________________
१०२
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
चुका, उजेडातील
स्थूल चुका तर समोरासमोर संघर्ष झाल्याने बंद होऊन जातात. पण सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम चुका तर इतक्या असतात की, त्या जसजशा निघत जातात तसतसा त्या मनुष्याचा सुगंध येत जातो. या चुका तर अंधारातील चुका आहेत. त्या स्वतःला दिसत नाहीत. ज्ञानी पुरुष जेव्हा प्रकाश फेकतात तेव्हाच त्या दिसतात. त्यापेक्षा उजेडातील चुका चांगल्या. त्या इलेक्ट्रिसिटीवाल्या असतात म्हणून स्वतःला लगेच दिसतात.
प्रश्नकर्ता : इलेक्ट्रिसिटीवाल्या चुका म्हणजे काय ?
दादाश्री : त्या सर्व उघड्या चुका, आतल्याआत घुसमट करवून निघून जातात. त्यामुळे सतत जागृतीत राहू शकतो. त्या चांगल्या म्हटल्या जातात. परंतु अंधारातील चुका तर कुणाला दिसतच नाहीत. त्यात स्वतःच प्रमादी असतो, स्वतः अपराधी असतो आणि दाखविणाराही कोणी भेटत नाही. इलेक्ट्रिसिटीवाल्या चुकांना कोणी दाखविणारा तरी भेटतो. स्वतःच्या चुका स्वतःला चावतात, अशा चुकांना आम्ही इलेक्ट्रिसिटीवाल्या चुका म्हणतो आणि अंधारातील चुका म्हणजे स्वतःच्या चुका स्वतःला चावत नाहीत. ज्या चूका चावतात त्या लगेच दिसतात पण ज्या चावत नाहीत त्या नजरेआड निघून जातात. अंधारातील चुका आणि अंधारातील गोष्टी, त्यापेक्षा तर कठोर माणसाच्या उजेडातील चुका चांगल्या, मग त्या जरी ढीगभर असोत. जेव्हा नावडती परिस्थिती आली असेल, कोणी दगडाने मारले तेव्हा चुका दिसतात. स्ट्राँग परमाणूवाली चूक असेल तर ती लगेचच दिसते, अशी व्यक्ती खूप कडक असते. तो ज्या बाजूला शिरतो तिथे खोलवर जातो. संसारात शिरला तर संसारात खोलवर जातो. आणि ज्ञानात शिरला तर ज्ञानात खोलवर जातो.
प्रकट होते केवळ ज्ञान, अंतिम दोष गेल्यावर
'माझ्यात चूक नाहीच' असे कधी बोलूच नये. असे बोलूच शकत नाही. ‘केवळ' झाल्यानंतरच चुका राहत नाहीत. भगवान महावीरांना