________________
पण आत्म्याला तर आनंदाची सुध्दा पडलेली नसते. त्याला तर जसे आहे तसे पाहण्यातच सर्वस्व आहे! ___दोषांमुळे अंतराय आणि अंतरायामुळे संपूर्ण आनंदाचा अनुभव थांबतो!
परमपूज्य दादाश्री स्वत:च्या ज्ञान दशेचे वर्णन करताना सांगतात की, 'आम्हाला तर एका केसाइतकी चूक झाली तरी लगेच लक्षात येते!' तर ते आत कसे कोर्ट असेल?! कसे जजमेन्ट असेल? कोणाशीही मतभेद नाही. गुन्हेगार दिसतो तरी त्याच्याशीही सुद्धा मतभेद नाही! बाहेरुन गुन्हेगार, आत तर कोणताच गुन्हा नाही.
म्हणून दादाश्री संपूर्णपणे निर्दोष झालेत आणि संपूर्ण जगाला निर्दोष पाहिले!
ज्ञानी पुरुषांची एकही स्थूल किंवा सूक्ष्म चूक नसते! सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम चुकाच असतात. ज्ञानी अशा चुकांचे संपूर्ण ज्ञाता-दृष्टा असतात आणि त्या चुका कोणाचेही नुकसान करणाऱ्या नसतात, मात्र स्वतःच्या 'केवळ ज्ञानाला' च बाधक असतात!
अंतिम प्रकारची जागृती कोणती? तर या जगात कोणी दोषीच दिसत नाही!
ज्याने सर्व चुका संपवल्या, त्याचा या जगात कुणीही वरिष्ठ राहिला नाही! म्हणून ज्ञानी पुरुषांना देहधारी परमात्मा म्हणतात.
दादाश्री सांगतात की, 'आम्ही' दोघे वेगळे आहोत. आत जे प्रकट झाले आहेत ते 'दादा भगवान' आहेत. ते संपूर्ण प्रकट झाले आहेत, परम ज्योति स्वरुप! जे आम्हाला आमच्या आतील चुका दाखवतात. आणि तेच 'चौदालोकचे नाथ' आहेत! तेच 'दादा भगवान' आहेत! ३६० डिग्रीचे पूर्ण भगवान !