________________
१३६
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
निर्दोष ठरवायचे. मग थोड्या वेळाने पुन्हा आतून आरडाओरडा करेल. 'तो तर असे-असे करतो, त्याला कशाला निर्दोष पाहता?' म्हणून एक्जक्टली जसे आहे तसे निर्दोष पाहायचे आणि एक्जेक्टली निर्दोषच आहे.
कारण हे जे जग आहे ना, जे तुम्हाला दिसते, तो सर्व तुमचा परिणाम आहे, कॉजेस (कारणं) दिसत नाहीत. तर आता परिणामात कोणाचा दोष?
प्रश्नकर्ता : कॉजेसचा दोष.
दादाश्री : कॉजेस करणाऱ्याचा दोष. म्हणजे परिणामात कुणाचाही दोष नसतो. असे हे जग परिणाम स्वरुप आहे. हे तर मी तुम्हाला अगदी छोटा ‘तारण' (हिशोब) काढायला शिकवले अजून तर दुसरे पुष्कळ हिशोब आहेत. कितीतरी हिशोब जमा झाले तेव्हा मी स्वीकार केला की, हे जग निर्दोष आहे. नाही तर असाच स्वीकार होईल का? ही काही नुसती थाप आहे ?
तुम्ही तुमच्या प्रतीतीत बसवा की हे जग निर्दोष आहे, शंभर टक्के निर्दोषच आहे. दोषीत दिसते तीच भ्रांती आहे आणि त्यामुळेच हे जग निर्माण झाले आहे बस, निर्माण होण्याच्या मागे दुसरे कोणतेही कारण नाही. ज्ञानदृष्टीने पाहायला गेलो तर जग निर्दोष आहे आणि अज्ञानतेने जग दोषित दिसते. जग जोपर्यंत दोषित दिसते. तोपर्यंत भटकत राहायचे आणि जेव्हा जग निर्दोष दिसेल तेव्हा आपली सुटका होईल.
जाणले तर त्यास म्हटले जाते जाणले तर तेव्हा म्हटले जाते की, कधीही ठोकर लागत नाही. खिसा कापला गेला तरीही ठोकर (दुःख) लागत नाही, आणि थोबाडीत मारले तरीही ठोकर लागत नाही, यास जाणले असे म्हटले जाते. हे तर 'मी जाणतो,' 'मी जाणतो' असे गात राहतो. बाकी 'जाणले' तर त्यास म्हटले जाते की, किंचितमात्र, नावापूरताही अहंकार नसतो. खिसा कापला,