________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
स्वतःचे सर्व दोष दिसतात. सहजही मनोभाव बदलले तरीही लक्षात येते की हा दोष झाला. हा तर वीतरागी मार्ग, एक अवतारी मार्ग आहे. हा खूप जबाबदारीचा मार्ग आहे. एका जन्मात सर्वच स्वच्छ झाले पाहिजे. आधी इथेच स्वच्छ झाले पाहिजे.
४२
म्हणजे फक्त दोषांचेच भांडार आहात. इथे ज्ञानविधीत याल तर मी तुमचे सर्व दोष धुऊन देईन. ते धुण्याचे माझ्या वाट्याला आले आहे. त्यानंतर स्वतःचे दोष दिसतील आणि स्वत: चे दोष दिसू लागले तर समजावे की आता मोक्षाला जाण्याची तयारी सुरु झाली. बाकी कुणालाही स्वतःचे दोष दिसले नाहीत.
आत्मा स्वत:च थर्मामीटर समान
स्वतः जे काही करतो त्यात स्वतःची चूक आहे असे कधीच त्याच्या लक्षात येत नाही. स्वतः जे करत असेल, सहजभावे जे कार्य, क्रिया करत असेल त्यात स्वतःची चूक आहे असे त्याला कधीही वाटत नाही. उलट कोणी चूक दाखवली तर त्याला ते उलटेच दिसते. तो जप करत असेल किंवा तप करीत असेल, किंवा त्याग करीत असेल, त्यात त्याला स्वतःची चूक दिसत नाही. चूक तर जेव्हा तो आत्मस्वरुप होतो, ज्ञानी पुरुषांनी दिलेला आत्मा प्राप्त होतो, तेव्हा आत्मा हा एकमेव थर्मामीटर समान आहे की जो चूक दाखवतो, त्याशिवाय कोणीही चूक दाखवू शकत नाही. स्वत:ची चूक कुणाला दिसतच नाही. चूक दिसली म्हणजे (मोक्षाचे) कामच झाले ना !
चूक संपवली तर परमात्मा होतो. स्वतः परमात्मा तर आहेच परंतु परमात्म्याची सत्ता केव्हा प्राप्त होते ? चूक संपते तेव्हा! पण ती चूक संपत नाही आणि सत्ता प्राप्त होत नाही आणि लोकांचे सासु-सासरे बनून खुश होतात. चूक संपली तर सत्ता प्राप्त होते, परमात्म्याची सत्ता प्राप्त होते. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 'स्वतः परमात्मा आहे' असे लक्ष्य प्राप्त झाले, म्हणून आता तो हळूहळू श्रेणी चढत जातो आणि सत्ता प्राप्त होत राहते.