________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
या भानगडीत मी कशाला पडू? अर्थात जगाचा नियमच असा आहे की, ज्याला स्वत:च्या सगळ्याच चुका दिसतील तेव्हा मग त्याचा वरिष्ठ कोणीच नसेल. म्हणून तर आम्ही सांगतो ना, की कोणी बापही आमचा वरिष्ठ नाही. उलट भगवंतच आम्हाला वश झाले आहेत. 'आम्हाला' तर प्रत्येक चूक, स्वत:ची किंचित्मात्र चूक, केवळज्ञानात दिसणाऱ्या चुका सुद्धा आम्हाला दिसतात. बोला आता, केवळज्ञान वर्तत नाही, आणि तरीही केवळज्ञानात दिसणाऱ्या चुका आम्हाला दिसतात!
दृष्टी निजदोषां प्रति हे ज्ञान घेतल्यानंतर बाहेरचे तर तुम्ही पाहाल, ती वेगळी गोष्ट आहे पण तुमच्याच आतील सर्व तुम्ही पाहत राहाल त्यावेळी तुम्ही केवळज्ञान सत्तेत असाल, पण ते अंश केवळज्ञान असते, सर्वांश नाही. आत वाईट विचार येतील त्यांना पाहायचे, चांगले विचार येतील त्यांना पाहायचे. चांगल्यावर राग (अनुराग) नाही आणि वाईटावर द्वेष नाही. चांगले-वाईट पाहण्याची आपल्याला गरज नाही. कारण मूळ सत्ताच आपल्या ताब्यात नाही, म्हणून ज्ञानी काय पाहतात? संपूर्ण जगाला निर्दोष पाहतात. कारण हे सर्व 'डिस्चार्ज' मध्ये आहे. त्यात त्या बिचाऱ्यांचा काय दोष? तुम्हाला कोणी शिवी देतो, ते डिस्चार्ज आहे, बॉस तुम्हाला अडचणीत टाकतो, ते सुद्धा डिस्चार्जच आहे. बॉस तर निमित्त आहे. जगात कुणाचाही दोष नाही. दोष दिसतो ती स्वत:चीच चूक आहे आणि हेच ‘ब्लंडर्स' आहेत आणि त्यामुळेच हे जग टिकून राहिलेले आहे. दोष पाहिल्याने, चुकीचे पाहिल्यानेच वैर बांधले जाते.
प्रमत्त भावाने दिसतात परदोष जगात कोणीही गुन्हेगार नाही. कोणी गुन्हेगार दिसत असेल तर ती आपलीच कमतरता आहे. कोणी गुन्हेगार दिसतो हाच तुमचा प्रमत्त भाव आहे. खरे तर अप्रमत्तता असली पाहिजे. मग कोणी गुन्हेगार दिसणारच नाही.