________________
आत्मदृष्टी झाल्यानंतर...
१०१
चुकांचे भांडार आत भरलेले आहे. क्षणोक्षणी दोष दिसतील तेव्हा काम झाले असे म्हटले जाते. हा सर्व माल तुम्ही भरुन आणला आहे, तो (मला) विचारल्या शिवायच ना! शुद्धात्म्याचे लक्ष्य बसले म्हणून चुका दिसतात. तरीही जर चुका दिसत नसतील तर त्यास निव्वळ प्रमादच म्हटले जाईल.
शुद्ध उपयोग, आत्म्याचा आत्म्याचा शुद्ध उपयोग म्हणजे काय? आत्म्याच्या बाबतीतही दुर्लक्ष करु नये. जराशी डुलकी आली तर पतंगाचा दोरा अंगठ्याला गुंडाळून डुलकी घ्यावी. त्याचप्रमाणे आत्म्याच्या बाबतीतही जरा सुद्धा अजागृती ठेवू नये. या मन-वचन-कायेचे दोष तर क्षणोक्षणी दिसले पाहिजेत. या दुषमकाळात तर दोष नसेल अशी कायाच नसते. जेवढे दोष दिसू लागतील तेवढी (ज्ञानाची) किरणे वाढली असे म्हटले जाईल. या काळात हे अक्रम ज्ञान तर आश्चर्यकारक प्राप्त झाले आहे. तुम्हाला फक्त जागृती ठेवून भरलेला माल रिकामा करायचा आहे, सारखे धुत राहायचे आहे.
अनंत चुका आहेत. चुका असल्यामुळे झोप येते. नाही तर झोप कसली? झोप येते त्यास तर शत्रू मानले जाते. प्रमादचर्या म्हणतात! शुभ उपयोगातही प्रमादाला अशुभ उपयोग म्हणतात. ज्ञानी पुरुष तर तासभरच झोपतात. निरंतर जागृत राहतात. आहार कमी झाला असेल, झोप कमी झाली असेल तेव्हा जागृती वाढते. नाही तर प्रमादचर्या असते. जास्त झोप येणे यास प्रमाद म्हणतात. प्रमाद म्हणजे आत्म्यास गाठोड्यात बांधून ठेवण्यासारखे आहे. जेव्हा झोप कमी होते, आहार कमी होतो तेव्हा समजावे की प्रमाद कमी झाला. चूक संपते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर लाईट (तेज) येते. वाणी सुंदर निघते, लोक त्याच्या मागे-मागे फिरतात. आपल्यात चुका नाहीत असे मानून बसून राहिला तर चूक दिसणारच कशी? निवांतपणे झोपून राहतो. आपले ऋषिमुनी झोपत नसत, खूप जागृत होते.