________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
संपवल्या नंतर, स्वतःचे अज्ञान बीज नष्ट होते आणि ज्ञानबीज पूर्णपणे उगवते, ते म्हणजे अशरीर भाव. ज्यांना किंचितमात्र, थोडीही ममता देहावर आहे, त्यास अशरीर भाव म्हणू शकत नाही पण देहावरील ममता जाणार तरी कशी? जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत ममता जात नाही.
४७
या जगात सर्वकाही सापडते परंतु स्वत:ची चूक मात्र सापडत नाही. म्हणूनच स्वत:च्या चुका दाखविण्यासाठी ज्ञानींची गरज आहे. ज्ञानी पुरुषच असे सर्व सत्ताधारी आहेत की जे आपल्याला आपली चूक दाखवून त्याचे भान करवून देतात, आणि तेव्हा ती चूक संपते. असे केव्हा होईल ? तर जेव्हा ज्ञानी पुरुष भेटतील आणि आपल्याला निष्पक्षपाती बनवतील तेव्हाच. स्वतःसाठी सुद्धा निष्पक्षपातीपणा उत्पन्न होतो तेव्हाच काम होते. जोपर्यंत ज्ञानी पुरुष स्व स्वरुपाचे भान करवून देत नाहीत तोपर्यंत निष्पक्षपातीपणा उत्पन्न होत नाही. 'ज्ञान' कुणाचीही चूक काढत नाही, आणि बुद्धी सर्वांचीच चूक काढते. सख्ख्या भावाची सुद्धा चूक काढते.
अंधारातल्या चुका
हे तर 'ज्ञानी पुरुष' आहेत, म्हणून स्वतः ला स्वतःच्या दोषांची जाणीव होते. नाहीतर स्वतःला समजणारच कसे ? मग तर चालली स्टीमर कोचीनच्या दिशेने ! होकायंत्र बिघडलेले आहे, म्हणून कोचीनला चालली ! दक्षिणेलाच ते होकायंत्र उत्तर दाखवते ! नाहीतर होकायंत्र नेहमी उत्तर दिशेलाच घेऊन जाते, असा स्वभावच आहे ! होकायंत्र बिघडले म्हणून तो काय करेल? आणि स्वतःला तर ध्रुवतारा पाहता येत नाही.
सर्वात मोठी चूक म्हणजे स्वच्छंद, स्वच्छंदतेमुळे तर पूर्ण लष्कर तयार झाले आहे. स्वच्छंद, हीच मोठी चूक. सहजच जरी असे म्हटले की 'त्यात काय झाले ?' म्हणजे झाले, संपले. त्यामुळे मग अनंत जन्म बिघडतात.
'मी जाणतो' ही अंधारातील चूक तर फार मोठी आहे. आणि परत असे म्हणणे की ‘आत्ता काही हरकत नाही' ही चूक तर सर्वच संपवून