________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दादाश्री : नाही. दोषही बघायचे नाहीत आणि गुणही बघायचे नाहीत. हे जे दिसतात ते सर्व प्राकृत गुण आहेत. त्यातील एकही गुण टिकणारा नाही. एखादा दानशूर असेल, तर त्याच्यात पाच वर्षापासून ते पन्नास वर्षांपर्यंत तेच (दानेश्वरीचेच) गुण असतील, पण जेव्हा सन्निपात होतो तेव्हा तो गुण बदलतो. हे गुण तर वात, पित्त आणि कफामुळे आहेत. आणि या तिन्हींमध्ये जेव्हा बिघाड होतो, तेव्हा सन्निपात होतो! असे गुण तर अनंत जन्मांपासून जमा केले आहेत. पण तरी असे प्राकृत दोष जमा करु नये. प्राकृत सद्गुण प्राप्त केले तर कधीतरी आत्मा प्राप्त करु शकेल. दया, शांती हे सर्व गुण असतील पण तिथेही जर वात, पित्त आणि कफ बिघडले तर तो सर्वांना मारतच राहतो. यास तर प्रकृतीची लक्षणे म्हणतात.
अशा गुणांनी पुण्यानुबंधी पुण्य बांधले जाते. ज्यामुळे मग एखाद्या जन्मात 'ज्ञानीपुरुषांची भेट झाली तर (मोक्षाचे) काम होते. पण अशा गुणांमध्ये गुंतून राहू नये. कारण ते गुण केव्हा बदलतील ते सांगता येत नाही. हे स्वतःच्या शुद्धात्म्याचे गुण नाहीत. हे सर्व तर प्राकृत गुण आहेत. या गुणांना तर आम्ही भोवरा म्हटले आहे.
संपूर्ण जग या प्राकृत गुणांमध्येच वसले आहे. संपूर्ण जग हे भोवऱ्यासारखेच आहे. हे तर सामायिक-प्रतिक्रमण प्रकृती करवून घेत असते आणि तो मात्र स्वत:च्या डोक्यावर घेतो आणि म्हणतो की 'मी केले.' हे जर देवाला विचारले, तर देव म्हणेल, की तू काहीच करत नाहीस. एखाद्या दिवशी पाय दुखत असेल तर, म्हणेल 'मी काय करु?' प्रकृती बळजबरीने करुन घेते आणि हा म्हणतो की, 'मी केले!' आणि म्हणूनच तो पुढील जन्माचे बीज टाकतो. हे सर्व उदय कर्मांमुळे होत असते आणि स्वतः त्याचा गर्व करतो. उदय कर्माचा गर्व करतो, त्याला साधू कसे म्हणायचे? साधू महाराजांची ही एक चूक आहे की ते उदय कर्माचा गर्व करतात. ही चूक होत असेल आणि जर ही एकच चूक संपवली मग तर कामच (कल्याण) झाले! उदय कर्माचा गर्व साधू महाराजांना आहे की नाही इतकेच बघून घ्यावे. दुसरे बाहेरचे काहीच