________________
१३२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
की, या माणसासाठी मला वाईट भाव का येतात? मी सांगितले, 'त्या माणसाचा दोष नाही, तुमचा दोष आहे.'
प्रश्नकर्ता : पण आपण जर वाईट असू तर सगळेच वाईट दिसायला हवेत.
दादाश्री : आपणच वाईट आहोत म्हणूनच हे वाईट दिसते. कोणीही वाईट नाहीच. वाईट दिसते ते तुमच्याच वाईटपणामुळे वाईट दिसते. भगवंताने हाच शोध लावला आणि तुम्ही जे चांगले म्हणतात तोही तुमचा मूर्खपणा आहे, फूलीशनेस आहे. चांगले-चांगले म्हणतो आणि जेव्हा आपण विचारु तेव्हा म्हणेल, 'माझा विश्वासघात केला.' पण मग तू चांगले-चांगले का म्हणत होतास? आज चांगले म्हणेल आणि दहा वर्षांनंतर म्हणेल की, माझा विश्वासघात केला, असे घडते की नाही?
प्रश्नकर्ता : असे घडतेच ना!
दादाश्री : आणि असे जे चुकीचे दिसते ते चांगले आहे असेही मानू नका.
जग निर्दोष अनुभवात... प्रश्नकर्ता : समोरचा निर्दोष दिसेल अशी जागृती सतत राहिली पाहिजे ना?
दादाश्री : निर्दोष पाहायला अजून तुम्हाला बराच वेळ लागेल. पण तरी दादांनी सांगितले आहे म्हणून कदाचित तुम्हाला निर्दोष दिसेलही, पण ते फक्त सांगितल्यामुळेच दिसेल. तुम्हाला एक्जक्ट निर्दोष दिसणार नाही.
प्रश्नकर्ता : मग आम्हाला असा अनुभव येणारच नाही? दादाश्री : आत्ताच तुम्हाला अनुभव येणार नाही.
प्रश्नकर्ता : आणि जर आम्ही मनात असे मानले की हो, ते निर्दोषच आहेत तर?