________________
जग निर्दोष
१३१
ही रक्कम धरली आणि ही रक्कम धरुन उत्तर आणले तर उत्तर येईल असे आहे. जगात कोणीच दोषी नाही. तुमच्या दोषानेच तुम्हाला बंधन आहे. दुसऱ्या कुणाचा दोष नाहीच. कोणी तुमचे नुकसान केले, कोणी शिव्या दिल्या, अपमान केला त्यात त्याचा दोष नाही, दोष तुमचाच आहे.
दृष्टीनुसार सृष्टी प्रश्नकर्ता : कधी असेही घडते की, जी व्यक्ती आज आम्हाला चांगली वाटते तीच उद्या तिरस्कारयुक्त वाटते. परत तिसऱ्या दिवशी तीच व्यक्ती आम्हाला मदत करणारी वाटते. तर असे का वाटते?
दादाश्री : त्या व्यक्तीत आपल्याला जो बदल दिसतो तो आपला रोग आहे. व्यक्तीत बदल होतच नाही. म्हणून जो बदल दिसतो तो आपलाच रोग आहे. आणि अध्यात्म हेच सांगते ना! अध्यात्म काय सांगते? तुला पाहताच येत नाही. मग उगाचच बायकोचा नवरा होऊन का बसला आहेस? अर्थात आपल्याला पाहता येत नसल्यामुळे असे सर्व घडत असते. बाकी ही फॅक्ट (खरी) वस्तू नाही.
स्वतःसाठी समोरची व्यक्ती काय मानत असेल, ते कसे समजणार? तुमच्यासाठी एखादी व्यक्ती अभाव व्यक्त करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीसाठी काय वाटते?
प्रश्नकर्ता : अभाव व्यक्त केला तर वाईट वाटते.
दादाश्री : मग तुम्ही दुसऱ्यांसाठी अभाव व्यक्त केला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : हे एक कोडेच आहे की, यांच्यात मला चांगला भाव दिसतो आणि या त्यांच्यात मला वाईट भाव दिसतो?
दादाश्री : नाही, हे कोडे नाही. आम्ही जाणतो की हे काय आहे, म्हणून आम्हाला कोडे वाटत नाही. एक व्यक्ती मला रोज विचारत असे