________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
११३
असतात, पण आम्ही निवडत असू आणि ज्यांच्याशी व्यवहार असेल, ते आमच्या निवडलेल्या गव्हात बिन निवडलेले गहू टाकत असतील तेव्हा आम्हाला त्यांना सांगावे लागते की, 'बाबा, असे करु नका.'
दादाश्री : कोणी बिन निवडलेले गहू केव्हा टाकेल की जेव्हा आपले गहू सुद्धा बिन निवडलेले असतील ना, तेव्हाच टाकेल. आपले निवडलेले असतील तर नाही टाकणार. असा नियम आहे.
हे तर इंद्रियगम्य ज्ञान प्रश्नकर्ता : नाही, पण दादा आपण एखाद्या वस्तूचा समभावे निकाल करत असतो, की 'भाऊ ही वस्तू चांगली नाही.' ह्या वस्तूमुळे क्लेश होत आहे. ह्या वस्तूमळे व्यवहार बिघडत आहे. पण समोरचा मनुष्य समभावे निकाल करण्याऐवजी असे म्हणेल की, 'मी तर असेच करणार. तुला जे करायचे असेल ते कर' मग तिथे व्यवहार कसा करावा?
दादाश्री : असे आहे ना, हे सर्व बुद्धीचे चाळे आहेत. जो परिणाम बदलत नाही, तिथे पाहत राहावे की याचा कसा परिणाम होत आहे ! म्हणजे समोरच्याची प्रकृती पाहत राहावी. आता हे चाळे कोण करत असते?
प्रश्नकर्ता : पुद्गल?
दादाश्री : बुद्धी करत आहे. नाही तर जे परिणाम आहेत त्यांना आपण पाहत राहायचे. पाहिले म्हणजे आपण आत्मा झालो. आणि जर दोषांना पाहाल तर प्रकृती स्वरुप होऊन जाल.
प्रश्नकर्ता : दादा, लोक तर असे सांगतात की, 'आम्ही तर तुमच्या प्रकृतीची चूक काढत आहोत आणि आम्ही त्याला (चूक काढणाऱ्याला) पाहत असतो की हा तुमची चूक काढत आहे.
दादाश्री : नाही, चूक काढणारा पाहू शकत नाही आणि पाहणारा चूक काढत नाही. काही नियम तर असतातच ना?!