________________
१३४
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
दादाश्री : हो, हेच की हा माझ्याच कर्माचा उदय आहे, त्याचा दोष नाही. यास जागृती म्हणतात.
आणि तुम्ही जर समजल्याशिवाय असेच बोललात की, संपूर्ण जग निर्दोष आहे, तर ते अजून पूर्णपणे तुमच्या अनुभवात आलेले नाही.
म्हणजे काही बाबतीत तुमचे असे डिसाईड (नक्की) होऊन जाते आणि काही बाबी अशा असतील की ज्यात डिसिजन (निर्णय) होत नाही. म्हणून हे तुम्ही मानूनच घ्यायचे. नंतर जेव्हा टाईम येईल तेव्हा ते डिसाईड होऊन जाईल. आपल्याला उत्तर माहीत असेल तर मग हिशोब लिहिता-लिहिता जेव्हा उत्तर मिळते तेव्हा समजते. उत्तर माहीत असलेले चांगलेच आहे ना!
प्रश्नकर्ता : हो. आता आम्हाला कुठलेही फळ मिळाले किंवा कुठलेही कार्य झाले, प्लस किंवा मायनस (कमी किंवा जास्त) पण ते आपल्या कर्माच्या अधीनच आहे, असेच मानले जाते...
दादाश्री : हो, यात दुसरे काहीच नाही. सर्व काही आपलेच आहे. मायनस म्हटले तरी आपले आणि प्लस म्हटले तरीही आपले. परंतु व्यवहारात तुम्ही समोरच्याला असे सांगितले पाहिजे की, भाऊ साहेब, तुम्ही चांगले काम करुन दाखवले, असे बोलले पाहिजे. आणि खराब केले असेल तर त्याला असे म्हणू नये की तुम्ही खराब काम केले.
प्रश्नकर्ता : मग त्याला काय सांगावे?
दादाश्री : त्याला काहीच सांगायचे नाही. त्याच्या प्रति मौन राहायचे. कारण, जर चांगले म्हटले नाही तर त्याला एन्करेजमेन्ट (प्रोत्साहन) मिळणार नाही. त्याला वाटेल की, हे शेठ तर काही बोलतच नाही. तो तर असेच मानतो ना की 'हे मीच केले!' तुमच्या कर्माच्या उदयाने तो करत आहे, असे त्याला माहीत नाही. तो तर असेच म्हणेल की, 'हे मी माझ्या मेहनतीने केले आहे.' तेव्हा आपल्याला 'हो' म्हणावे लागते.