________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
या वयात सुद्धा असे बोलताना त्याला लाज वाटत नाही की, 'मी हिचा नवरा आहे.' बोलताना लाज वाटते का? आणि 'हा माझा नवरा आहे,' असे बायको सुद्धा बोलते. या वयातही त्यांना लाज वाटत नाही. ऐंशी वर्षाचे झाले त्यांनाही लाज वाटत नाही. कारण ते जसे जाणतात तसेच बोलतात आणि लोकांना समजेल असेच बोलतील ना! मग काय करणार? पण ते ज्ञान खोटे नाही, ते व्यवहारिक ज्ञान आहे, खरे ज्ञान नाही.
खऱ्या ज्ञानात तर तुम्ही शुद्धात्मा आहात आणि तेही शुद्धात्मा आहेत. पण त्या शुद्धात्म्याचे भान झाले पाहिजे ना? आता तर 'मी चंदुलाल आहे हे भान आहे, मी जैन आहे हे दुसरे भान आहे. वय चौऱ्यात्तर वर्ष आहे, हे सुद्धा भान आहे. सर्व प्रकारचे भान आहे. बालपणी कुठे-कुठे खेळायला गेलो होतो याचेही भान आहे. नोकरी कुठे-कुठे केली, व्यापार कुठे-कुठे केला याचेही भान आहे. स्वतः कोण आहे? याचे मात्र भान नाही.
प्रश्नकर्ता : आता ते ज्ञान तुम्ही द्या. खरे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जागृत झाली आहे म्हणूनच इथे आलो आहोत.
दादाश्री : या ज्ञानासाठी तर जन्मोजन्म इच्छा असते, पण खरा नियाणां कधी केला नाही. जर खरा नियाणां केला असता तर संपूर्ण पुण्य त्यात वापरले जाते. नियाणांचा स्वभाव काय? तर तुमचे जेवढे पुण्य असेल ते सर्व नियाणां साठी वापरले जाते.
इथे तर घरासाठी पुण्य वापरले गेले, देहासाठी पुण्य वापरले गेले, या सर्व गोष्टींसाठी पुण्य वापरले गेले, परंतु मोक्षाचा नियाणां केलेलाच नाही ना! मोक्षाचा नियाणा केला तर संपूर्ण पुण्य त्यातच वापरले जाते. बघा ना, आम्ही मोक्षाचा नियाणां केला होता म्हणून सर्वकाही सुरळीत चालत आहे. ज्या काही अडचणी असतील त्या मिलमालकांना असतील, पंतप्रधानाला असतील पण आम्हाला काहीच अडचण नाही.