________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
प्रश्नकर्ता : प्रमत्त भाव म्हणजे काय?
दादाश्री : वस्तु, वस्तूचा स्वभाव चुकते त्यास प्रमत्त म्हणतात. वस्तू त्याच्या मूळ धर्मात राहते त्यास अप्रमत्त भाव म्हणतात.
वीतरागांनी सांगितले मुक्तीच्या हेतूने समज नसल्यामुळे तुम्ही गोंधळता. या गोंधळाविषयी तुम्ही मला विचारले पाहिजे की, माझा इथे गोंधळ होत आहे तर मी काय केले पाहिजे? असे विचारावे, त्यासाठीच तर आपण सत्संग ठेवत असतो.
एक जरी कर्म कमी झाले तरी गुंतागुंत दिवसेंदिवस कमी होत जाते. एका दिवसात एक जरी कर्म कमी केले, तर दुसऱ्या दिवशी दोन कर्म कमी करु शकाल. पण हा तर रोज नवीन गुंता करतो आणि त्यास वाढवतच जातो! हे सर्व काय एरंडेल पिऊन फिरत असतील? जणु एरंडेल प्यायलेले असेल असे तोंड करुन फिरतात हे सर्व. एरंडेल विकत आणत असतील का? इतके महाग एरंडेल रोज कुठून विकत आणतील? आतील परिणती बदलली की एरंडेल प्यायलासारखे तोंड होते! दोष स्वत:चा आणि चूक काढतो दुसऱ्याची, याच्याने आतील परिणती बदलून जाते. स्वतःचे दोष शोधा असे वीतरागी सांगून गेले, दुसरे काहीच सांगितले नाही. 'तू तुझ्या दोषाला ओळख आणि मुक्त हो. बस, एवढ्यानेच तुला मुक्तिधाम मिळेल. एवढेच काम करण्यास सांगितले भगवंतांनी.
गरज आहे अचूक ज्ञान आणि अचूक समजूतीची
एक आचार्य महाराज विचारतात की माझा मोक्ष केव्हा होईल? तेव्हा भगवंत सांगतात, की जेव्हा तुमचे ज्ञान आणि समजूत अचूक होईल तेव्हा. हीच चूक आहे आणि याच चुकीमुळेच अडकून राहिले आहात. तुमचे ज्ञान आणि तुमची समजूत अचूक होईल तेव्हा तुमचा मोक्ष होईल. यात भगवंताने काय खोटे म्हटले?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.