________________
निजदोष दर्शनना ने. निर्दोष
समाधान आणू शकेल ना! आणि जर त्याने ऐकले नाही तरीही आमची काही हरकत नाही. आम्ही सांगतो की असे कर आणि जर नाही ऐकले तरी हरकत नाही.
३६
प्रश्नकर्ता : आपल्याला काहीच वाटत नाही ?
दादाश्री : मी जाणतो की हा कशाच्या आधारावर बोलत आहे ! उदयकर्माच्या आधारावर बोलत आहे. माझी आज्ञा न पाळण्याची त्याची इच्छा तर नाहीच. अशी इच्छा नसतेच ना ? म्हणून त्याला गुन्हा लागू पडत नाही, तो उदयकर्माच्या आधारावर असे बोलला, तेव्हा आम्हाला ते वळवून घ्यावे लागते. जर प्रकृती विरोधास उठली तर तिथे आम्हाला पथ्य (संयम) पाळावे लागते. स्वतःचे तर संपूर्ण अहित करतोच पण दुसऱ्यांचेही अहित करतो. बाकी, सरळ प्रकृतीवाले चुका करतात, करीतच राहतात. जगात साऱ्या प्रकृतीच आहेत.
तुला तुझ्या चुका दिसतात का ?
प्रश्नकर्ता : हो, चुका तर दिसतात.
दादाश्री : एकही चूक दिसत नाही तुला आणि जितके केस आहेत त्याहीपेक्षा जास्त चुका आहेत. त्या कशा समजतील तुला ?
प्रश्नकर्ता : चूक करणे किंवा न करणे ते कर्माधीन आहे ना ?
दादाश्री : ओहोहो ! हा छान शोध लावलास ! बघा ना, जणू लहान मुलेच आहेत ही सर्व ! बेभानपणा! बघा तरी, अजूनही विचारतो की चूक करणे किंवा न करणे हे कर्माधीन आहे की काय मग विहिरीत कसा पडत नाहीस. तिथे तर सांभाळून चालतोस. आणि वेळ आली तर पळतो सुद्धा, तिथे का कर्माधीनपणा बोलत नाहीस ? ट्रेन येते तेव्हा रेल्वेचा रुळ ओलांडतोस की नाही ? तिथे कर्माधीन आहे असे का बोलत नाही.
स्वत:चे दोष स्वतःला कसे दिसतील ? दिसणारच नाहीत ना !