________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
प्रश्नकर्ता : आणि दोष करणारा सुद्धा?
दादाश्री : तो सुद्धा अहंकार आहे आणि दोषी बघणारा सुद्धा अहंकारच आहे.
प्रश्नकर्ता : दोष सुद्धा अहंकार आहे, असे का सांगता तुम्ही?
दादाश्री : अर्थात दोष करणारा, बस. तरी दोष करणारा अहंकारी नसूही शकतो. आपले ज्ञान घेतलेला असेल आणि पाच आज्ञांचे पालन बरोबर करीत असेल, तर त्याच्या दोषाला दोष म्हटले जात नाही. कारण तो 'स्वत:च' स्वत:चे दोष पाहणारा असतो. पण दोष हा भरलेला माल आहे, 'तुमचा' दोष नाही. अर्थात अशी सापेक्षता आहे यात, हे फक्त एकांतिक नाही. पण दोष बघणारा तर अहंकारीच असतो.
प्रश्नकर्ता : म्हणजे दादाजी, दोष करणारा हा अहंकारी नसूही शकतो का?
दादाश्री : नसूही शकतो. प्रश्नकर्ता : आणि दोष बघणारा मात्र अहंकारी असतोच.
दादाश्री : असतोच, एकांतिक रुपाने. एकांतिक रुपाने असतोच. या जगात दोष पाहणारा एकांतिक रुपाने अहंकारी असतोच.
___ महत्त्वाचे आहे चुकांचे भान होणे
चूक झाली हे जर लगेच लक्षात येत असेल तर कोणी चूक करणारच नाही ना! पण मग चोवीस तास झाल्यानंतर सुद्धा लक्षात येत नाही.
प्रश्नकर्ता : हे तर जेव्हा दु:ख भोगवे लागते ना, तेव्हा समजते.
दादाश्री : भोगण्याचा परिणाम तर सहा महिन्यानंतर येतो, स्वतःला काही समजतच नाही.