे, 'जगात कोणताही मनुष्य दोषी नाहीच. मनुष्यही दोषी नाही आणि वाघ सुद्धा दोषी नाही.' म्हणजे या उत्तरावरुन पूर्ण रक्कम शोधून काढायची.
उत्तर काय आहे, तर हे जग संपूर्ण निर्दोष स्वरुपात आहे. जीवमात्र निर्दोष आहे. दोषी दिसते ते स्वत:च्या अज्ञानतेमुळे. बोला आता, किती चुकीच्या धारणेत आहात तुम्ही?
प्रश्नकर्ता : खूपच चुकीच्या.
दादाश्री : जेव्हा जग निर्दोष दिसेल, तुमचा खिसा कापत असेल तरीही ती व्यक्ती तुम्हाला निर्दोष दिसत असेल, तेव्हा समजावे की करेक्टनेस (यथार्थता) वर आपण आलोत.
एक रक्कम तुम्ही धराल? शाळेत शिकत असताना अंकगणितात शिक्षक शिकवतात ना की काही जमत नसेल तर सपोज (समजा की) १०० असे सांगतात ना? असे नाही का सांगत की मनात १०० हा आकडा धरा तेव्हा उत्तर येईल. तेव्हा आपल्याला वाटते की, शिक्षकांनी १०० वर काही जादू केलेली दिसतेय. मग आपण म्हणू की नाही मी तर सव्वाशे धरेल. तेव्हा ते सांगतील, तुला धरायची असेल ती धर ना! असे धरल्यानेही उत्तर मिळेल असे आहे.
अशी एक रक्कम मी तुम्हाला धरण्यास सांगू का? या जगात कोणीही दोषी नाही. संपूर्ण जग निर्दोषच आहे. तुम्हाला दोष दिसतात का?
प्रश्नकर्ता : पाहिले तर दिसतात.
दादाश्री : खरोखर दोष नाहीच. तरीही दोष दिसतात, ती आपली अज्ञानता आहे. लोकांचे किंचितमात्र दोष दिसतात ती आपली अज्ञानता आहे.