________________
७४
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आणि प्रतिक्रमण केल्यानंतर ते निघून जातात. आणि कित्येक दोष तर इतके चिकट असतात की त्यांचे पुन्हा-पुन्हा प्रतिक्रमण करावे लागतात. लोक म्हणतील की तोच दोष पुन्हा-पुन्हा का होत आहे? तेव्हा म्हणे हो भाऊ, पण त्याचे कारण त्यांना समजत नाही. दोष तर पाकळ्यांसारखे आहेत, अनंत आहेत. म्हणून जे दोष दिसतात त्यांचे प्रतिक्रमण केले तर ते धुतले जातात.
प्रश्नकर्ता : एकीकडे आपण म्हणतो की हे ज्ञान क्रियाकारी आहे आणि दुसरीकडे काही चूक झाली तर त्यास निकाली भाव म्हणतो तर ही एडजस्टमेन्ट म्हटली जाणार ना?
दादाश्री : या सर्व निकाली गोष्टीच आहेत. या सर्व गोष्टी निकाली आहेत, म्हणून ग्रहणही करु नये व त्यागही करु नये. त्यागात तिरस्कार होत असतो, द्वेष होत असतो आणि ग्रहण करण्यात राग (अनुराग) होत असतो आणि या सर्व तर निकाली गोष्टी आहेत! __तुमच्यात दोष आहे असे तुम्हाला का दिसते! याचा पुरावा काय? तर म्हणे चंदुभाऊ कोणावर रागावले ते तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही, याचा अर्थ तुम्हाला चंदुभाऊचा दोष दिसला. असे दिवसभर जे आवडत नसतील असे सर्व दोष तुम्हाला आता दिसू लागले.
गुन्हेगारी, पाप-पुण्याची हे जग 'व्यवस्थित' आहे. 'व्यवस्थित शक्ती' आपली जी गुन्हेगारी होती ती पुन्हा आपल्याजवळ पाठवते. तेव्हा तिला येऊ द्यावे आणि आपण आपल्या समभावात राहून तिचा निकाल करावा. मागील जन्मी ज्या-ज्या चुका केल्या त्या सर्व ह्या जन्मात समोर येतात, म्हणून आपण या जन्मात जरी सरळ वागलो तरी त्या चुका आपल्याला नडतात, याचेच नाव गुन्हेगारी!
ही गुन्हेगारी दोन प्रकारची आहे. आम्हाला फुले वाहिली तीही