________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
बघायचे नसते. त्यांच्यात कषाय असतील तरी चालेल पण उदय कर्माचा गर्व नसावा. बस, इकतेच बघायचे.
३२
प्रत्येक जीव अनंत दोषांचे भाजन आहे. कृपाळु देवांनी म्हटले आहे की, 'मी तर अनंत दोषांचा भाजन आहे करुणाळ' असे बोला.
सर्वात मोठा दोष
भगवंताने संसारी दोषाला दोष म्हटले नाही. 'तुझ्या स्वरुपाचे अज्ञान' हाच सर्वात मोठा दोष आहे. 'मी चंदुभाऊ आहे' तोपर्यंत दुसरे दोष टिकून आहेत. आणि एकदा जर 'स्वतःच्या स्वरुपाचे भान झाले की मग अन्य दोष पळ काढतात !
स्वत:ची एकही चूक दिसत नाही. आपण विचारले की 'शेठ, तुमच्यात एखादा दोष तर असेलच ना ? तेव्हा म्हणेल 'होय, थोडासा क्रोध आणि जरासा लोभ आहे. दुसरा कोणताच दोष नाही.' मग तिथे तर तू अनंत दोष आहेत असे बोलतोस आणि इथे पुन्हा... दोनच आहेत असे सांगतोस! म्हणजे आपण विचारतो तेव्हा त्याला वाटते की आपली अब्रू जाईल. अरे, पण अब्रू होतीच कुठे ? अबूदार कोणास म्हणावे की जो मनुष्यातून पुन्हा चार पायात जात नाही, त्याला म्हणतात अबूदार !
अरे, एवढा पक्का माणूस तू. देवाजवळ तर 'मी अनंत दोषांचे भाजन आहे' असे बोलतोस आणि इथे बाहेर दोनच दोष आहेत असे सांगतोस ! आपण जर विचारले की, 'तू देवाजवळ बोलत होतास ना ?' तेव्हा म्हणेल, 'हे सर्व तर तिथे बोलायचे असते, इथे नाही' त्यापेक्षा तर टरबूज चांगले, त्याच्यात एवढे दोष नसतात! अरे, देवाजवळ वेगळे बोलतोस आणि इथे वेगळे बोलतोस? आणखी किती चक्कर फिरशील तू ?
म्हणे थोडासा क्रोध आणि जरासा लोभ आहे, या दोन चुकांचाच मालक! भगवंत जेव्हा इथे विचरत ( वावरत) होते ना, तेव्हा त्यांच्यात पाच लाख चुका होत्या आणि हा दोनच चुकांचा मालक ! भगवंत जेव्हा