________________
१४०
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
साप, विंचू सुद्धा आहेत निर्दोष या जगात कोणी दोषी नाहीच. प्रश्नकर्ता : जे काही आहे ते उदयकर्मामुळेच आहे, म्हणूनच ना?
दादाश्री : हो, संपूर्ण जग निर्दोषच आहे. कोणत्या दृष्टीने निर्दोष आहे? तेव्हा म्हणे, जर शुद्धात्मा पाहिला तर निर्दोषच आहे! मग दोषी कोण आहे ? तर बाहेरील पुद्गल ना! ज्याला जग मानते, ते पुद्गल...! आपल्याला काय जाणायचे आहे की, आज हे पुद्गल उदयकर्माच्या अधीन आहे, स्वतःच्या अधीन नाही, स्वत:ची इच्छा नसेल तरीही करावे लागते. तेव्हा तो बिचारा निर्दोषच आहे. म्हणूनच आम्हाला संपूर्ण जग, जीवमात्र निर्दोषच दिसतात. जग निर्दोष स्वभावाचे आहे. संपूर्ण जग निर्दोषच आहे. तुम्हाला दुसऱ्यांचे दोष दिसतात ते तुमच्यात दोष असल्यामुळेच दिसतात. जग दोषी नाही, हे जर तुमच्या दृष्टीत आले तरच तुम्ही मोक्षाला जाल. जग दोषी आहे ही दृष्टी असेल तर तुम्हाला इथेच आरामशीर पडून रहावे.
कोणी जप करत असेल, तप करत असेल तर आपण त्याचा दोष का पाहावा? 'व्यवस्थित शक्ती' च्या ताब्यात जसे असेल, तसे तो बिचारा करतो. त्यात आपले काय देणेघेणे? आपल्याला टीका करण्याचे काही कारण आहे का? आपण त्याच्याबरोबर नवीन करार का करावा? त्याला जसे अनुकूल वाटेल तसे तो करेल. आपले तर मोक्षाशीच काम आहे मोक्षाशिवाय दुसऱ्या कोणाशीही काम नाही. आणि आम्हाला जगात कोणीच दोषी दिसत नाही. खिसा कापणारा सुद्धा दोषी दिसत नाही. म्हणजे जगातील कुठलाही जीव दोषी दिसत नाही. साप असो, विंचू असो किंवा कोणीही असो, जो तुम्हाला दोषी दिसतो त्याची मग तुम्हाला भीती वाटायला लागते. आणि आम्हाला दोषी दिसतच नाही. तो कोणत्या आधारे दोषी नाही, तो आधार आम्ही ज्ञानाने जाणतो. दोषी दिसते ती तर भ्रांतदृष्टी आहे, हो, भ्रांत दृष्टी! हा चोर आहे आणि हा सावकार आहे, हा अमका आहे, ही सर्व भ्रांत दृष्टी आहे. आपले 'लक्ष्य' काय असले पाहिजे की,